मक्केतून स्थलांतर केल्यावर जेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) मदीनेत दाखल झाले त्या प्रसंगी सर्वप्रथम प्रेषितांनी तिथल्या लोकांना मोजक्या शब्दांत पहिलेवहिले प्रवचन दिले. ते असे-
“हे लोकहो, गोरगरीबांना जेवू घाला. सलम (शांततेचा) प्रसार करा आणि जेव्हा लोक झोपेत असतात अशा वेळी तुम्ही नमाज पढत राहा.” (तिर्मिजी)
त्यांच्या काही अनुयायींवर त्यांच्या या शिकवणीचा इतका प्रभाव पडला की त्यांनी रात्री झोपणेच सोडून दिले. शेवटी प्रेषितांना त्यांना याविषयी समजावून सांगावे लागले. हजरत उस्मान बिन मजऊन रात्रभर नमाज अदा करत. प्रेषितांनी त्यांना सांगितले की हे उस्मान, तुमच्या शरीराचाही तुम्हावर हक्क आहे. नमाज पढा, पण रात्री झोपसुद्धा घ्या.
इतर अनुयायी रात्री उठून नमाज पढत होते आणि फारच कमी झोप घेत होते. ह. अबु हुरैरा (र.) यांनी रात्रीचे तीन भाग केले. एका भागात ते स्वतः नमाज पढत होते. दुसऱ्या भागात त्यांच्या पत्नी आणि तिसऱ्या भागात त्यांचे गुलाम नमाज पढत होते. (बुखारी, सीरतुन्नबी, खंड ५, किबलानुअमानी सुलैमान नदवी)
गरीब आणि विधवेची सेवा करणाऱ्याचा मरातब अल्लाजवळ त्याच्या मार्गात संघर्ष करण्यासारखा आहे. तसेच जर कुणी दिवसभर रोजा ठेवतो आणि रात्रभर नमाज पढत राहतो, तसेच पुण्यकर्म गरीब आणि विधवेच्या सेवेद्वारे लाभते. (बुखारी)
एक दिवस प्रेषितांनी आपल्या अनुयायींना विचारले, “मी तुम्हाला रोजा, नमाज आणि जकातपेक्षाही उच्च दर्जा कशाचा आहे सांगू?”
त्यांच्या अनुयायींनी विनंती केली की अवश्य हे प्रेषित (स.)!
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी विनवण्या करून आपल्या व्यथा मांडून गरीबांचे प्रदर्शन करून मागणे मना केले. ते म्हणतात की “अशी व्यक्ती गरीब आणि निराधार नाही जिला लोक एक दोन घास देऊन आपल्या दरवाजावरून मागे लावतात. गरीब अशी व्यक्ती आहे जिच्याकडे काहीही नसताना तिला लोकांकडून मागायला लाज वाटते आणि लोकांपाशी आपले रडगाणे मांडत नाही.” (बुखारी)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, “त्या अस्तित्वाची शपथ, ज्याच्या हाती माझे प्राण आहेत, तुमच्यापैकी कुणी आपल्या पाठीवर लाकडाचे ओझे घेऊन हमाली करतो ती व्यक्ती अशा व्यक्तीपेक्षा उच्च दर्जाची आहे जी लोकांकडे भीक मागते.” (बुखारी, किताबुज्जकात)
संकलन :
सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment