Halloween Costume ideas 2015

आलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(४३) हे मरयम! आपल्या पालनकर्त्याच्या आदेशांची आज्ञाधारक बनून राहा, त्याच्या पुढे नतमस्तक होत राहा व जे दास त्याच्या पुढे झुकणारे आहेत त्यांच्याबरोबर तू सुद्धा झुकत जा.’’
(४४) (हे पैगंबर (स.)!) या परोक्षाच्या वार्ता आहेत ज्या आम्ही तुम्हाला दिव्यप्रकटनाद्वारे कळवीत आहोत, एरवी तुम्ही त्यावेळी त्या ठिकाणी हजर नव्हता, जेव्हा हैकलचे सेवक हा निर्णय घेण्याकरिता की मरयमचा पालक कोण असावा,यासाठी आपापले फांसे फेकत होते.४३आणि त्यावेळी देखील तुम्ही हजर नव्हता जेव्हा त्यांच्या दरम्यान भांडण होत होते.
(४५) आणि जेव्हा दूतांनी म्हटले, ‘‘हे मरयम! अल्लाह तुला आपल्या एका आदेशाची शुभवार्ता देत आहे. त्याचे नाव मरयमपुत्र, मसीह इसा असेल व तोया जगात व परलोकात प्रतिष्ठित राहील, अल्लाहच्या निकटवर्ती दासांमध्ये त्याची गणना होईल.
(४६) तो लोकांशी पाळण्यातदेखील संभाषण करील आणि मोठा होऊन सुद्धा,आणि तो एक सदाचारी पुरुष असेल.’’
(४७) हे ऐकून मरयम म्हणाली, ‘‘हे पालनकर्त्या! मला मूल कसे होणार? मला तर कोणा पुरुषाने स्पर्शदेखील केला नाही.’’ उत्तर मिळाले, ‘‘असेच होईल.४४ अल्लाह जे इच्छितो ते निर्माण करतो. तो जेव्हा एखादे कार्य करण्याचा निर्णय घेतो तेव्हा फक्त म्हणतो, ‘हो’ तर ते होते.’’


४३) म्हणजे चिठ्ठी टाकत होते. (कुराअंदाजी) चिठ्ठी टाकण्याची गरज यामुळे निर्माण झालीकी आदरणीय मरयमच्या आईने त्यांना अल्लाहसाठी हैकल (उपासनागृह) ला भेट चढवली होती.मरयम मुलगी होती. म्हणून ही एक नाजूक समस्या बनली होती की हैकलच्या पुजाऱ्यांपैकी कोणाच्या संरक्षणाखाली त्यांना ठेवावे.
४४) म्हणजे कोणत्याही पुरुषाने तुला स्पर्श केला नाही तरी तुला पुत्रप्राप्ती होईल. हेच शब्द `कजालीक' (असेच घडेल) आदरणीय जकरियांच्या उत्तरातसुध्दा आले आहेत. त्यांचा जो अर्थ तिथे आहे तोच इथेसुद्धा आहे. तसेच नंतरचे वाक्य आणि मागील पुढील सर्व व्याख्यान याच अर्थाची पुष्टी करत आहे, की आदरणीय मरयम यांना कोणत्याही पुरुषाशी लैंगिक संबंधाविना पुत्ररत्नप्राप्तीचा शुभसंदेश दिला होता. आणि वास्तवात याचप्रकारे पैगंबर इसा (अ.) यांचा जन्म झाला. जरआदरणीय मरयम यांना स्वाभाविकपणे पुत्ररत्न होणार होते. ज्याप्रमाणे इतर स्त्रियांना मुले होतात आणि पैगंबर इसा (अ.) यांचा जन्म वस्तुत: नैसर्गिक पद्धतीने झाला असता तर हे सर्व व्याख्यान निरर्थक ठरले असते जे या सूरहच्या आयत क्रं. ३५ ते ६३ पर्यंत चालत आले आहे. तसेच कुरआनमध्ये इतर ठिकाणी आदरणीय पैगंबर इसा (अ.) यांच्या जन्माविषयी आलेले सर्व व्याख्यान निरर्थक ठरले असते. इसाई (खिश्चन) लोकांनी पैगंबर इसा (अ.) यांना खुदा आणि खुदावंदचे पुत्र याच कारणाने समजले होते की त्यांचा जन्म अस्वाभाविकपणे बापाविना झाला होता. यहुदी लोकांनी मरयम यांच्यावर दोषारोप याचसाठी केला की सर्वांसमोर ही घटना (इसा जन्माची) घडली होती की एक तरुणी अविवाहित असताना तिला पुत्र झाला. जर ही घटना घडलीच नसती तर या दोन्ही जनसमुदायांच्या खंडणार्थ हेच सांगणे पुरेसे होते की तुम्ही चुकीचे दोषारोप करीत आहात. ती मुलगी तर विवाहित होती. अमुक व्यक्ती तिचा पती होता आणि त्याच्याचपासून तिला इसा (अ.)हा मुलगा झाला होता. हे संक्षिप्त वृत्त सडेतोडपणे देण्याऐवजी इतकी लांबलचक प्रस्तावना देण्याची काय गरज होती? तसेच अमुक व्यक्तीचा मुलगा असे सांगण्याऐवजी मरयमपुत्र इसा असे का बरे सांगितले गेले, की ज्यामुळे कोडे उलगडण्याऐवजी ते आणखीनच गडद बनावे. जे लोक कुरआनला अल्लाहचा ग्रंथ मानतात त्यांना सत्यतेची पुष्टी वरील विवरणावरून मिळते.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget