Halloween Costume ideas 2015

नामोस्मरण आणि याचना : प्रेषितवाणी (हदीस)

माननीय अबू बकर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले,‘‘दु:खी-कष्टी मनुष्याने ही प्रार्थना (दुआ) करावी– ‘अल्लाहुम्मा... (शेवटपर्यंत)’ अर्थात- हेअल्लाह! मी तुझ्या कृपेचा इच्छुक आहे. तू मला क्षणभरदेखील माझ्या इच्छा-वासनेच्या हवालीकरू करू नकोस (आपल्या देखरेखीत ठेव) आणि माझी वाणी, अहवाल व व्यवहार व्यवस्थित कर, तुझ्याशिवाय कोणीही उपासनेस योग्य नाही.’’ (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : जोपर्यंत एखादा भक्त अल्लाहच्या संरक्षणात व देखरेखीत असतो इच्छा- वासनांचात्याच्यावर कसलाही प्रभाव पडत नाही आणि त्याच्याकडून कसलेही पापकृत्य करवू शकत नाही.परंतु जेव्हा अल्लाहच्या संरक्षणापासून भक्त स्वत:ला वंचित करून घेतो तेव्हा इच्छा-वासनात्याला विनाशाच्या मार्गावर सोडतात. म्हणून मोमिन दुआ (प्रार्थना) करतो की ‘‘हे अल्लाह!मला इच्छा-वासनांच्या हवाली करू नकोस अन्यथा माझा विनाश होईल आणि माझ्या संपूर्णजीवनाला पवित्र बनव, व्यवस्थित कर.’’
माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) ही दुआ पठणकरीत असत, ‘‘अल्लाहुम्मा... (शेवटपर्यंत) अर्थात- हे माझ्या अल्लाह! मी तुझा आश्रय मागतो संकटांपासून, दु:खापासून, त्रासापासून, आळस व सुस्तीपासून, कर्जाच्या ओझ्यापासून आणिमानवांनी प्रभुत्व मिळविण्यापासून.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण : अल्लाहच्या आश्रयात स्वत:ला देण्याचा अर्थ आहे की दासाला आपल्या दुर्बलतेचीव विवशतेची जाणीव आहे. त्याला वाटते की आपण दुर्बल आहोत म्हणून शक्तिशाली स्वामीचाआश्रय मागतो जेणेकरून त्याने त्या दुष्टव्यांपासून वाचवावे.
येणाऱ्या संकटांना जो त्रास व काळजी संलग्न असतात त्यास ‘हम’ म्हणतात आणि‘हु़ज्न’ दु:खाला म्हणतात जे संकट आल्यानंतर पोहोचते. ‘अज़्ज’ म्हणजे एखादे काम करू न  शकणे आणि ‘मूर्खपणा’ व ‘बेसावधपणा’ या अर्थानेदेखील घेतला जातो. म्हणजे असे की मनुष्याला वाटते की ‘हे तर सोपे काम आहे, रात्री करू’, परंतु रात्र निघून जाते आणि तो ते काम करू शकला नाही तर म्हणतो, ‘बरे चला, उद्या होईल.’ अशाप्रकारे कामाची मूळ संधी वाया जाते. या दुआचा सार असा आहे की मोमिन आपल्या पालनकर्त्याला म्हणतो, ‘‘हे अल्लाह! माझे रक्षण व देखरेख कर. येणाऱ्या संकटांमुळे माझ्या मनाला त्रास होऊ नये. जेव्हा संकटयेईल तेव्हा मला संयम दे, जी वस्तू हरवली जाईल त्यावर मला दु:ख होऊ नये आणि तुझ्यामार्गावर चालण्यात आळस व सुस्ती माझ्यापाशी फिरकू नये आणि माझ्यावर लोकांचे इतके कर्जहोऊ नये जेणेकरून मला त्याची परतफेड करता येणे शक्य न व्हावे आणि काळजीने ग्रासला जाऊ नये आणि वाईट लोकांना माझ्यावर प्रभुत्व प्रदान करू नकोस.’’
माननीय ज़ैद बिन अरकम (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) ही दुआ करीत असत, ‘‘अल्लाहुम्मा... (शेवटपर्यंत) अर्थात- हे माझ्या अल्लाह! तू माझ्या वासनेला असे बनव की तिने तुझी अवज्ञा करू नये आणि तुझ्या शिक्षेचे भय वाटावे, दुर्गुणांपासून पवित्रकर, तू त्यास उत्तमप्रकारे पवित्र करणारा आहेस, तू त्याचा संरक्षक आणि स्वामी आहेस, हे माझ्या अल्लाह! मी तुझा आश्रय मागतो त्या ज्ञानापासून जे मला लाभ देणार नाही आणि त्या हृदयापासून जे तुझ्यासमोर नतमस्तक होणार नाही आणि त्या वासनेपासून जी संतुष्ट न व्हावी आणि अशा दुआपासून जी कबूल न व्हावी.’’ (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण : ‘लाभ देणारे ज्ञान’ मनुष्याला ईशपरायणता शिकविते, अनुसरणासाठी प्रोत्साहित करते आणि जग व परलोकात अल्लाहच्या कृपेचा हक्कदार असते. ‘वासनेपासून संतुष्ट न होणे’ म्हणजे त्याला जगातील कितीही मोठ्या प्रमाणात साधनसंपत्ती प्राप्त झाली तरी संतुष्ट न होता त्याची भूक वाढत जाते आणि दुआ कबूल न होण्याची अनेक कारणे आहेत ज्यापैकी एक कारण असे आहे की मनुष्याची मिळकत अवैध असणे, जसे- व्यवहारांच्या बाबतीत ‘वैधमिळकती’च्या बाबतीत वर्णन आले आहे.माननीय अब्दुल्लाह बिन उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) हीदुआ करीत असत, ‘‘अल्लाहुम्मा... (शेवटपर्यंत) अर्थात- हे माझ्या अल्लाह! मी तुझा आश्रय मागतो या गोष्टीपासून की जी देणगी तू मला दिली आहे (माझ्या दुष्कर्मांमुळे) हिसकावून घेतली जावी आणि जी खुशाली मला प्राप्त झाली आहे त्यापासून मी वंचित व्हावे आणि असे की तुझा कोप कोसळावा आणि असे की तू माझ्यावर निराश व्हावा, मी या गोष्टींपासून तुजा आश्रय मागतो.’’ (हदीस : मुस्लिम)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget