(२) की तुम्ही भक्ती करू नये परंतु केवळ अल्लाहची, मी त्याच्यातर्फे तुम्हाला खबरदार करणारादेखील आहे व शुभवार्ता देणारादेखील.
(३) आणि तुम्ही आपल्या पालनकत्र्यापाशी क्षमायाचना करा आणि त्याच्याकडे परतून या तर तो तुम्हाला एका विशिष्ट मुदतीपर्यंत चांगली जीवनसामुग्री देईल३ आणि प्रत्येक श्रेष्ठीला त्याचे श्रेष्ठत्व प्रदान करील.४ परंतु जर तुम्ही तोंड फिरविले तर मी तुमच्यासंबंधी एका मोठ्या भयंकर दिवसाच्या प्रकोपापासून घाबरतो. (४) तुम्हा सर्वांना अल्लाहकडे परतावयाचे आहे आणि तो सर्वकाही करू शकतो.
(५) पाहा, हे लोक आपली छाती वळवितात की जेणेकरून त्याच्यापासून लपावे.५ खबरदार! जेव्हा हे वस्त्रांनी स्वत:ला झाकतात, अल्लाह त्यांच्या गुपितांना जाणतो व प्रकट गोष्टींनादेखील. त्याला तर रहस्यांचेदेखील ज्ञान आहे जे मनात आहेत.
(६) भूतलावर चालणारा कोणताही प्राणी असा नाही ज्याच्या उपजीविकेची जबाबदारी अल्लाहवर नाही आणि ज्याच्यासंबंधी तो जाणत नाही की त्याचे वास्तव्य कोठे आहे? आणि कोठे तो सोपविला जातो.६ सर्वकाही एका स्पष्ट दप्तरात नोंदलेले आहे.
१) `किताब' याचा अनुवाद वर्णनशैलीला पाहून `आदेश' (फर्मान) केला आहे. अरबी भाषेत हा शब्द `ग्रंथ' आणि `लेख' या अर्थानेच फक्त येत नाही तर आदेश आणि `शाही फरमान' या अर्थानेसुद्धा येतो. कुरआनमध्ये अनेक ठिकाणी हा शब्द याच अर्थाने आला आहे.
२) म्हणजे या आदेशामध्ये जे सांगितले गेले आहे ते दृढ आणि अटळ आहे, खूप पारखून घेतलेले आहे. याचा एकही शब्द असा नाही जो वास्तविकतेपासून कमी-अधिक असेल. या आयती सविस्तर स्पष्ट रूपात आलेल्या आहेत. यात एक एक बाब तपशीलासह स्पष्ट रूपात आली आहे. (व्याख्यानात अस्पष्टता अजिबात नाही)
३) म्हणजे जगात तुमच्यासाठी ठराविक काळ निश्चित केला आहे. या काळात तो तुम्हाला वाईट नव्हे तर चांगल्या प्रकारे ठेवील. त्याच्या कृपाप्रसादाचा वर्षाव तुमच्यावर होत राहील, त्याच्या समृद्धीने तुम्ही लाभान्वित होत राहाल, तसेच जगात तुम्ही सुखी आणि सन्मानित राहाल. जीवनात तुम्हाला सुखचैनीत तो ठेवील, अपमान आणि तिरस्काराने नव्हे तर मान सन्मानाने तुम्ही जीवन व्यतीत कराल. हाच विषय (सूरह नहल, आयत ९७ मध्ये) आला आहे. यामुळे लोकांच्या त्या सर्वसामान्य गैरसमुजूतीला दूर करणे अभिप्रेत आहे, ज्यास शैतानाने बुद्धीहीन लोकांच्या मनात रूजविले आहे. शैतान अशा लोकांना पटवून सांगतो की ईशपरायणतेने, सत्यनिष्ठेने तसेच जबाबदारीपूर्ण आयुष्य घालविण्याने परलोक यश पदरात पडत असेल परंतु तुमचे जगातील जीवन मात्र बरबाद होते. अल्लाह याचे खंडन करताना स्पष्ट सांगत आहे, ``परलोकाबरोबर या जगातील जीवनाचा सन्मान आणि सफलतासुद्धा अशाच लोकांसाठी आहे जे ईशपरायणशीलतेत चांगुलपणाने आपले जीवन व्यतीत करतात.'' (`मताअे अहसन' म्हणजे उत्कृष्ट जीवनसामुग्री) कुरआनच्या भाषेत जीवनाच्या त्या सामुग्रीला म्हटले जाते जे जगाच्या सुखवैभवावरच नष्ट होत नाही तर परिणामात परलोकाच्या सुखवैभवाचे साधन बनते.
४) म्हणजे जी व्यक्ती नैतिकता आणि जीवनव्यवहारात जितकी पुढे जाईल अल्लाह तितकेच मोठे पद तिला बहाल करील. जी व्यक्ती आपल्या चारित्र्याने आणि आचरणाने स्वत:ला ज्या श्रेष्ठतेची पात्र सिद्ध करते, ती श्रेष्ठता तिला अवश्य दिली जाते.
५) मक्का येथे जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आवाहन (संदेश) चर्चेत येऊ लागले तेव्हा अनेकानेक लोकसुद्धा त्यांच्या संदेशाने अतिबेजार बनले. काही लोक विरोधात पुढे येत नसत. असे लोक पैगंबर मुहम्मद (स.) यांना टाळत असत आणि त्यांच्या कोणत्याच म्हणण्याकडे हे लोक लक्ष देत नसत. पैगंबर मुहम्मद (स.) एखाद्या ठिकाणी बसलेले दिसले की ते उलट्या पावलाने परत जात असत. लांबून आपणास येताना पाहिले तर दिशा बदलत िंकवा तोंड लपवित जेणेकरून आमना-सामना होऊ नये आणि त्यांनी संबोधित करून काही उपदेश करू नये.
अशाचप्रकारच्या लोकांकडे संकेत आहे की हे लोक सत्याचा सामना करण्यासाठी घाबरतात. आपले तोंड शहामृगासारखे लपवून त्यांना असे वाटते की सत्य आता गायब झाले आहे. परंतु सत्य आपल्या जागी विद्यमान आहे आणि तो तर पाहात आहे की हे मूर्ख लोक सत्यापासून वाचण्यासाठी तोंड लपवित फिरत आहेत.
६) म्हणजे ज्या अल्लाहच्या ज्ञानाची स्थिती ही आहे की चिमणीच्या एक एक घरट्याची आणि कीडेमकोड्यांच्या एक एक बिळांची पूर्ण माहिती अल्लाहला आहे. अल्लाह त्यांना तिथेच उपजीविका पोहचवित आहे. त्याला कोणता जीव कोणत्या क्षणी कोठे राहातो व कोठे मरतो याची खबर असते. अशाप्रकारे तोंड लपवून आणि कानांत बोटे टावूâन िंकवा डोळयांवर पडदा टावूâन तुम्ही त्याच्यापासून वाचाल, अशी तुमची धारणा ही तुमची घोडचूक आहे. सत्याकडे बोलाविणाऱ्यापासून तुम्ही तोंड लपविले तरी शेवटी तुमच्या पदरात काय पडणार? काय अल्लाहपासूनसुद्धा तुम्ही वाचाल? काय अल्लाह पाहात नाही की एक मनुष्य तुम्हाला सत्याकडे बोलवित आहे आणि तुम्ही त्याचे म्हणणे कानावर पडू नये म्हणून जीवाचा आटापिटा करत आहात.
Post a Comment