Halloween Costume ideas 2015

न्यायाधिशाने स्वतंत्र असावे


आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे पूर्व मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना असे म्हटले होते की, त्यांना वाटतं तेव्हांच ते राज्यसभेच्या अधिवेशनात सहभागी होतात. ते कोणाशी बांधिल नसून स्वतंत्र सदस्य आहेत. त्यांची इच्छा झाली तरच ते अधिवेशनात हजेरी लावतात. त्यांना आपल्या मनानुसारच करायचे होते तर त्यांनी राज्यसभेचे सदस्यत्व स्विकारलेच कशाला? त्यांच्या या वक्तव्यावरून तृणमुल काँग्रेसने त्यांच्या विरूद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे.  

ते असे देखील म्हणाले होते की, मी मुख्य न्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यावर माझ्याकडे मोजकेच ऑप्शन होते. कुठल्यातरी आयोगावर नियुक्ती किंवा एखादा अन्य कोणत्या तरी अशा पदावर नियुक्ती. ज्यामध्ये त्यांना काही आकर्षण नव्हते. म्हणून त्यांनी राज्यसभा सदस्याचा पर्याय निवडला. याचा सरळ अर्थ असा की, त्यांना या पदाची गरीमा आणि त्यांच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्यांचे भान नव्हते. घरी बसून काय करावे, कुठेतरी वेळ घालवायला हवा, अशी तर भूमिका यामागे नसणार ना? आणि कशामुळे कोणत्या त्यांच्या विशेष सेवेमुळे त्यांना हे पद मिळाले? याचा त्यांनी उलगडा केलेला नाही. तरी साऱ्या देशाच्या नागरिकांना हे माहित आहे. 

बाबरी मस्जिदीच्या निकालानंतर ते म्हणाले की, मी या प्रकरणाला पुनर्जिवित केलेले नाही. माझ्यावर ही जबाबदारी आल्यावर मी काय करावे? एक तर सरळ नकार देवून घरी परत जावे किंवा ती जबाबदारी पार पाडावी. मी दूसरा पर्याय निवडला. मी सक्षम होतो म्हणून तसे केले. सक्षम नसतो तर नोकरीच केली नसती. शिवाय इतर पाच न्यायाधिशांचा वेळ वाया घालविण्यात हाशिल. 

बाबरी मस्जिदीचा निकाल दिल्यानंतर त्यांनी त्याचा आनंद साजरा केला. आपल्या मित्र न्यायाधिशांना हॉटेलात डिनर दिले आणि डिनर नंतर अगोदरचे बाकीचे सारे उद्योग आलेच. त्यांना असे विचारावे वाटते की त्यांना या निकालाचा (न्यायदानाचा नव्हे) तितका आनंद का झाला? त्यांनी एक जबाबदारी पार पाडली म्हणून की, अन्य कोणते कारण होते? ते म्हणाले की, जर न्यायाधीश स्वतंत्र असतील तर न्याय स्वतंत्रपणे दिला जावू शकतो. त्यांनी स्वतःला हा प्रश्न विचारावा. बाबरी मस्जिदीचा निकाल देताना ते स्वतंत्र होते का? 

गोगई यांच्या या दिलखुलास भाष्याद्वारे हे तथ्यदेखील समोर आले की, उच्चपदावरून निवृत्त होणाऱ्या व्यक्तींना दूसऱ्या एका अशा पदाची आवड असते ज्यात इतर सोयीसुविधांबरोबर प्रतिष्ठेची देखील अपेक्षा असते. म्हणून कितीही लाचार असला किंवा कितीही प्रतिष्ठित असला तरी त्याला प्रतिष्ठेचे आकर्षण असणारच? हा मानवीय स्वभाव आहे. पण वयाची 30-35 वर्षे सत्ता व त्यातून येणारी प्रतिष्ठा आणि ऐश्वर्य लाभल्यावर देखील त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण होत नसतात. आणि याच आकांक्षाच्या आहारी जावून मग ते इतरांना खुश करण्यासाठी कोणत्याही सीमांचे विचार करत नाहीत. रंजन गोगोई म्हणतात ते खरे, माणूस स्वतंत्र असल्यास तो आपली जबाबदारी स्वतंत्रपणे पार पाडू शकतो. स्वतंत्र नसल्यास मग जे बाबरी मस्जिदीविषयी घडले तेच घडत राहणार. दूसरी एक गोष्ट त्यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेल्या लैंगिक आरोपांविषयी सांगितली. त्यांनी आता निवृत्त झाल्यावर हे मान्य केले आहे की, त्यांच्याविरूद्ध गठित केलेल्या खंडपीठावर त्यांनी अध्यक्ष व्हायला नको होते. पण आता असे म्हणण्यात काय अर्थ? त्यांना हे तर सांगायचे नव्हते ना की, त्यांना त्या खंडपीठाच्या न्यायाधिशांच्या स्वातंत्र्यावर विश्वास नव्हता आणि म्हणून न्यायस्वतंत्रपणे दिला जाणार नव्हता. प्रत्येकाच्या मनातील सत्य परिस्थिती त्याची त्यालाच माहिती असते. इतर कोणाला दुसऱ्यांच्या आचा विचारावंर आक्षेप घेण्याची गरज नाही. 


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget