भाजपच्या एका नेत्याचे असे म्हणणे आहे की ज्या लोकांनी गुन्हे केले असतील देशाचा कायदा त्यांना अटक करणारच. पण एकीकडे अशा लोकांची धरपकड होत असताना दुसरीकडे बरेच असे लोक आहेत ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत, त्यांची चौकशी त्याच संस्थांद्वारे होत आहे ज्या संस्था इतर लोकांविरुद्ध कारवाई करत आहेत. तरीदेखील वर्षानुवर्षे कारवाई होत राहते आणि त्यांना शिक्षा मिळत नाही, कारण ही कारवाई वाटेतच बंद पडते. न्यायालयीन निकाल दिलाच जात नाही. यासाठी कोण जबाबदार! जर गुन्हे करणाऱ्या लोकांच्या दारी कायदा पोलोचणारच असेल तर हा कायदा इतर लोकांचा हात मध्येच का सोडून देतो? तर काहींचे हात धरून त्यांना आपल्या बरोबर घेऊन जातो, हे समजण्यापलीकडचे आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे झाली, आपण स्वातंत्र्याचा अमृतकाळ साजरा करत आहोत, पण या देशाला आणि राष्ट्राला या पुढची वाट कोणती हे सापडत नाही. या समस्येला जबाबदार कोण? ज्यांनी आजवर सत्ता भोगली, चालवली, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि उभारणी केली ते की त्यांच्यानंतर जे दुसरे लोक आलेत ते? कुणी आता यापुढे राष्ट्राला सध्याच्या अत्यंत वाईट वळणावरुन सुखरुप पुढे नेणार आहे?
राहुल गांधी यांनी देशव्यापी भारत जोडो यात्रा काढली होती, आपल्या दीड वर्षांच्या यात्रेची सांगता होत असताना त्यांनी बरेच काही सांगितले. ते म्हणतात की देश काय आहे, देशाचे नागरिक कसे आहेत हे त्यांना ह्या यात्रेनंतर कळाले. म्हणजे एक असा पक्ष ज्याने देशाचे नेतृत्व केले, स्वातंत्र्य चळवळ चालवली, दीडएक वर्षांचा ज्याचा इतिहास त्यांच्या एका मोठ्या नेत्याला राष्ट्र आणि नागरिकांविषयी फार काही माहीत नव्हते. यासाठी त्यांना दीड वर्षे पायी यात्रा काढावी लागली आणि याद्वारे त्यांनी लक्षावधी नागरिकांशी संपर्क साधला. झाले असे की देशाला स्वातंत्र्य मिळाले पण राष्ट्राचा जसा बौद्धिक, वैयक्तिक आणि नैतिक विकास व्हायचा होता तसा तो झाला नाही. काँग्रेस पक्षाने देशाला बरेच काही दिले. अल्पकाळात विकासाची गाथा निर्माण केली, पण राष्ट्रात माणसामाणसांमध्ये जी विषमता आहे त्याकडे लक्ष दिले नाही. इतकेच नाही तर जी सामाजिक व्यवस्था पूर्वापार इथे चालू होती ती जशीच्या तशी राहू दिली. स्वतः राहुल गांधींनी आपल्या भाषणात याची कबुली दिली आहे की एका सामान्य माणसाला बुद्धिमत्ता नसते. फक्त उच्च परंपरेचेच लोक बुद्धिमान असतात. असे आमच्या देशाचे चित्र आहे असे राहुल गांधी यांनी सांगितले. दुसरे असे की सत्तेपासून किती संपत्ती कमवायची की गोळा करायची याचे भान सत्ताधारीवर्गाला राहिले नाही.
आज या देशाची जी दशा झाली त्याला प्रत्येक राजकीय पक्ष जबाबदार आहे. एका खासदाराकडे १००-२०० कोटींची संपत्ती येते कुठून? याचा हिशोब कधी राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना विचारला असता तर आज देशाला ईडीच्या हवाली केले जाऊ शकले नसते. याचा अर्थ असा नाही की फक्त एकाच पक्षाचे लोक बळी पडत आहेत, आज ज्याच्याकडे सत्तेची चावी आहे ते आपल्या राजकीय उद्दिष्टासाठी तिचा वापर करत असतील पण याच्या परिणामांनाही त्यांनाच सामोरे जावे लागते जे सत्ता, संपत्ती आणि संधीचा दुरुपयोग करत असतात. काँग्रेसपासून याचा धडा इतर पक्षांनी घेतला तर ते त्यांच्याच भल्याचे असणार आहे.
काँग्रेस पक्षाला जवळपास २००० कोटींचा आयकर विभागाने नोटीस बजावली तेव्हा राहुल गांधींनी असे म्हटले होते की उद्या कुणीही सत्तेवर येऊ शकतो, याचे भान संस्थांनी ठेवायला हवे. यानंतर लगेचच याचे परिणाम आले. नोटिशीची मुदत वाढवण्यात आली आणि आप पक्षाचे संजय सिंह यांना जामीन मंजूर झाला!
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक,
मो.: 9820121207
Post a Comment