Halloween Costume ideas 2015

ईश्‍वर आपल्याला जाब विचारेल याची जाणीव लोप पावत आहे : ऍड. फैसल काझी

कोनगाव (भिवंडी) - मरणोत्तर जीवन सफल होण्यासाठी माणसाने सदाचारी माणूस बनून शांती निर्माण करून आपले व सर्वांचे जीवन सार्थ करणे, गरजवंतांच्या गरजा जाणून घेऊन त्यांना सर्वतोपरी मदत करणे हाच रमजानचा खरा संदेश आहे. सर्व सृष्टीचा मालक ईश्‍वर आपणाला जाब विचारेल, याची जाणीव सध्या लोप पावताना दिसत आहे. अनेक जन त्याला घाबरत नाहीत, ईशभिरूता नाहीशी होत आहे. जीवनाची घडी दुरुस्त करण्यासाठी ईशपरायणता अंगीकारून सत्कर्म करण्याचे आवाहन कल्याण येथील प्रसिद्ध वकील ऍड. फैसल काझी यावेळी केले.
    सालाबादप्रमाणे यंदाही ’जमाअत-ए-इस्लामी हिंद’च्या कोनगाव शाखेतर्फे रविवार दि. 24 जून 2018 रोजी सायंकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र सभागृहात आयोजित ईद मीलन सोहळ्यात ऍड. काझी बोलत होते.
    पवित्र रमजानमधील 1 महिन्याच्या प्रशिक्षणाने 11 महिने गोरगरीबांच्या भुकेची जाणीव निर्माण करणे हेदेखील अल्लाहला (ईश्‍वराला) अभिप्रेत असल्याचे सांगून ऍड. फैसल काझी यांनी रोजा, जकात आणि रमजान ईद यावर अतिशय मोलाचे विश्‍लेषण सादर केले. इस्लाम काय आहे, इस्लामची मूलतत्त्वे काय सांगतात, प्रेषित मुहम्मद (स.) यांची शिकवण काय आहे आणि मुस्लिम कोणास म्हणतात? याबाबत उपस्थितांचे सखोल मार्गदर्शन प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनचरित्रातील अनेक उदाहरणे देऊन ऍड. काझी यांनी केले. कार्यक्रमाची सुरूवात कु. हेंजल यांच्या कुरआन पठणाने झाली. त्याचा मराठी अनुवाद साप्ताहिक शोधनचे कार्यकारी संपादक शाहजहान मगदुम यांनी प्रस्तुत केला.
    यावेळी कोनगावच्या सरपंच डॉ. रूपाली कराळे, उपसरपंच कु. कुमार म्हात्रे, पं. स. सदस्य विजय म्हात्रे, मजदुर फेडरेशन ठाणे संचालक बाळू पाटील, ग्रा.पं. सदस्य कविता विष्णू कोळी, कविता गोरक्ष भगत, दर्शन म्हात्रे, भरत जाधव, अशोक म्हात्रे, भाजप भिवंडी ता. वी. स. अध्यक्ष प्रमोद पाटील, शिवसेना वाहतूक भिवंडी तालुका अध्यक्ष वसीम शेख, माजी उपसरपंच इक्बाल खांडे, कल्याण जामा मस्जिदचे इमाम डोन इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे जमाअतचे स्थानिक अध्यक्ष इंतेखाब आलम, मजहर शेख आणि ज्येष्ठ पत्रकार शाहजहान मगदुम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
त्याचप्रमाणे शिवसेना ठाणे जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष सुहेल गांठोकर, भाजप डॉक्टर सेल ठाणे जिल्हा अध्यक्ष अमोल कराळे, भाजप भिवंडी तालुका चिटणीस दीपक मुकादम, माजी उपसरपंच फरदीन करेल, संतोष म्हात्रे सर, कल्याण जमाअत-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष मिशेल चौधरी, ऍड. संदेश सरावते, मानवाधिकार भिवंडी तालुका अध्यक्ष तुषार पाटील, समाजसेवक जमील भाई, इंटक ठाणे जिल्हा अध्यक्ष पंढरी भोईर, भाजप गुजराती अध्यक्ष खुशाल प्रजापती इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे आयोजन इस्लाम धर्माविषयी गैरसमज दूर करून एकमेकांत संवाद घडवून आणता येईल यासाठी करण्यात आल्याचे जमाअत-ए-इस्लामी हिंद कोनगावचे अध्यक्ष इंतखाब आलम यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात सांगितले. अनेक उपस्थित मान्यवरांनी अशा कार्यक्रमाची आवश्यकता असून कौतुकास्पद व अभिनंदनीय उपक्रम असल्याची प्रतिक्रिया यावेळी दिली आणि जमाअतच्या यापुढील प्रत्येक कार्यक्रमात अशीच साथ देण्याचा शब्द दिला. सूत्रसंचालन आदर्श कोचिंग क्लासेसचे संचालक अफसर खान यांनी केले. इंतेखाब आलम यांनी सर्व उपस्थितांचे मन:पूर्वक आभार मानले.
नियोजित कार्यक्रमाच्या वेळी बाहेर धोधो पाऊस पडत असतानादेखील निमंत्रितांनी उपस्थित राहून दिलेला मान हेच सिद्ध करून गेला की समाजात संवाद, आचारविचारांच्या देवाणघेवाणीची परंपरा आजही अबाधित आहे. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवर व उपस्थितांनी शीरखुर्मा व भोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जमाअतचे स्थानिक अध्यक्ष इंतेखाब आलम, अफसर खान सर, शाहजहान मगदुम, मजहर शेख इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget