Halloween Costume ideas 2015

समाजमाध्यमांतील वांझोटी ट्रोलींग

साहिल शेख
कुरूंदवाड (कोल्हापूर)
8668691105

इंटरनेट, फेसबुक, वॉटस्ऍपच्या भूमीत जगात अगदीच वांझोट्या ट्रोलींगला बळी पडून अती उत्साहाने अज्ञानघाईत प्रतिक्रियावादी होणारी रिकाम टेकड्यांची लक्षणीय वाढ गेल्या काही वर्षभरात दिसून आली. एअरटेल कंपनीचा बायकॉट असो किंवा ’आंबा’ प्रकरणाची आंबट मुक्ताफळे, प्लास्टिक बंदीवरील जोक्स असोत किंवा सेल्फी डे सारखे घाणेरडे प्रकार असोत, बहुजन विशेषत: उच्चभू्र सुशिक्षित तरूणांची मानसिकता कन्फ्युझ अशीच दिसत राहते.
    नकळत प्रस्थापित व्यवस्थेला पुरक असे कामच आपल्या हातून घडते याचे भान राहत नाही. अशा डिलीटेड होणार्‍या पोस्टस्वर थोर सामाजिक कार्य केल्याचा आभास हा सुखावह ठरणारा असला तरी तो योग्यच आहे असे म्हणावेसे काही नाही.
    गल्ली मोहल्ल्यात राहणार्‍या हातावरचे पोट असणार्‍या मिश्रवस्तीत कसेबसे जीवन जगणारा बहुतांशी मुस्लिम तरूण या प्रकारांपासून दूर आहे. कष्टकरी, सर्वहारा पारंपारिक व्यवसायात अर्धमेला झालेला मुस्लिम युवक, कसेबसे शिकून सरकारी/ खासगीत नोकरीसाठी अल्लाहकडे दुवा करणारा युवक, यांच्या प्रश्‍नांना सोशल मीडिया, फेसबुकी प्रचार प्रसारक प्राधान्य देत नाहीयेत. सध्याच्या सरकारी धोरणांची जादुई आकडी खेळी, उजव्यांचे विचारांनी बहरून केलेली अभ्यासपूर्व विश्‍लेषता पद, पैसा, प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी लाचारीचा कळस गाठणारी. साहित्यिकांची धावती रेस, गळचेपी भूमिकांनी गल्ली ते दिल्लीच्या शासन प्रतिनिधींची, सरकारीबाबूंची चमचेगिरी याचा एकूण कुप्रभाव मुस्लिम पिढीवर होतोय.
    बाबरीच्या दंगलीनंतरच एकूण मुस्लिम समाज मनाची भितीदायक जडणघडण आजअखेर तशीच आहे. विशेषत: नव्वदीनंतरच्या कालखंडापासून भगव्या हिंदूत्ववाद्यांच्या सर्वच शाखांचा अतिकट्टरतेने सामोरे जावून द्वेषाचे समाजकारण, राजकारण, त्याला सांभाळत बसणारी भाजपाई व्यवस्था, यामुळेच सर्वसामान्य मुस्लिम युवकांच्या शैक्षणिक आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक ज्ञान, माहितीच्या दिशाच चुकल्या आहेत. घर, गल्ली, जात, धर्म, मैत्री व्यवसाय, सामाजिक संबंध आणि सरकार या प्रत्येक पातळीवर त्यांचा होणारा रोजचा पराभव आणि निर्माण होणारी एकूण उद्वीग्णता यावर मात्र कोणाचेच बोलणे-लिहिणे होत नाही.
    सध्याच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कोलाहलात एकात्मता सांगणार्‍या आणि समता शोधणार्‍या प्रत्येक जाती-धर्माची अस्मिता, तीव्रता, कट्टरता ही सो कॉल्ड उजव्या-डाव्या, त्याच बरोबर फसव्या बाजारपेठी, भांडवलदारी मानसिकतेच्या सत्ताधीश विचारवंतांनी निर्माण केली आहे. सामाजिक बदलांमध्ये प्रतिमा आणि प्रतिकांची बेमालूम निर्मिती करत, तंत्रज्ञानालाही यांनी गिळून टाकले आहे. बाबरीपूर्व नसलेली जहरी किंवा समोर येत नसलेली मानसिकता आज उघडपणे प्रचारकी-प्रसारकी बनलेली आहे. लव्ह जिहादचा भंपकपणा, गोहत्येवरून गोबंदीवरून होणारं मॉबलिंचिंग, व्हॅलेंटाईन डे सारखी शेंबडी थेरं, मंदिर प्रवेशावरून उठविलेला गोंधळ, पुस्तक साहित्य पुरस्कार निर्मितीचा गोतावळा जपणारा हौशी बाजार, शाहिद काजमी पासून राणा अय्युब, पानसरे, दाभोळकर, गौरी लंकेश, कलबुर्गीपर्यंत, रोहित, नजीब, पहलू, अख्लाक, मोहसीन, आसिफा ते परवा युपीत पोलिसांच्या संरक्षणाखाली मारला गेलेला तरूण कासीम. अशा भरपूर भयानक घटनांना चालना आणि उधाण आणत मुस्लिम तरूणाला अधिकृत सापळ्यात पकडण्यासारखे डाव रचले जातायेत. शिक्षण व्यवस्थेच्या सक्षमीकरणातून विषारी खोटी छद्मी इतिहास प्रस्थापित करत धु्रवीकरणाच्या प्रक्रियेला सध्या आलेला ऊत, वेग हा गेल्या तीसेक वर्षातील सांस्कृतिक सामाजिक प्रतिमा बदलांच्या परंपरेची देन आहे. शहरी वस्त्या किंवा गल्लीबोळात मुस्लिम धर्मीयाला राहणेसाठी घरे नाकारणं, मुस्लिमांचे छोटे जरी काम नेत्या पुढार्‍याने केले की आपण मुस्लिमांचे लाड करतो की काय? या खोट्या शंकेपोटी, कामात दिरंगाई अडथळा आणणे. कन्स्ट्रक्शन बंग्लो, ते साईट्स प्लॅटमधून शेवटच्या टप्प्यातच मुस्लिमांना प्रवेश देणे. पूर्वापार रूढ झालेल्या गाव-वस्त्या शहरे यांची नावे, रस्त्यांचे फलक आणि स्वागत कमानी यांचे नव्याने बारसे घालणे, रंगाचा वाद रंगवून, वारणीच करून टाकणे, हे एका विस्फोटक स्थितीपर्यंत आले आहे हेच सत्य!
    उघड्या डोळ्यांनी ही उपरी सहिष्णुता किंवा प्रदर्शनीय नाटकीयता कधी इफ्तार पार्टीच्या निमित्ताने तर कधी शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने दिसते. मानवता, प्रेम स्नेहाच्या सदिच्छा देणार्‍या आणि माणूसकी-सलोख्याच्या नात्यांची वीण घट्ट करणार्‍या तमामांना आपलेस करीत, जे असत्य नाटकी त्याला उघड मांडणे हे सर्वांचेच कर्तव्य. म्हणून मीडिया कोणत्याही बाजूने झुकते माप घेत असेल, तरी मुस्लिम युवकांच्या रोजच्या प्रश्‍नांचा जागर घालीत त्यांच्या मानसिक गुंतागुंतीच्या, गोंधळाच्या काळात त्याची हिम्मत वाढविण्यासाठी तरी कशाही प्रकारे पुढे यायला हवे. केवळ वैचारिकता, अपूरी फेसबुकी दुनियेची आभासी टाईमपाी भूलभूलैय्यात न गुरफटता शहाण्या जाणकारांनी मनमोकळेपणाने दु:ख, व्यथा, वेदना मांडावी. यासाठी भांडावे एवढेच सध्या... पुढं बोलतं राहूच!! इन्शाअल्लाह माझ्या हातून काही नेक घडो.
मैं बेपनाह अंधेरो को, सुबह कैसे कहूं
मैं इन नजारों का अन्धा तमाशबीन नहीं!
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget