दक्षिणपंथी राजकारणाच्या वाढत्या दबावामुळे, भारतातील अनेक राज्यांनी धर्म स्वातंत्र्य अधिनियम बनविले आहे. दुर्दैव हे आहे की, हे सगळे कायदे, धर्म आणि आस्थेच्या स्वातंत्र्याचा संकोच करीत आहेत. यांचा घोषित उद्देश कथित धर्मपरिवर्तन थांबविणे आहे. आपले संविधान आपणास धर्माला मानने, त्याच्यावर आचरण करने आणि त्याचा प्रसार, प्रचार करण्याचे स्वातंत्र्य देतो. या कायद्यांचा दुरूउपयोग अल्पसंख्यांक समुदायाला भेडसावणे, धमकावणे आणि त्रास देण्यासाठी केला जात आहे. असाच कायदा कर्नाटक राज्यात बनविण्यासाठी प्रस्तावित आहे आणि हा ही कायदा इतर कायद्यांप्रमाणे बनविला जात आहे.
असले कायदे बनविणाऱ्या राज्य सरकारांच्या टार्गेटवर ख्रिश्चन आणि मुस्लिम अल्पसंख्यांक आहेत. सध्यस्थितीत ख्रिश्चन यांचे सर्वात मोठे शिकार बनत आहेत. मागील चार दशकांपासून देशात ख्रिश्चनांविरोधी वातावरणनिर्मिती केली जात आहे. अगोदर नन आणि पादरी यांच्यावर हल्ले सुरू केले आणि नंतर सामान्य ख्रिश्चनांवर सन 1990 च्या दशकामध्ये रानी मारिया यांची हत्या केली गेली. अशाच हल्ल्यात सगळ्या मोठा आणि भयावह हल्ला 1999 मध्ये पास्टर ग्राहम स्टेंस आणि त्यांच्या दोन निरागस मुलांना जाळले जाणे. गुजरातच्या डांग, मध्यप्रदेशच्या झाबुआ आणि ओडिशाच्या कंधमाल मध्ये ख्रिश्चनांवर हल्ले करणे असे प्रकार बरेच दिवस चालत राहिले. प्रचार असा केला गेला की ख्रिश्चन मिशनरी, दलित आणि आदिवासींना जोर-जबरदस्तीने आणि लोभ लालसेने ख्रिश्चन बनवत आहेत.
1970 च्या दशकात स्वामी असीमानंद यांनी डांग, गुजरात मध्ये, स्वामी लक्ष्मणानंद यांनी कंधमाल, ओडिशामध्ये आणि आसाराम बापूच्या समर्थकांनी झाबुआ, मध्यप्रदेशशात आदिवासी भागात आपले आश्रम स्थापित केले. वनवासी कल्याण आश्रम आणि विश्व हिन्दू परिषदेचे त्यांना संपूर्ण समर्थन आणि सहकार्य प्राप्त होते. बजरंग दल यांच्यासोबत होते. बजरंग दलाचेही दारासिंह उर्फ राजेंद्र पाल याने पास्टर स्टेंस यांची हत्या केली होती. यावेळी ते जेलमध्ये या अपराधी शिक्षा भोगत आहेत. हे सगळे निवडणुकीत लाभ मिळविण्यासाठी तसेच आदिवासी लोकांना आपल्या झेंड्याखाली आणण्याचा सांप्रदायिक शक्तींच्या अभियानाचा एक भाग होता. यासोबतच, आदिवासींचे हिन्दूकरण करणयासाठी आदिवासी भागात शबरी आणि हनुमानाची मंदिरे उभारण्यात आली आणि शबरी महाकुंभ आयोजित केले. या आयोजनामध्ये आरएसएसच्या नेत्यांची प्रामुख्याने उपस्थिती असायची.
या आरोपात कोणते तथ्य नाही की, आदिवासींचे जोर-जबरदस्तीने व लालसेने धर्मपरिवर्तन केले जात आहे. ख्रिश्चन धर्म भारतात अनादीकाळापासून आहे. असं म्हटलं जाते आहे की, 52 ईसवीमध्ये सेंट थॉमस यांनी मालाबार तटावर चर्चची स्थापना केली होती. याप्रमाणे भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रवेश जवळपास 2 हजार वर्ष पूर्वीच झाला होता. सन 2021 च्या जनगणनेनुसार, भारतामध्ये ख्रिश्चनांची एकूण लोकसंख्या 2.3 टक्के आहे. लोकसंख्येत त्यांच्या टक्केवारीची गेल्या पाच दशकात थोडीशी घसरण झाली आहे. सन 1971 मध्ये ते लोकसंख्येच्या 2.60 टक्के होते. सन 1981 मध्ये 2.44 टक्के, 1991 मध्ये 2.34 टक्के, 2001 मध्ये 2.30 टक्के आणि 2011 मध्ये 2.30 टक्के. पास्टर स्टेंस यांच्या हत्येच्या घटनेच्या तपासासाठी त्यावेळेसचे केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांनी वाधवा आयोगाची स्थापना केली होती. आयोग या निष्कर्षावर पोहोचला होता की, ओडिशाच्या क्योंझार आणि मनोहरपूर भागात जिथे पास्टर स्टेंस सक्रीय होते, तिथे ख्रिश्चनांच्या लोकसंख्येत कुठलीच वाढ झाली नाही. तथ्य आणि आकडे काहीही सांगत असले तरी, सांप्रदायिक संघटना वारंवार असा प्रचार करत आहेत की, मिशनरिज धर्मपरिवर्तन करत आहेत आणि हा प्रचार लोकांच्या ध्यानीमनी बसला आहे. अशी धारणा ही मनात घर करून आहे की, मिशनरीजना विदेशातून पैसा मिळत आहे. आम्ही हे सगळं जानतो की, विदेशातून येणारा पैशाचे नियमन एफसीआरए अंतर्गत होते आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला या संबंधात पूर्ण माहिती असते. सुरूवातीला ख्रिश्चनांविरोधी हिंसा आदिवासी क्षेत्र आणि गावांपर्यंतच होत होती. हळू-हळू ती लहान शहरांनाही शिकार बनवत आहे. कान्वेंट शाळांवर हल्ले होत आहेत. नुकतेच मध्यप्रदेशच्या गंजबासौदा येथे एका कान्वेंट शाळेवर हल्ला झाला. आतापर्यंत कान्वेंट शाळा उच्च गुणवत्तेचे शिक्षण देण्यासाठी ओळखल्या जात होत्या. आता द्वेष इतका वाढला आहे की, त्या शाळांवर हल्ले केले जाऊ लागले आहेत. जे लोक हे हल्ले करत आहेत ते तर केवळ मोहरे आहेत. या हल्ल्यांच्या पाठीमागे ते लोक आहेत जे द्वेष पसरवत आहेत. सांप्रदायिक राजकारणी असे मानतात की ख्रिश्चन धर्म आणि इस्लाम विदेशी आहेत. महात्मा गांधी यांनी लिहिले होते की, प्रत्येक देश असा मानतो की त्याचा धर्म अन्य कोणत्याही धर्माएवढाच चांगला धर्म आहे. खरेच की भारताचे महान धर्म त्याच्या लोकांसाठी पुरेसा आहे आणि त्यांना एक धर्म सोडून दूसरा धर्म स्वीकार करण्याची गरज नाही. यानंतर ते भारतीय धर्मांची यादी सांगतात. ख्रिश्चन धर्म, ज्यू धर्म, हिन्दू धर्म आणि त्याच्या विभिन्न शाखा तसेच इस्लाम आणि पारसी धर्म भारतातील जीवित धर्म आहेत. (गांधी कले्निटड वर्क्स, खंड 47, पृष्ठ 27-28). खरे तर सर्व धर्म वैश्विक असतात आणि त्यांना राष्ट्रांच्या सीमांमध्ये सीमित केले जाता येत नाही. आजच्या जगात हिन्दू पूर्ण विश्वात पसरले आहेत. धर्म स्वातंत्र्य विधेयके / अधिनियमांच्या मागे सांप्रदायिक राजकारण आणि त्याचा दबाव आहे. ज्याच्यामुळे ’दुसऱ्यांशी द्वेष करा’ या अभियानाला नव्या स्तरावर पोहोचविले जात आहे. या सारखा कायदा कर्नाटक राज्यात बनविला जात आहे. यामुळे भारतातील ख्रिश्चनांप्रती द्वेषाच्या भावनेत वाढ होईल आणि आपल्या देशातील एकतेला तडा देणारी प्रवृत्ती मजबूत होईल.
जे लोक धर्मपरिवर्तन करत आहेत त्यांच्याबद्दल असे म्हणावे की, त्यांना भीती दाखवून धमकावले जाते आणि ते लालसेपोटी असे करत आहेत, खरे तर असे म्हणणे त्यांचा अपमान करणे आहे. काय लोक आपल्या मर्जीनुसार धर्मपरिवर्तन करू शकत नाहीत? कायद्याने, सामाजिक आणि नैतिक मापदंडानुसार प्रत्येक व्यक्तीला हा अधिकार आहे की तो आपल्या पसंतीनुसार धर्म निवडावा आणि त्याचे आचरण करावे.
आपल्या संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बी.आर. आंबेडकर यांनी आपल्या याच अधिकाराचा वापर करताना हिन्दू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्विकारला होता. हे दुर्दैव आहे की आम्ही हिन्दू धर्मातून ख्रिश्चन धर्म परिवर्तन करण्याला एक अपराध समजत आहोत परंतु, अन्य धर्मांचा त्याग करून हिन्दू धर्म स्विकारणाऱ्याला घर वापसी संबोधले जात आहे. नुकतेच वसीम रिजवीने हिन्दू धर्म स्वीकारला आणि आपले नाव जितेंद्र त्यागी ठेवले. याला सकारात्मकतेने पाहिले गेेले.
मागील काही वर्षांपासून चर्चेस आणि ख्रिश्चनांच्या प्रार्थना सभांवर हल्ले होण्याच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. मात्र कंधमाल सारखा व्यापक हिंसाचार जरी होत नसला तरी ख्रिश्चनांविरूद्ध हिंसा सुरू आहे आणि ती वाढत आहे. आपण सर्वांनी हे स्वीकार केले पाहिजे की, प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म निवडण्याचा अधिकार आहे. असे समजून आम्ही एका मानवीय आणि नैतिक समाजाचे निर्माण करू शकू. एक असा समाज जो लोकांच्या व्यक्तीगत अधिकारांचा सन्मान करत आहे.
- राम पुनियानी
(मूळ इंग्रजी लेखाचे हिंदीत भाषांतर अमरिश हरदेनिया यांनी केले तर हिंदीचे मराठी भाषांतर बशीर शेख, एम.आय.शेख यांनी केले) (लेखक आयआयटी मुंबई शिकवित होते आणि सन 2007 च्या नेशनल कम्यूनल हार्मोने पुरस्काराने सन्मानित आहेत. )
Post a Comment