पवित्र कुरआनत याबाबत अल्लाहचे म्हणणे आहे की-
‘‘ज्या लोकांनी अल्लाहला आपला विधाता स्वीकारला आणि त्यावर ठाम राहिले, त्यांना अल्लाहचे दूत म्हणतात, भिऊ नका की नराश होऊ नका. आणि ज्या स्वर्गाचे अल्लाहने तुम्हाला वचन दिले आहे त्याचा आनंद साजरा करा.’’ (पवित्र कुरआन, ४१:३०)
या आयतीच्या अवतरणानंतर प्रेषितांना लोकांनी कधी हास्य करताना पाहिले नाही, असे हसन (र.) यांचे म्हणणे आहे.
पवित्र कुरआनात अल्लाहचे म्हणणे आहे की-
‘‘हे प्रेषित, त्यांना सांगा, मीदेखील तुमच्यासारखा एक मनुष्य आह. मला अनुभूतीद्वारे कळवले गेले आहे की तुमचा ईश्वर एकमेव इलाह (अल्लाह) आहे तेव्हा या (श्रद्धे) वर दृढ राहा आणि अल्लाहपाशी क्षमायाचना भाकित जा.’’ (पवित्र कुरआन, ४१:६)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की एकमेकांशी संवाद साधताना दृढता असावी. म्हणजे तुमचं बोलणं, तुमची कर्मं आणि तुमचं उद्दिष्ट प्रामाणिक असायला हवे. याचाच अर्थ आपल्या बोलण्या, चालण्यावर ठाम राहाण्याचा आहे. अल्लाहकडे प्रार्थना करा, त्याने तुम्हाला सरळ आणि दृढनिश्चयी ठेवावे.
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की जोपर्यंत अविचलित राहात नाही तोपर्यंत कोणतीही व्यक्ती आपल्या शब्दांवर, आचारविचारांवर ठाम राहू शकत नाही. म्हणजे माणूस जोपर्यंत एकेश्वरावर श्रद्धा ठेवत नाही तोपर्यंत त्याच्या शब्दांवर, आचारविचारांवर त्याचे परिणाम उमटत नाहीत.
इस्लामची व्याख्या करत प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की इस्लाममध्ये कुणाला कष्टात टाकले किंवा आपसात एकमेकांना कष्टात टाकले जात नाही.
जो माणूस कुणा दुसऱ्या माणसाला कष्टात टाकेल, अल्लाह त्या माणसाला कष्टात टाकतो. ज्याने श्रद्धावंतास कष्टात टाकले किंवा त्याच्याशी लबाडी केली, त्याचा अल्लाह धिक्कार करतो. त्याला टंचाईत टाकतो.
स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना लुबाडणं किंवा स्वतःचं काही भलं नसताना देखील एखाद्या व्यक्तीला अडचणीत टाकणं, लोकांसमोर कठीण परिस्थिती उभी करण्यासारखं आहे.
लोकांना विवश करून उच्च किंमतीला त्यांना विकणं त्यांच्यासमोर समस्या उभ्या करण्यासारखं आहे. प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले होते की असा काळ देखील येणार आहे जेव्हा संपन्न लोक इतर लोकांच्या गरजा पूर्ण करण्यापासून आपले हात रोखून धरतील.
Post a Comment