सर्व केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद, काँग्रेसचे एक प्रमुख नेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे प्रसिद्ध वकील आहेत. नुकतेच त्यांचे एक पुस्तक प्रकाशित झाले आहे, ज्याचे शिर्षक आहे ’सनराइज ओवर अयोध्याः नेशनहुड इन अवर टाइम्स’ या पुस्तकाच्या प्रचार साहित्यात लिहिले आहे की, सुप्रीम कोर्टाने राम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा केला. जर एक मस्जिद उध्वस्त करणे आस्थेची रक्षा आहे, तर एका मंदिराची स्थापना, आस्थेचा उद्धार आहे तर मग आम्ही सर्वजण मिळून संविधानात आस्थेचा उत्सव साजरा करू शकतो.
पुस्तकात असेही म्हटले आहे की, जिथे हिन्दू एक महान आणि सहिष्णू धर्म आहे तिथे हिंदुत्व एका प्रकारचे राजकारण आहे. ज्याची तुलना आयएसआयएस आणि बोको हरमच्या राजकारणाशी केली जाऊ शकते. आपल्या पुस्तकात खुर्शीद यांनी अयोध्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा जोरात बचाव केला आहे. हे सत्य माहित असून देखील देशाच्या सर्वोच न्यायालयाने हे स्वीकार केले आहे की, 1949 मध्ये चोरट्या मार्गाने लपून छपून रामाच्या प्रतीमा तेथे ठेवणे हे एक गुन्हेगारी कृत्य होते आणि मस्जिद पाडणे हा ही अपराध होता. परंतु, कोर्टाने या गुन्ह्याबद्दल कोणालाही शिक्षा केली नाही. जिथपर्यंत दूसऱ्या गुन्ह्याचा प्रश्न आहे, लिब्रहन आयोगाच्या अहवाल भाजपाच्या शीर्ष नेतृत्वाला कोठडीत टाकण्यासाठी पुरेसा आहे. खुर्शीद, खरेतर शांतीचे बोलत आहेत आणि त्या निर्णयाप्रती आपली भूमीका मवाळ ठेवत आहेत ज्याने गुन्हेगारांना सोडून दिले आहे.
हां! पुस्तकात त्यांनी हिंदुत्वाच्या व्याखेचे विवेचन करताना त्याची तुलना अन्य कट्टरपंथी संघटनांशी केली आहे. त्यामुळे या गोष्टीवर गदारोळ उभा राहिला आहे. हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्यांनी नैनीताल येथील त्यांच्या घरी गोळीबार केला आणि जाळपोळ केली. त्यांच्या पुस्तकाला हिन्दू धर्माचा अपमान करणारे पुस्तक म्हणून दर्शविले. खरे तर ते हिन्दू धर्माची स्तुती करत आहेत. ते तर हिन्दू धर्माच्या नावावर केल्या जात असलेल्या राजकारणाचा विरोध करत आहेत. त्यांच्यासारखचे, राहुल गांधी यांनी हिन्दू धर्म आणि हिंदूत्व हे वेगळे असल्याचे सांगितले. हिन्दू एक धर्म आहे आणि हिन्दुत्व राजकारण आहे. इस्लाम एक धर्म आहे, तर बोको हरम व आएसआयएस इस्लामच्या नावावर राजकारण करणाऱ्या संघटना आहेत.
लोकांच्या डोक्यात असे भरले आहे की हिंदुत्व आणि हिन्दू धर्म पर्यायवाची शब्द आहेत. हे सांप्रदायिक राष्ट्रवाद्यांना मिळालेले मोठे यश आहे. सावरकारांनी मोठ्या हुशारीने आपली राजकीय विचारधारा, हिंदुत्वाच्या नावात हिन्दू शब्द सामील करून केली आहे. यामुळे एका सामान्य हिन्दू ला असे वाटते की हिंदुत्वावर केलेली टिका म्हणजे त्यांच्या धर्मावर टिका केली आहे.
सावरकर हिन्दू राष्ट्रवादाचे जनक आहेत आणि त्यांच्या नजरेसमोर राष्ट्रीय ओळख तीन स्तंभावर आधारित आहे. 1. भौगोलिक एकता, 2. वांशिक चिन्ह आणि 3. सांस्कृतिक विविधता. सावरकर हिन्दुंसाठी धर्माच्या महत्वाला कमी आखताना म्हणतात की हिन्दु धर्म, हिन्दूत्वा चा एक गुणधर्म मात्र आहे. (हिन्दुत्व पान 18). या प्रकारे दोन शब्दांमधील अंतर स्पष्ट आहे.
हिन्दू धर्माला समजने अवघड कार्य आहे कारण या धर्माचा ना कोणी पैगम्बर आहे, ना कोणते एक पवित्र पुस्तक आणि ना कोणता एक देव. तरीपण हिन्दू एक धर्म आहे, यात कोणते दुमत नाहीये. नेहरू लिहितात की एका धर्माच्या रूपात हिन्दू अस्पष्ट, अकार नसलेला आणि बहुपैलू आहे आणि वेगवेगळे लोक याला वेगवेगळ्या दृष्टीने पाहतात. आज आणि इतिहासातही यामध्ये वेग-वेगळ्या आस्था आणि आचरण पद्धती समाविष्ट राहिल्या आहेत. यामध्ये अनेक गोष्टी एकमेकांपेक्षा वेगळ्या आणि एकमेकांचे खंडन करणाऱ्या आहेत. मला असे वाटते की जगा आणि जगू द्या या धर्माचा मूळ आत्मा आहे. महात्मा गांधी यांनी हिन्दू धर्माची परिभाषा करण्याचा प्रयत्न करताना लिहिले आहे की, जर मला हिन्दू धर्माची परिभाषा करायला सांगितले तर मी केवळ असे म्हणेन : अंहिसक साधनांनी सत्याचा शोध. कोणी व्यक्ती ईश्वरावर विश्वास न ठेवताही स्वतःला हिन्दू म्हणू शकतो. हिन्दू धर्म, सत्याचा निरंतर शोध घेण्याचे नाव आहे. गांधीचा हिन्दू धर्म सहिष्णू होता.
त्यापेक्षा, सावरकर यांच्यासाठी हिन्दू धर्म हा एक राजकीय उद्देश होता आणि हाच हिन्दू सांप्रदायिकतेचा आधार आहे. सावरकर यांच्या अनुसार हिन्दू तो आहे जो सिंधूपासून समुद्रापर्यंत पसरलेल्या भूभागाला आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी दोन्ही मानतोे. त्यांच्या अनुसार हिन्दू एक वेगळे राष्ट्र आहे आणि भारत भूमीचे मूळ रहिवाशी आहेत. मुसलमान एक वेगळे राष्ट्र आहे. गांधी-नेहरू यांचाा समज होता की आमचा धर्म कोणताही असो आम्ही एक राष्ट्र आहोत. गांधीजी यांनी त्यांच्या हिन्दू धर्माला परिभाषित करताना म्हटले आहे की, ईश्वर अल्लाह तेरो नाम.
हिन्दू राष्ट्रवादी, अर्थात हिन्दुत्वाचे राजकारण करणारे, हिन्दू धर्म आणि हिन्दूत्वाला पर्यायवाचीच्या रूपात स्पष्ट करत आहेत. अधिक समजून-उमजून असे प्रचारित केले जात आहे की, हिन्दुत्व सर्वांना सोबत घेवून चालतो आहे आणि त्यांच्यामध्ये एकता स्थापित करत आहे. हीच गोष्ट मोहन भागवतही सांगत आहेत. हा सर्व प्रचार निवडणुकीच्या लाभासाठी केला जात आहे. हिन्दुत्वाच्या अजेंड्यात हे समाविष्ट आहे की इतिहासाचे गौरवीकरण - त्या इतिहासाचे ज्यामध्ये जातीयता आणि लैंगिक उतरंड दगडवारची रेष होती. - ’विदेशी धर्म’ (ईसाई धर्म आणि इस्लाम) चे राक्षसीकरण आणि गाय, राम मंदिर, लव जिहाद आदीसारख्या मुद्यांवर हिन्दूंची भावना भडकावणे. ते हे पण मानतात की ईसाई मिशनरींद्वारा केले जात असलेले ’धर्मांतरण’ हे ही हिन्दूंसाठी खतरनाक आहे. थोडक्यात हिन्दुत्वाचा अजेंड अशा नीतिंना लागू करणे आहे जो समाजातील उच्चवर्गीयांना लाभ पोहोचवेल आणि गरीबांप्रती फक्त शाब्दिक सहानुभूती व्यक्त करेल.
हिन्दू धर्म आणि हिन्दुत्व हे एक असल्याचे दाखविणे सांप्रदायिक शक्तींची एक राजकीय रणनीति आहे. हिन्दुत्व असहिष्णु आहे, हिंसेला प्रोत्साहित करत आहे आणि धार्मिकतेलाही. ते दलित आणि आदिवासींना सोशल इंजिनिअरिंग मार्फत आपले राजकीय हित साधण्यासाठी उपयोगात आणत आहेत. खरेतर, हिन्दुत्व त्या राजकारणाचे नाव आहे जे सद्यस्थितीला धरून ठेवण्याबरोबरच समाजाला वर्णावर आधारित जुन्या व्यवस्थेकडे पुन्हा ढकलू पाहत आहे.
आपल्या घरात जाळपोळ झाल्यानंतर खुर्शीद यांनी म्हटले की, यामधून हे स्पष्ट होत आहे की, ते जे करीत आहेत ते बरोबर आहे. ते खरे म्हणत आहेत परंतु, हा प्रश्न उपस्थित होतो की, आम्ही या विभाजित करणाऱ्या विचारधारेचा सामना कसा करावा? विभाजित करणाऱ्या शक्तींनी सामान्य लोकांना हे समजावून सांगण्यात यश मिळविले आहे की, हिन्दू धर्म आणि हिन्दूत्व एकच आहे. काय आम्ही हिन्दुत्वाचे नाव न घेता त्याच्या विभाजित करणाऱ्या राजकारणाचा मुकाबला करू शकू? काय आपण हिन्दूंना हे समजाऊ शकू की, हिन्दू धर्म तो आहे ज्याला महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांनी परिभाषित केले आहे. आम्हाला गांधी यांचा हिन्दू धर्म व गोडसे आणि त्याच्या साथीदाराच्या हिन्दुत्वात फरक करावा लागेल. ज्यामुळे हिन्दू धर्माची विविधता आणि मानवीयता या सिद्धांतावर ठाम राहू शकेल आणि आपण सांप्रदायिकतावादींच्या अजेंड्याचा मुकाबला करत शांती आणि बंधुत्व यावर आधारित समाजाची स्थापना करू शकू. (इंग्रजीतून हिंदीत रूपांतर अमरिश हरदेनिया आणि मराठीत रूपांतर एम.आय. शेख, बशीर शेख) (लेखक आयआयटी मुंबईत शिक्षक होते आणि सन 2007 मध्ये राष्ट्रीय सामाजिक सौहार्द पुरस्काराने सन्मानित आहेत.)
- राम पुनियानी
Post a Comment