लखीमपूर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाने कोर्टात अशी मागणी केली आहे की हत्या करण्याचा प्रयत्न करण्यासाठी चार्जशीटमध्ये उल्लेख करावा. एसआयटीच्या म्हणण्यानुसार ही घटना सुनियोजित हत्या करण्याचे कटकारस्थान होते, दुर्घटना नव्हती. मारेकऱ्यांनी समन्वयाने रचलेला हे सुनियोजित षड़यंत्र होते. एसआयटीचे तपास अधिकारी विद्याराम दिवाकर यांचे असे देखील म्हणणे आहे की रॅश ड्रायव्हिंगचा नोंदवलेला गुन्हा बदलून त्याजागी हत्येचाच गुन्हा नोंदवावा.
तीन ऑक्टोबर रोजी आठ जण ज्यामध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश होता. एका वाहनाखाली त्यांना चिरडून ठार केले होते. ज्या वाहनाने त्यांना चिरडण्यात आले आणि ते आरोपी सध्या तुरुंगात आहेत. यात प्रामुख्याने गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र अशीश मिश्रा यांचा समावेश आहे.
एसआयटीने ज्या पद्धतीने या प्रकरणावर प्रश्न उपस्थित करून कोर्टात आरोपीविरूद्ध हत्येचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे त्यावरून अशी आशा वाटते की खरेच या प्रकरणात न्याय होणार आहे. कोर्टात जे काही पुरावे सादर करावे लागतील ते इमानेइतबारे सादर झाले तर दोषींना शिक्षा होणार यात शंका नाही. पण हा गृहराज्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून आणखीन काय काय घडतंय आताच कुणी सांगू शकत नाही. आम्हाला जाणूनबुजून पुरावे नसताना कुणाला दोषी ठरवून त्याला शिक्षा व्हावी असे वाटत नाही. न्याय व्हावा हीच अपेक्षा. एसआयटीने म्हटल्याप्रमाणे हा गुन्हा सुनियोजित होता, म्हणजे माणसांना चिरडून मारायचे होते. हा सर्व खटाटोप एकाकी घडला नसणार. सुनियोजित म्हणजे काही दिवसांपूर्वीच सर्व काही ठरवले गेले असावे. यात फक्त आरोपीच नसून इतरही लोक असतील. या सर्वांचा एक सूत्रधारही असावा, तो सूत्रधार कोण? हेही एसआयटीने तपास करून त्याची शहानिशा करायला हवी.
दुसरी महत्त्वाची बाब अशी की आपण कोणत्या धर्मात, कोणत्या सभ्यतेत राहातो. माणसांनी हत्या करणे अशा घटना घडतच राहातात. दररोज कितीतरी लोकांचे प्राण या हत्येद्वारे घेतले जात असतील. पण ज्या लोकांची हत्या होते आणि जे लोक हत्या करतात त्यांच्यामध्ये कोणता न कोणता कलह असतोच. कारण विनाकारण कुणी कुणाचा जीव घेत नसतो. पण कितीही मोठी कारणं असतील, आपसात भांडणं असतील, तरी देखील कुणाची हत्या करण्याची परवानगी कायदा देत नाही. समाज देत नाही. मानवता देत नाही की कोणता धर्म वा सभ्यता तशी अनुमती देत नाही. असे असताना ज्या निष्पाप लोकांना ज्यांचा मारेकऱ्यांशी काहीएक संबंध नव्हता, भांडण नव्हते अशा लोकांना त्यांच्या मागून येऊन त्यांच्यावरून वाहन चालवून त्यांना चिरडून मारून टाकणं हा कोणता धर्म, कोणती संस्कृती?
या प्रकरणाची दुसरी बाजू अशी की जे काही घडले ते सुनियोजित तर होतेच याचा उद्देशही तेव्हाच महत्त्वाचा होता. वर्षभरापासून जे शेतकरी पूर्णपणे शांततेने, संयमाने, धैर्याने आंदोलन करत होते, त्यांना हिंसेच्या मार्गावर लोडून द्यावे. पण हे आंदोलन जशा पद्धतीने शस्तबद्धतेने चालू होते, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला संयम ढळू दिला नाही. ते हिंसेवर उतारू झाले असते तर एक दोन दिवसांतच हे आंदोलन संपवून टाकले गेले असते. सत्तेपेक्षाही प्रामाणिक आणि मुत्सद्दी या शेतकऱ्यांनी सत्तेचे काहीच चालू दिले नाही. त्यांनी उलट एक दोन व्यक्तींचे प्राण वाचवले. त्यांनी इच्छिले असते तर अशीश मिश्राशी जशास तसा व्यवहार केला असता. पण ते शेतकरी होते. सत्तेच्या नशेत धुंद मंत्रीसंत्री नव्हते. त्यांना आपले लक्ष गाढायचे होते. आपले उद्दिष्ट साकार करायचे होते. त्यांनी आपल्या उद्दिष्टासाठी ७५० शेतकऱ्यांचे बलिदान देऊन दुसऱ्यांचा जीव घेतला नाही. स्वतःचे प्राण अर्पण केले आणि शेवटी त्यांनी आपले उद्दिष्ट साध्य केले. पंतप्रधान मोदींनी उदार मनाने म्हणा की निवडणुकीच्या विवशतेने म्हणा, शेवटी ते क्रूर तीन कृषी कायदे पत घेतले. इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या इतर मागण्या देखील मान्य करीत न्यूयनतम समर्थन मूल्यासाठी एक समिती गठन करण्याचा निर्णय घेतला. या देशात बरीच आंदोलने झाली. बऱ्याच चळवळी चालल्या, पण शेतकऱ्यांनी जे करून दाखवले ते इतरांना जमले नाही. कमालीची एकता, कमाहीचे संघटन, व्यवस्थापन या शेतकऱ्यांनी करून दाखवले. ज्यांच्याविषयी कुणाला अशी आशा नसेल कारण जते शेतकरी होते. मध्यमवर्ग नाही की शिकले सवरलेले नाहीत, बुद्धिवादी नाहीत, अशी सर्वांची धारणा असेल, पण शेवटी अशा सर्व मापदंडांना झुगारून त्यांनी आपले संघटन कौशल्याच्या प्रकाशात स्वतःचा मीडिया सर्वकाही स्वतःच उभारला. हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांना रात्रंदिवस आपल्या घराबाहेर दिल्लीच्या सीमेऱर वेगवेगङ्या ठिकाणी बांधून ठेवणे काही सोपे काम नव्हते. एका अशा उद्दिष्टासाठी जे खरेच साकार होईल की नाही याची खात्री वर्षाच्या शेवटच्या दिनापर्यंत कोणालाही नव्हती. जिकिरीचे काम होते. शेतकरी नेत्यांनी हे आव्हान स्वीकारले आणि पार पाडले. कोणत्याही राजकीय पक्षाच्या साहाय्याविना हे आंदोलन चालविले गेले. इतक्या मोठ्या कार्यात कितीतरी अथक अडचणी आल्या असतील, पण हे लोक खचून गेले नाहीत. जगाच्या इतहासात अशी दुसरी घटना नाही. कोणत्या आंदोलनाचा एवढा मोठा इतिहास नाही.
शेतकऱ्यांची प्रामाणिकता आणि आपल्या सर्वस्व या लढ्यात वाहन टाकणं हीच खऱ्या अर्थाने या आंदोलनाची गुरुकिल्ली ठरली. बाकी काय नाही. या शेतकऱ्यांनी देशाच्या नागरिकांना दाखवून दिले आहे की कोणतेही ध्येय गाठणे अशक्य नसते, पण त्यासाठी तशी तयारी असावी लागते.
- सय्यद इफ्तिखार अहमद
संपादक,
मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment