खान बहादूर खान, उत्तर-पश्चिम उत्तर प्रदेश राज्यातील रोहिलखंडचा शासक,ज्यांनी मातृभूमीला मुक्त करण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला, त्यांचा जन्म १७८१ मध्ये झाला.त्याने ईस्ट इंडिया कंपनीने देऊ केलेल्या अत्यंत उच्चपदास नकार दिला.
३१ मे १८५७ रोजी रोहिलखंडची राजधानी बरेली येथे वयाच्या ७० व्या वर्षी खान बहादूर खान यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले. त्यांनी रोहिलखंडच्या लोकांना‘भारताचे लोक’ असे संबोधून इतिहास रचला. आपल्या स्वातंत्र्याचा शुभ दिवस उजाडला आहे.
इंग्रज फसवणुकीचा अवलंब करू शकतात. ते हिंदूंना मुस्लिमांविरुद्ध भडकवण्याचा आटोकाट प्रयत्न करतील आणि त्याउलट. मुस्लिमांनो, जर तुम्ही पवित्र कुरआनचा आदर करत असाल आणि हिंदूंनो, जर तुम्ही गाई मातेची पूजा करत असाल, तर तुमचे क्षुद्र मतभेद विसरून या पवित्र युद्धाला हात द्या. एका झेंड्याखाली लढा आणि तुमच्या रक्ताच्या मुक्त प्रवाहाने हिंदुस्थानावरील इंग्रजांच्या वर्चस्वाचा कलंक धुवून टाका.
खान बहादूर खान यांच्या नेतृत्वाखाली शोभाराम पंतप्रधान बनला होता, जो त्याच्या प्रामाणिकपणासाठी ओळखला जातो आणि बख्त खान सेनापती झाला होता. जेव्हा हिरवा रोहिलखंडात स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला ध्वज फडकावला, ब्रिटिश राज्यकर्त्यांना धक्का बसला.
खान बहादूर खान यांनी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी विविध पावले उचलली. त्यांनी हिंदू सणांमध्ये गोहत्येवर बंदी घातली. त्यांच्या अनेक प्रयत्नांमुळे इंग्रजांना त्यांचे स्वार्थ साधण्यासाठी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडता आली नाही. हे खुद्द इंग्रजांनीही त्यांच्या अहवालात मान्य केले आहे.
शेवटी ब्रिटीश सेनापतींनी प्रचंड सैन्यासह बरेलीला वेढा घातला. प्रतिकूल परिस्थितीत खान बहादूर खान शेवटच्या क्षणापर्यंत शत्रूशी लढले.
५ मे १८५८ रोजी ते आपल्या नाममात्र सैन्यासह नेपाळच्या जंगलात परतले. पण नेपाळचा शासक जो ब्रिटीश समर्थक होता, जंग बहादूर यांनी खान बहादूर खान यांना इंग्रजांच्या स्वाधीन केले. त्यांनी रोहिलखंडचा नेता बहादूर खान आणि ईस्ट इंडिया कंपनीविरुद्धच्या लढाईत भाग घेतलेल्या इतर २४३ जणांना फाशीची शिक्षा दिली.
या सर्वांना २४ मार्च १८६० रोजी बरेली येथील ब्रिटीश कमिशनरच्या जुन्या कार्यालयाच्या इमारतीत एका मोठ्या वटवृक्षाला टांगण्यात आले. मातृभूमीला सलाम करत खान बहादूर खान आपल्या देशबांधवांसह मातृभूमीच्या मातीत विलीन झाले.
लेखक : सय्यद नसीर अहमद
भाषांतर : शाहजहान मगदुम
Post a Comment