हजरत अब्दुल्लाह इब्ने अब्बास म्हणतात, एकदा मी प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या शेजारी बसलो होतो तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी तुम्हाला काही शिकवण देतो. अल्लाहच्या मर्यादांचे रक्षण करा म्हणजे जे अनिवार्य ते करा आणि जे निषिद्ध आहेत ते टाळा. तुम्हाला अल्लाहसमोरच आढळेल. काही मागायचे झाल्यास अल्लाहकडेच मागणी करा. लक्षात ठेवा, अख्खं जग तुमचं काही भलं करायचं इचित असेल तरी अल्लाहने तुमच्या भाग्यात जे लिहून ठेवलंय त्यापेक्षा जास्त कुणी काही देऊ शकत नाही आणि जर तुम्हाला कोणती हानी पोहोचवायचे ठरवले तरी अल्लाहने जे तुमच्यासाठी ठरवलंय त्यापेक्षा जास्त हानी तुम्हाला कोणी पोहोचवू शकणार नाही.’’
अल्लाहच्या मर्यादांचे जतन करा, तो तुमच्या समक्ष आहे. भरभराटीच्या काळात अल्लाहशी नातं शाबूत ठेवाल तर टंचाईच्या काळात तुम्हाला मदत करील. जे काही तुम्ही गमवलं असेल ते तुम्हाला मिळणारच नव्हते आणि जे काही तुम्हाला प्राप्त झालेले आहे ते तुम्हाला मिळणारच होते. संयम पाळा. तुम्ही सफल व्हाल. चिंतेबरोबरच त्यापासून सुटताही होणार आणि टंचाईच्या पाठोपाठ सुबत्ता लाभते. (संदर्भ : तिर्मिजी)
हजरत अब्दुल्लाह इब्ने समऊद म्हणतात की, आपल्या डोक्यात जाऱ्या (म्हणजे विचार) आणि पोटात जाणाऱ्या प्रत्येकाचे रक्षण करा. डोळे, कान आणि जिभेला निषिद्ध गोष्टींपासून वाचवा. तसेच निषिद्ध वस्तू घेण्यापासून अलिप्त राहा.
लक्षात ठेवा, अल्लाहला तुमच्या मनामधील विचारांची सुद्धा माहिती असते. म्हणून त्याला भीत राहा. (पवित्र कुरआन, २:२३५)
डोळे, कान आणि मन या सर्वांविषयी प्रश्न विचारले जातील. (पवित्र कुरआन, १७:३६)
हजरत अब्दुल्लाह इब्ने उमर म्हणतात, प्रेषित मुहम्मद (स.) सकाळ-संध्याकाळ ही प्रार्थना करीत असत-
‘‘हे अल्लाह, तू मला या जगी आणि परलोकात क्षमा कर. हे अल्लाह, मला या जगा आणि परलोकात तसेच आपली मुलंबाळं आणि सवपत्तीच्या बाबतीत मला क्षमा कर. माझ्या गुप्तांगांचे रक्षण कर. भीतीपासून मला वाचव. चोहोबाजुंनी माझे रक्षण कर. मी तुझ्या उदात्त अस्तित्वापासून क्षमा मागतो.’’
Post a Comment