Halloween Costume ideas 2015

धर्म आणि दहशतवादाचा काही संबंध नाही

समकालीन राजकारणाने धर्माचे पांघरून घेतलेले आहे. मग ते साम्राज्यवादी देशांची कच्च्या तेलाच्या संसाधनांवर ताबा मिळविण्याचे राजकारण असो की दक्षीण आशियायी देशांमध्ये जन्मावर आधारित असमानता लादण्याचे राजकारण असो. दोघेही धर्माच्या कुबड्यांचा वापर करीत आहेत. पाकिस्तान शिवाय अनेक पश्‍चिम आशियायी देशांमध्ये इस्लामच्या नावावर सामंतवाद व एकाधिकारवादाचे पोषण केले जात आहे. म्यानमार आणि श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्म हा राजकारणाचा चेहरा बनलेला आहे. भारतात हिंदुत्वाचा वापर उदारवाद आणि समानतेसाठी उठणाऱ्या आवाजाला शांत करण्यासाठी केला जात आहे. अशा प्रकारे संकिर्ण आणि कट्टरवादी राजकारण नेहमीच कलाकार आणि रचनात्मक कार्यात संलग्न असलेल्या व्यक्तींना निशाना बनवित आहे. गझलच्या मैफिलीमध्ये उत्पात केला जातो, चित्रपटगृहांवर हल्ले केले जातात. नाटकांना रोखले जाते. प्रदर्शन करणाऱ्यांच्या विरोधात हंगामा केला जातो. पुस्तकांवर प्रतिबंध लावण्याचा आग्रह केला जातो. धर्म आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली कलाकार, लेखक इत्यादींकडून माफी मागण्याची मागणी केली जाते.
    बॉलीवुडची सिनेतारका प्रियंका चोप्रा ही एका अमेरिकी टीव्ही सिरयल काँटिकोमध्ये काम करीत आहे. याच्या एका भागात प्रियंका चोप्राचे पात्र भारत-पाकिस्तान शिखर वार्तेच्या आयोजनास्थळी एक भारतीय हिंदू आतंकवादीकडून अणुबॉम्ब स्फोट करण्याच्या षडयंत्राला असफल करते. यामुळे काही हिंदू ब्रिगेडच्या भावना दुखावल्या गेल्या. यासंदर्भात हिंदू सेनेने जनतेकडे अपील केले की जनतेने प्रियंका चोप्राच्या चित्रपटांना जावू नये. त्यांनी प्रचार केलेल्या जाहिरातीच्या मालांचा बहिष्कार करावा. हिंदू सेनेने भारत सरकारशीही आग्रह केला की, सरकारने प्रियंकाची नागरिकता काढून घ्यावी.’ प्रियंकाने या हल्ल्यासमोर तात्काळ शरणागती पत्करली. तिने ट्विट केले की, मला या गोष्टीचं फार दुःख आहे की क्वॉन्टिकोच्या अलिकडच्या भागामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. असा करण्याचा माझा कुठलाही इरादा नव्हता आणि भविष्यातही राहणार नाही. मी खऱ्या मनाने क्षमा मागते. मला भारतीय नागरिक असल्याचा अभिमान आहे आणि तो कधी बदलणार नाही” बॉलीवुडची एक दुसरी अभिनेत्री पूजा भट्ट ने मात्र प्रियंकाला साथ दिली आणि एक कलाकार म्हणून तिच्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा बचाव केला.
    अलिकडे चित्रपट, सिरियल, कादंबऱ्या इत्यादींमध्ये नेहमीच मुस्लिम चरित्रांना आतंकवादी म्हणून सादर केले जाते. अशा परिस्थितीत क्वान्टिकोच्या एका भागात एका हिंदूला आतंकवादी दाखविण्यात आलं. तर त्यावर एवढा गहजब करण्याची काय आवश्यकता आहे? हा काय एवढा मोठा गुन्हा आहे की त्यासाठी संबंधित कलाकाराच्या नागरिकत्वाला रद्द करण्याची मागणी केली जावी. हिंसा आणि दहशतवाद यांना धर्माशी जोडण्याची प्रवृत्ती 9/11 च्या डब्ल्यूटीसी हल्ल्यानंतर सुरू झाली. खरी परिस्थिती तर अशी आहे की, या आणि अन्य दहशतवाद करणाऱ्या गटांना अमेरिकेनेच हत्यार आणि प्रशिक्षण उपलब्ध करून दिले होते. जेणेकरून सोव्हिएत संघाच्या अफगानिस्तानवरील कब्जा उठविण्यासाठी ते गट लढाया करतील. त्यांनाच धर्मयोद्धा बनविण्यासाठी इस्लामच्या त्या संस्करणाचा उपयोग केला गेला जो सऊदी अरबमध्ये प्रचलित आहे. ही सारी योजना वॉश्गिंटनमध्ये बनली आणि तेथूनच कार्यान्वित झाली. दहशतवादीकृत्यांना इस्लामच्या नावावर मान्यता देण्यात आली. अमेरिकेच्या मीडियाने
इस्लामिक टेररिझम असा नवीन शब्द तयार केला आणि पहिल्यांदा एका धर्माला दहशतवादाशी जोडले. जगामध्ये दहशतवादी सर्वच धार्मिक गटांचे आहेत. अशाच पद्धतीचे दहशतवादी हल्ले हिंदू राष्ट्रवाद्यांकडून झाल्यानंतर हिंदू आतंकवाद किंवा भगवा आतंकवाद सारखे शब्द उपयोगात आणले जावू लागले. आता साध्वी प्रज्ञा आणि आसिमानंद सारख्या लोकांना जमानत मिळाल्यावर ही मागणी जोर धरत आहे की, ज्या लोकांनी या शब्दाचा उपयोग केला होता त्यांनी क्षमायाचना करावी.
    मालेगावमध्ये सन 2008 मध्ये झालेल्या विस्फोटांचा तपास तत्कालीन एटीएसप्रमुख हेमंत करकरे यांनी केली. तेव्हा असे लक्षात आले की, विस्फोटामध्ये आणलेली मोटारसायकल हिंदूत्ववादी प्रज्ञा ठाकूरच्या मालकीची होती. जसजसा तपास पुढे जात होता तसतसे अन्य हिंदूंची नावे पुढे येत होती. ज्यात कर्नलप्रसाद पुरोहित, मेजर उपाध्याय, स्वामी दयानंद व स्वामी आसीमानंद इत्यादींची नावे प्रामुख्याने पुढे आली. त्यातील बहुतेक हिंदू राष्ट्रवादी संघटन आणि आरएसएसशी संबंधित होते. तपासानंतर या लोकांना अटक करण्यात आली आणि आरएसएसच्या दोन पूर्व प्रचारकांना अजमेर स्फोटासाठी जबाबदार धरून कोर्टाच्या मार्फतीने जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली. साध्वी प्रज्ञा, पुरोहित आणि आसीमानंद यांना जमानतीवर सोडण्यात आले. आसीमानंदने तर एका न्यायाधिशासमोर कबुली जबाब दिला होता की त्यांनीच आतंकवादी हल्ल्यांची योजना बनविली होती. दयानंद पांडेच्या लॅपटॉपमधून आपत्तीजनक सामुग्री मिळाली होती. सुनील जोशी जो की या टीमचा एक सदस्य होता, ची हत्या करण्यात आली. आणि असे भासविण्यात आले की त्याची हत्या यासाठी झाली की त्याने साध्वी प्रज्ञाबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. एकंदरित झालेल्या तपासात आणि पुढे आलेल्या पुराव्यानंतरही 2014 साली झालेल्या केंद्रातील सत्तांतरानंतर या सगळ्यांनाच जामीन मिळाला. सत्य कधी पुढे येईल का?
    एक महत्वपूर्ण बाब ही की, या प्रकरणातील सरकारी वकील रोहिनी सॅलीयन यांनी आरोप लावला होता की त्यांनी साध्वी आणि अन्य आरोपींसंंबंधी नरमाईची भूमिका घ्यावी असा त्यांच्यावर दबाव आणण्यात आला होता. यामुळे या गुन्ह्या आणि गुन्हेगारांना शिक्षा देण्यासंदर्भात अनेक प्रश्‍न उभे राहतात. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटासंबंधित प्रकरणात रूबिना मेमन या स्त्रीला केवळ यासाठी जन्मठेप सुनावण्यात आली की स्फोटामध्ये वापरण्यात आलेली कार तिच्या नावावर पंजीकृत होती. मात्र मालेगाव स्फोटात वापरण्यात आलेली मोटारसायकल साध्वी प्रज्ञाच्या नावावर होती तरी तीला जामीन मिळाला.
    मागील काही दिवसांपासून देशात जे काही होत आहे ते अत्यंत चिंताजनक आहे. शंभुलाल रेगर याने अफराजुलला लवजिहादच्या नावावर अत्यंत क्रूरपणे मारून टाकले. तरीपण रेगरच्या परिवारासाठी निधी जमा केला गेला. प्रोफेसर कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या हिंदू संघटनांशी संबंधित लोकांनी केल्याचे पुढे आलेले आहे. प्रियंका चोपरा सारख्यांना आपल्या करिअरसाठी क्षमा मागून विरोधापासून स्वतःचा बचाव करावा लागत आहे. मात्र मोठा मुद्दा आहे की, धर्म आणि राजकारणाच्या या दलदलीमध्ये ओढणाऱ्यांपासून स्वतःचा कसा बचाव करता येईल. 

- राम पुनियानी

(इंग्रजीतून हिंदी भाषांतर अमरिश हरदेनिया आणि हिंदीतून मराठीत एम.आय. शेख, बशीर शेख यांनी केले. )


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget