Halloween Costume ideas 2015

सूरह यूनुस:ईशवाणी (सुबोध कुरआन)


(१०५) ...आणि कदापिदेखील अनेकेश्वरवादींपैकी असू नये.१०९

(१०६) आणि अल्लाहला सोडून अशा कोणत्याही अस्तित्वाचा धावा करू नकोस जो तुला फायदाही पोहचवू शकत नाही आणि नुकसानही नाही. जर तू असे करशील तर अत्याचाऱ्यांपैकी बनशील.

(१०७) जर अल्लाहने तुला एखाद्या संकटात घातले तर स्वत: त्याच्याशिवाय इतर कोणी नाही जो संकट निवारण करील. आणि जर त्याने तुझ्यासाठी एखाद्या कल्याणाचा इरादा केला तर त्याच्या कृपेला रद्द करणारादेखील कोणी नाही. तो आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो त्याला आपल्या कृपेने उपकृत करतो, आणि तो क्षमा करणारा व दया करणारा आहे.’’

(१०८) हे मुहम्मद (स.)! सांगून टाका, ‘‘लोकहो! तुमच्यापाशी तुमच्या पालनकत्र्याकडून सत्य आलेले आहे. आता जो सरळमार्ग अनुसरील त्याचे सद्वर्तन त्याच्यासाठीच हिताचे होय आणि जो मार्गभ्रष्ट राहील त्याची मार्गभ्रष्टता त्याच्यासाठीच विनाशकारी आहे. आणि मी तुमच्यावर काही हवालदार नाही.’’


(१०९) आणि हे पैगंबर (स.)! तुम्ही मार्गदर्शनाचे अनुसरण करीत राहा जे तुमच्याकडे दिव्य प्रकटन (वह्य) द्वारे पाठविले जात आहे, आणि संयम राखा इथपावेतो की अल्लाह निर्णय करील आणि तोच सर्वोत्तम निर्णय लावणारा आहे.


१०९) म्हणजे त्या लोकांत कधीही सम्मीलीत होऊ नकोस जे अल्लाहच्या अस्तित्वात, त्याच्या गुणात, त्याचा हक्कांमध्ये आणि त्याच्या अधिकारांमध्ये इतरांना सहभागी ठरवितात. म्हणून मागणी केवळ या स्वीकारात्मक पद्धतीतच नाही की विशुद्ध तौहिद (एकेश्वरत्व) चा मार्ग सामुदायिकरित्या स्वीकारावा, परंतु या अलिप्त्वादी रूपातसुद्धा आहे की त्या लोकांपासून वेगळे व्हावे जे कोणत्याही पद्धतीने किंवा कोणत्याही स्वरुपात अनेकेश्वरत्व स्वीकारत असतील.  विश्वासातच  नव्हे  तर आचरणातसुद्धा आणि व्यक्तीगत जीवनाच्या पद्धतीतसुद्धा आणि सामाजिक जीवनव्यवस्थेतसुद्धा एकेश्वरत्व प्रकर्षाने प्रकट झाले पाहिजे.

आपल्या उपासनेत, घरातच नव्हे तर शाळांमध्ये, मदरशांमध्ये, न्यायालयात, कार्यालयात, विधीमंडळात, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात म्हणजेच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्या लोकांच्या जीवनपद्धतीपेक्षा आपली जीवनपद्धती वेगळी आहे, ज्यांनी आपली जीवनपद्धती एकेश्वरत्व आणि अनेकेश्वरत्वाच्या मिश्रणातून तयार केली आहे.

तुम्हाला उघड अनेकेश्वरत्वापासून सुरक्षित राहण्याची आवश्यकता नाही तर छुप्या अनेकेश्वरत्वापासून अत्यंत सावधगिरीने अलिप्त् राहण्याची गरज आहे. खरेतर छुपे अनेकेश्वरत्व अत्यंत भयानक आहे आणि त्यापासून सावध राहाण्याची अति गरज आहे.

काही अज्ञानी लोक छुप्या अनेकेश्वरत्वाला हलके अनेकेश्वरत्व म्हणतात. त्यांच्या मतानुसार याचा विषय इतका महत्त्वपूर्ण नाही जितका उघड (स्पष्ट) अनेकेश्वरत्वाचा आहे. `छुप्या' चा अर्थ `हलका' नव्हे तर `लपलेला' आहे. (प्रत्येकजण जाणतो की गुप्त्रोग हा भयंकर घातक असतो, त्या रोगांपासून ज्याची लक्षणे स्पष्ट दिसून येतात) ज्या अनेकेश्वरत्वाला मनुष्य एका नजरेतच ओळखतो त्याच्याशी एकेश्वरत्व जीवनपद्धतीचा संघर्ष अटळ आहे. परंतु ज्या अनेकेश्वरत्वाला समजण्यासाठी शोधवृत्तीची आवश्यकता आहे तसेच एकेश्वरत्वाच्या निकडींची पूर्ण जाणीव असणे आवश्यक आहे; असा मनुष्य छुप्या अनेकेश्वरत्वाची पाळेमुळे जीवनधर्म व्यवस्थेत खोलवर रूजवितो ज्याची खबर सर्वसामान्य एकेश्वरत्व लोकांना होत नाही. हळूहळू अशा अदृश्य पद्धतीने तो जीवनधर्माच्या आत्म्यालाच खाऊन टाकतो. असे करताना कधीही धोक्याची घंटा वाजवण्याची संधी मिळत नाही.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget