नामोस्मरण आणि याचना
माननीय अबू मालिक (रजि.) आपल्या वडिलांपासून कथन करतात की वडील म्हणाले की जेव्हा एखादा मनुष्य इस्लामचा स्वीकार करतो तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) त्याला नमाज शिकवित असत, मग त्याला म्हणत, ‘‘अशाप्रकारे दुआ करा- अल्लाहुम्मा... (शेवटपर्यंत) अर्थात हे माझ्या अल्लाह! तू माझे पाप क्षमा कर आणि माझ्यावर दया कर आणि मला सरळमार्ग दाखव आणि खुशाली व उपजीविका दे.’’ (हदीस : मुस्लिम)
माननीय माननीय मुआ़ज बिन जबल (रजि.) यांच्या कथनानुसार,
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी माझा हात पकडला आणि म्हणाले,
‘‘हे मुआज! मी तुझ्यावर प्रेम करतो.’’ मग म्हणाले, ‘‘तुला उपदेश करतो की प्रत्येक नमाजनंतर या दुआचे पठण करा, हे सोडू नका- ‘‘अल्लाहुम्मा... (शेवटपर्यंत) अर्थात- हे माझ्या अल्लाह! तू माझी मदत कर, नामोस्मरणाच्या बाबतीत, आभाराच्या बाबतीत आणि उत्तम उपासनेच्या बाबतीत.’’ (हदीस : रियाजुस्सालिहीन, अबू दाऊद, निसई)
स्पष्टीकरण : म्हणजे ‘‘मला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुझे स्मरण व्हावे, तुझा आभारी असावे आणि उत्तमोत्तम प्रकारे तुझी उपासना करावी, परंतु मी दुर्बल आहे, तुझ्या मदतीचा गरजवंत आहे, तुझ्या मदतीशिवाय हे काम होऊ शकत नाही.’’
पैगंबर मुहम्मद (स.) प्रत्येक फर्ज नमाज (अनिवार्य नमाज) मध्ये (सलाम फिरविल्यानंतर) या दुआचे पठण करीत असत,
‘‘लाईलाहा... (शेवटपर्यंत) अर्थात- अल्लाहशिवाय कोणी उपासनेस पात्र नाही, तो एकमेव आहे, शासनात त्याचा कोणीही भागीदार नाही, संपूर्ण सत्ता त्याच्याच हातात आहे आणि तोच स्तुती व कृतज्ञतेचा हक्कदार आहे, त्याला प्रत्येक गोष्टीवर प्रभुत्व प्राप्त आहे. हे अल्लाह! तू जे काही देऊ इच्छितो त्यास रोखणारी कोणतीही शक्ती नाही आणि ज्यापासून तू वंचित करू इच्छितो, तो वस्तू देणारी कोणतीही शक्ती नाही. तुझ्या तुलनेत कोणाही वर्चस्ववाद्याचे वर्चस्व निष्प्रभ आहे. (हदीस : बुखारी)
उपासना
माननीय जाबिर बिन समुरा (रजि.) यांच्या कथनानुसार,
मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याबरोबर नमाज अदा करीत होतो. पैगंबरांची नमाजदेखील जेमतेम असायची आणि प्रवचनदेखील जेमतेम असे, फार मोठीही नाही आणि अगदीच लहानदेखील नाही. (हदीस : मुस्लिम)
माननीय अबू कतादा (रजि.) यांच्या कथनानुसार,
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मी नमाजकरिता येतो आणि मनात इच्छा असते की फार उशिरापर्यंत नमाजचे नेतृत्व करावे, मग एखाद्या बालकाच्या रडण्याचा आवाज कानी पडतो तेव्हा नमाज आटोपशीर करतो, कारण मला ही गोष्ट आवडत नाही की नमाज उशिरापर्यंत वाढवून बालकाच्या मातेला त्रास सहन करण्यास भाग पाडावे.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या काळात महिलादेखील मस्जिदमध्ये येत होत्या आणि नमाज सामूहिकरित्या अदा करीत असत. त्यांच्यात लहान मुलांच्या मातादेखील असायच्या. त्या मुलांना घरी ठेवून येणे शक्य नव्हते. या हदीसमध्ये लहान मुले आणि महिलांच्या बाबतीत वक्तव्य करण्यात आले आहे. यात त्या इमामांकरिता (नमाजचे नेतृत्व करणाऱ्यांकरिता) बोध आहे जे अनुकरण करणाऱ्यांच्या (त्यांच्या मागे नमाज अदा करणाऱ्यांच्या) स्थितीकडे दुर्लक्ष करून नमाजमध्ये उशिरापर्यंत कुरआनमधील श्लोकांचे पठण करतात.
माननीय ज़ियाद (रजि.) यांच्या कथनानुसार,
माननीय मुगीरा (रजि.) यांना वक्तव्य करताना ऐकले होते की पैगंबर मुहम्मद (स.) ‘तहज्जुद’च्या नमाजमध्ये उभे राहायचे इथपर्यंत की त्यांचे दोन्ही पाय सुजायचे. तेव्हा लोक म्हणायचे, ‘‘हे पैगंबर! इतका त्रास का म्हणून सहन करता?’’ उत्तरादाखल पैगंबर म्हणायचे, ‘‘मी (अल्लाहचा) कृतज्ञ भक्त बनू नये काय?’’ (हदीस : बुखारी)
Post a Comment