Halloween Costume ideas 2015

हा अपराध नाही तर अधिकार आहे का?


एका माणसाचा आपल्या उच्चवर्णीय जातीचा इतका अहंकार माजला की त्याने चक्क आदिवासी म्हणजेच भारताचा मूलनिवासी आणि या देशाचा खराखुरा मालक असलेल्या एका गरीब तरुणाच्या तोंडावर लघुशंका केली. आपल्या जातीच्या अहंकारात तो इतका विलीन झाला की त्याला माणसाची ओळखही राहिली नाही. इथवर गोष्ट समजली असती पण एका व्यक्तीने असे काही केले ज्यामुळे माणुसकीला काळिमा फासला गेला, नंतर जे घडले आणि घडत आहे ते त्यापेक्षाही निंदनीय आणि खेदजनक आहे. मध्य प्रदेश सरकारने त्या माणसाला अटक केली आणि लाजत लाजत त्याच्या घराचा काही भाग बुलडोजरने पाडला. शासनाच्या या कारवाईविरुद्ध त्या जातीचे संस्कारी लोक लघवी करणाऱ्या माणसाच्या समर्थनार्थ उतरले. ते विचारत आहेत की लघवी करणे कोणता अपराध आहे? ते शासनाकडून त्या माणसाच्या घराची भरपाई करण्याची मागणी करत आहेत. स्वतः ५१००० रुपयांची त्याला मदतही केली. आजवर कित्येक लोकांची घरे छोट्या छोट्या कारणावरून बुलडोजरने पाडण्यात आले, त्या वेळेस या लोकांची मानसिकता जागृत झाली निव्हती. तसे एका माणसाच्या कुकृत्याची शिक्षा निष्पाप लोकांना, त्यांच्या नातेवाईकांना देऊ नये, हा निसर्गनियम आहे. पण ही गोष्ट दुसऱ्या जातीच्या लोकांना का लागू होत नाही? याचे एकमेव कारण हे संस्कारी लोक जे आपल्या संस्कारी जातीला एका माणसाच्या समर्थनार्थ उभे आहेत ते जसे त्या आदिवासीला मानवजातीचा समजत नाहीत. तसेच इतर सारे मानवसुद्धा त्यांच्यासाठी मानवजातीचे नसतील. संस्कारी लोक विचारतात की लघवी करणे अपराध आहे का? तो जर अपराध मानायलाच तयार नसतील तर मग खुशाल दररोज एका इतर मागास जातीच्या लोकांना आणावे आणि आपले वर्चस्व जगाला दाखवून द्यावे की कोण जास्त संस्कारित आहेत ते की इतर सारी मानवजात? मध्य प्रदेशचे शासन असो की इतर ठिकाणची त्यांची केंद्र सरकारचमधली नेतेमंडळी असोत, या घटनेकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहत नाहीत. मध्य प्रदेशातील आदिवासी समाजाची त्यांची व्होटबँक वाचवण्याची त्यांची चिंता आहे. जर गरीब आदिवासी लोक या घटनेमुळे दुखावले आहेत तर हे दाखवायला त्यांनी अगोदरच मोर्चे काढले असते, ते तर घाबरून आपापल्या घरी बसले आहेत. ज्यांनी त्यांच्यावर अत्याचार केले तेच उलट आपराध्याच्या समर्थनार्थ मोर्चेच मोर्चे काढत आहेत. म्हणजे हजारो वर्षांपूर्वीपासून त्यांनी दुर्बलांवर किती आणि कसे भयंकर अत्याचार केले असतील ज्यामुळे त्यांनवा स्वतःवर होत असलेल्या अमानुष अत्याचाराचेही गांभीर्य एकतर समजतच नाहीत आणि समजले तर त्यांच्यामध्ये इतकी हिंमत नाही की त्यांनी स्वतःवर झालेल्या अन्याय-अत्याचाराविरुद्ध उभे राहावे. काही महिन्यांत निवडणुका होतील, या देशाचे सर्वकाही निवडणुकांवर आधारित असते, त्याशिवाय दुसरे काहीच नाही.  निवडणुकांनंतर कुणाचे सरकार येते आणि कुणाचे पडते तसेच जे पक्ष सत्तेवर येतात त्यांचे आणि मतदारांचे काही नाते होते का, ही गोष्ट मतदार आणि राजकीय पक्ष दोघेही विसरुन जातात. पुन्हा १०-५ वर्षे घडलेल्या अत्याचारासारखे अत्याचार होत राहतील. मणिपूर जसे जळत आहे तसेच इतर राज्यांतही झाले तर काही नवल नाही.

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, 

मो.: ९८२०१२१२०७


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget