Halloween Costume ideas 2015

मोहम्मद शेर अली (१८४२-१८७२)


ब्रिटीशविरोधी भावनेचे मूर्त रूप असलेले मोहम्मद शेर अली यांचा जन्म १८४२ मध्ये पेशावर, सध्या पाकिस्तानात झाला. लहानपणीच इंग्रजांविरुद्ध उठलेल्या वहाबी चळवळीतून त्यांना प्रेरणा मिळाली. १८६३ मध्ये ते पेशावरहून अंबाला येथे स्थलांतरित झाले. त्यांना २ एप्रिल १८६८ रोजी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली, कारण वैयक्तिक शत्रुत्वाच्या एका प्रकरणात ब्रिटिश न्यायालयाने त्यांना गुन्हेगार घोषित केले होते. मात्र तुरुंगातील त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे फाशीची शिक्षा कमी करून जन्मठेपेत आणण्यात आली आणि त्यांना अंदमानच्या तुरुंगात हलवण्यात आले.

देशबांधवांसाठी काहीही करू शकत नसल्यामुळे तुरुंगात त्यांना काळजी वाटत होती. इंग्रजांविरुद्ध सूड उगवण्याची त्यांची योजना होती. आपले ध्येय गाठण्यासाठी त्यांनी काळजीपूर्वक योजना आखली. त्यांनी आपल्या संतुलित वर्तनाने तुरुंग अधिकाऱ्यांना विश्वासात घेतले आणि सहकैद्यांचे केस कापण्याच्या कामासाठी नियुक्ती मिळवली. मोहम्मद शेर अली यांना केस कापण्यासाठी वापरण्यात येणारी सामग्री देण्यात आली होती, ज्यामध्ये एक धारदार चाकू होता, जो त्यांना शत्रूचा बदला घेण्यासाठी वापरायचा होता. ते संधीची वाट पाहत असताना, द ब्रिटीश व्हाईसरॉय लॉर्ड मेयो यांनी ८ फेब्रुवारी १८७२ रोजी अंदमान तुरुंगाला भेट दिली. ते ब्रिटिश अधिकारी लॉर्ड मेयोच्या आगमनाची बदला घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते. व्हाईसरॉय तुरुंगाच्या कक्षांची पाहणी करत असताना शेर अली यांनी अचानक उडी मारली आणि व्हाईसरॉयवर चाकूने हल्ला केला. अशा प्रकारे त्यांनी काही क्षणांतच व्हाईसरॉयचा वध केला.

नंतर त्यांनी खटल्यात उघडपणे आपला गुन्हा कबूल केला आणि म्हणाले, “मी जेव्हा माझ्या देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत उतरलो तेव्हा मी माझ्या आयुष्यावर सर्व आशा सोडल्या होत्या. मी निदान आमच्या एका शत्रूला तरी संपवू शकलो. मी माझे कर्तव्य पार पाडू शकलो. तुम्ही सर्व जण ईश्वराच्या दरबारातील माझ्या उदात्त कर्तव्याचे साक्षीदार व्हाल.” व्हाईसरॉयच्या हत्येसाठी मोहम्मद शेर अली यांना पुन्हा फाशीची शिक्षा झाली. फाशी देण्यापूर्वी शेर अली यांनी सांगितले की, “मला त्याच्या कृत्याबद्दल पश्चात्ताप होत नाही, उलट अभिमान वाटतो”. त्यांना ११ मार्च १८७२ रोजी वायपर बेटावर फाशी देण्यात आली. इतिहासकार शांतीमोय रॉय यांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहताना म्हटले की, “शहीद मोहम्मद शेर अली हे त्यांच्या शौर्य, देशप्रेम आणि देशासाठीच्या वचनबद्धतेने प्रेरित होऊन इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या क्रांतिकारकांच्या पुढच्या पिढीसाठी आदर्श बनले होते.”


लेखक : सय्यद नसीर अहमद

भाषांतर : शाहजहान मगदुम


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget