Halloween Costume ideas 2015

खेळ आणि इस्लाम

९व्या रिफॉर्मेशन कप फुटबॉल टुर्नामेंट मुंब्रा मध्ये जमाअत ए इस्लामी हिंद मुंब्राचे अध्यक्ष यांच्याद्वारे दिलेला संदेश


खेळणे हा नैसर्गिकपणा आहे. खेळण्याचा जौहर स्वाभाविक आहे. मग तो पक्षी, प्राण्याविषयी असो किंवा मानवांच्या बाबतीत.  आपण पाहतो कि योग्य परिस्तिथीत पक्षी आणि प्राणी देखील संधी मिळताच उड्या मारतात,धावतात, खेळतात.         खेळ असो किंवा जीवनातील इतर कोणतेही कार्य, त्यात सहभागी होण्यासाठी उत्तम आरोग्य ही पूर्वअट आहे. खेळण्याच्या थेट संबंध चांगले स्वास्थ याच्याशी आहे. खेळ असो कि जीवनातील इतर एखादे कार्य व संघर्ष याचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो.

इस्लामी दृष्टिकोनातून आरोग्य आणि तंदुरुस्ती देखील उपासनेसाठी आवश्यक आहे. सत्यधर्म इस्लामचा प्रचारासाठी,नमाज, रोजा, हज आणि सत्याचा विरोध करणाऱ्या अत्याचारींशी होणारा  जिहाद हा संघर्ष असो या सगळ्यांसाठी स्वास्थ आणि आरोग्य जरुरी आहे.म्हणूनच सृष्टी निर्मिकाचे प्रिय आणि आपले प्राण अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांना मुसलमान तंदरुस्त आणि निरोगी हवे होते.

त्यांचे कथन आहे

"दुबळ्या मुसलमान पेक्षा शक्तिशाली मोमीन बरा"ते स्वतः आणि त्यांचे सहकारी त्या काळातील वेगवेगळे खेळ खेळायचे. म्हणून इस्लामच्या थेट शिकवणीत गतीने चालणे,धावणे,कुस्ती,पाण्यात पोहणे,नेमबाजी,उंटाची रेस,घोडदौड, भाला फेकणे इत्यादी शिकवणी संबंधित प्रेषितांची शिकवण आढळते.      

आज, आपल्या सर्वांना आरोग्याची काळजी घेण्यासंबंधित इस्लामिक सूचनांसह, खेळांना प्रोत्साहन देणे आणि क्रीडा संबंधित क्रियाकलापांमध्ये सहभागी होण्याचे महत्त्व अगदी वैद्यकीय आणि विज्ञानाच्या शिकवणी मार्फत पण कळले आहे. जमाते इस्लामिक हिंद मुंब्रा इस्लामी तत्वे आणि मर्यादा असलेल्या वेगवेगळ्या मैदानी खेळांना प्रोत्साहन देते, मुलांचा खेळात सहभाग झाल्याने आरोग्य व स्वाभाविकपणा जपण्यात मदत होते आणि वेगवेगळ्या वाईट सवई व्यसन यापासून सुरक्षित राहतात मग ती तंबाकू,ड्रग्स इत्यादी असो कि मोबाईल सुरफींग आणि प्रोनोग्राफी. 

आपण खेळातून काय शिकतो?

* आपले ध्येय साध्य करणे.

* स्वार्थ सोडून उद्देश साध्य करण्यासाठी सांघिक कार्य कसे केले जाते.

* इतरांच्या चुकांकडे दुर्लक्ष करून पुढे खेळा. तुमचा उद्देश साध्य करण्यासाठी, क्षमा करा.

* यश मिळविण्यापासून मागे हटू नका आणि पराभूत झालेल्यांच्या चांगल्या प्रयत्नांचे कौतुक करा. आत्मचिंतन करा आणि पुढे खेळ चालू ठेवा. 

हे सर्व गुण मुस्लिमांमध्ये जन्माला यावेत, जेणेकरून त्यांनी या जगात आपली जबाबदारी "सृष्टी निर्मिकाचे मार्गदर्शनवर आधारित सर्वोत्तम समाज,माध्यम मार्गीय समाज" ही भूमिका बजावू शकतील, अशी या शिकवणी मार्फत इस्लामची इच्छा आहे.

2012 ईसवी सनापासून पायात बूट नाहीय,गोलकोसवर धड नेट नाही, बांबू बांधून सुरु केलेले रिफॉर्मशन कप फुटबाल टूर्नामेंट आज देशपातळीवरचा चषक बनला आहे. आपण आज त्यासाठी जमा आहोत.घरी बसून, स्वतःच्या जगात आनंदी राहून, काहीही बदल होत नाही.

अंधाराला शिव्याशाप देऊन काहीही बदलणार नाही. मुंब्रा शहरात खुप काही चांगलं आहे आणि त्यासोबत काही वाईट गोष्टीही आहेत. त्यांना फटकारून काही होणार नाही. आपल्या सगळ्यांनी आपल्या समाजातील वाईट गोष्टींविरुद्ध लढायचं आहे. समाज बदलण्यासाठी आपली भूमिका निभावण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे.आपले कौशल्य आणि विशेष गुण अल्लाहच्या मार्गात घाला, भौतिक नफा-तोटा याच्या वरती उठून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात चांगल्या परिवर्तनासाठी कार्य करा. न्याय आणि संतुलित,प्रामाणिक,आनंदी भारतीय समाज घडवण्यासाठी.

जमाअत ए इस्लामी हिंदचे सहकार्य करा

मुंब्रा शहराचा कायापालट करण्यासाठी अतिशय पराकाष्ठा आणि प्रयत्न करत आहे.

अल्लाहने तुमच्यापैकी प्रत्येकाला काही ना काही कौशल्य दिले आहे, प्रत्येकामध्ये काही ना काही विशेष गुण ठेवला आहे.आपल्या त्या विशेष गुण आणि वेळेचा काही भाग इस्लामच्या फायद्यासाठी खर्च करू या.आपल्याला ज्या प्रकारचा न्याय,समता आणि बंधुत्वावर आधारित  चांगला समाज आणि जग निर्माण करायचे आहे ते केवळ विचार करून किंवा इतरांना शाप देऊन साध्य होणार नाही.त्यासाठी इस्लामच्या शिकवणीनुसार प्रथम स्वतःला घडवावे लागेल आणि त्यानुसार मग जग निर्माण करावे लागेल. 

जेव्हा प्रिय पैगंबर मक्केच्या खोऱ्यात एकटे उभे होते, तेव्हा तुमच्यासारख्या काही तरुणांनी  त्यांचे नेतृत्व स्वीकारले, आपले गुण आणि कौशल्य त्यांच्या स्वाधीन केले,आणि त्यांचा आदेशानुसार पराकाष्ठा करू लागले तेव्हा त्याचा परिणाम काय झाला हे आपल्या सर्वांना माहीत आहे.

दारू, जुगार, नाचगाणी,निर्मिक शिवाय काल्पनिक देवांची पूजा यांच्या व्यसनात गुरफटलेला, स्त्रियांचा आदर न करणारा समाज बघता बघता जगाचा तारणहार झाला. त्यांना जाग आली तर काही वर्षातच अरबस्तानची भूमीच नाही तर जगाचा कायापालट झाला.बघता बघता जगाला आपल्या डमरुवर नाचवणारे रोम आणि पर्शिया सारखे अत्याचारी साम्राज्यांचा सत्तेवरून हाकलून न्याय राबवणारे आणि बंधुत्व निर्माण करणारे शासक बनले.युवा शक्ती फार मोठी शक्ती आहे. समाजात तेच बदल घडवू शकतात. म्हणूनच प्रत्येक अत्याचारी शासन त्यांना दारू,जुगार,  नशा,नाचगाणे आणि सेक्स यामध्ये अडकवून ठेवण्याचे प्रयत्न करते.

या, जमात इस्लामी हिंदला या देशाची व्यवस्था बदलायची आहे, न्याय, बंधुत्व, प्रेम या तत्वावर आधारित समाज निर्माण करायचा आहे,आमच्या या कार्याला सगळ्यांनी साथ द्या.बदलत्या मुंब्राचे साक्षीदार बना. 

जे आमच्या संघटनेत सामील होऊन साथ देवू शकतात त्यांनी सोबत यावे, ज्यांना भाग न घेता एकत्र चालता येते ते भल्या कार्यासाठी आमच्या सोबत चालू शकतात. त्यांनी सोबत चाला. आपले ट्यालेंट परिवर्तन घडवण्यासाठी लावा. ते, आणि ज्यांना हे पण येत नाही त्यांना आपल्या जागी राहून आमच्यासाठी निदान प्रार्थना करता येते त्यांनी ती करावी.आम्ही अल्लाहवर विश्वास केला तोच आपल्यासाठी पुरेसा आहे. हे तर आपले सौभाग्य कि तो आपल्या कार्यासाठी ज्याला इच्छितो त्याला निवडतो. अल्लाहच आमचा पालनकर्ता, प्रेषित आमचे नेतृत्व आणि कुरानच आमचा मार्गदर्शक, जिहाद (पराकोटीची पराकाष्ठा) हाच आमचा मार्ग आहे. कुराणाच्या  शिकवणीला अंमलात आणणे हीच मानवता आहे. याशिवाय जे पण मानव विचारातून निर्माता तत्वांवर धर्म किंवा जीवनमार्ग उदंड लोकांनी बनवले आहेत ते फक्त मानवाला मार्गभ्रष्ट करू शकतात.शोषण आणि छळ करणारे आहेत.

- सैफ अस्रे

मुंब्रा (ठाणे)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget