Halloween Costume ideas 2015

कंत्राटी सरकारीबाबू

१४३९६ तज्ज्ञ लोकांचा सरकारी कामांमध्ये उपयोग करून घेण्याची प्रथा राजीव गांधींच्या काळापासून सुरू आहे. राजीव गांधींनी दूरसंचार विभागाचा कायापालटकरताना देशात पहिली डिजिटल व संगणकीय क्रांती आणताना सॅम पित्रोदा याखासगी क्षेत्रातील तज्ज्ञाचा उपयोग करून घेतला होता. पुढे डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळातही रघुराम राजन, मॉन्टेकसिंग अहलुवालिया, नंदन नीलेकणीअशा तज्ज्ञांचाही सरकारी सेवेत चांगला उपयोग करून घेण्यात आला आहे.आता सरकारी नोकऱ्यांमध्ये जॉईन्ट सेक्रटेरी या पदांवर खासगी कंपन्यांमधीलअधिकारी थेट कंत्राटी पद्धतीने भरले जाणार असल्याचे केंद्र सरकारने काहीदिवसांपूर्वी जाहीर केले. गेले अनेक वर्षे याबाबत चर्चा सुरू होती. सरकारीबाबूंची ढिसाळपणाने काम करण्याची पद्धत लोकांना पसंत नाही. बहुराष्ट्रीय कंपन्या,खासगी नामांकित कंपन्या, खासगी वित्तीय सेवा कंपन्या किंवा अगदी विद्यापीठे किंवा नामांकित खासगी संशोधन संस्थांमधील अधिकारी केंद्र सरकारी नोकरीतथेट जॉईन्ट सेक्रेटरीपदांवर नियुक्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.त्या प्रक्रियेतील पहिले पाऊल म्हणून अशा दहा जागा भरण्याची अधिसूचनाहीजारी करण्यात आली आहे. महसूल, अर्थमंत्रालय, वाणिज्य, नागरी विमानवाहतूक मंत्रालय अशा विभागांमध्ये हे अधिकारी तीन ते पाच वर्षांच्या कंत्राटांवरनेमले जाणार आहेत. खासगी क्षेत्रातील उच्चपदांवर काम केल्याचा किमान पंधरावर्षांचा अनुभव एवढी एकच अट सरकारने त्यासाठी ठेवली आहे. सरकारने हानिर्णय जाहीर केल्यानंतर त्याचे जसे स्वागत झाले तशीच त्यावर टीकाही सुरू झाली आहे. सरकारला संघ विचारांची माणसे प्रशासनात घुसवायची आहेत त्यासाठी काढण्यात आलेली ही पळवाट आहे, या प्रतिक्रियेपासून यापुढील काळात आता निवडणुका न घेताच पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रीही नेमण्याचा सरकारचा इरादा आहे, येथपर्यंत विविध प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्या आहेत. आत्तापर्यंत ही पदे केवळ आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांमधूनच भरली जातहोती. सनदी अधिकाऱ्यांचा हा समुदाय ब्रिटिश राजवटीची देन आहे. इंडियनसिव्हील सर्व्हिस ही पूर्वीच्या काळी मोठी नाव कमावलेली सेवा होती. पण पुढे त्यात बऱ्याच भानगडी मिसळल्या गेल्या. सनदी अधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांचा पोत ओळखून त्यांनाच बासनात गुंडाळून ठेवण्याचा मार्ग पत्करल्यानंतर सनदी अधिकाऱ्यांविषयीचा रोष वाढीला लागला. हे सनदी अधिकारी नंतर थेट भ्रष्टाचार आणि पॉलिटकल लॉबिंगमध्येच गुंतले. आता ही सारी उच्चपदस्थ सनदी अधिकारी मंडळी सरकारी कामकाज पद्धतीत चांगलीच मुरब्बी बनली आहेत.त्यांना आवर घालणे हे आता राजकारण्यांच्याही हातात राहिलेले नाही. या अधिकाऱ्यांमुळे आजवर अनेक चांगल्या सरकारी योजनांचा बट्ट्याबोळ झालाआहे. कागदी घोडे नाचवणे आणि सतत नकार घंटा वाजवणे हा त्यांचा स्थायीभाव झाला आहे. मलईदार पदांवर स्वत:ची वर्णी लावून घेणे, आपल्याला सोयीच्या बदल्या घडवणे, उर्वरित वेळात गटबाजी करून अंतर्गत राजकारण करणे हा त्यांचा आवडता धंदा बनला आहे. अर्थात, काही कार्यक्षम आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांचा त्याला अपवाद आहे, ही बाब जरी खरी असली तरीहे प्रमाण अगदी थोडे आहे. सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाबाबतचा मुद्दायामुळे पूर्णत: बाजूला फेकला जाणार आहे. आता आपला वर्गाचा प्रशासनातला टक्का आणखी घासरतोय की काय अशी सुप्त भीती सत्ताधाऱ्यांच्या मनात निर्माण झाली असण्याची शक्यता आणि सुप्त भीती नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या लक्षात येणे आणि आपल्या वर्गाचा प्रशासनातील टक्का असाच टिकवून ठेवायचा हे आता आपल्याला गुणवत्तेच्या आधारे शक्य नाही (गेल्या पाच वर्षतील या परिक्षांमधील यशस्वी उमेदवाराची जात आणि प्रवर्गनिहाय आकडेवारी लक्षात घेतल्यास ही बाब सहज लक्षत येते). तेव्हा काहीतरी नवीनमार्ग आपली माणसे या महत्वाच्या पदावर घुसविण्यासाठी आखलाच पाहिजे,असे या सत्ताधाऱ्यांना वाटणे ही त्यांच्या दृष्टीने काळाची गरज होती. जी खाजगी क्षेत्रातील लोकांना सचिवपदी बसवून सहज साध्य होणार आहे. खाजगी क्षेत्रांतील लोकांकडे एकवेळ गुणवत्ता असेल पण नीतिमत्ता आहे की नाही याचाही एखादा अभ्यास व्हायला हवा. चंदा कोचारांसारखी बरीच उदाहरणे आपल्या गाठीशी आहेतच. शिवाय यात आणखी एक धोका आहे ते म्हणजे या नियुक्या करण्याचा अधिकार सरकारला आहे म्हणजे ज्या विचारसारणीचे सरकार सत्तेवर येईल ते आपल्या ताटाखालील मांजराची तेथे वर्णी लावणार हे सांगायला कोणा ज्योतिषाकडे जायला नको आणि सध्या सुमारांच्या सद्धीचा काळ असल्याने याचे गांभीर्य अधिकच वाढते. याहीपेक्षा आणखी गंभीर बाब म्हणजे खाजगी क्षेत्रांत गुणवत्ता असते हे विधान अर्धसत्य आहे हे अनेक खाजगी क्षेत्रातील दिग्गज म्हणविल्या जाणाऱ्या अनेक नमुन्यांनी पूर्णसत्य करून दाखविले आहे. त्यामुळेआपल्या विचारांची आणि त्याहीपेक्षा आपल्या मर्जीतील माणसे आणि त्यांचे वर्चस्व येनकेन प्रकारे टिकवून ठेवण्यासाठी ज्या काही धडपडी सुरू आहेतत्यातीलच ही एक आहे हे मात्र निश्चित!
-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४,  Email: magdumshah@eshodhan.com)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget