Halloween Costume ideas 2015

आणखी एक टंचाई - तांबे

उद्योगपती अनिल अग्रवाल यांचा वेदांत समूहाचा तुतिकोरिन येथील स्टरलाइट प्रकल्प कायमस्वरूपी बंद करण्याचा आदेश तामिळनाडू शासनाने दिलेला आहे.त्यामुळे या प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणाविरोधात झालेले आंदोलन संपलेले आहे. मात्र देशात तांबे टंचाई निर्माणहोऊन तांब्याची आयात करण्याची पाळी देशावर येणारआहे. तुतिकोरिनच्या प्रकल्पातून चार लाख टन तांब्याचे उत्पादन होत होते. कारखानदाराच्या मते मागणीच्या ४३टक्के आणि देशाच्या गरजेच्या ३२ टक्के तांबे या तुतिकोरिन प्रकल्पातून होत असल्याचे सांगितले जात होते.तसा हा उपरोक्त प्रकल्प मार्चपासून देखभाल व दुरुस्तीसाठी बंदच होता. पण त्यावर राज्य शासनाची बंदी आल्यानंतर तो कायमचा बंद होत आहे. काही हजार कामगार बेरोजगार झालेले आहेत. चालू कारखाना बंद होणे हे खेदास्पद असले तरी त्याविरूद्ध झालेल्या जनआंदोलनाची तीव्रता लक्षात घेता सदर प्रकल्प बंद करणे भाग पडलेले आहे.औद्योगिक व घरगुती वापरासीठी तांब्याचा वापर गरजेचा आहे. तांब्याची भांडी वापरणे आरोग्यदायक असते. मात्र तांज्याचा कार्यान्वित प्रकल्प पर्यावरणाच्या दृष्टीने थांबविण्याचा प्रकार घडलेला आहे. त्याचा फेरविचार होऊ शकतो. पर्यावरणाला हानिकारक करणारे प्रदूषणाचे घटक काढून टाकण्यापेक्षा प्रकल्पच बंद करणे इष्ट वाटत नाही. तशात निर्यात होण्यासारखी तांब्यासारखीबाब देशाचे दुहेरी नुकासन करते. कारण निर्यातीमुळे कमी होणारे तांबे देशाला आयात करावे लागणार आहे.त्यामुळे त्यासाठी आपला रुपया खर्च करून आंतरराष्ट्रीय चलन डॉलर्स घ्यावे लागणार आणि त्यातून तांबे खरेदी करावे लागणार.म्हणजे हा व्यवहार देशाची व्यापारी तूट वाढविण्यास कारण होईल. थोडक्यात, स्टरलाइट हा तांबेनिर्मितीचा प्रकल्प अदूरदर्शी जनआंदोलनामुळे कायमचा बंद करणे म्हणजे रोग्याला अ‍ैषधपाणी देण्याऐवजी कायमची झोप देणारी गोळी देण्यासारखे होईल.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget