समृद्धी महामार्ग सध्या अपघात मार्ग म्हणून परिचित होत आहे. नुकतेच नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसचा बुलढाण्यात भीषण अपघात झाला. 30 जून रोजी घडलेल्या अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर 8 प्रवासी जखमी झाले आहे. त्याची धग विझत नाही तोपर्यंत 5 जणांचा या मार्गावर अपघात झाला.
समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातांच्या या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. 2022-2023 या वर्षात 368 अपघात घडले असून, 70 नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. तर 106 हून अधिक जखमी झाले आहेत. शासनाने या मार्गाहून धावणाऱ्यांसाठी वेग मर्यादा निश्चित करून कडक धोरण अवलंबवावे, अशी मागणी जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रने केली आहे.
Post a Comment