आता देशात कोणत्याही व्हायरससाठी लॉकडाउनची शक्यता कमी. परंतु दिल्लीसह देशातील अनेक राज्यांत प्रदूषणाने लॉकडाउनची स्थिती निर्माण केली आहे. यावरून आपण समजू शकतो की प्रदुषणाने आपले पाय आकाश-पाताळ, पुर्व-पश्चिमेसह देशातील कानाकोपऱ्यापर्यंत पसविले आहेत. त्यामुळे प्रदुषणाच्याबाबतीत आजच सर्वांनीच सावधगिरी बाळगली पाहिजे. अन्यथा सर्वांसाठी दिल्ली दूर नाही.
ल्लीची भयानक स्थिती पहाता संपूर्ण राज्यांनी व शहरांनी सतर्क रहाण्याची गरज आहे. कारण प्रदूषणाची स्थिती दिल्लीमध्ये इतकी बिकट आहे की, लोक घरातही मास्क लावून बसत आहेत, शाळा आठवडाभर बंद आहे म्हणजेच प्रदूषणाने आपात्कालीन स्थिती निर्माण केली आहे. हिवाळा सुरू व्हायच्या आधीच दिल्लीमध्ये वायुप्रदूषणाने विक्राळ रूप धारण करून दिल्ली गॅसचेंबर बनली आहे. दिल्लीतील प्रदुषणाने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे व दिल्ली गॅसचेंबर झाल्यामुळे वायुप्रदूषणाचा धोका अधिक गडद झाला आहे. त्यामुळे संपूर्ण भारत प्रदुषणाच्या मार्गावर जाते की काय असे वाटत आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत दिल्लीकरांना कोरोना, डेंग्यू, मलेरिया सोबतच प्रदुषणाचा सामनासुध्दा करावा लागत आहे, ही अत्यंत चिंतेची व गंभीर बाब आहे. राजधानी दिल्ली गॅसचेंबर बनली तर देशाचे काय होईल? ही सुद्धा चिंता 135 कोटी जनतेच्या मनात भेडसावत आहे. एकीकडे दिल्ली भारताची राजधानी आणि दुसरीकडे जगात दिल्लीसारखे प्रदुषन कोणत्याही देशात नसल्याचे सांगण्यात येते. याचाच अर्थ असा की संपूर्ण दिल्ली गॅसचेंबर बनल्याचे स्पष्ट दिसून येते. आताही हरियाणा, पंजाब आणि उत्तरप्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात पराली जाळल्याने दिल्ली एनसीआरमध्ये विषारी हवा मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे व ती घातक सिद्ध झाली आहे.
दिल्ली सरकार प्रदुषण कमी करण्यासाठी दरवर्षी ऑड-ईवन फार्मुल्या लावुन प्रदुषण कमी करण्याचा प्रयत्न करीत असते. परंतु दरवर्षी आक्टोंबर पासूनच प्रदुषणाने विक्राळरूप धारण करण्यास सुरुवात केलेली असते. त्यामुळे ऑड-ईव्हन फार्मुल्यावर सुध्दा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. नॅशनल ग्रीन ट्रीब्यूनलने प्रदुषणाच्याबाबतीत सरकारी अधिकाऱ्यांची लापरवाही असल्याचे सांगण्यात येते. दिल्लीतील प्रदुषणाचे सावट एका दिवसात तयार झाले नसून ते कासवाच्या गतीने वाढत आहे आणि आता उग्ररूप धारण केल्याचे दिसून येते. आज प्रदुषणामुळे दिल्लीत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजही दिल्लीसह देशात सरकारी वाहन मोठ्या प्रमाणात विषारी धुर ओकत आहे. सोबत त्याला कारखान्याच्या धुराची साथ मिळत आहे व दुषीत पाणी त्याला दुजोरा देत आहे. अशाप्रकारे प्रदुषणाचा व्याप दिवसें-दिवस वाढतांना दिसतो. या सर्वबाबींना मुख्य कारण म्हणजे वृक्षतोड व निसर्गावर मानवाने केलेला अन्याय होय. आज वृक्ष तोडीमुळे संपूर्ण देशाच्या पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. त्याचेच प्रायश्चीत्त आज प्रदुषणाच्या रूपात दिल्लीसह संपूर्ण भारतवासीयांना भोगावे लागत आहे. आज प्रदुषण विकत घेण्याकरीता कोणत्याही देशाला बाजारात जावे लागत नाही. कारण आज प्रत्येक देश परमाणु हत्याराच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात करतांना दिसतात. सोबतच अनेक देशांमध्ये गृहयुद्ध चरनसीमेवर आहेत.त्याचप्रमाणे संपूर्ण देशाजवळ अत्याधुनिक दारूगोळ्याचे भांडार मोठ्या प्रमाणात आहेत.त्यामुळे आज संपूर्ण जग बॉम्बच्या ढीगाऱ्यावर बसलेले दिसून येते. म्हणजेच संपूर्ण जगाने प्रदूषणाला जवळ केल्याचे दिसून येते. जगात प्रदुषणाच्याबाबतीत दिल्लीचा प्रथम क्रमांक लागतो ही अत्यंत चिंतेची आणि गंभीर बाब आहे.
देशातील महत्वपूर्ण संपूर्ण सरकारी कार्यालये दिल्लीमध्ये आहेत.उदाहरण द्यायचे झाले तर सुप्रिम कोर्ट, संसदभवन, राष्ट्रपती भवन, संपूर्ण मंत्रालये , जगातील राजदूत इत्यादी अनेक म्हणजेच दिल्ली ही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ठिकाण आहे. अशा ठिकाणी महाभयानक प्रदुषण म्हणजे अत्यंत गंभीर बाब आहे. दिल्लीतील प्रदुषणाची धक्कादायक बाब म्हणजे दिल्लीत इतके प्रदुषण वाढले आहे की एक व्यक्ती 50 सिगारेट पिवुन धुर काढतो इतके प्रदुषन दिल्लीमध्ये आहे ही एक धोक्याचीच घंटा आहे. प्रदुषणाला फक्त फटाकेच जबाबदार नसून लाखो वाहनांचा विषारी धूरसुध्दा जबाबदार आहे.
आज धुळीतील व वायुतील प्रदुषणाने मानव, पशु-पक्षी,जिवजंतु यांच्या काळजात घर करीत आहेत ही बाब शरीरासाठी घातक ठरू शकते. वाढते प्रदुषण पाहाता असे वाटते की दिल्लीसह भारत विनाशाकडे जात आहे की काय असे वाटत आहे. त्याचप्रमाणे वाढत्या प्रदूषणामुळे अनेक जंगली पशु-पक्षी व वृक्ष लुप्त होत आहे. वाढते प्रदुषण पहाता वृक्षतोड थांबवुन वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. प्रदुषण नियंत्रणात आणले नाही तर संपूर्ण भारत गॅसचेंबर बनायला वेळ लागणार नाही. म्हणून प्रदुषन रोखण्याकरीता ज्यांच्या-ज्यांच्या मनात जी-जी कल्पना येत असेल तर याचा वापर केला पाहिजे. सध्याच्या परीस्थितीत प्रदुषण महाविनाशाकडे प्रवेश करतांना दिसत आहे. कारण जल,वायु व स्थल प्रदुषन विक्राळ रूपधारण करीत असल्याचे दिसून येते. ही बाब एकट्या दिल्लीच्या प्रदुषनावरून दिसून येते. याला कारणीभूत फक्त मानवच आहे. त्यामुळे यापासुन तोडगा मानवालाच काढावा लागेल.लॅन्सेट मेडिकल जर्नलच्या अहवालावरून असे दिसून येते की प्रदुषणाच्या बाबतीत संपूर्ण जगाचा विचार केला तर भारत प्रदुषणाचे माहेरघर बनल्याचे दिसून येते. यात दिल्ली एन. सी.आर. अव्वल क्रमांकावर आहे.
प्रदुषणाचा राक्षस असाच आपल्यात वावरत राहिला तर 135 कोटी जनतेच्या काळजात घरकरून राहील आणि आपल्याला विनाशाकडे नेल्याशिवाय रहाणार नाही. त्यामुळे प्रदुषणावर उपाय तातडीने योजण्याची गरज आहे.प्रदुषण हटविण्याकरीता केंद्र व राज्य सरकारनी एकत्र येऊन कठोर पावले उचलली पाहिजेत.केंद्र सरकारला मी आग्रह करतो की कलम 370,तिन तलाकचा मुद्दा,नोटबंदी,प्लास्टीक बंदी आणि राममंदिर मुद्दा याच प्रमाणे वायुप्रदूषणाचा व जलप्रदुषणाचा मुद्दा सरकारने हाताळला पाहिजे.
वायुप्रदुषण व जल प्रदुषण नियंत्रण ठेवण्याकरिता माननीय सुप्रिम कोर्ट,राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, लोकसभा अध्यक्ष व पर्यावरण मंत्रालय यांनी वाढत्या प्रदुषणाकडे जातीने लक्ष देवून युध्दपातळीवर उपाय योजावे अशी माझी विनंती आहे. कारण संपूर्ण कायद्यांची सुत्र दिल्लीतूनच चालत असतात कारण दिल्ली भारताची राजधानी आहे आणि याच ठिकाणी उच्चपदस्थ मंडळी राहतात. अशा ठिकाणी जर प्रदुषणावर नियंत्रण ठेवता येत नसेल तर देशाचे काय होईल? अशी भीती वाटत आहे.त्यामुळे प्रदुषणावर नियंत्रण ठेवणे काळाची गरज आहे.
आता देशातील राज्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की सर्वांसाठी दिल्ली दूर नाही. त्यामुळे आजच सावध व्हा आणि पर्यावरणाला वाचवून प्रदुषणावर मात करा. प्रदुषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु प्रदुषणाचे इतके गंभीर परिणाम होईल असे दिल्लीकरांना वाटत नव्हते. परंतु आज दिल्लीत आरोग्यासाठी आणिबाणी लागल्याचे दिसून येते. 2019 च्या जागतिक प्रदुषन निर्देशांकानुसार जगातील शंभर सर्वाधिक प्रदूषित शहरे बघितली तर त्यापैकी 28 शहरे ही केवळ भारतातील आहेत. हा अहवाल अत्यंत गंभीर आहे आणि चिंतेचा विषय आहे.दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हीआयपी कल्चर राहातो मग प्रदुषणाच्या बाबतीत टोकाची भूमिका का घेतल्या जात नाही? प्रदुषणाच्या बाबतीत केंद्राने केजरीवाल यांना दोष द्यावा व केजरीवाल यांनी केंद्राला दोष द्यावा हा संघर्ष योग्य नाही.प्रदुषणाच्या बाबतीत एकत्र येवूनच तोडगा काढला पाहिजे.
आज हवेतील प्रदुषण प्रथम क्रमांकावर व पाणी प्रदुषन दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे दिसून येते. त्यामुळे मानवाचा व पशुपक्षांचा जिव गुदमरत आहे. आज वाढत्या प्रदूषणामुळे व वृक्ष तोडीमुळे जंगलातील हिंसक पशु शहराकडे प्रवेश करतांना दिसताहेत. दिल्लीचे प्रदुषण पाहता संपूर्ण राज्यांना दिल्ली दुर नाही. कारण दिल्लीमध्ये वायुप्रदूषणाने लॉकडाउनसारखी परिस्थिती निर्माण केली आहे. करिता सावधान आता एकच नारा असायला पाहिजे ’प्रदुषण पळवा देश वाचवा’ कारण प्रदूषण वाढीची आणीबाणी दिल्लीत लागली आहे.
हीच परिस्थिती देशातील संपूर्ण राज्यांवर येवू शकते.त्यामुळे सर्वांनीच सजग राहणे गरजेचे आहे. सावधान!
- रमेश कृष्णराव लांजेवार,
मो. 9325105779
Post a Comment