प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, तुम्हाला माहीत आहे का गरीब कोण आहे?
त्यांचे अनुयायी म्हणाले, आम्ही असे समजतो की ज्याच्याकडे रुपये-पैसे नाहीत, कोणतीही मौल्यवान वस्तू नाही असा माणूस गरीब असतो.
प्रेषित म्हणाले, आमच्या समूहात गरीब व्यक्ती ती जी कयामतच्या दिवशी रोजा, नमाज, जकात यासारखे कर्म घेऊन जाईल, परंतु त्याने कुणाला शिवी दिली असेल, कुणावर आरोप लावला असेल, कुणाचा माल खाल्ला असेल, कुणाची हत्या केली असेल, कुणाला मारले असेल, अशा माणसाने ज्या उपासना केल्या असतील त्याच्यातून अशा लोकांना दिले जाईल ज्यांच्यावर त्याने अत्याचार केले असतील. यामुळे त्याचे रोजे, नमाज इत्यादी उपासनांचा दिला जाणारा मोबदला संपून जाईल. तरीदेखील ज्या लोकांवर त्याने अन्याय केलेला आहे ते पूर्ण होणार नाही. तेव्हा या लोकांनी जे लहानसहान गुन्हे केले असतील ते त्या माणसाच्या हिशोबात जमा होतील आणि नंतर अशा व्यक्तीला नरकात टाकले जाईल.
(ह. अबू हुरैरा (र.), सहीह मुस्लिम)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, अल्लाह म्हणतो की तीन व्यक्ती अशा प्रकारच्या आहेत की कयामतच्या दिवशी त्यांच्याविरुद्ध त्यांनी ज्यांच्यावर अन्याय केले असतील त्यांच्या बरोबरीने मी स्वतः उभा राहीन. एक अशी व्यक्ती ज्याने माझी शपथ घेऊन (कुणाला) वचन दिले आणि त्याला धोका दिला, वचन पूर्ण केले नाही. दुसरी अशी व्यक्ती ज्याने एक स्वतंत्र माणसाला विकून टाकलं आणि ती किंमत हडप केली. तिसरी अशी व्यक्ती ज्याने कामावर मजूर लावले, त्याच्याकडून पुरेपूर काम करून घेतले आणि त्याला त्याचा रोजगार दिला नसेल.
(फतहुलबारी, सुनन इब्ने माजा)
हकीम बिन हजाम वर्ण करतात की मी प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे काही मागितले, त्यांनी मला देऊन टाकले. मी दुसऱ्यादा काही मागितले, त्यांनी पुन्हा दिले. मी पुन्हा तिसऱ्यांदा काही मागितले, पुन्हा दिले. आणि नंतर प्रेषित (स.) म्हणाले की हकीम, ज्याने आपल्या आवश्यकतेसाठी कुणाशी काही मागितले असेल तर अशा मालात बरकत दिली जाते. पण ज्याने आपल्या इच्छेपोटी कुणाशी मागितले असेल त्यामध्ये बरकत नसते. तो व्यक्ती अशा माणसासारखा आहे जो खातो-पितो, पण त्याला कधीही समाधान होत नाही. वरचा हात खालच्या हातापेक्षा (देणऱ्याचा हात घेणाऱ्याच्या हातापेक्षा) चांगला असतो. प्रेषित महम्मद (स.) यांनी असे सागितल्यावर हकीम म्हणाले की त्या अस्तित्वाची शपथ, ज्याने आपणास प्रेषित बनवून पाठवले आहे. यानंतर मी कधीही कुणाकडे मागणारे नाही. या दुनियेतून निघून जाण्यापर्यंत. यानंतर ते आपल्या वचनावर ठाम राहीले. ह. अबू बकर यांनी त्यांना बोलावले त्यांची मदत करण्यासाठी, त्यांनी नकार दिल्यानंतर ह. उमर (र.) म्हणाले की हे मुस्लिम लोकहो, तुम्ही साक्षी राहा, मी ह. हकीम यांना त्यांचा हक्क देऊ इच्छितो, पण स्वीकारत नाही. हकीम यांनी प्रेषितांनंतर कुणाकडेच काही मागितले नाही.
(फतहुलबारी, सहीह मुस्लिम)
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment