(५७) मग इब्राहीम (अ.) ने विचारले, ‘‘हे अल्लाहच्या दूतांनो! ती कोणती मोहीम आहे ज्यास्तव आपले आगमन झाले आहे?’’
(५८) ते म्हणाले, ‘‘आम्ही एका अपराधी जनसमूहाकडे पाठविले गेलो आहोत.
(५९-६०) केवळ लूत (अ.) चे कुटुंबीय याला अपवाद आहेत, त्या सर्वांना आम्ही वाचवू, त्याच्या पत्नीव्यतिरिक्त की जिच्यासाठी (अल्लाह फरमावितो की) आम्ही नियोजित केले आहे की ती पाठीमागे राहणार्यांत समाविष्ट असेल.’’
(६१-६२) मग जेव्हा हे दूत लूत (अ.) पाशी पोहचले, तर त्याने सांगितले, ‘‘आपण अनोळखी दिसता.’’
(६३) त्यांनी उत्तर दिले, ‘‘नाही, तर आम्ही तेच घेऊन आलेलो आहोत ज्याच्या येण्यात हे लोक शंका घेत होते.
(६४) आम्ही तुम्हाला खरे सांगतो की आम्ही सत्यानिशी तुमच्यापाशी आलेलो आहोत.
(६५) म्हणून आता काही रात्र उरली असता आपल्या कुटुंबीयांना घेऊन निघून जा आणि स्वत: त्यांच्या मागोमाग चला. तुमच्यापैकी कोणीही मागे वळून पाहू नये.
(६६) बस्स, सरळ चालत जा जिकडे जाण्याची तुम्हाला आज्ञा दिली जात आहे.’’ आणि त्याला आम्ही आमचा हा निर्णय पोहचविला की उजाडताच यांचे समूळ उच्चाटन केले जाईल.
(६७) इतक्यात शहराचे लोक हर्षोन्मादित होऊन लूत (अ.) च्या घरावर चालून आले.
(६८) लूत (अ.) ने सांगितले, ‘‘बंधुनो! हे माझे पाहुणे आहेत, माझी फजिती करू नका.
(६९) अल्लाहचे भय बाळगा, मला अपमानित करू नका.’’
(७०) ते म्हणाले, ‘‘आम्ही वारंवार तुम्हाला मनाई केली नाही काय की सार्या जगाचे मक्तेदार बनू नका?’’
(७१) लूत (अ.) ने (जेरीस येऊन) सांगितले, ‘‘जर तुम्हाला काही करावयाचेच असेल तर या माझ्या मुली हजर आहेत.’’१६
(७२) तुझ्या जीवाची शपथ हे पैगंबर (स.)! त्या वेळी त्यांच्यावर एक प्रकारची धुंदी चढली होती ज्यामध्ये ते मर्यादेच्या खूप पलीकडे चालले होते.
(७३) सरतेशेवटी तांबडे फुटताच एका भयंकर स्फोटाने त्यांना गाठले
१६) स्पष्टीकरणासाठी पाहा सूरह-११ हूद, टीप क्र. २६, २७
Post a Comment