नव्वदच्या दशकात अमेरिकेला जागतिक वर्चस्व प्राप्त करण्यामध्ये युएसएसआर (युनायटेड सोव्हियट सोशालिस्ट रिपब्लिक) हा देश सर्वात मोठा अडथळा निर्माण करत होता. या संघराज्याचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोरोबाचेव्ह यांना हाताशी धरून अमेरिकेने सोव्हियट रशियाचे विभाजन घडवून आणले. हे विभाजन 15 डिसेंबर 1991 रोजी झाले आणि सोव्हियट रशियाची 15 श्नले झाली. देशाची अशी वाट लावून गोरोबाचेव्ह अमेरिकेला निघून गेले आणि तहहयात (मृत्यूपर्यंत) अमेरिकेच्या मदतीवरच जगले.
यानंतर अमेरिकेने स्वतःला जागतिक फौजदार घोषित करून बायपोलार (अनेक ध्रुवीय) जगाचे युनिपोलार (एकध्रुवीय) जगामध्ये रूपांतर झाले असून, अमेरिका हीच आता एकमेव महासत्ता आहे, असे घोषित केले. येणेप्रमाणे अमेरिकेचे वर्चस्व जागतिक स्तरावर प्रस्थापित झाल्यानंतर अमेरिकन वर्चस्वाला आव्हान फक्त मुस्लिम राष्ट्रांपैकी एखाद्या राष्ट्राकडून मिळेल अशी भीती वाटू लागली होती. त्यासाठी अमेरिकेने एकानंतर एक मुस्लिम राष्ट्रांना टार्गेट करून आपले मांडलीक करून घेतले. ज्या मुस्लिम देशांनी मांडलीकत्व स्विकारले नाही त्यांची ठरवून गळचेपी करण्यास सुरूवात केली गेली. अफगानिस्तान, लिबिया, इराक, इराण, सीरिया इत्यादी राष्ट्रांना आपल्या सैन्यशक्तीचा वापर करून बेचिराख करण्याची मोहिम आखली गेली. अनेक ट्रिलियन डॉलर त्यावर खर्च केले गेले. मीडियाद्वारे अपप्रचार करून मुस्लिम देश आणि मुस्लिम समाजाबद्दल जगामध्ये घृणा निर्माण केली गेली. इजिप्तमध्ये 51 टक्के मतं घेऊन जनतेमधून निवडून आलेल्या मुहम्मद मुर्सी सरकार अमेरिकेचे ऐकत नसल्याचे लक्षात आल्यावर अवघ्या एका वर्षात इजिप्शियन सैन्य कमांडर जनरल अब्दुल फतेह अलसिसी याला हाताशी धरून मुहम्मद मुर्सी यांचे सरकार उलथवण्यात आले व त्यांना यातना देऊन तुरूंगात -(उर्वरित पान 2 वर)
मारण्यात आले. एवढे होऊनसुद्धा अफगानिस्तानातून अमेरिकेला लाजिरवाना पराभव पत्करून माघारी जावे लागले. इराणशी अणुकरार करावा लागला. हे अपयश येण्यापूर्वी तुर्कीयेमध्ये 15 जुलै 2016 मध्ये सैन्य अधिकाऱ्यांना हाताशी धरून उठाव करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला गेला. परंतु रज्जब तय्यब उर्दगान या लोकप्रिय नेत्याने अमेरिकाप्रणित सैन्य उठावाचा बिमोड केला आणि तिसऱ्यांदा पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून सत्ता प्राप्त केली. तुर्कीयेमध्ये झालेल्या सैन्य उठावाप्रमाणेच 23 जून 2023 रोजी रशियामध्ये ब्लादिमीर पुतीनच्या विरूद्ध एक सैन्य उठाव घडवून आणण्यात आला. अमेरिका आणि युरोपच्या चॅनलमध्ये या उठावाचा उदोउदो सुरू झाला व काही तासातच रशियाला दुसरा राष्ट्राध्यक्ष मिळेल अशी घोषणा करण्यात आली. मात्र झाले वेगळेच. 15 जुलै 2016 मध्ये अमेरिकेला तुर्कीयेमध्ये सत्तांतर घडविण्यामध्ये जसे अपयश आले तसेच 23 जून 2023 रोजी रशियामध्ये व्हॅगनर ग्रुपच्या माध्यमातून रशियामध्ये सत्तांतर घडवून आणण्यामध्ये अपयश आले. हे सर्व कसे झाले हे समजून घेणे अत्यंतर रोचक आहे. पुतीन यांच्या नेतृत्वाखाली रशिया पुन्हा युएसएसआरसारखाच शक्तीशाली होत असल्याचे लक्षात आल्यावरून व त्याला बलाढ्य चीनची साथ मिळत असल्यामुळे ज्यू राष्ट्राध्यक्ष असलेल्या युक्रेनला हाताशी धरून त्याचा समावेश नाटोमध्ये करून अमेरिकेने नाटोची सीमा रशियन सिमेपर्यंत नेण्याची योजना आखली. युक्रेन जर नाटोचा सभासद बनला असता तर युक्रेनवर युद्ध केल्यास नाटोचे 30 देश मिळून रशियाशी लढले असते आणि हे परवडण्यासारखे नव्हते. म्हणून कधीकाळी केजीबीचे एजंट राहिलेल्या पुतीननी युक्रेनवर नाटोची सदस्यता मिळण्याअगोदरच युद्ध लादले आणि अमेरिकेची गोची केली. दीड वर्षापासून सुरू असलेले हे युद्ध अमेरिकेच्या अंदाजापेक्षा जास्त दिवस लांबले आणि युक्रेन जवळ-जवळ उध्वस्त झाले. युक्रेनला उध्वस्त करण्यामध्ये दोन सैन्य गटांनी रशियन सैन्याची मोलाची मदत केली. एक - येवगेनी प्रिगोझिन यांच्या वॅगनर ग्रुप या खाजगी सैन्याने, दोन - चेचन नेता रमझान कदीरोव्ह याच्या मुस्लिम सैन्याने. हे लक्षात घेता अमेरिकेने येवगिन प्रिगोझिन याला निरोप दिला की तुम्ही पैशासाठी युद्ध करता आम्ही तुम्हाला रशियापेक्षा जास्त पैसे देवू तुम्ही आमच्याकडून लढा. नाहीतरी 25 हजार रशियन सैनिक ठार झालेले आहेत यापुढे आणखीन ठार होतील तुमचे सैनिक मरतील, अशी माहिती माध्यमातून पुढे येत आहे. अमेरिकेच्या या जाळ्यात येवगिन प्रिगोझिन अडकला आणि त्याने 23 जून रोजी रशियामध्ये बंडाचा झेंडा फडकावला. त्याने रशियाची दोन शहरं (रोस्तो आणि ऑनडॉन) ताब्यात घेत मास्कोपासून 200 किलोमीटर पर्यंत त्याने मजल मारली. मात्र चतूर पुतीन यांनी तीन कामे केली. 1. त्यांनी रज्जब तय्यब उर्दगान यांच्याशी संपर्क केला व त्यांचा पाठिंबा मिळविला. 2. रमझान कदिरोव्ह यांना व्हॅगनर ग्रुपच्या प्रमुखाला आव्हान देण्यासाठी राजी केले. 3. बेलारूसचे अध्यक्ष अले्नझांडर लुकाशेनको यांना प्रिगोझिन याच्याशी बोलणी करण्यास राजी केले. रशियन सैन्यात तसेच वॅगनॉर ग्रुपमध्ये सुद्धा मुस्लिम सैनिकांची मोठी संख्या असून, उर्दगान आणि रमझान करिदोव्ह दोघेही पुतीनच्या समर्थनार्थ पुढे आलेले पाहून सैन्यात चलबिचल सुरू झाली. याची दखल घेत प्रिगोझिन याने बेलारूसच्या अध्यक्षांच्या मध्यस्थीला मान दिला आणि हे बंड अयशस्वी झाले. प्रिगोझिनने आपल्या सैन्यांना युक्रेनच्या बेस कॅम्पमध्ये परत जाण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे वॅगनॉर ग्रुपचे सैनिक परत गेले. दरम्यान, पुतीन यांनी वॅगनर ग्रुप बरखास्त केल्याच्या बातम्या येत असून, त्यातील सैनिकांना रशियन सैन्यामध्ये सामील करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. तुर्कीयेमध्ये जसे बंड अयशस्वी झाले तसेच रशियामध्ये झाल्यामुळे अमेरिकेच्या वर्चस्वाला आंतरराष्ट्रीय स्तरावर झटका बसला आहे.
वॅगनर ग्रुप म्हणजे काय?
वॅगनर ग्रुपचे अधिकृत नाव पीएमसी वॅगनर आहे. यात सामील सैनिक हे भाड्यावर घेतले जातात. त्यांचे प्रशिक्षण वगैरे रशियामध्येच केले जाते. त्यांना अत्याधुनिक हत्यार आणि मिलिट्री उपकरणे दिली जातात. ज्या ठिकाणी रशियाला आपले सैन्य राजकीय कारणांमुळे पाठविता येत नाही त्या ठिकाणी रशिया हे सैन्य पाठविते. सीरिया, लिबिया आणि इराकमध्ये रशियाने हे सैनिक पाठविले होते. आजही त्या देशात वॅगनरचे अनेक सैनिक कार्यरत आहेत. हे सैनिक रशियाचे कट्टर समर्थक असून, यामध्ये 50 हजार सैनिक सामिल आहेत.
येवगेनी प्रिगोझिन कोण आहेत?
येवगिनी प्रिगोझिन यांचा जन्म 1 जून 1961 रोजी रशियाच्या सेंट-पिटस् बर्ग शहरात झाला. विशेष म्हणजे पुतीनही या शहरात जन्मले होते. प्रिगोझिन लहानपणापासूनच धाडसी स्वभावाचे होते. 1981 मध्ये लोकांना मारहाण, ठगबाजी आणि लुटालुटीच्या एका प्रकरणात 13 वर्षांची शिक्षा झाली होती. 9 वर्षे तुरूंगात राहिल्यानंतर सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर त्यांना सोडून देण्यात आलेले होते. तुरूंंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी, ’’हॉट डॉग’’ (खाण्याचा एक पदार्थ) विकण्याचे रेस्टॉरंट सुरू केले. हे रेस्टॉरंट अल्पावधीतच लोकप्रिय झाले आणि पिटस् बर्गचे फॅशनेबल डायनिंग स्पॉट ठरले. स्वतः पुतीन अनेकवेळा अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांना घेऊन गेलेले आहेत. येवगेनी यानिमित्ताने पुतीनच्या संपर्कात आले. पुतीनला आपल्या कौशल्याने प्रभावित करून त्यांनी रशियाच्या शाळा आणि सैनिकांना जेवण देण्याचे ठेके मिळविले. मागच्या पाच वर्षात येवगिनी यांना 3.1 अब्ज डॉलर पेक्षा जास्त सरकारी कॉन्ट्रॅ्नट मिळालेले आहेत. ते वॅगनर ग्रुप या सैन्यामुळे प्रभावित होते आणि वॅगनर आर्मीसाठी दानही देत होते. अल्पावधीतच त्यांनी कॅट्रींगचा व्यवसाय सोडून स्वतः वॅगनरमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि वॅगन ग्रुपचे प्रमुख बनले. ते कट्टर रशियन असून, अमेरिकेच्या गळाला कसे लागले याबद्दल अमेरिकेमध्ये चर्चा सुरू असून, एक विचार असाही आहे की ते खरोखरच पुतीन यांना आता रशियाच्या भविष्यासाठी संकट समजत असल्यामुळे कदाचित त्यांनी हे पाऊल उचलले असेल.
- एम. आय. शेख
Post a Comment