६) त्यांच्यात (जनावरांत) तुम्हासाठी सौंदर्य आहे, जेव्हा सकाळी तुम्ही त्यांना चरावयास पाठविता आणि जेव्हा संध्याकाळी तुम्ही त्यांना परत आणता.
(७) ते तुमच्यासाठी ओझे वाहून अशा अशा ठिकाणी घेऊन जातात जेथे तुम्ही जिवापाड परिश्रमाशिवाय पोहचू शकत नाही. वस्तुस्थिती अशी आहे की तुमचा पालनकर्ता फारच मायाळू व दयावान आहे.
(८) त्याने घोडे व खेचरे आणि गाढवे निर्माण केली की जेणेकरून तुम्ही त्यांच्यावर स्वार व्हावे आणि ती तुमच्या जीवनाची शोभा व्हावी. तो पुष्कळशा अन्य वस्तू (तुमच्या फायद्यासाठी) निर्माण करतो ज्याचे तुम्हाला ज्ञानदेखील नाही.४
(९) आणि अल्लाहवरच आहे सरळमार्ग दाखविणे जेव्हा की वाममार्गदेखील अस्तित्वात आहेत. जर त्याने इच्छिले असते तर तुम्हा सर्वांना सद्बुद्धी दिली असती.
(१०) तोच आहे ज्याने आकाशांतून तुमच्यासाठी पर्जन्यवृष्टी केली ज्याने तुम्ही स्वत:देखील तृप्त होता आणि तुमच्या जनावरांसाठीसुद्धा चारा उत्पन्न होतो.
(११) तो त्या पाण्याद्वारे शेती फुलवितो आणि जैतून व खजूर व द्राक्षे आणि तर्हेतर्हेची इतर फळे निर्माण करतो. यात एक मोठी निशाणी आहे त्या लोकांसाठी जे गांभिर्याने विचार करतात.
(१२) त्याने तुमच्या कल्याणासाठी रात्र व दिवसाला आणि सूर्य व चंद्राला वश केले आहे आणि सर्व नक्षत्रेही त्याच्याच आज्ञेने वशीभूत आहेत. यात खूप निशाण्या आहेत त्या लोकांसाठी जे बुद्धीचा उपयोग करतात.
४) म्हणजे बर्याचशा अशा वस्तू आहेत ज्या मनुष्याच्या भल्यासाठी कार्यशील आहेत व माणसाला माहीतच नाही की कोणकोणत्या ठिकाणी किती सेवक त्याची सेवा करण्यात लागले आहेत व कोणती सेवा पार पाडीत आहेत
Post a Comment