Halloween Costume ideas 2015

आलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(५१) अल्लाह माझाही पालनकर्ता आहे व तुमचा पालनकर्तासुद्धा. म्हणून तुम्ही त्याचीच बंदगी (भक्ती) करा हाच सरळमार्ग आहे.
(५२) जेव्हा इसा (अ.) ला जाणवले की बनीइस्राईल अधर्म व नाकारण्यामध्ये तत्पर आहेत तेव्हा त्याने सांगितले, ‘‘कोण अल्लाहच्या मार्गात माझा साहाय्यक बनेल?’’ हवारींनी  उत्तर दिले, ‘‘आम्ही अल्लाहचे साहाय्यक आहोत, आम्ही अल्लाहवर श्रद्धा ठेवली, तुम्ही साक्षी राहा की आम्ही मुस्लिम (अल्लाहच्या आज्ञेपुढे नतमस्तक होणारे) आहोत.
(५३) स्वामी! जे फर्मान तू अवतरले आहेस, आम्ही त्याला मानतो आणि पैगंबराचे अनुसरण स्वीकारतो. आमची नावे ग्वाही देणाऱ्यांमध्ये समाविष्ट कर.’’
(५४) नंतर बनीइस्राईल (येशू मसीहच्याविरूद्ध) गुप्त कारस्थान करू लागले. उत्तरादाखल अल्लाहनेदेखील आपली गुप्त आट योजिली आणि अशा गुप्त युक्ती योजण्यात अल्लाह सर्वात वरचढ आहे.
(५५) (ती अल्लाहची गुप्त युक्तीच होती) जेव्हा त्याने सांगितले, ‘‘हे इसा (अ.), मी आता तुला परत घेईन आणि तुला माझ्याकडे उचलून घेईन व ज्यानी तुला नाकारले आहे  त्यांच्यापासून (म्हणजे त्यांच्या सहवासातून व घाणेरड्या वातावरणात, त्यांच्या संगतीत राहण्यापासून) तुला पवित्र करीन आणि तुझे अनुसरण करणाऱ्यांना पुनरुत्थानापर्यंत  (कयामतपर्यंत) त्या लोकांवर वरचढ ठेवीन ज्यांनी तुला नाकारले आहे. मग सरतेशेवटी तुम्हां सर्वांना माझ्याकडे यावयाचे आहे; तेव्हा मी त्या गोष्टींचा निर्णय देईन ज्यासंबंधी तुम्हा  दरम्यान मतभेद निर्माण झाला आहे.
(५६) ज्या लोकांनी नाकारण्याचा मार्ग अंगीकारला आहे त्यांना इहलोक व परलोक दोहोंमध्ये कठोर शिक्षा देईन. आणि त्यांना कोणीही सहायक मिळणार नाही.
(५७) आणि ज्यांनी ईमान व सद्वर्तनाचे आचरण स्वीकार केले आहे, त्यांना त्यांचे मोबदले पुरेपूर दिले जातील. आणि (पक्के जाणून घ्या की) अल्लाह अत्याचारी लोकांवर कदापि प्रेम  करीत नाही.’’
(५८) हे पैगंबर (स.)! ही संकेतवचने व बुद्धिमत्तेने ओतप्रोत वर्णने आहेत जी आम्ही तुम्हाला ऐकवीत आहोत.
(५९) अल्लाहपाशी इसा (अ.) चे उदाहरण आदम (अ.) सारखेच आहे की अल्लाहने त्याला मातीपासून निर्माण केले आणि आज्ञा दिली की अस्तित्वात ये आणि त्याचे अस्तित्व प्रत्यक्षात आले.
(६०) ही वस्तुस्थिती आहे जी तुमच्या पालनकत्र्याकडून सांगण्यात येत आहे. आणि तुम्ही त्या लोकांत सामील होऊ नका जे याच्यात शंका घेतात.
(६१) हे ज्ञान आल्यानंतर आता याबाबतीत तुमच्याशी जो कोणी वाद घालत असेल तर हे पैगंबर (स.), त्याला सांगा, ‘‘या, आमची मुलेबाळे व तुमची मुलेबाळे, तसेच तुम्ही आणि आम्ही, आपण सर्व येऊ या आणि अल्लाहजवळ प्रार्थना करु या की, जो खोटा असेल त्याच्यावर अल्लाहकडून धिक्कार होवो.’’
(६२) या अगदी खऱ्या घटना आहेत आणि वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाहशिवाय अन्य कोणीही ईश्वर नाही आणि ते अस्तित्व केवळ अल्लाहचेच आहे ज्याची शक्ती सर्वांपेक्षा  वरचढ आहे व ज्याची बुद्धिमत्ता विश्वव्यवस्थेत कार्यरत आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget