Halloween Costume ideas 2015
2021

Tabliq

सुमारे वर्षभरापूर्वी दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमाअतचे मुख्यालय खूपच गाजले. त्यावेळी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेद्वारे कोरोना प्रसाराच्या संसर्गादरम्यान धार्मिक मेळावा आयोजित केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. धार्मिक मेळाव्याला उपस्थित असलेले 24 लोक कोविड-19 पॉज़िटिव असल्याचे आढळून आले तेव्हा या धार्मिक केंद्र कोरोना व्हायरस हॉटस्पॉटच्या रूपात उदयास आले. गुन्हे शाखेने परदेशी कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथीचे रोग कायदा आणि भारतीय दंड संहितेतील विविध तरतुदींनुसार जमाअतच्या 955 परदेशी सदस्यांविरुद्ध खटला दाखल केला.

दिल्ली पोलिसांनी असा आरोप केला की, हे लोक टुरिस्ट व्हिसाच्या माध्यमातून भारतात भारतात प्रवेश केला आणि जमाअतच्या मर्कजमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले. व्हिसाच्या तरतुदींचे उल्लंघन करण्याव्यतिरिक्त या परदेशी नागरिकांनी संसर्गजन्य रोग तर पसरलाच त्याचबरोबर मर्कजमध्ये उपस्थित असलेल्या लोकांसह सामान्य जनतेच्या जीवालादेखील धोका निर्माण केला, असेही पोलीस म्हणाले.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी काहींना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले तेव्हा सरकारने तबलिगी जमातच्या लोकांवर भारतात कोरोना विषाणूचा प्रसार केल्याचा आरोप केला,  ज्यामुळे देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले. केंद्र सरकारच्या सांगण्यावरून त्यांना शोधून क्वारन्टाइन करण्याची राज्य सरकारांनी देशव्यापी मोहीम हाती घेतली. त्यामुळे एका वर्षानंतर दिल्लीतील तबलिगी जमात कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचे काय झाले हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरेल.       -(उर्वरीत पान 7 वर)

सर्वप्रथम आपण या वस्तुस्थितीकडे पाहू या दिल्लीतील  निजामुद्दीन मर्कजमधील 955 परदेशी नागरिकांवर खटला दाखल करण्यात आला होता. त्यांच्यापैकी 911 जणांनी ‘प्ली बार्गेन’ केले होते आणि आपापल्या मायदेशी परतले होते. ’प्ही बार्गेन’ ही सरकारी वकील आणि प्रतिवादी यांच्यातील एक व्यवस्था आहे ज्यामध्ये प्रतिवादी एखाद्या किरकोळ आरोपासाठी स्वतःला दोषी मानतो आणि त्याऐवजी मोठे आरोप एकतर रद्द केले जातात किंवा त्यांना कठोर शिक्षा दिली जात नाही. उर्वरित 44 परदेशी नागरिकांनी खटल्याला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला, त्यापैकी 8 जणांना प्राथमिक पुराव्यांअभावी खटला सुरू होण्यापूर्वी सोडून देण्यात आले आणि उर्वरित 36 जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खटल्याव्यतिरिक्त दिल्लीतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये जमाअतच्या सदस्यांविरुद्ध आणखी 29 गुन्हे दाखल करण्यात आले होते. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ते एकाच वेळी साकेत कोर्टात स्थानांतरित करण्यात आले. यातील काही खटले रद्द करण्याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने ट्रायल कोर्टास या याचिकांचा निकाल लागल्याशिवाय कोणताही आदेश देण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. सध्या या 29 खटल्यांपैकी केवळ 13 खटले प्रलंबित आहेत आणि 51 भारतीय नागरिकांचा या खटल्यांमध्ये समावेश आहे. दिल्ली पोलिसांनी वेगवेगळ्या भागात दाखल केलेल्या 29 प्रकरणांमधील 193 परदेशी नागरिक हे गुन्हे शाखेच्या खटल्यानुसार निजामुद्दीन मर्कजमध्ये आढळले होते, असे तबलिगी जमाअतच्या वकील आशिमा मांडला यांनी म्हटले आहे.

मांडला म्हणतात, आम्ही न्यायालयाला सांगितले की, ज्या लोकांना मर्कजमधून ताब्यात घेण्यात आले त्याच लोकांवर शहरातील अन्य मस्जिदींमध्ये त्याच दिवशी दाखवून त्यांच्याविरुद्ध स्वतंत्र खटले दाखल करण्यात आले, हे कसे शक्य आहे? आशिमा मंडला म्हणतात की, ’प्ली बार्गेन’ अंतर्गत दिल्लीतील तबलिगी जमाअतच्या लोकांनी सुमारे 55 लाख रुपये दिल्ली उच्च न्यायालयात दंड म्हणून जमा केले असून त्यापैकी सुमारे 20 लाख रुपये पीएम केअर फंडात जमा झाले आहेत. मांडला यांच्या मते, तबलिगी जमातच्या लोकांची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश 15 डिसेंबर 2020 रोजी आला होता आणि दिल्ली सरकारने अद्याप कोणतेही अपील केलेले नाही. मांडला यांच्या मते निर्दोष सुटलेल्या 36 लोकांपैकी एक ट्युनिशियन नागरिक होता जो मरण पावला आहे.  उर्वरित 35 लोक आपल्या मायदेशी परतले आहेत, पण त्यांना अशी अट घालण्यात आली आहे की या  प्रकरणात पुढील सहा महिन्यांत अपील झाल्यास त्यांनी सहकार्य करावे. जर निर्दोष सुटल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत अपील न झाल्यास त्यांना खटल्यातून निर्दोष मुक्त समजले जाईल.

या मुद्द्यावर विविध न्यायालये काय म्हणतात?

परदेशी नागरिकांना बळीचा बकरा बनविण्यात आला होता आणि त्यांच्याविरूद्ध ली कारवाई नागरिकता (संशोधन) कायद्याच्या विरोधानंतर भारतीय मुस्लिमांसाठी एक अप्रत्यक्ष चेतावणीच आहे, असे म्हणत गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याच प्रकरणात 29 परदेशी नागरिक आणि सहा भारतीयांविरुद्ध दाखल केलेला एफआयआर फेटाळून लावला. तबलिगी जमाअत कार्यक्रमाच्या प्रसारमाध्यमांच्या वृत्तसंकलनावरील याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सांगितले की, अलीकडच्या काळात भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सर्वाधिक गैरवापर झाला आहे. तबलिगी जमाअत प्रकरणावरून प्रसारमाध्यमांचा एक गट जातीय द्वेष पसरवत असल्याचे सांगत एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे विधान केले.

डिसेंबर 2020 मध्ये दिल्लीतील एका न्यायालयाने 36 परदेशी तबलिगी जमाअतच्या सदस्यांची निर्दोष मुक्तता करताना सांगितले की आरोपी नमूद केलेल्या तारखेला मर्कजमध्ये पोहोचले किंवा मार्च 2020 अखेरपर्यंत मर्कजमध्ये राहिले हे हजेरी रजिस्टर देखील सिद्ध करत नाही. न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले की 12 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत मर्कजमध्ये कोणत्याही आरोपीचे अस्तित्व सिद्ध करण्यात सरकारी वकील अपयशी ठरले. कुठेही उल्लंघन झालं असं वाटत नाही. तबलिगी जमाअतच्या एका तरुण सदस्याने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने डिसेंबर 2020 मध्ये म्हटले होते की, नवी दिल्लीतील तबलिगी जमाअत कार्यक्रमात सहभागी झाल्यावर एखाद्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप करणे हे कायद्याचा गैरवापर करण्यासारखे आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये मुंबईतील एका न्यायालयाने तबलिगी जमाअतच्या 20 परदेशी सदस्यांची निर्दोष मुक्तता  करताना म्हटले की त्यांच्याविरुद्ध जरादेखील पुरावा नाही.

मर्कज पुन्हा उघडू शकते?

कोविद-19 च्या संक्रमणादरम्यान धार्मिक सभा आयोजित केल्याच्या आरोपावरून बंद करण्यात आलेल्या निजामुद्दीन येथील तबलिगी जमाअतचे मर्कज अजूनही पुन्हा सुरू होण्याच्या प्रतिक्षेत आहे.

दिल्ली सरकारने धार्मिक कार्यासाठी मर्कज पुन्हा सुरू करण्याचे मान्य केले असले तरी शब-ए-बारातच्या निमित्ताने राज्य वक्फ बोर्डाने निवडलेल्या 50 जणांना निजामुद्दीन मर्कज येथील एका मस्जिदीत प्रार्थना करण्याची परवानगी दिली जाऊ शकते, असे केंद्र सरकारने म्हटले होते.

याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय अद्याप आलेला नाही. 

दिल्ली सरकारने उच्च न्यायालयाला सांगितले आहे की, गेल्या वर्षी सोशल डिस्टन्सिंगच्या तथाकथित उल्लंघनाच्या प्रकरणात अडकलेल्या अनेक परदेशी नागरिकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे आणि उर्वरित लोकांवर खटल्यास विलंब लागू शकतो आणि गेल्या जूनमध्ये सर्व धार्मिक स्थळे पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालय मर्कजमधील धार्मिक कार्ये पुन्हा सुरू करण्याचा आदेश देऊ शकते.

दिल्ली वक्फ बोर्डाने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेद्वारे मर्कजमधील मस्जिदी, मदरसे आणि वसतिगृहांसह संपूर्ण कॅम्पस सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

तबलिगी जमाअत म्हणजे काय?

1926-27 मध्ये भारतात तबलिगी जमाअतची स्थापना झाली. इस्लामी विचारवंत मौलाना मुहम्मद इलियास    यांनी त्याचा पाया घातला. मौलाना मुहम्मद इलियास यांनी दिल्ली लगतच्या मेवात येथील लोकांना धार्मिक शिक्षण देण्याचे काम सुरू केले. नंतर ही मालिका पुढे वाढत गेली.

तबलिगी जमाअतची पहिली बैठक 1941 साली भारतात झाली आणि त्यात 25,000 लोक सहभागी झाले होते. 1940 च्या दशकापर्यंत जमाअतचे कार्य अविभाजित भारतापुरतेच मर्यादित होते, पण नंतर त्याच्या शाखा पाकिस्तान आणि बांगलादेशात पसरल्या. जमाअतचे कार्य झपाट्याने पसरले आणि ही चळवळ जगभर पसरली. तबलिगी जमाअतचे सर्वांत मोठे संमेलन दरवर्षी बांगलादेशात होते, तर पाकिस्तानात देखील रायविंडमध्ये एक वार्षिक कार्यक्रम आयोजित केला जातो, ज्यामध्ये जगभरातील लाखो मुस्लिम सहभागी होतात. त्याची केंद्रे 140 देशांमध्ये आहेत. भारतातील सर्व प्रमुख शहरांमध्ये याचे मर्कज (केंद्र) आहे. या केंद्रामध्ये वर्षभर इज्तेमा (धार्मिक शिक्षणासाठी लोकांचे एकत्रित जमणे) सुरू असतो.

तबलिगी जमाअतचा शाब्दिक अर्थ ‘आस्था आणि श्रद्धा लोकांदरम्यान पसरवणारा समूह’ असा होतो. सामान्य मुस्लिमांपर्यंत पोहोचणे आणि विशेषतः आयोजन, पेहराव आणि वैयक्तिक वर्तणुकीच्या बाबतीत त्यांचा विश्वास-आस्था पुनरुज्जीवित करणे हा या लोकांचा उद्देश आहे.


- राघवेंद्र राव

(बीबीसी हिंदी मधून साभार)


kaba

जगात जेवढे काही धर्म आहेत त्यांना काहीतरी नाव आहे. धर्माचे नाव एका विशिष्ट व्यक्तीवर ठेवले जाते किंवा त्या वंशाच्या धर्मावर असते ज्यात तो वंश उदयास येतो.  उदाहरणार्थ ख्रिश्चन धर्म हा ईसा (अलैहिस्सलाम) यांच्या नावावर आहे. बौद्ध धर्म गौतम बुद्धांच्या नावावर आहे. ज्यू धर्माचे नाव ज्यूमधील एका कबिल्याच्या नावावर यहूदी ठेवलेले आहे ज्याचे नाव यहुदा होते. असाच प्रकार इतर धर्मांच्याबाबतीत आहे. पण इस्लाम धर्माचे नाव कोणत्या व्यक्ती अथवा वंशाच्या नावावर नाही. इस्लाम ही एक खास / विशिष्ट प्रवृत्तीला जाहीर करतो जी इस्लाम या शब्दात आहे. हे नाव कुठल्याही व्यक्तीने शोधून काढलेले नाही किंवा हे नाव एखाद्या वंशाच्या नावावर ठेवलेले आहे. याचा सबंध कोणा व्यक्ती किंवा देशाशीही नाही. फक्त इस्लामची गुणवैशिष्ट्ये लोकांमध्ये बानवणे याचा उद्देश आहे. प्रत्येक काळात ते लोक जे सत्य बोलत होते, पवित्र आचरण करत होते ते सर्व मुस्लिम होते आहे आणि भविष्यातही राहतील. (अरबी भाषेत इस्लामचा अर्थ होतो आदेश मानने. इस्लाम या शब्दाचा दूसरा अर्थ शांती, आश्रय देणे, संरक्षण करणे सुद्धा आहे.) 

आपण पाहतो जगात आज जितक्या काही वस्तू आहेत ते एका नियमात बांधलेल्या आहेत. सूर्य, चंद्र, पृथ्वी सर्व आपल्या ठरवून दिलेल्या कक्षेतच फिरतात. पाणी, हवा, झाड-झुडपे सर्व काही एक नियमानुसार चालतात. मनुष्यासाठीही हे नियम आहेतच तो सुद्धा या नियमाप्रमाणेच श्वास घेतो, पाणी पितो, जेवन करतो त्याच्या शरीराचे सर्व अवयव काम करत असतात.  

या सर्व गोष्टी ज्या निर्मात्याने बनविल्या त्यानेच या नियमात या गोष्टींना बांधले आहे. संपूर्ण सृष्टी त्याचा आदेश मानणारी आहे. त्याप्रमाणे या सर्वांचा धर्म इस्लाम आहे व त्या सर्व गोष्टी मुसलमान आहेत. कारण ते आपल्या निर्मात्याचे म्हणजेच अल्लाहच्या आदेशाचे पालन करीत आहेत. 

सूर्य,चंद्र, तारे, जमीन, वृक्ष, दगड, प्राणी या सर्व गोष्टी मुस्लिम आहेत व सर्व मनुष्यही मुस्लिम आहेत पण काही मनुष्य शिर्क व कुफ्र सारखे गुन्हा करून मुस्लिम बनण्यापासून वंचित राहतात. 

मनुष्याला आपले मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य आहे, तो इस्लाम आत्मसात करून मुस्लिम होऊ शकतो पण हे त्याच्या निवडीची बाब आहे. 

एक व्यक्ती आहे जो आपल्या निर्मात्याला ओळखतो व त्यालाच आपला मालक समजतो आणि तो आपल्या जीवनात आपल्या निर्मार्त्याने घालून दिलेल्या नियमांचे पालन करतो तो पूर्णपणे मुस्लिम आहे तो आता सत्य व शांतीच्या मार्गाने अनुकरण करेल. 

कुफ्र म्हणजे काय?

आता एक दुसरा व्यक्ती जो जन्मतः तर मुस्लिम आहे पण त्याने अल्लाहचे आदेश मानले नाहीत तर तो व्यक्ती काफीर आहे. कुफ्रचा अर्थ लपवने, नकार देणे किंवा पडदा टाकणे असा होतो. 

कुफ्रचे नुकसान

कुफ्र हे एक अज्ञान आहे, अथवा खरे अज्ञान कुफ्रच आहे. जो व्यक्ती आपल्या निर्मात्याला मानण्यास मनाई करत असेल ज्याने कार्बन, सोडियम व कितीतरी गोष्टींना मिळवून मनुष्य तयार केले. ज्याने एवढे सुंदर जग अगदी काटेकोरपणे बनवले ज्याच्याकडे सर्व ज्ञान आहे त्याचा आदेश मानण्यास नकार करणाऱ्याला अज्ञानीच म्हणावे लागेल.

त्याने आता जीवनात कितीही ज्ञान आत्मसात केले तरीही त्याचा उपयोग नाही कारण त्याला ज्ञानाचे पहिले टोकच मिळाले नाही. 

सर्वात मोठे अत्याचार / दडपण कुफ्र आहे कारण आपल्या प्रवृत्तीच्या विरोधात त्यांच्याकडून काम करून घेतले जाते. सर्व गोष्टींची प्रवृत्ती आहे कि ते अल्लाहच्या आदेशाचे पालन करावेत. पण कुफ्र करणारा व्यक्ती या प्रवृत्तीच्या विरूद्ध कामे करतो. 

कुफ्र म्हणजे दडपणे नव्हे तर बंड, कृतघ्नता व नमक-हरामीपण आहे. ज्या अल्लाहने बुद्धी दिली त्याच बुद्धीचा वापर अल्लाहविरूद्ध होत असेल तर त्याला बंड म्हणणार. ज्या अल्लाहमुळे आपण जगतो आहोत त्या अल्लाहचे आभार न मानणे व त्याविरूद्धच कारवाया करणे यालाच नमक-हरामी म्हणतात. 

कुफ्रमुळे जे काही नुकसान होते ते मनुष्याचेच होते. ज्या बादशाहची सल्तनत एवढी मोठी आहे कि वैज्ञानिकांनाही याच्या शेवटच्या टोकाचा शोध घेता आला नाही. त्या अल्लाहचे मनुष्याचे त्याला मानण्या न मानण्याने काही नुकसान होणार नाही.

कुफ्र करणाऱ्याला कधीच सत्याचा मार्ग सापडणार नाही व ज्ञान प्रप्त होणार नाही. त्याचे सामाजिक जीवन खराब होईल त्याची आर्थिक स्थिती खराब होईल. त्याची सत्ता खराब होईल, तो जगात अशांतता पसरवेल. हिंसा करेल, दुसऱ्यांचे हक मारेल, दडपशाही करेल कारण जो आपल्या निर्मात्याला ओळखत नाही त्यात काय नितीमत्ता आणि काय सत्य असणार तो आपली संपत्ती गैरप्रकारे कमवेल. आखिरतच्या दिवशी त्याचेच हात, पाय व इतर अवयव त्याच्या विरूद्ध अल्लाहच्या दरबारात ग्वाही देतील. 

इस्लामचे फायदे

अल्लाहने मनुष्याला विचार करण्याची, बरोबर-चूक कोणते ही ओळखण्याचा विवेक दिला आहे तसेच स्वातंत्र्यही दिले आहे. हे स्वातंत्र्यच खरी परीक्षा आहे. आपण या स्वातंत्र्याचा वापर कसे करतो यावर आपले यश अवलंबून आहे. आपण ईश्वराला ओखळून सत्य व त्याच्या कायद्याचे पालन करत असू तर आपल्याला यश मिळेल अन्यथा नाही. 

जो मुसलमान असेल तो आपल्या ज्ञानाचा उपयोग मनुष्याचा कल्याणासाठी करेल तो कधीच स्वतःला कुठल्याही गोष्टीचा मालक समजणार नाही त्यात अहंकार असणार नाही. 

तसेच इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्राचे ज्ञान मिळवून एक मुस्लिम आपल्या प्रयत्नाने एका काफीरापेक्षा मागे नसेल. पण दोघांत अंतर असेल. एक मुस्लिम चांगल्या पद्धतीने या ज्ञानाचा वापर करेल. भूतकाळात तो वंश ज्या जमाती नष्ट झाल्या त्यांच्यापासून तो बोध घेईल. 

मुसलमानाचे विचार हे सत्य. अल्लाहला मानणारे असतील तो सर्व काही अल्लाहचे आहे असे मोल व अल्लाहने दिलेल्या गोष्टींचा वापर अल्लाहच्या मर्जीच्या प्रमाणे तो करेल. कारण त्याला एकादिवशी सर्व गोष्टींचा हिशोब द्यावा लागणार आहे. 

असे ज्याचे विचार असतील तो स्वतःला वाईट कामांपासून मुक्त ठेवेल. तो आपल्या बुद्धीला वाईट विचारांपासून रोखेल. डोळ्यांनी, कानांनी वाईट काम करणार नाही. त्यांच्या तोंडून वाईट गोष्टी निघणार नाहीत. तो आपले हात अत्याचार करण्यासाठी उचलणार नाही, त्याचे पाय चुकीच्या जागी जाणार नाहीत. तो गैरप्रकारे ऐशआरामाचे जीवन जगणार नाही तर तो साधे जीवन जगेल. 

या व्यक्तीसारखा सभ्य कोणीही नसेल तो दोन्ही जगात यश संपादन करेल. त्याच्यासारखा सन्मान कोणाचा नसेल कारण तो अल्लाहशिवाय कोणासमोर झुकत नाही. त्याच्यासारखा ताकतवान कोणी नसेल कारण त्याच्या मनात अल्लाहशिवाय कोणाचीही भीती नाही. तो थोड्या संपत्तीवरच समाधान मानणारा असेल तो सर्वांना प्रिय असेल कारण तो सर्वांची मदत करेल. सर्वांचे हक अदा करेल. 

मुस्लिमाची ही प्रवृत्ती बघितल्यानंतर एक मुस्लिम कधीच अस्वाभीमानी व खालच्या दर्जाचा राहूच शकत नाही.

या जगात अल्लाहच्या आदेशाचे पालन करून व सन्मानाने जीवन जगल्यानंतर त्या जगात अल्लाह कधीही न संपणारे खजीने आपल्या गुलामासाठी खुले करेल व अशाप्रकारे इस्लामचे अनुयायी दोन्ही जगांत यश संपादन करतात. 

इस्लाम हा धर्म कुण्या एका विशिष्ट देशाचे किंवा वंशाचे लोकांचे नाव नसून तो संपूर्ण मानवजातीच्या मालकीचे आहे. प्रत्येक युगात प्रत्येक देशात जो व्यक्ती अल्लाहला जाणला व सत्याचे आचरण ज्याने केले ते सर्व मुस्लिम होते. त्यांचा धर्म इस्लाम होता. (संदर्भ : दिनीयात भाग 1 चा सार. )


- अबु सकलैन रफिक अहमद पटेल, 

लातूर 

9860551773


लोकहो, आम्ही तुम्हाला एका पुरुष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविकतः अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे. निश्चितच अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.’’  (सुरे अलहजरात आयत नं. 13)

आजच्या धावपळीच्या जगामध्ये जीवनाचा गांभीर्याने विचार करायला लोकांकडे वेळच नाही. उपजिविकेची काळजी लोकांना जीवनासंबंधी आणि विशेषतः मरणोत्तर जीवनासंबंधी विचार करण्याची संधीच देत नाही. जीवन काय आहे? शाप आहे की वरदान? ठरवून केलेली खेळी आहे की निव्वळ योगायोग? परिपूर्ण आहे का अपूर्ण ? आपल्याला कोणी जन्माला घातले की आपण आपोआप जन्माला आलो? जन्म देण्यामध्ये आई-वडिलांव्यतिरिक्त तिसरी कोणती शक्ती कार्यरत होती काय? होती तर मग ती शक्ती कोणती? ती कशी आहे? का तिने आपल्याला जन्माला घातले? या सर्व प्रश्नांची उत्तरे कोठे सापडतील? ही सारी प्रश्नावली केवळ काल्पनिक नसून या मागे निश्चित असा कार्यकारणभाव आहे व तो कुरआनने मोठ्या सुंदर पद्धतीने उलगडून दाखविलेला आहे. 

मुळात कुरआन एक नसून दोन आहेत. एक पुस्तक स्वरूपात तर दुसरा प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या स्वरूपात. जर फक्त पुस्तकाचे अवतरण झाले असते तर त्याचा परिणाम तेवढा झाला नसता जेवढा आज आहे. आज जवळ-जवळ 200 कोटी लोक मुस्लिम आहेत व ते गर्वाने स्वतःला मोहमेडन अर्थात प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे पाईक असल्याचा उल्लेख करतात. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे वारस म्हणून कुरआनचे प्रात्यक्षिक दाखविण्याचे काम मुस्लिमांचे आहे. फक्त कुरआन वाटप करून जमणार नाही तर स्वतः कुरआनचे प्रात्यक्षिक दाखविल्याशिवाय इतरांना कुरआन काय आहे समजणार नाही. 

ज्याप्रमाणे गुलाबासोबत काटे असतात तसेच सामाजिक स्वातंत्र्यासोबत वाईट गोष्टी असतात. इस्लाम स्वतंत्र समाजामधून ’इव्हील’ म्हणजे वाईट गोष्टी समाप्त करू इच्छितो. दुसऱ्या जीवन व्यवस्थेमध्ये वाईट गोष्टींना उत्तेजन दिले जाते. 

प्रसिद्ध समाजशास्त्री अनिल उपाध्याय यांच्या मते इस्लाममध्ये कट्टरता आहे, हे सत्य आहे. पण ती कट्टरता सत्यासाठीची आहे, न्यायासाठीची आहे, मानव कल्याणाविषयी आहे. हीच कट्टरता लोकांना नकोय. या कट्टरतेमुळेच ते नाराज आहेत. त्यांना लवचिक व्यवस्था पाहिजे. इस्लाम त्याच्यासाठी तयार नाही. 

कुरआनचे मानवीय स्वरूप

कश्ती-ए-हक का जमाने में सहारा तू है

असरे नौरात है धुंदलासा सितारा तू है

मागच्या आठवड्यात आपण ’त्या 24’ आयातीचे विश्लेषण केले होते ज्या संंबंधी धिक्कारपात्र वसीम रिझवीने  सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. या आठवड्यात कुरआनच्या त्या आयातींचा उहापोह करण्याचा विचार आहे. ज्यांच्याकडे सहसा कोणाचे लक्ष जात नाही. 

1. ’’पृथ्वीवर उपद्रव माजवू नका’’ (सुरे बकरा आयत नं.11)

2. ’’ईश्वर न्याय करणाऱ्यांना पसंत करतो’’ (सुरे अलमायदा आयत नं. 42)

3. ’’ निवाडा न्यायपूर्ण पद्धतीने करा’’ (सुरे अलमायदा आयत नं.42)

4. ’’हे श्रद्धावंतांनो, अल्लाहसाठी सत्यावर अढळ राहणारे व न्यायाची ग्वाही देणारे बना. एखाद्या गटाच्या शत्रुत्वाने तुम्हाला इतके प्रक्षोभित करू नये की तुम्ही न्यायापासून विमुख व्हाल. न्याय करा, हे ईशपरायणतेशी अधिक निकटवर्ती आहे. अल्लाहचे भय बाळगून कार्य करीत राहा. जे काही तुम्ही करता, अल्लाह त्याची पुरेपूर खबर ठेवणारा आहे.’’(सुरे अलमायदा आयत नं. 8)

जगाला न्यायाशिवाय दुसऱ्याच कुठल्याच गोष्टीची गरज नाही. - ताब्दुक ऍम्रे (प्रसिद्ध तुर्की सुफी संत) 

वरील सर्व आयातींमध्ये पृथ्वीमध्ये राहणाऱ्यांचे सर्वोच्च कल्याण करण्यासाठी त्या मुलभूत गोष्टींचा उल्लेख केलेला आहे ज्यांची गरज एका आदर्श समाजाच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे. पहिल्या आयातीमध्ये म्हटलेले आहे की, पृथ्वीवर उपद्रव माजवू नका. म्हणजेच सभ्यतेने रहा. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या आयातीमध्ये न्यायाचे महत्त्व विशद केलेले आहे. न्याय निष्पक्षपणे करण्याचे निर्देश दिलेले आहेत. न्याय करतांना तुम्हाला अशा लोकांचाही विचार करावा लागेल जे तुम्हाला आवडत नाहीत किंवा ज्यांच्याशी तुमचे वैर आहे. त्या वैराचा परिणाम तुमच्या न्यायबुद्धीवर होवू नये याची काळजी घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. न्यायाशिवाय सामाजिक शांतता प्रस्थापित होवू शकत नाही. राजकीय शक्तीने, लष्करी बळाने जरी लोकांची मुस्कटदाबी करता येत असली तरी तो एक ’सप्रेस्ड वॉर’ असतो. म्हणून इस्लाममध्ये न्याय करण्यास फार महत्त्व दिलेले आहे. न्याय करण्यासाठी न्यायबुद्धी अत्यंत जरूरी असते. न्यायबुद्धी निर्माण करण्यासाठी जागतिक दृष्टीकोण आवश्यक असतो आणि तो दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी कुरआन म्हणतो की, ’’लोकहो! आम्ही तुम्हाला एका पुरुष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविक पाहता अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे. निश्चितच अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.’’  (सुरे अलहजरात आयत नं. 13)

जेव्हा जगातील सर्व लोक एका आई-वडिलांची संतती आहे एवढा व्यापक दृष्टीकोण माणसाच्या विचारांचा ताबा घेतो तेव्हाच तो न्याय करू शकतो. संकुचित दृष्टीकोणाने न्याय कधीही होवू शकत नाही, ही सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ गोष्ट आहे. धर्माच्या बाबतीत कुरआनचे म्हणणे स्पष्ट आहे की, 

1.’’ धर्माच्या बाबतीत जबरदस्ती नाही.’’ (सुरे बकरा आयत नं. 256).

2. ’’ जर तुझ्या पालनकर्त्याची अशी इच्छा असती की, पृथ्वीतलावर सर्व (लोक) श्रद्धावंत / आज्ञाधारक अर्थात मुस्लिमच असावेत.’’ तर सर्व भूतलवासियांनी (तशी) श्रद्धा ठेवली असती. मग तू (काय) लोकांना भाग पाडशील. की ते श्रद्धावंत बनावेत?’’ (सुरे युनूस आयत नं.99)

इस्लामच्या बाबतीत असा एक व्यापक गैरसमज लोकांमध्ये पसरलेला आहे की, इस्लाम हा तलवारीच्या बळावर पसरलेला धर्म आहे. ही धारणा अतिशय चुकीची आहे. भारताच्या पूर्वेकडील मलेशिया, इंडोनेशिया, ब्रुनोई या मुस्लिम व 8 कोटी उइगर मुस्लिम असलेल्या चीन सारख्या देशांचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट लक्षात येईल की, मुस्लिमांनी कधीच या देशावर आक्रमण केलेले नव्हते. तरी सुद्धा ही राष्ट्रे मुस्लिम आहेत. इंडोनेशिया तर जगातील सर्वात मोठे मुस्लिम राष्ट्र आहे. स्पष्ट आहे, येथे इस्लाम आपल्या वैचारिक क्षमतेच्या आणि मुस्लिमांच्या चारित्र्याच्या बळावर विस्तारपावला. भारतासारख्या देशात जरी मुस्लिम आक्रमणकर्ते आले आणि इथे शेकडो वर्ष त्यांनी राज्य केले, तरी त्यांची आक्रमणे ही राजकीय स्वरूपाची होती, संयोगाने ते मुस्लिम होते. अपवाद वगळता इस्लामचा प्रचार आणि प्रसार हे त्यांचे कधीच धोरण नव्हते. मुळात ताकदीच्या बळावर श्रद्धा बदलता येते, हेच गृहितक चुकीचे आहे. 

वरील पहिल्या आयातीमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की, धर्माच्या बाबतीत जबरदस्ती नाही. इस्लामच्या बाबतीत कोणावर जबरदस्ती करताच येत नाही. साधे अतिक्रमण करून मस्जिद बांधता येत नाही तर लोकांच्या श्रद्धेवर अतिक्रमण कसे करता येईल? दुसऱ्या आयातीमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की, ईश्वराची ही इच्छाच नाही की, पृथ्वीवरील सर्व लोकांना बळजबरीने मुस्लिम बनविण्यात यावे. स्पष्ट आहे त्याची जर तशी इच्छा असती तर पृथ्वीवर एकही माणूस बिगर मुस्लिम राहिला नसता. म्हणूनच मुस्लिमेत्तरांबरोबर विनाकारण युद्ध करण्याची परवानगी इस्लाम देत नाही. कुरआनमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की, 

1. ’’ आणि तुम्ही अल्लाहच्या मार्गात त्या लोकांशी लढा जे तुमच्याशी लढतात परंतु अतिरेक करू नका. अल्लाहला अतिरेक करणारे आवडत नाहीत.’’ (सुरे अलबकरा आयत नं. 190)

पहा! यात स्पष्ट म्हटलेले आहे की, ईश्वराच्या मार्गात त्या लोकांशी लढा जे तुमच्याशी लढतात. यात मुस्लिम आणि मुस्लिमेत्तर असा फरक नाही. जे तुमच्याशी लढतील त्यांच्याशी लढण्याची परवानगी दिलेली आहे. ही किती न्यायसंगत बाब आहे, हे वाचकांनी स्वतःच ठरवावे. उलट यात असे म्हटलेले आहे की, लढतांना अन्याय करू नका. म्हणजे या ठिकाणी शत्रुंशी लढतांना सुद्धा अतिरेक करण्यापासून रोखण्यात आलेले आहे. म्हणूनच माझे स्पष्ट मत आहे की, कुरआन म्हणजे तीन गोष्टींचा समुच्चय आहे. कृपा, कृपा आणि कृपा.

2.  ’’जर अल्लाह अशा प्रकारे मानवाच्या एका समुदायाला (दंगलखोर आणि अत्याचारी) दुसऱ्या समुदायाच्या हस्ते हटवत नसता तर पृथ्वीची व्यवस्था बिघडली असती.  परंतु जगातील लोकांवर अल्लाहची मोठी कृपा आहे की (तो अशा तर्हेने हिंसाचाराच्या विनाशाची व्यवस्था करीत असतो.)’’  (सुरे अलबकरा आयत नं.:251)

या आयातीमध्ये अल्लाहच्या त्या वैशिष्ट्याचे वर्णन केलेले आहे ज्यात ईश्वराने अत्याचारी गटांचा बिमोड दुसऱ्या न्याय गटांच्या माध्यमातून करण्याची व्यवस्था ठेवली नसती तर पृथ्वीवरची सर्व व्यवस्थाच बिगडून गेली असती. हे असे सत्य आहे जे की, कोणत्याही सामान्य बुद्धिच्या माणसाच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. 

3. ’’मग काय कारण आहे की तुम्ही अल्लाहच्या मार्गात त्या असहाय पुरुष-स्त्रियां आणि मुलांकरिता लढत नाही जे दुर्बल असल्यामुळे त्यांचे दमन केले गेले आहे आणि (असे लोक) धावा करीत आहेत की, हे पालनकर्त्या! आम्हाला या वस्तीतून बाहेर काढ ज्याचे रहिवाशी अत्याचारी आहेत, आणि तुझ्याकडून आमचा एखादा वाली व सहायक निर्माण कर.’’  (सुरे अन्निसा आयत नं.:75). 

आयीन-ए-नौ से डरना तर्ज़े कुहन पे अड़ना

मंज़िल यही कठीण है कौमों की ज़िंदगी में 

या आयातीमध्ये एका अशा मुद्याकडे सभ्य आणि सक्षम लोकांना ईश्वराने आवाहन केलेले आहे की, तुम्ही सक्षम असून, त्या स्त्री- पुरूष आणि मुलांकरिता का लढू इच्छित नाही, ज्यांच्यावर अत्याचार होत आहेत. साधारणपणे दुर्बलांचे रक्षण करणे हे सबलांचे नैतिक कर्तव्य आहे आणि याच कर्तव्याकडे या आयातींमध्ये न्यायप्रिय लोकांचे लक्ष वेधण्यात आलेले आहे. आणि त्या अत्याचारग्रस्त लोकांच्याकडून अत्याचार कणाऱ्या लोकांविरूद्ध लढताना जी हिंसा होणार आहे त्या हिंसेला ईश्वराने ’न्याय हिंसा’ ठरवलेले आहे आणि हे सत्य समजण्यासारखे आहे. 

सरसकट बिगर मुस्लिमांच्याविरूद्ध कुठलेही कारण नसतांना ’लढा’ असे निर्देश देणारी एकही आयत कुरआनमध्ये नाही. उलट कुरआन म्हणतो की, 

1. ’’अल्लाह तुम्हाला या गोष्टीची मनाई करीत नाही की तुम्ही त्या लोकांशी सद्व्यवहार आणि न्यायाचे वर्तन करावे, ज्यांनी धर्माच्या बाबतीत तुमच्याशी युद्ध केले नाही आणि तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर काढले नाही. अल्लाह न्याय करणाऱ्यांना पसंत करतो.’’  (सुरे अलमुम्तहना आयत नं. 8).

ही आयत स्वयंस्पष्ट आहे. त्याच लोकाशी लढण्याची परवानगी आहे ज्यांनी तुमच्यावर अत्याचार केलेले असतील. धर्माच्या कारणावरून तुम्हाला घरातून बाहेर काढले असतील. बाकी कोणत्याही धर्माचे लोक असो त्यांच्याशी न्यायपद्धतीने वागा. कारण असे लोकच ईश्वराला प्रिय आहेत. एवढे स्पष्ट उदाहरण दिलेले असतांना असे म्हणायला कुठे जागा राहते की, इस्लाम हा इतर धर्मियांचा द्वेष शिकवितो. त्यांच्याविरूद्ध हिंसा करायला प्रेरित करतो. 

या काही मोजक्या आयाती आहेत ज्या मी वाचकांच्या सेवेमध्ये सादर केलेल्या आहेत. अशा अनेक आयातींनी कुरआन भरलेले आहे. प्रश्न फक्त त्या आयातींचा मतीतार्थ समजून घेण्याचा आहे व याची प्राथमिक जबाबदारी मुस्लिमांची आहे. मुस्लिमेत्तरांना त्यांच्या भाषेत कळेल अशा पद्धतीने कुरआनचा उपदेश पोहोचविणे हे त्यांच्या जीवनाचे उद्देश आहे. मुळात मुस्लिम समाजातील एक मोठा वर्ग कुरआनपासून व्यवहार्यरित्या तुटलेला असल्यामुळे कुरआनमधील निर्देशांचा परिणाम त्यांच्या जीवनात दिसून येत नाहीत. म्हणून अशा लोकांचे जीवनसुद्धा तणावग्रस्त आहे आणि भौतिकवादी लोकांच्या जीवनापेक्षा वेगळे नाही. 

वस्तुस्थिती अशी आहे, इस्लाम तीन प्रकारच्या लोकांना पसंत नाही. एक- ज्यांच्या पर्यंत त्यांच्या मातृभाषेत इस्लामबद्दल पुरेशी माहिती पोहोचलेली नाही. दोन - ते लोक जे मीडियाच्या अपप्रचाराला बळी पडलेले आहेत. तीन - ते लोक   ज्यांना जगामध्ये मनमानी करावयाची आहे. अनैतिक जीवन जगायचे आहे. अनैतिक कृत्य करायची आहेत. अनैतिक पद्धतीने व्यवहार करायचे आहे. अनैतिक पद्धतीने साधन सामुग्री गोळा करायची आहे. अनैतिक व्यवसाय करायचे आहेत. जे लोक नैतिकतेचे पाईक आहेत, नैतिकतेला पसंत करतात. त्यांच्यासाठी गरज आहे ती या गोष्टीची की कुरआनचा परिचय प्रत्येक मुस्लिमाने आपल्या सद्वर्तनातून करून द्यावा. तेव्हाच कुरआन विषयी असलेले गैरसमज बहुसंख्य बांधवांच्या मनातून दूर होतील.


- एम. आय. शेख


मार्चला कोरोना पळवून लावण्याला एक वर्ष पूर्ण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असे म्हटले होते की, महाभारताचे युद्ध 18 दिवसात संपले होते. पण कोरोना विरूद्धचे युद्ध जिंकण्यासाठी 21 दिवस लागणार आहेत. या घोषणेआधी दोन दिवस पंतप्रधानांनी जनता कर्फ्यू दरम्यान लोकांना टाळी आणि थाळी वाजवण्याची नाट्यमय घोषणा केली होती. लोकांनीही कर्फ्यूच्या समाप्तीनंतर मोठ्या उत्साहाने मोदींना प्रतिसाद दिला होता. यानंतर दोनच दिवसांनी रात्रीच्या 8 वाजता कुणाला काही समजण्याआधी नोटाबंदी प्रमाणेच देशात टाळेबंदीची घोषणा करून टाकली. नोटा बंदीचे समजू शकतो लोकांना याची माहिती मिळू नये म्हणून अचानक घोषणा केली होती. पण लॉकडाऊनला कुठला बहाणा करता येत नव्हता. करावे काय लोकांना पंतप्रधानांच्या अशा व्यवहारांची जणू सवयच जडलेली दिसते. 

तसे पाहता नोटाबंदीचाही उपयोग करूनच घेतला होता. काळेधन पांढरे करूनच घेतले. त्यासाठी भ्रष्टाचाराचा मार्ग निवडला असेल. पण या भ्रष्टाचाराच्या काळ्या धनाचे काय झाले असेल? आश्चर्य या गोष्टीचे वाटते की लॉकडाऊन लावताना अशा कोट्यावधी लोकांचा थोडा देखील विचार केला गेला नाही ज्यांना पाणी पिण्यासाठी दररोज विहीर खांदावी लागते. प्रवासी मजुरांकडे एक आठवडा पोट चालवण्याचा खर्च देखील शिल्लक नसतो. सरकारने हे आश्वासन दिले की कुणावर उपासमारीची वेळ येऊ देणार नाही पण गेल्या 70 वर्षांचा अनुभव असा की सरकारी वचन पूर्ततेसाठी नव्हे तर त्यांची मते हस्तगत करण्यासाठी असतात. गरीबांनी पंतप्रधानांनी घोषित केेलेले लॉकडाऊन पायाखाली तुडविले. रेल्वे आणि मोटारीची आशा सोडून दिली पायी चालतच आपापल्या गावी निघाले. 

5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा फुगा आंतरराष्ट्रीय चौकात फुटला. लाखो लोकांनी पायीच घरी आपापल्या गावी जाण्याचा निर्णय घेऊन जगाला दाखवून दिले की मोठमोठ्या शहरांमध्ये इमारतींमध्ये माणूस नाही तर पशुप्राणी निवास करतात. पंतप्रधानांच्या विनंतीकडेही लोकांनी कानाडोळा केला ते म्हणाले होते की, लोकांना एकमेकांची काळजी घ्यावी कोणाला उपाशी राहू देऊ नये. राष्ट्राच्या सर्वेसर्वाच्या शोषण मनोरंजन असू शकते पण त्यांच्यात एकमेकांसाठी संवेदना सद्भावना जागृत करत नसतात. प्रवासी मजुरांनी माध्यमांना सांगितले होते की, त्यांना मृत्यू जरी आला तरी ते थांबणार नाहीत त्यांना मरायचे आहे. पण आपल्या घरी, आपल्या नातलगांमध्ये. अशा रीतीने कोरोना महामारीनंतर लॉकडाऊन लावल्यामुळे भारतीय समाज आणि शासन यंत्रणेसमोर एक दर्पण ठेवले गेले. ज्यामध्ये लोकांनी आपला विकृत चेहरा पाहिला. जे लोक आपले प्राण हातात घेऊन या प्रवासी मजुरांच्या मदतीला धावून आले, त्यांना सोडून या सगळ्या प्रकरणात शासन व्यवस्थेने आपले संवेदनशून्य व्यक्तीत्वाचा पुरावा दिला. लाखो लोक देशाच्या सर्व सडकांवर निघालेले असताना कोर्टात खोटे सांगितले होते. एकही प्रवासी मजूर सडकेवर नाही. 

आंधळ्या न्याय व्यवस्थेने सरकारशी कोणताही प्रश्न न विचारता त्यांनी जे सांगितले ते जसेच्या तसे स्वीकारले. थोडी जरी लाज असती तर प्रवासी मजुरांसाठी विशेष रेलगाड्या आणी बसेसची सोय केली असती आणि नंतरच लॉकडाऊन लागू केले असते. जगातील साऱ्या देशांनी आपल्या नागरिकांना सांभाळून घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला आणि मग नंतर लॉकडाऊन लावला. पण आपल्या लोकशाहीने तर लोकांचा गळाच दाबून टाकला. आपल्या या दुर्वर्तनाकडून लोकांचे लक्ष्य दुसरीकडे वळवण्यासाठी माध्यमांमध्ये तबलीगी जमातच्या मुस्लिमांना कोरोनाच्या फैलावासाठी जबाबदार धरण्यात आले. रेल्वे सुरू झाल्याची घोषणा ऐकूण प्रवासी मजूर मुंबईतील बांद्र जामा मशीदीजवळ जमले असताना त्यांचा संबंध मशीद आणि साहजिकच मुस्लिमांशी जोडला गेला. पण जसाजसा काळ लोटत गेला सत्य परिस्थितीसमोर आलीच.

लॉकडाऊनच्या एका वर्षानंतरची स्थिती अशी की जगात अमेरिका आणि ब्राझील नंतर भारताचा क्रमांक लागतो. कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे. तरी देखील खरी परिस्थिती समोर येत नाही. लोक सीटीस्कॅन, टेस्ट करून उपचार घेत आहेत. देशात गेल्या आठवड्यापर्यंत एक कोटी 19 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 106100 लोकांचे प्राण गेले. लसीकरणाची मोहिम चालू आहे. कोरोनाच्या परतण्याचा अर्थ असा की टाळीथाळी वाजवून लोकांना मुर्ख बनवले जावू शकते पण कोरोना महामारीला पिटाळून लावता येत नाही. देशाची भोळीभाबडी जनता आणि कोरोना विषाणूत भला मोठा अंतर आहे. यासाठी शासनाला गांभीर्याने उपाययोजना करावी लागेल. पण ज्या सत्ताधारींना फक्त निवडणुका जिंकणे हाच एकमेव उद्देश आहे. त्यांच्याकडून कोणत्या गांभीर्याची अपेक्षा करणे मूर्खपणा ठरेल. हे सत्ताधारी जनतेला निवडणूक मोहिमेत गुंतवून ठेवून आपले सत्ताप्राप्तीचे उद्दिष्ट साकार करणार आहेत. ज्याची किंमत गोरगरीब जनतेला मोजावी लागते. 

कोरोना विषयी पहिली अशी धारणा होती की हा रोग झोपडपट्टीतून इमारतीपर्यंत पसरतो. पण आताच्या तपासात असे उघडकीस आले आहे. की हा रोग उंचउंच इमारतीत राहणाऱ्या सधन संपन्न लोकांपासून झोपडपट्यापर्यंत येतोय. गोरगरीबांना महागड्या दवाखान्यात उपचार करणं परवडत नाही. तेव्हा त्यांनाच स्वतःची काळजी करावी लागेल.


(३४) परंतु आता त्याने त्यांच्यावर कोप का पाठवू नये जेव्हा ते मस्जिदेहराम (काबा मस्जिद) चा मार्ग रोखत आहेत व खरे पाहता ते त्या मस्जिदचे अधिकृत व्यवस्थापक नाहीत. तिचे अधिकृत व्यवस्थापक तर ईशपरायण लोकच असू शकतात परंतु बहुसंख्य लोकांना ही गोष्ट माहीत नाही. 

(३५) अल्लाहच्या घराजवळ या लोकांची नमाज काय असते? केवळ ते शिट्या वाजवतात व टाळ्या पिटतात.२८ तर घ्या आता या प्रकोपाचा आस्वाद, आपल्या त्या सत्याच्या इन्कारापायी जो तुम्ही करीत राहिला आहात,२९ 

(३६) ज्या लोकांनी सत्य स्वीकारण्यास नकार दिला ते आपली मालमत्ता अल्लाहच्या मार्गापासून लोकांना रोखण्यासाठी खर्च करीत आहेत व आता आणखीही खर्च करीत राहतील. परंतु सरतेशेवटी हेच प्रयत्न त्यांच्यासाठी पश्चात्तापाचे कारण बनतील. मग पराभूत होतील, मग हे ईमानविरोधक (काफिर) नरकाकडे घेरून आणले जातील. 

(३७) ते यासाठी की अल्लाहने दुष्टांना सज्जनांपासून वेगळे करून समस्त दुष्टांना एकत्रितपणे नरकाग्नित झोकून द्यावे. हेच लोक खरे नुकसान प्राप्त करणारे आहेत.३० 

(३८) हे पैगंबर (स.), या इन्कार करणाऱ्यांना सांगा की जर आतादेखील परावृत्त झाले तर पूर्वी जे काही घडलेले आहे ते माफ केले जाईल, परंतु जर हे त्याच पूर्वीच्या चालीची पुनरावृत्ती करतील तर पूर्वीच्या लोकांशी जे काही घडले आहे ते सर्वांना माहीत आहे. 

(३९,४०) हे श्रद्धावंतांनो! या अधर्मियांशी युद्ध करा इथपर्यंत की उपद्रव शिल्लक राहू नये आणि दीन (आज्ञापालन) सर्वस्वी अल्लाहसाठी व्हावा.३१ मग जर ते उपद्रवापासून परावृत्त झाले तर त्यांची कृत्ये पाहणारा अल्लाह आहे, पण जर का त्यांनी मानले नाही तर समजून असा की अल्लाह तुमचा वाली आहे, आणि तो सर्वोत्तम सहाय्यक व मदतगार आहे. 

(४१) आणि तुम्हाला माहीत असावे की जो काही (युद्धात प्राप्त संपत्ती) तुम्ही हस्तगत केला आहे, त्याचा पाचवा वाटा अल्लाह व त्याचे पैगंबर (स.) व नातेवाईक व अनाथ, व गोर-गरीब व वाटसरू यांच्याकरिता आहे.३२ जर तुम्ही श्रद्धा ठेवली आहे अल्लाहवर आणि त्या गोष्टीवर जी निर्णयाच्या दिवशी अर्थात दोन्ही सैन्याची गाठ पडण्याच्या दिवशी, आम्ही आमच्या दासावर अवतरली होती,३३ (तर हा वाटा स्वखुशीने अदा करा) अल्लाह सर्व गोष्टींना समर्थ आहे. 

(४२) आठवा तो प्रसंग जेव्हा तुम्ही खिंडीच्या अलीकडे होता आणि ते पलीकडे पडाव टाकून होते आणि काफिला तुमच्या खालच्या बाजूला होता. जर एखादेवेळी पूर्वीच तुमच्या आणि त्यांच्यामध्ये मुकाबल्याचा करार होता तर निश्चितच तुम्ही या प्रसंगाला बगल दिली असती, परंतु जे काही घडले त्याचे कारण असे की ज्या गोष्टीचा निर्णय अल्लाहने घेतलेला होता त्याला अल्लाहने प्रत्यक्षात आणावे म्हणजे जे नष्ट होणार आहे त्याने उघडपणे प्रमाणासह नष्ट व्हावे व ज्याला जिवंत राहावयाचे आहे त्याने उघडपणे प्रमाणासह जिवंत राहावे;३४ खचितच अल्लाह ऐकणारा व जाणणारा आहे.३५ 

(४३) आठवा तो प्रसंग जेव्हा हे पैगंबर (स.)! अल्लाह तुमच्या स्वप्नांत त्यांना थोडे करून दाखवीत होता.३६ जर एखाद्या वेळेस तुम्हाला त्याने त्यांची संख्या जास्त दाखविली असती तर निश्चितच तुम्ही लोकांनी धीर सोडला असता आणि युद्धाच्या बाबतीत तुम्ही तंटा सुरू केला असता; परंतु अल्लाहनेच त्यापासून वाचविले. नि:संशय तो मनातील स्थितीदेखील जाणणारा आहे.२८) हा संकेत त्या भ्रमास दूर करतो ज्याद्वारे अरब लोक धोका खात होते. ते समजत होते की कुरैश अल्लाहच्या गृहाचे पुजारी आहेत आणि प्रबंधक आहेत. ते तेथे पूजापाठ करतात म्हणून अल्लाहची त्यांच्यावर मेहरबानी आहे. या भ्रमाचे खंडन करण्यासाठी सांगितले गेले आहे की परंपरागत पुजारी किंवा प्रबंधक बनून कोणी व्यक्ती अथवा समाज एखाद्या उपासनागृहाचा वैध पुजारी बनू शकत नाही. वैध आणि योग्य पुजारी आणि प्रबंधक तर तेव्हाच बनू शकतो जेव्हा ईशपरायणतेने मनुष्य आपले जीवनव्यवहार पार पाडीत असेल. हे लोक तर ईशपरायण लोकांना काबागृहात येण्याची मनाई करतात. हे काबागृह तर फक्त अल्लाहचीच उपासना करण्यासाठी आहे. हे तर या काबागृहाचे पुजारी, प्रबंधक व सेवक बनण्याऐवजी मालक होऊन बसलेले आहेत. म्हणूनच ते ज्यांच्याशी नाराज आहेत अशांना काबागृहात ते येण्याची मनाई करतात. त्यांचे हे कृत्य स्पष्ट पुरावा आहे की ते अल्लाहचे भय बाळगत   नाहीत आणि ईशपरायण नाहीत. त्यांची उपासना जे ते काबागृहात करतात तर त्यात एकाग्रता व विनम्रता नाही. त्यांची उपासना अल्लाहसाठी नाही की त्यांचे स्मरणसुद्धा अल्लाहसाठी नाही. त्यांची ती उपासना निरर्थक आहे, एक खेळतमाशा आणि हंगामा आहे ज्याचे नाव त्यांनी उपासना ठेवले आहे. अल्लाहच्या गृहाची अशी तथाकथित सेवा आणि खोटी उपासना करून ते अल्लाहच्या कृपेचे अधिकारी कसे बनणार? आणि हे कृत्य त्यांना अल्लाहच्या कोपापासून कसे वाचविणार?

२९) ते समजत होते की अल्लाहचा कोप आकाशातून दगडांचा वर्षावाने होतो किंवा निसर्गाच्या प्रकोपाने येतो. परंतु येथे त्यांना दाखवून दिले आहे की बदरच्या युद्धात त्यांचा निर्णायक पराजय ज्यामुळे इस्लामसाठी जीवनाचा आणि प्राचीन अज्ञानी व्यवस्थेसाठी मृत्यूचा निर्णय झाला होता, हा तर त्यांच्यासाठी अल्लाहचाच कोप होता.

३०) यापेक्षा आणखीन दिवाळखोरी काय असू शकते की मनुष्य ज्या मार्गात आपला पूर्ण वेळ, सर्व कष्ट, सर्व योग्यता आणि संपूर्ण शक्ती, जीवनपुंजी खर्च करतो आणि तेव्हा त्याला माहीत होते की तो तर विनाशाकडे  पोहचला  आहे.  त्याने  या  मार्गात  जे  काही  खर्च केले ते सर्व वाया गेले आणि त्यावर व्याज आणि नफा मिळण्याऐवजी उलटा त्याला दंड भोगावा लागत आहे.

३१) येथे मुस्लिमांच्या त्याच युद्धाच्या उद्देशाला स्मरण करून दिले आहे. यापूर्वी सूरह २, आयत १९३ मध्ये वर्णन आले आहे. या उद्देशाचे नकारात्मक अंश म्हणजे बिघाड व उपद्रव बाकी राहू नये आणि सकारात्मक अंश म्हणजे आज्ञापालन (दीन) फक्त अल्लाहसाठीच व्हावे. फक्त हाच एक नैतिक उद्देश आहे ज्याच्यासाठी लढणे ईमानधारकांसाठी अनिवार्य (फर्ज) आहे. याव्यतिरिक्त दुसऱ्या हेतुसाठी युद्ध करणे वैध नाही आणि अशा अवैध युद्धात भाग घेणे ईमानधारकांसाठी उचित नाही. (तपशीलासाठी पहा सूरह २, टीप २०४-२०५) 

३२) येथे युद्धात प्राप्त् झालेल्या संपत्तीच्या वाट्यासंबंधीचे आदेश आले आहेत. याविषयी व्याख्यानाच्या प्रारंभी सांगितले गेले होते की हा अल्लाहचा ईनाम (बक्षीस) आहे. याचा निर्णय घेण्याचा अधिकार अल्लाह आणि पैगंबर यांचाच आहे. आता हा निर्णय झाला आहे. तो म्हणजे युद्ध संपल्यानंतर सर्व सैनिकांनी युद्धसंपत्ती सेनापतीच्या पुढे आणून द्यावी आणि काहीही लपवून ठेवू नये. नंतर या संपत्तीतून पाचवा भाग त्या उद्देशासाठी काढून ठेवावा ज्यांचा आयतमध्ये उल्लेख आला आहे. राहिलेले चार भाग त्या सर्व लोकांत वाटप व्हावे ज्यांनी युद्धात भाग घेतला असेल. म्हणून या आयतीनुसार पैगंबर मुहम्मद (स.) नेहमी युद्धानंतर घोषणा करीत की ``ही युद्धसंपत्ती तुमच्यासाठी आहे. माझ्यासाठी यात काहीही नाही, शिवाय पाचव्या (खम्स) भागाशिवाय आणि हा पाचवा हिस्सासुद्धा तुमच्या सामुदायिक हितासाठीच आहे. म्हणून एकएक सुई आणि एक एक धागा आणून समोर ठेवा. एखादी लहान  आणि  मोठी  वस्तू  लपवून  ठेवू  नका. असे  करणे लज्जास्पद आहे आणि याचे परिणाम नरक आहे. या वाट्यात अल्लाह आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांचा एकच भाग आहे आणि याचा अर्थ म्हणजे पाचव्या भागाचा एक भाग अल्लाहचा बोलबाला करणे आणि `सत्य धर्माच्या कामात' लावला जावा. (खर्च केला जावा)

नातेसंबंधी म्हणजे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवनात त्यांचे नातेसंबंधी होते. जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) आपला पूर्ण वेळ इस्लाम धर्मासाठी लावत असे आणि उपजीविका स्वत:साठी कमविण्यासाठी त्यांच्याजवळ वेळ नसायचा, म्हणून यासाठी निश्चितच प्रबंध होणे आवश्यक होते ज्यामुळे त्यांच्या कुटुंबांचा (नातेसंबंधी) आणि दुसरे आप्तेष्ट ज्यांचे संगोपण त्यांच्यावर होते, खर्च भागला जावा आणि त्यांच्या जीवनावश्यक गरजापूर्ण होणे आवश्यक होते. `खम्स' मध्ये आपल्या नातेसंबंधीचासुद्धा हिस्सा निश्चित केला होता. परंतु याविषयी मतभेद आहे की पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या देहावसनानंतर हा हिस्सा कोणाला मिळावा. काहींच्या मते पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यानंतर हा हिस्सा निरस्त झाला होता. काहींचे मत आहे की हा हिस्सा पैगंबर मुहम्मद (स.) नंतर जे शासनाध्यक्ष बनले त्यांच्या नातेसंबंधींना मिळणे आवश्यक आहे. तिसऱ्या गटाचे मत आहे की हा हिस्सा पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या कुटुंबातील निर्धन लोकांत वाटला जावा. माझ्या शोध कार्यानुरूप चार आदर्श खलीफांच्या काळात याच तिसऱ्या मतानुसार कार्यवाही होत होती.

३३) म्हणजे ते समर्थन व मदत ज्यामुळे तुम्ही विजयी झाला आहात आणि ज्यामुळे तुम्हाला ही युद्धसंपत्ती मिळाली आहे.

३४) म्हणजे सिद्ध व्हावे की जो जिवंत होता त्याला जिवंतच राहिले पाहिजे होते आणि जो मृत झाला त्याला मृत होणे होते. येथे जिवंत राहणारा आणि मृत होणाऱ्याशी तात्पर्य मनुष्य नाही तर इस्लाम आणि अज्ञानता आहे.

३५) म्हणजे अल्लाह आंधळा, बहिरा आणि बेखबर नाही तर तो जाणणारा आणि पाहणारा आहे. त्याच्या साम्राज्यात अंदाधुंद काम होत नाही. 

३६) ही त्याकाळची गोष्ट आहे जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) मुस्लिमांना घेऊन मदीनाहून निघाले होते किंवा रस्त्यात होते आणि हे पाहिले गेले नव्हते की शत्रूचे सैन्य किती प्रमाणात आहे. त्या वेळी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी स्वप्नात त्या सैन्याला पाहिले आणि जे दृष्य त्यांच्यासमोर ठेवले गेले त्यावरून पैगंबर मुहम्मद (स.) यांनी अनुमान लावला की शत्रूची संख्या काही अधिक नाही. तेच स्वप्न पैगंबर  मुहम्मद (स.) यांनी मुस्लिमांना सांगितले. त्यावरून मुस्लिमांना धीर आला आणि ते पुढे सरसावले.

३७) म्हणजे आपल्या भावना आणि इच्छांना वशीभूत करा. उताविळपणा, भय, भीती, लोभ, घबराट आणि अनुचित उत्तेजनापासून स्वत:ला दूर ठेवा. शांत मनाने आणि संतुलित निर्णय शक्तीद्वारा काम करीत राहा. संकट आणि अडथळे समोर असले तर तुमचे पाऊल डगमगले जाऊ नये. उत्तेजनापूर्ण समयी क्रोध व उन्मादाने तुम्ही एखादे अनुचित कार्य करू नये. संकटे समोर असतील आणि स्थिती बिघडली असे वाटत असेल तर घाबरून तुम्ही विचलीत होऊ नये. उद्देशप्राप्तीच्या उन्मादात किंवा कच्चे पक्के उपायांनाच वरवर प्रभावकारी समजून तुमचे ध्येय गडबडीचे शिकार बनू नये. जग, जगाचे फायदे आणि मनाच्या इच्छांचे प्रलोभने तुम्हाला खुणवित असतील तर तुमचे मन त्यांच्याकडे आकर्षित होण्याइतपत कमजोर बनू नये. हा सर्व तपशील एक लहानसा शब्द `सब्र' (धैर्य) मध्ये समाविष्ट आहे. अल्लाह सांगतो की जे लोक या सर्व दृष्टीने सब्र करणारे (धैर्यवान) आहेत, माझे समर्थन त्यांनाच आहे.महाराष्टात वाझे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात पक्ष-विपक्षांकडून एकमेकांवर जणूकाय बॉम्ब टाकत आहे की काय असे वाटत आहे. खंडनी वसुलणे, ब्लॅकमेल करणे यातूनच भ्रष्टाचाराचा उगम झालेला आहे आणि याचा पुरेपूर फायदा महाराष्ट्रासह देशाचा ९० टक्के राजकीय पुढारी व सरकारी अधिकारी खुलेआम घेत आहेत. परमबी सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दर महिन्याला १०० कोटी रुपये खंडनी देण्याचा आरोप लावला. हा आरोप सत्य की असत्य हे सांगता येत नाही. परंतु परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमध्ये अर्धसत्य अवश्य असावे असे वाटते.

परमबीर सिंग यांचा अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीच्या आरोप, मनसुख हिरेन यांचा मृत्यू व सचिव वाझे प्रकरणाने मोठे राजकारण तापल्याचे दिसून येते. भ्रष्टाचारी किंवा हत्यारा याला एकच सजा असावी ती म्हणजे फाशी! गुन्हेगार कोण आहे ही बाब कायद्याच्या चौकटीत आहे. परंतु सचिन वाझे प्रकरण व माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचा १०० कोटी रुपयांचा आरोप पाहाता अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. परंतु प्रत्येक पक्षाचे राजकीय नेतेमंडळी स्वत:ला दुधासारखे स्वच्छ समजतात. परंतु असे बिलकुलच नाही. कारण माजी आयुक्त परमबीर सिंग एका गृहमंत्र्यांवर आरोप लावतो तेव्हा यात काहीतरी अर्धसत्य अवश्य असावे त्यामुळे त्यांनी चौकशीला सामोरे जाण्याकरिता गृहमंत्री पदाचा राजीनामा देने गरजेचे आहे.

भारतात भ्रष्टाचाराचे उगमस्थान हे राजकीय पुढाऱ्यांपासून सुरू होऊन वरीष्ठ सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत गेले आहे. यांनीच भ्रष्टाचाराला विकसित केले व त्यातूनच तयार झाले विजय माल्या, मेहुल चोकसी, नीरव मोदी, ललीत मोदी ही सर्व मंडळी देशाचे आर्थिक गुन्हेगार असून यांनी देशाला लुटुन विदेशात पसार झाले. या अट्टल आर्थिक गुन्हेगारांना देशांच्या बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा करण्याचे काम आपल्याच राजकीय पुढाऱ्यांनी व सरकारी अधिकाऱ्यांनी केले तेव्हाच ते विदेशात पसार झाले. यांच्या करोडो ते अरबो रूपयांच्या घोटाळ्यामुळे देशात बेरोजगारी, महागाई व शेतकऱ्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात.

राजकीय नेतेमंडळी व वरिष्ठ सरकारी अधिकारी भ्रष्टाचार करतात हे सचिन वाझे, परमबीर सिंग, अनिल देशमुख यांच्यात सुरू असलेल्या प्रकरणावरून स्पष्ट होते. आज ९० टक्के राजकीय पुढाऱ्यांजवळ व सरकारी अधिकाऱ्यांजवळ करोडो रुपयांची नगदी संपत्ती, गाडी, बंगला, सोने-चांदी, चल-अचल संपत्ती आहे. ही संपत्ती आली कोठून याचे उत्तर देशाच्या १३० कोटी जनतेला महाराष्ट्रात सुरू असलेल्या प्रकरणावरून मिळेल. देशात किंवा राज्यात जो व्यक्ती लोकप्रतिनिधी म्हणून पाच वर्षांसाठी निवडून जातो तो व्यक्ती अचानक पाचवर्षाच्या काळात कमीतकमी ५०० करोड रुपयांचा धनी बनतो. एवढा पैसा आला कोठून हा प्रश्र्न लोकसभेत, राज्यसभेत किंवा विधानसभेत कोणीही विचारत नाही. अशीच परीस्थिती राहिली तर राज्यासह देशात महागाईचा आणि बेरोजगारीचा मोठा डोंगर उभा झाल्याशिवाय राहणार नाही.

आज देशात पाच राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकीत महागाई व बेरोजगारी हे महत्वाचे मुद्दे बाजूला सारून पक्ष-विपक्ष एकमेकांवर ताशेरे ओढून सत्ता हस्तगत करण्याच्या प्रयत्नात आहे. प्रत्येक पक्षाने मोठ-मोठे मॅनिफॅस्टो बनविले हे मतदारांना लालसा दाखविण्याच्या उद्देशाने बनविल्याचे स्पष्ट दिसून येते. यामुळे आज राजकीय पुढाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे १०० रूपये लिटर पेट्रोल व खाण्याचे तेल १५० रूपये किलो दिसून येते. यावरून आपण सर्व जाणू शकता की बाकीच्या आवश्यक वस्तुनी किती उच्चांक गाठला असेल. अशा परिस्थितीत सर्वसामान्य कसा काय जगणार!

देशातील जो पैसा चलनात यायचा तो संपूर्ण करोडो ते अरबो रूपया देशाच्या ९० टक्के राजकीय पुढाऱ्यांनी व सरकारी अधिकाऱ्यांनी डांबून ठेवला असल्याचे महाराष्ट्रातील प्रकरणावरून स्पष्ट होते. याकरिता आता कसून चौकशी होणे गरजेचे आहे. याकरिता सक्तवसुली संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), एनआयए, एटीएस व राज्यातील संपूर्ण यंत्रणांनी भ्रष्टाचाऱ्यांची व हत्याऱ्यांची कसून चौकशी करून १३० कोटी जनतेसमोर उघड केले पाहिजे, तेव्हाच देश प्रगतीपथावर येईल.

देशापुढे प्रश्न आहे की राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखणार कोण? त्यामुळे कोणतीही किंवा कोणावरीलही चौकशी असो त्यांनी सर्वांनी चौकशी यंत्रनेला सहकार्य करण्याची गरज आहे. देशात जेव्हा मोठा अधिकाऱ्यावर किंवा मोठ्या राजकीय पुढाऱ्यांवर चौकशी होते तेव्हा कोणीही राजकारण करू नये. परंतु महाराष्ट्रात वेगळेच वातावरण दिसून येते. सत्ताधारी पक्ष आपली सत्ता वाचविण्यासाठी संपूर्ण ताकद लावत आहे तर विपक्ष सरकारला पाडण्यासाठी एडीचोटीचे प्रयत्न करीत आहे. त्यामुळे राज्यात कोरोना महामारी, बेरोजगारी, महागाई याकडे कोणताही राजकीय पक्ष जातीने लक्ष देण्यास तयार नाही. ही बाब सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवरून स्पष्ट होते आणि यात भरडतो आहे सर्वसामान्य नागरिक. आतंकवादी, खुनी, बलात्कारी यांच्यात तुलना केली तर देशाचा सर्वात मोठा गुन्हेगार म्हणजे "भ्रष्टाचारी" होय. कारण भ्रष्टाचारी हा एका व्यक्तीचा गुन्हेगार नसुन तब्बल १३० कोटी जनतेचा सर्वात मोठा गुन्हेगार असतो. त्यामुळे तो कोणताही भ्रष्टाचारी असो त्याला आजन्म कारावास किंवा फाशी व्हायलाच पाहिजे!

- रमेश कृष्णराव लांजेवार

नागपूर

मो.९३२५१०५७७९कर्नाटकापासून मध्यप्रदेशपर्यंत काँग्रेसी आमदार फोडून सत्ता मिळविण्यात भाजपेयींना यश आलं. पण महाराष्ट्रात 'जिंकूनही हरलेल्या' आणि 'मी पुन्हा येईन..!' अशी वलग्ना करणाऱ्या फडणवीसांनी ते जमलं नाही. मनाला खूप लावून घेतलं. पहाटेचा शपथविधी फसल्यानंतर तर त्यांच्या वर्मीच घाव लागला. मग सूडानं पेटलेल्या फडणवीसांनी हरेक प्रयत्न केले; पण हाती काहीच लागलं नाही. एकही आमदार गळाला लागला नाही. सत्तेच्या आमिषानं भाजपेयीं बनलेले आमदार सत्ता नसल्यानं धायकुतीला आले. त्यांना सांभाळण्यासाठी काही करणं गरजेचं होतं. ते अगदी छोट्यामोठ्या कारणावरून 'राष्ट्रपती राजवटी'ची मागणी करू लागले. ऊठसूट राजभवन गाठू लागले. राज्यपालांच्या गळी पडू लागले. केवळ आपणच नाही तर त्यांनी आपली सगळी ब्रिगेड याकामी लावली. तेही सदानकदा राजभवनावर जाऊ लागले. एवढं करूनही अपेक्षित साध्य होत नव्हतं. आमदार हाती लागत नाहीत. सत्ताबदल करता येत नाही या वैफल्यातून मग त्यांनी राज्यात आरोपांची राळ उठवली. एक नियोजनबद्ध 'साजिश' विधिमंडळाच्या अर्थसंकल्प अधिवेशन काळात रचली गेली. जरा आठवा सुधीर मुनगंटीवार यांनी 'तीन महिने थांबा, आम्ही पुन्हा येतो की, नाही बघाच...!' असा इशारा विधिमंडळात दिला होता. संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्यानंतर भाजपेयींनी उचल खाल्ली तर सत्ताधारी बॅकफूटवर गेले. विधिमंडळात आणि रस्त्यावर सरकारच्या बदनामीच्या संधी विरोधकांनी सोडली नाही. हे सुरू असतानाच फडणवीस आपल्याशी एकनिष्ठ असणाऱ्या 'अभिजनी-संघी' अधिकाऱ्यांना हाताशी धरलं. पोलीस महासंचालकपदी असलेले सुधीरकुमार जयस्वाल, रश्मी शुक्ला आणि शर्मा यांना केंद्रात डेप्युटेशनवर पाठवलं गेलं. त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई होणार नाही याची खबरदारी घेऊन सरकारातल्या त्यांच्याकडं असलेल्या 'टॉप सिक्रेटस' मिळवल्या. दरम्यान वाझे प्रकरण उदभवलं. संघी अधिकाऱ्यांनी मग मिळालेली सर्व माहिती सरकारच्या आधी फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचविली. ती फडकवीत फडणवीसांनी विधिमंडळ दणाणून सोडलं. सत्ताधाऱ्यांची पळता भुई थोडी झाली. वाझेंना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सरकारच्याच अंगलट आला. वाझेंच्या निलंबनाबरोबरच आयुक्त परमबीरसिंग यांची बदली केली गेली. मग फडणवीस यांनी थेट दिल्ली गाठली. तिथं सल्लामसलत केली अन परतले. परमबीरसिंग आपल्यावर अन्याय झालाय असं म्हणत थेट सरकारातल्या गृहमंत्र्यावर १०० कोटी रुपयांची डान्स बार, बिअरबारमधून वसुली करण्याबाबतचा आरोप करणारं पत्रच मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांना धाडलं. हे पत्र प्रसिद्धीमाध्यमांकडं पाठवायला ते विसरले नाहीत. अपेक्षित असा लेटर बॉम्ब पडला होता. जो हलकल्लोळ माजायचा होता तो माजला. मग फडणवीसांची एन्ट्री झाली. त्यांनी एकापाठोपाठ एका पत्रकार परिषदेत संघी अधिकाऱ्यांनी दिलेला दारुगोळा सरकारवर टाकला. सरकार पुरतं घायाळ झालं. सारेच सैरभैर झाले. काय करावं काही सुचत नव्हतं. दुसरीकडं 'फडणवीस ब्रिगेड' सरकारवर दूरचित्रवाणीवर, सोशल मीडियावर तुटून पडत होते. पुन्हा फडणवीसांनी दिल्ली गाठली. तिथं हिंदीत पत्रकार परिषद घेतली, नेत्यांबरोबरच गृहसचिवांची भेट घेतली. कागदपत्रे, सीडी, पेनड्राईव्ह सोपविली. या दरम्यान बंगालच्या निवडणुका होताहेत, त्या संपल्या की काय आहे ते मी पाहीन असं अमित शहा यांनी आजतक वाहिनीला सांगितलंय. इकडं मंत्रिमंडळाची बैठक झाली. टॉप सिक्रेट माहिती बाहेर कशी गेली याची चौकशी करायचा आदेश मुख्य सचिवांना दिला गेला. रश्मी शुक्ला यांनी ही माहिती पुरवल्याचं उघड झालं. त्या तर आधीच डेप्युटेशनवर केंद्रात गेल्यात. त्यांनी जो अहवाल चुकीचा दिलाय, तो आपण मागे घेत असल्याची विनंती केली. पण तसा प्रघात नसल्यानं तो मागे घेतला गेला नाही. दरम्यान आपल्या नवऱ्याचं कर्करोगानं नुकतंच निधन झालंय, शिवाय मुलं अजून शिकताहेत तेव्हा कारवाई करू नये अशी रडत विनंती सरकारकडं केली. मुख्यमंत्र्यांनी सहानुभतीनं त्यांच्यावर कारवाई न करता बढती देत केवळ बदली केली. पण मुख्यमंत्र्यांच्या या सौजन्याचा शुक्ला यांनी गैरफायदा घेतला आणि आपली 'स्वामीनिष्ठा' यांनी दाखवून फडणवीस यांच्याकडं अहवाल आणि रेकॉर्डिंग असलेलं पेनड्राईव्ह सोपवलं. सरकार शुक्लांच्या बरोबरच आपल्या गृहमंत्र्याची चौकशी करणार आहे. परमबीरसिंग तर सर्वोच्च न्यायालयातून परत पाठवल्यानंतर उच्च न्यायालयात गेले आहेत. पाहू या आगे आगे होता है क्या...!

परमबीरसिंग यांनी गृहमंत्री महिन्याला १०० कोटी जमा करतात हे जाहीरपणे सांगून खळबळ उडवून दिली! खरंतर पोलीस, क्राईम बिट कव्हर करणाऱ्या प्रत्येक पत्रकाराला ही बाब नवीन नाही, उलट आकडा फारच कमी सांगितला गेलाय अशी पहिली प्रतिक्रिया अनेक क्राईम रिपोर्टरांची होती! राजकीय व्यवस्थेत हे रुटीन बनलंय, ज्याच्याकडं गृहखाते त्यानंच पक्षाचे सारे खर्च करावेत, हा अलिखित नियम बनलाय. कोणताही पक्ष त्याला अपवाद नाही. अगदी भाजपसुद्धा त्याबाबत नाकानं कांदे सोलू शकत नाहीत. हा एवढा नियमित कामकाजाचा भाग बनलाय. निवडणुका समजा अधिकृत वर्षभरावर आल्या असतील तर त्या त्या पक्षाचा गृहमंत्री पक्षाला सहज किमान हजार कोटी तरी जमवून देतो! महिन्याला १०० कोटी हा आकडा वाचून काही बिचाऱ्या लोकांना झटका बसला असेल कारण ते कधी इकडे लक्ष देतच नाहीत त्यामुळं हा आकडा त्यांचे डोळे पांढरे करू शकतो. पण ज्यांना मुंबई पोलीस आणि त्यांच्या कमाईचा चार्ट माहीत आहे ते हा आकडा ऐकून हसत असावेत! मुंबईत पोलीस आयुक्त व्हावं हे राज्यात काम करणाऱ्या प्रत्येक आयपीएस अधिकाऱ्यांचं अंतिम ध्येय असतं यावरून लक्षात घ्या, हे ध्येय प्राप्त केल्यावर त्याची महिन्याला प्राप्ती किती असेल? मुंबई पोलीस आयुक्तांची दर दिवसाला किमान ५ कोटी कमाई होते, मग गृहमंत्री किती कमवत असेल? मुंबई सोन्याचं अंडे देणारी कोंबडी उगाच समजली जात नाही. इथं क्राईम ब्रँचमध्ये वर्णी लागायला एखादा अधिकारी ५ कोटी मोजायला का तयार होतो, याचा विचार केला की सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. अर्थात मुंबईला केवळ मंत्रालयात दर आठवड्याला चक्कर मारणाऱ्या कुण्याही नेता, कार्यकर्त्याला हे आर्थिक गणित लक्षात येणार नाही. या प्रक्रियेत असणाऱ्या लोकांनाच फक्त हे विराट दर्शन झालेलं असतं. मुंबई पोलिसात कायम मराठी विरुद्ध अमराठी असं प्रबळ गट आहेत. राजकीय नेते आपल्या फायद्यासाठी त्यांना पाठबळ देऊन त्यांचं पालनपोषण करीत असतात. पोलीस अधिकाऱ्यांचे असे विविध गट सांभाळणे थोरल्या पवारांसाठी डाव्या हाताचा मळ आहे. सत्तेवर येणारा प्रत्येक पक्ष कमी अधिक प्रमाणात यापेक्षा वेगळं काहीच करीत नाही. उलट नेत्यांमधील सवतेसुभे लक्षात घेऊन पोलीस अधिकारी खरे आर्थिक उत्थान करून घेताना दिसतात. जो पकडला गेला तो चोर असा सगळा मामला असतो! क्रिकेट सट्टा, वरळी मटका, बार, हूक्कापार्लर, जुगार हे कोरोनाचेही बाप आहेत. ते कधीच संपत नाहीत. ज्यानं त्याना संपवितो म्हटलं तोच संपतो. कितीही काहीही केलं तरी त्यावर अंकुश ठेवताच येत नाही. या परमवीरसिंह यांच्या पत्रावर फार खळबळजनक अन् धक्कादायक अशा प्रतिक्रिया देणाऱ्यानी आपल्या छातीवर हात ठेवून सांगावं कि, त्यांच्या शहरात क्रिकेट सट्टा, वरळी मटका, जुगार चालू आहे कि नाहीत? त्यासाठी पोलिस खंडणी घेतात की नाही? त्या विरोधात कुणी बोलतंय का? तक्रार करतंय का? नाही. कारण ते परंपरागत आहेत आणि त्यासाठी खंडणी देणं-घेणं हीसुद्धा एक रुढी आहे. अशा ह्या वाहत्या गंगेतून बाजूला काढल्याचं परमवीरसिंह यांना अतिव दुःख झालंय. त्यांनी हे पत्र तो फार 'सद् रक्षणाय खल निग्रहणाय !' आहे म्हणून लिहिलेलं नाही. तसं असतं तर हे फडणवीसांच्या काळातच घडलं असतं. कारण ही खंडणी परंपरागत असल्यानं फडणवीसांनाही ही रसद मिळतच होती. ती सरळ आपल्याच खिशात यावी म्हणूनच त्यांनी गेली पाच वर्षे गृहमंत्रीपद स्वतःकडंच ठेवलं होतं. आणि परमवीरसिंह यांनी पत्राद्वारे खंडणीचं रहस्योद्घाटन केलं. त्याची बदली केली नसती तर हे सारे कायदेशीर राहिलं असतं. पण बदली झाल्यानं हेच बेकायदेशीर ठरलं. सोबतच फडणवीसही असेच खंडणीखोर होते, हे सत्यही उघडकिस आलंय. बदली झाल्यावर परमबीरसिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून देशभर एक हवा निर्माण केली. परमबीरसिंग हे या प्रकरणातील नाहक बळी आहेत की निर्दोष की अपयशी की मुक संमती असलेले अधिकारी होते की लाभार्थी की गुन्हेगार? की कळसूत्री बाहुली, की आणखी काही? हे पूर्ण तपासांती समजेल

आपल्या एका ज्युनिअर अधिकाऱ्याला आपल्या हद्दीतून पैसे गोळा करायला सांगितलं हे समजल्यावर आयुक्त काय करू शकतो? तर तो स्पष्ट तोंडी नकार देवू शकतो, लेखी पत्र देऊन नकारही कळवू शकतो. मंत्री आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांची लेखी नोंद कोणत्याही एका अगर सर्वच पोलिस स्टेशनमधल्या डायरीमध्ये करू शकतो. कारण पोलिस स्टेशनमधील स्टेशन डायरी नोंद हा एकमेव पुरावा अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत ग्राह्य धरला जातो. ताब्यातील अधिकाऱ्यांना परस्पर बोलविण्याचा आणि तपासाबाबत वाजवी कायदेशीर सूचना देण्याचा अधिकार गृहमंत्र्यांना आहे. असतो. शेवटी सरकार म्हणजे कॅबिनेटमंत्री. म्हणूनच कोणत्याही अपयशाबद्धल विरोधीपक्ष मंत्र्यांचा राजीनामा मागते. मंत्र्यांनी दिलेल्या सूचना तपासी अंमलदार यांच्यावर बंधनकारक नसल्या तरी तपासी अंमलदार त्या सूचनांची नोंद तपासाच्या केस डायरीमध्ये करतात. ते करणे बंधनकारक असते. केस डायरीतील नोंद याला पुराव्याच्या दृष्टीनं मोठं महत्त्व आहे. गृहमंत्र्यानी केलेल्या हस्तक्षेपाच्या नोंदी परमबिरसिंग यांनी केलेल्या आहेत का? मोहन डेलकरांचा गुन्हा मुंबईत दाखल न करण्याचा परमबीर यांचा युक्तिवाद हा घटना बाह्य आणि पोरकट वाटतो. आत्महत्येचा गुन्हा मुंबईत घडला म्हणजे गुन्हा मुंबईतच दाखल झाला पाहिजे हे गृहमंत्र्याचं म्हणणं योग्य आहे.

एसीपी पाटील यांचे व्हॉट्सअॅप वरील संभाषण नंतर तयार केलेलं दिसतं. अशा गोष्टींबद्धल असा संवाद संशयास्पद वाटतो. या पत्राला पुरावा मूल्य अजिबात नाही. पत्र नैसर्गिक प्रतिक्रिया नसून कारवाईनंतर आलेल्या विचारातून लिहिल्यासारखे जाणवते. पत्रात नमूद केलेल्या घटना घडत असता अर्जदाराची अगोदरची वर्तणूक आणि दोषी ठरवून बदली केल्यानंतरच्या काळातील वर्तणूक यात फार मोठी तफावत जाणवते. यात कुठलाही कायदेशीर पुरावा नसून सामान्य माणसासाठी सनसनाटी आणि विरोधीपक्षासाठी खाद्य पुरवल्याचं दिसतंय. आजचे आयपीएस अधिकारी यांचं मूळ एकेकाळी आयपी या ब्रिटिशसेवेत आहे. मुठभर आयपी अधिकारी काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत कायदा सुव्यवस्था राखायचं काम करीत. आजचे हे अधिकारी अर्धी चड्डीच्या इशाऱ्यावर चाल सिंहाची दाखवतात मात्र वर्तणूक लबाड कोल्ह्याची करतात. पोलिस दलाची दुर्दशा व्हायला हेच आयएएस आणि आयपीएस नेतृत्व जबाबदार आहे हे मी अनेक वर्ष मांडत आलोय! असं माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांचं म्हणणं आहे.

प्रत्येक वेळेला सुशांतसिंग राजपूत, कंगना रनौत, अर्णव गोस्वामी आणि आता वाझेसारखं प्रकरण उपस्थित करायचं. प्रसारमाध्यमांच्या मागण्यांची पूर्तता करायची आणि महाराष्ट्रातील गारपीट, अवकाळी पाऊस, शेतीमालाचे भाव, कांद्याचा प्रश्न, वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे दर, बेरोजगारी, कोरोना या प्रश्नांवर जो आक्रस्ताळेपणा आवश्यक आहे, तो फडणवीस करत नाही. फक्त मुख्यमंत्रिपदावर डोळा ठेवून आपल्या पाच वर्षाच्या कालावधीतील भानगडी उघड्या होता कामा नये, हा हेतू मनात ठेवून फक्त खोटं बोलताहेत. असो. नाटककार राम गणेश गडकरी यांनी आपल्या 'राजसंन्यास' नाटकात जिवाजी कलमदाने या पात्राच्या तोंडी एक वाक्य लिहिलंय, " वारुळातली दोन जिभांची पिवळी नागीण चावली तर एका पिढीचा घात होतो; पण कारकुनी कानावरची ही दोन जिभांची काळी नागीण डसली तर सात पिढ्यांचा सत्यानाश करते. शाईचा सोमरस आणि लेखणीची समिधा करून एखाद्याची आहुती घेण्यासाठी कारकुनाने एक ओळ खरडली की ती वेदवाक्य...!" हे त्रिकालाबाधित सत्य सध्याच्या सरकारला अनुभवायला येतंय. राज्य प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांनी राजकारण्यांचे फोन चोरून ऐकले, रेकॉर्ड केले आणि तो सारा मालमसाला फडणवीस यांच्याकडं सुपूर्द केलाय. ते सरकारमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सिद्ध केलंय. याचा अर्थ त्या संबंधित अधिकाऱ्यांना विद्यमान सरकारपेक्षा गेलेल्या सरकारातल्या नेत्यावर अधिक विश्वास असावा. ही स्वामीनिष्ठा म्हणावी की, आणखी काही. पण हे गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. टॉप सिक्रेट कागदपत्रे बाहेर जातात. थेट विरोधकांकडं जातात. ती सार्वजनिक होतात. हा कर्तव्यच्युतीचा भाग आहे. सनदी अधिकारी म्हणून घेतलेल्या शपथेचा भंग आहे. अधिकाऱ्यांच्या या स्वामीनिष्ठांचे विच्छेदन व्हायला हवंय!

 - हरीश केंची

मो.: ९४२२३१०६०९

(लेखकाच्या ब्लॉगवरून साभार)


इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी दैनिकानं देशातील सर्वशक्तिमान व्यक्तींची एक यादी प्रकाशित केली आहे, यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिल्या स्थानावर ठेवले आहे तर दुसऱ्या क्रमांकावर गृहमंत्र्यांचे नाव आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव दिले आहे. ही क्रमवारी त्या दैनिकाने ठरवली असली तरी पहिला क्रमांक मोदींना द्यावा की मोहन भागवतांना यावर लोकांचे काय मत आहे ते त्या वृत्तपत्रानं आजमावून पाहिले असते तर कदाचित पहिला क्रमांक भागवतांना मिळाला असता. पण प्रश्न या क्रमवारीचा नाही तर देशाची आजची जशी दयनीय अवस्था झालेली आहे यासाठी जबाबदार कोण? पहिल्या क्रमांकावरील व्यक्ती की तिसऱ्या क्रमांकावरील? हा आहे. देशाच्या परिस्थितीचा पाढा लिहून काढण्याची गरज नाही. खास आणि आम अशा सर्वच नागरिकांना त्याची माहिती आहे. त्यासाठी ते चिंतीतही आहेत. कारण या परिस्थितीने सर्वांना अशा बिकट परिस्थितीत ढकलले आहे की यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना सुचत असला तरी तो त्यांच्या हातात नाही, याची काळजी अधिक आहे. समस्या कोणत्याही राष्ट्रात, राजवटीत, शासन व्यवस्थेत असतात, पण त्या समस्यांचे निराकरण करण्यास सरकार उत्सुक नसेल तर किंवा सरकारच या समस्यांच्या मुळाशी असेल, सरकारच दिवसेंदिवस या समस्यांचे जाणूनबुजून देशाला, देशातील जनतेला ढकलून द्यायच्या प्रयत्नात असेल तर प्रश्न उपस्थित होतो. देशातील गरीबी दररोज वाढत आहे. दिवसागणिक देशाच्या मालमत्तेचा लिलाव होताना लोक आपल्या डोळ्यांनी पाहत आहेत, पण त्याला रोखणे कुणाच्या हातात नाही. सत्ताधारी पक्ष या सागळ्या समस्यांचे उगमस्थान आहे. विरोधी पक्षाची भूमिका नगण्य आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्षालाही या देशाच्या लुटीत सत्ताधारी वर्गाने सहभागी करून घेतले आहे. त्यांना त्या लुटीत वाटा मिळत असावा की काय या प्रश्नाचा गुंता नागरिकांसमोर आहे. एका व्यक्तीच्या किंवा एका विचारसरणीच्या समूहासमोर देशातील १३० कोटी जनता हतबल झाल्याचे चित्र सर्वांना दिसत आहे. सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आसा की या देशाच्या सत्ताधारीवर्गाला आणि ज्या विचारसरणीचा या सत्ताधाऱ्यांनी अंगीकार केला आहे त्याचे उद्दिष्ट काय? संघाला भारतात हिंदू राष्ट्र निर्माण करायचे आहे की भारतालाच हिंदू राष्ट्र बनवायचे आहे याचे उत्तर मिळत नाही. भारताची ८०-९० टक्के लोकसंख्या हिंदू आहे तर अल्पसंख्यक केवळ १५-२० टक्के असतील. अशा वेळेस हिंदू राष्ट्र ज्या ८०-९० टक्के हिंदूंच्या हितासाठी निर्माण करायचे आहे त्यांना का इतक्या दारिद्र्यावस्थेत ढकलून दिले जात आहे. या देशात ४०-५० टक्के वर्ग शेतकऱ्यांचा आहे. त्यातील जवळपास ९५ टक्के हिंदू शेतकरी आहेत. त्या हिंदू शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून मोठ्या उद्योगपतींना बहाल करण्यामागे संघाची भूमिका काय? ४०-५० टक्के लोकसंख्या हिंदू शेतकऱ्यांची असताना त्यांना तथाकथित हिंदू राष्ट्रात का सामावून घेतले जात नाही? हीच इतर उद्योगधंद्यांचीही अवस्था आहे. दररोज लाखो युवक आपल्या नोकऱ्या गमावत आहेत. त्यातील २ टक्केसुद्धा अल्पसंख्यक नसतील. बाकीचे ९८ टक्के कर्मचारी हिंदू नागरिकच आहेत, त्यांचे हिंदू राष्ट्रात का बरे स्थान नाही? देशाची संपत्ती ही साऱ्या नागरिकांची आहे. ती विकली जात असताना याचा फटका ८०-९० टक्के हिंदूंवर पडणार आहे. प्रश्न असा की राष्ट्राच्या ज्या हिंदू वर्गावर दररोज नव्या समस्यांची भर पडते त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी संघ का पुढे येत नाही? देशातील सर्वशक्तिमान नागरिक मोहन भागवत शेतकऱ्यांच्या आंदोलनात का हस्तक्षेप करत नाहीत, देशाची मालमत्ता कवडीमोलाने आपल्या आवडत्या उद्योगपतींना विकत असताना संघ त्याची दखल का घेत नाही? शेतकऱ्यांच्या जमिनी आणि सर्व भारतीय नागरिकांची मालमत्ता केवळ २ व्यक्तींच्या हवाली करण्याचे सरकारचे प्रयत्न होत असताना जर संघ काही बोलायला, हस्तक्षेप करायला तयार नसेल तर त्याचा अर्थ काय लावावा? येथील (हिंदूंपैकी) फक्त दोन-चार टक्के लोकच हिंदू आहेत, बाकीचे ९५ टक्के लोक हिंदू नाहीत? हिंदू राष्ट्रात या ९५ टक्के हिंदूंचे स्थान कोणते? सबंध भारताला हिंदू राष्ट्र बनवायचे असेल तर सबंध हिंदू जनतेचे हक्काधिकार सुरक्षित असतील याची काळजी संघाने घ्यावी आणि ती जबाबदारी उचलली पाहिजे की नाही? पण जर संघाला वाटत असेल की फक्त ४-५ टक्के लोकच हिंदू आहेत, बाकीचे हिंदू नाहीत तर मग अशी भूमिका त्याने स्पष्टपणे मांडावी. फक्त ४-५ टक्के लोकच हेदशाच्या श्रीमंती- मालमत्तेचे खरे वारसदार आहेत, असे त्यांना सांगायचे असेल तर तसे उघड-उघड सांगायला हवे.

 - सय्यद इफ्तिखार अलमद

संपादक

मो.: ९८२०१२१२०७


देशातील एका राजकीय नेत्याने सेक्युलॅरिझमला देशासाठी सर्वांत मोठा धोका म्हटले आहे. त्यांच्या मते भारतीय परंपरा आणि सभ्यतेला वैश्विक स्तरावर प्रस्तुत करण्यात सर्वांत मोठा कोणता अडसर असेल तर तो सेक्युलॅरिझम आहे. भारताची कोणती सभ्यता म्हणजेच धार्मिक सभ्यता, 

मूल्ये, आचारविचार, शिकवणी ते वैश्विक पटलावर प्रस्तुत करू इच्छितात हे त्यांनी सांगितले नाही. त्यांना स्वत: त्यांची कल्पना असेल असे वाटत नाही. सेक्युलॅरिझम या विचाराची कल्पना खरे तर धर्माविरूद्ध नाही. धर्माच्या नावाखाली प्रत्येक धर्माने माणसांव र माणसांची गुलामी, पंडित,  पुजारी, पुरोहितांद्वारे केली होती. मग ते कोणत्याही धर्माचे का असेनात. त्यांच्याविरूद्ध विकसित झालेला आणि आधुनि क सत्ताप्रणालीचा मुख्य आधारस्तंभ म्हणून झालेली विचारधारा आहे. धर्माच्या नावाखाली माणसांना गुलाम बनवण्याच्या परंपरेला कंटाळून हे विचार विचारवंतांनी मांडले होते. धार्मिक आस्थांना नाकारणं किंवा धार्मिक विधी पूजा-अर्चा त्यांच्या शिकवणींना अंगीकारण्याविरूद्ध या राजकीय विचाराचा उपयोग केला गेला नाही. सेक्युलॅरिझमद्वारे धर्माचे स्वातंत्र्य जसेच्या तसे बहाल केले गेले होते. ते आजही आहे. सेक्युलॅरिझम फक्त राजकीय विचारधारा आहे. धर्माशी त्याचा काही एक संबंध नाही. धर्माच्या नावाखाली धर्मपंडितांनी माणसांवर माणसांची गुलामी त्या गुलामीला विरोध होतो आहे आणि राहणार. जसे धर्माच्या माणसांविरोधी शिकवणींद्वारे धार्मिक मक्तेदारी बाळगणाऱ्यांनी माणसांच्या हक्काधिकारांचे हनन करू नये, तसेच  सेक्युलॅरिझमने देखील माणसांच्या धार्मिक आस्था, आकांक्षा, श्रद्धा, शिकवणी या बाबींमध्ये लुडबुड करू नये. हा इतिहास वेगळा. भारताच्या बाबतीत सांगायचे झाल्यास ज्या नेत्यांना सेक्युलॅरिझमचा धोका असल्याचे वाटते त्यांनी कोणत्या धर्मपरंपरा सभ्यतेचे प्रदर्शन जगासमोर मांडायचे

आहे, हा एक प्रश्न. ज्या धर्माच्या नावाखाली मानवी समाजाला खंड खंड करून टाकले आहे त्या विचारांचा? काही लोकसमूहांना मानवाचादेखील अधिकार दिला नाही. त्यांना तुच्छ समजले जाते, त्यांच्याशी अस्पृश्यतेचा व्यवहार केला जातो. पशुपक्ष्यांसारखेदेखील मानवांशी वर्तन केले जात नाही. त्या परंपरांना संस्कृतीला त्यांना जगासमोर मांडायचे आहे काय? खरी गोष्ट ही नाही. त्यांची खरी समस्या ही की त्यांना भारतात इतर धर्मियांचे अस्तित्व देखील मान्य नाही. ज्यांना स्वतःच्या धर्माचे पालन करणाऱ्यांचे अस्तित्व मान्य नाही ते दुसऱ्यांना कसे सहन करतील. सेक्युलॅरिझमचा वापर ते स्वतःसाठी करून घेतात. इतरांनी त्याचा वापर करू नये, असे त्यांना वाटते. सेक्युलॅरिझमचा जितका दुरुपयोग त्यांनी करून घेतला आणि करत आहेत, तितका जगाच्या कोणत्याही राजकीय व्यऱस्थेने केला नसेल. त्यांना मुस्लिम नको आहेत. म्हणून जेव्हा  सेक्युलॅरिझमचे नाव घेऊन मुस्लिम आपल्या हक्काधिकारांची मागणी करतात तेव्हा ते म्हणतात, सेक्युलॅरिझम देशासाठी मोठा धोका आहे. त्यांना म्हणायचे असते मुस्लिम देशासाठी धोका आहेत. सेक्युलॅरिझमशी मुस्लिमांना त्यांनी अशा प्रकारे जोडले आहे. सेक्युलॅरिझमचा उदय १०० एक वर्षांआधी झाला असावा. त्या विचारावर आधारित राजकीय व्यवस्थेने जेमतेम ७०-८० वर्षांपूर्वी जन्म घेतला असेल त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी त्या देशांनी ज्यांना या विचारांचा अभिमान आहे, आजपर्यंत केलेली नाही. मात्र त्याच्या नावाखाली जगातील सगळ्या राजकीय व्यवस्था, राष्ट्रे आपल्या देशांमध्ये राष्ट्रांमध्ये इतर अल्पसंख्यक धर्मसमुदायावर सतत अन्याय केलेला आहे. त्यांना कधीच सेक्युलॅरिझमची त्यास वागणूक दिली नाही. मुस्लिमांचे धर्मपालन करतान तो १४५० वर्षे जुना आहे. १७०० वर्षांपूर्वी मुस्लिमांना त्यांच्या धर्माने ही शिकवण दिली आहे की धर्माच्या नावाने कोणावर अन्याय होता कामा नये. ज्याला त्याला ध्रमाचे स्वातंत्र्य असेल. मुस्लिमांनी त्यांच्याशी धर्मसहिष्णुतेचा व्यवहार करावा. कोणच्या देवीदेवता, इत्यादी धार्मिक परंपरंना वाईट बोलू नये. त्यांच्याशी वाईट वा अन्यायाचा व्यवहार करू नये. त्यांना सेक्युलॅरिझम  शिकवण्याचा कुणी विचार करू नये. त्या विचारांच्या पलीकडची त्यांची धर्मसहिष्णुता, त्यांच्या मानवतेच्या शिकवणी आहेत. काळे-गोरे, श्रीमंत-गरीब, तुच्छ अशा शब्दावली सुद्धा त्यांच्या धर्मात नाहीत. सारे मानव एकाच जातीचे – ती जात मानवतेची. कारण सर्वांना एकाच ईश्वराने – अल्लाहने जन्म दिला आहे. इतर धर्माच्या अनुयायांचा दुसरा ईश्वर ही इस्लामविरोधी विचारधारा आहे. आणि इस्लामविरोधी विचारधारेशी मुस्लिमांचा काही एक संबंध नाही. हिंदू-मुस्लिम, दलित-उच्चवर्णीय ही जातवारी तर भारतीय परंपरेने केली आहे, सेक्युलॅरिझमने नाही. पण आपल्या सामाजिक विचारांच्या त्रुटीला हे लोक सेक्युलॅरिझमला जबाबदार  धरून परधर्मियांची कोंडी करू पाहताहेत. त्यांना उघडपणे बोलण्याचे साहस नाही. म्हणून ते सेक्युलॅरिझमची आड घेतात, एवढेच!

- सय्यद इफ्तिखार अलमद

संपादक

मो.: ९८२०१२१२०७


भारतीय माध्यमांवर आजकाल गुजरातचे वर्चस्व आहे. देशाच्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या घरासमोर एका बेवारस गाडीमध्ये काही विस्फोटक सामग्री ठेवलेली नुकतीच आढळली होती. नंतर माहित झाले की ही गाडी हिरेन मनसुख या दुसऱ्या गुजराती व्यक्तीच्या नावावर होती. हिरेन मन्सुखचे नाव ऐकल्यावर कित्येक लोकांना हिरेन पंड्याचे नाव लक्षात आले असेल. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना ते गुजरात राज्याचे गृहमंत्री होते. 

त्यांनी मोदींच्या विरूद्ध तोंड उघडण्याचे प्रयत्न केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते फिरायला निघाले असता त्यांची हत्या झाली. ज्या कथित मुस्लिम आतंकवादींनी त्यांची हत्या केली त्यांना गुजरातमध्ये बाबु बजरंगी सारखी  उघड-उघड हत्या आणि हिसेंचा गर्व करणारी व्यक्ती का मिळाली नसेल? हिरेन पंड्या यांच्या वडिलांनी मोदीजींच्या बरोबर व्यासपीठावर बसण्यास नकार दिला होता, हे विसरून चालणार नाही.

हिरेन पंड्या सारखेच हिरेन मनसुख यांचा मृतदेह देखील संशयास्पद स्थितीत आढळला होता. आपल्या हत्येपूर्वी मनसुख हिरेन यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री समवेतच मुंबई आणि ठाणेच्या पोलीस आयुक्तांकडे काही लोक त्यांना भीती दाखवत असल्याने आपल्या सुरक्षेची मागणी केली होती. आपल्या पत्रात त्यांनी तीन व्यक्तींकडे बोट दाखवले होते. त्यातील एक सचिन वाझे दूसरे पोलीस सहआयुक्त आणि तिसरे मिड डे या मुंबईतल्या इंग्रजी दैनिकाचे पत्रकार फैजान खान यांचे नाव होते. न्यूज लॉन्ड्रीच्या   बातमीनुसार 17 फेब्रुवारी रोजी ते मुंबईसाठी निघाले असता त्यांच्या गाडीत बिघाड झाला म्हणून त्यांनी ती गाडी नायरपुलाजवळ सोडून दिली. पण जेव्हा 18 फेब्रुवारीला ती गाडी परत घेण्यासाठी ते तिथे आल्यावर त्यांची गाडी बेपत्ता झाली होती. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पण कोणतीच कार्यवाही करण्यात आली नव्हती. 25 फेब्रुवारी रोजी ती गाडी मुकेश अंबानी यांच्या ’अ‍ॅन्टेलिया’  बंगल्यासमोर आढळली आणि त्यात काही विस्फोटकही आढळली. तेव्हापासूनच पोलिसांकडून त्यांना भीती दाखविण्याची सुरूवात झाली आणि पुढे जावून माध्यमे देखील यामध्ये सामील झाली. 4 मार्च रोजी रात्री तेे कोणा पोलीस अधिकाऱ्यांशी भेटायला गेले पण परत घरी पोहोचलाच नाही. 5 मार्चला त्यांच्या हिरेन मनसुख यांच्या पुत्राने ते बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली. पण त्याच दिवशी संध्याकाळी हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेती बंदरला आढळला. या प्रकरणाला महत्त्वाचे वळण लागले ते हिरेनच्या पत्नीने नोंदविलेल्या एफआयआरमुळे. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, ती गाडी पीटर न्यूटन या व्यक्तीच्या नावावर 2016 पासून होती आणि गेल्या वर्षी नोव्हेंबर ते 5 फेब्रुवारीपर्यंत ती गाडी सचिन वाझे यांच्याकडे होती. अशा प्रकारे या गाडीशी सचिन वाझे यांचा संबंध जुळला. हिरेनच्या पत्नी विमला यांनी सांगितले की, 27, 28 फेब्रुवारी आणि 2 मार्चला त्यांचे पती वाझे यांच्याबरोबर होते. विमल यांच्या म्हणण्यानुसार सचिन वाझे यांनी हिरेन याला वचन दिले होते की तो जर अटक व्हायला तयार झाला तर 2-4 दिवसात त्यांना सोडविण्यात येईल. विमल यांनी आपल्या वकीलाला अटकपूर्व जामीना विषयी विचारले असता वकीलाने असे म्हटले होते की, त्यांचे पती आरोपी नसल्याने त्यांना जामीन मिळणार नाही. 4 मार्च रोजी हिरेन गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांशी भेटायला गेले आणि दुसऱ्या दिवशी त्याचां मृतदेह आढळला. विमल यांनी पोलिसांना सांगितले होते की, त्यांच्या पतीला पोहायला येत होते म्हणून ते पाण्यात बुडू शकत नाही. हिरेन यांचा पर्स, मोबाईल आणि गळ्यातली चेन मिळाली नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांना ही शंका येते की त्यांच्या पतीची हत्या झालेली असावी.

विमल यांच्या या जबाबीने महाराष्ट्राच्या विधानसभेत बजेट सेशन चालू असताना विपक्षाला जणू एक सुवर्ण संधीच मिळाली. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका तासापूर्वीच या सभेत सरकारवर या प्रकरणाद्वारे हल्ला केलेलाच होता. त्यांनी हिरेन आणि वाझे यांच्यातील संबंध आणि संबंधीत हद्दीतील पोलिसांपूर्वी सचिन वाझे हे कसे घटनास्थळावर पोहोचले यावर आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले की, मनसुख यांचे हात बांधलेले होते. अशा प्रकारे कोणी आत्महत्या करत नसतो. फडणविसांनी विमल यांचे पत्र विधानसभेत वाचून दाखविले. वाझे यांच्यावर हत्या करून मृतदेह खाडीत टाकून देण्याचा आरोप लावला. 

या देशात कुणाची संशयास्पद हत्या व्हावी आणि कुठे स्फोट घडला तर त्यात मुस्लिमांची चर्चा होवू नये असे होत नाही. या प्रकरणात जैशुल हिन्द नावाच्या एका संघटनेचा उल्लेख झालाच. त्या गाडीत एक पत्र सापडले. यात लिहिले होते की नीता भाभी आणि मुकेश भैय्या हे तर फक्त एक ट्रेलर आहे. पुढच्या वेळी संबंध सामग्री तुमच्याकडे पोहोचेल. गंमतीची गोष्ट अशी की ज्या बॅगमध्ये हे पत्र सापडले त्या बॅगेवर मुकेश अंबानी यांच्या आयपीएल टीम मुंबई इंडियन्सचे नाव होते. दुसऱ्या दिवशी जैशुल हिन्द याने मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळणाऱ्या गाडीशी आपला कसलाच संबंध नसल्याचे जाहीर केले. दुसरी गंमतीची गोष्ट अशी की जरी या गाडीत ठेवलेल्या जेलेटिन कांड्या नागपूरच्या एका कंपनीत बनविल्या असताना कुणाचे लक्ष संघाकडे गेले नाही. गांधीजींच्या हत्येनंतर हे संघ अंहिसेचे पालन करत आले आहे. कोणत्याही हिंसक घटनेशी त्यांचा संबंध नसतो. कपिल शर्मांनी जगजाहीर धमकी दिली तरी त्यास अटक करण्याची कुणालाच हिंमत झाली नाही. कारण त्यांना आपली कामगीरी दाखविण्यासाठी निर्दोष मुस्लिम आणि त्यांना साथ देणाऱ्या प्रामाणिक हिंदूंची कमतरता आहे कोठे? 

30 जानेवारी 2021 अगोदर जैशुल हिंदचे नाव कुणीही ऐकले नव्हते. पण दिल्ली येथील इस्त्राईल वकिलात समोर झालेल्या विस्फोटामुळे त्या संघटनेचे साऱ्या माध्यमांचे लक्ष आपल्याकडे वळवले. मॅसेजिंग अ‍ॅप टेलिग्रामद्वारे त्या संघटनेचे त्या विस्फोटाशी संबंध असल्याचे उघड झाले. त्यात असे म्हटले गेले होते की, ही घटना पुढील विस्फोटांच्या मालिकेची सुरूवात आहे.  त्यावेळी शेतकऱ्यांचे आंदोलन जोरात होते म्हणून समजूतदार व्यक्तींनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यांना कळून चुकले होते की, शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडून लक्ष इतरत्र विचलित करण्यासाठीची ही सोय होती. तालिबान आणि आयएसआयचे नावही गोवण्यात आले. भारत सरकारने इस्त्राईलला अचुक सुरक्षा प्रदान करण्याचे वचन दिले. याद्वारे इस्त्राईलला खुश करण्याची नामी संधीही भारताच्या सत्ताधाऱ्यांना मिळाली. पुढे जावून मुंबई पोलिसांनी जाहीर केले की त्यांच्याकडे जैशुल हिंद नावाच्या कोणत्याही संघटनेची माहिती नाही. आता या प्रकरणात नवीन वळण आले आहे. गुप्तचर संस्थांचे असे म्हणणे आहे की, जैशुल हिंद याने ही योजना दिल्लीतील तिहाड जेलमध्ये बसून टेलीग्राम चैनलद्वारे बनविली होती. गुप्तचर संस्थांच्या म्हणण्यानुसार तिहाड जेलमधील तीन चार कैद्यावर पाळत ठेवली जात आहे. आता या प्रकरणात इंडियन मुजाहीदीनच्या तसनीम यांच्या नावाचीही चर्चा होत आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की, देशाच्या सर्वात मोठ्या जेलमध्ये बसून असे षडयंत्र रचले जात आहेत. ज्या जेलमधील रौनी विल्सन यांच्या संगणकात वायरसद्वारे त्यांना अडकवले जात आहे. त्या जेलमधील एखाद्या कैद्याच्या मोबाईलद्वारे एक गट बनवणे कोणते अवघड काम आहे. हे सगळं कारस्थान मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी तर नव्हे ना? आश्चर्य या गोष्टीचे आहे की, मुंबईत भाजपावाले पोलिसांवर वाझेला वाचविण्याचा आरोप लावत आहेत. त्याच सचिन वाझे यांना केंद्रीय गुप्तचर संस्था तिहाड जेलमध्ये पाठवून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का? अशा परिस्थितीत हिरेन मनसुख यांच्या पत्नीला न्याय कसा मिळणार? 

- डॉ. सलीम खान


वचनपूर्ती : पूरग्रस्त कनवाड येथील 34 कुटुंबांना घरांचे व संसारोपयोगी साहित्यांचे वाटप


कोल्हापूर (अशफाक पठाण) 

कोल्हापूर जिल्ह्यासह सीमाभागात 2019 ला प्रलंयकारी महापुरात तालुक्यातील अनेक गावांचे मोठे नुकसान झाले. कनवाड येथे इतर नुकसानीबरोबरच अनेकांची घरे उध्वस्त झाली. अशा गरीब घटकांना जमाअते इस्लामी हिंद या सेवाभावी संघटनेकडून जवळपास दीड कोटी रूपये खर्चून 34 पक्की घरे बांधून देण्यात आली. त्याचबरोबर दोन शाळांना कंपाऊंड बांधून दिले. हे काम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले. 

जमाअते इस्लामी हिंद व आयडिएल रिलीफ कमेटी महाराष्ट्र द्वारा आयोजित घरांचा हस्तांतरण सोहळा कनवाड येथे 14 मार्च रोजी श्रीमती ए.ए.पाटील हायस्कूल येथे संपन्न झाला. यावेळी राज्यमंत्री पाटील बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जमाअतचे प्रदेशाध्यक्ष रिजवानुर्रहेमान खान होते. मंचावर सरपंच डॉ. बाबासो बवनपाल अरसगोंडा, जि.प.चे सीईओ संजयसिंह चव्हाण, जयसिंगपूरचे एसडीपीओ रामेश्वर वेंजने,  जमाअतचे महाराष्ट्र सचिव मो. जफर अन्सारी, ह्युमन वेलफेअर फाऊंडेशन नवी दिल्लीचे सहायक जनरल सेक्रेट्री मोअज्जम नाईक, शिरोळचे तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, बीडीओ शंकर कवितके, एसआयओ दक्षिण महाराष्ट्राचे अध्यक्ष सलमान खान, जनसेवा विभागाचे सचिव मो. मजहर फारूक,  जमाअतचे जिल्हा संघटक नदीम सिद्दीकी, कोल्हापूरचे जेआयएच अध्यक्ष अन्वर पठाण उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कनवाड गावात 2019 च्या प्रलयंकारी महापुरात उध्वस्त घरे पुन्हा उभारण्याचा निर्णय जमात-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्र आणि आयडियल रिलीफ कमिटी ट्रस्टने घेतला आणि  ती घरे एका साध्या पण सन्माननीय सोहळ्यामध्ये रहिवाशांना देण्यात आलीे. 

  बांधलेल्या घरांचा दर्जा अतिशय उत्तम असल्याचे सांगत राज्यमंत्री पाटील म्हणाले, संस्थेच्या वतीने कनवाड हे गाव दत्तक घ्यावे, शासन आपल्यासोबत हातात हात घालून काम करेल. संस्थेकडून मिळणारा प्रतिसाद उत्साह वाढविणारा असल्याचेही यड्रावकर म्हणाले.मानवकल्याणासाठी सर्वांनीच पुढाकार घेवून काम केले पाहिजे. जमाअते इस्लामी हिंदने पुरग्रस्त कनवाड गावात 34 कुटुंबांना संसोरोपयोगी साहित्यासह घरे उभा करून दिली. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. जमाअतने हे कार्य पूरग्रस्तांना दाखविण्यासाठी नव्हे तर अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी केले आहे. धर्म विचारात न घेता त्यांनी पीडितांची सेवा केली असल्याचे ते म्हणाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. संजयसिंह चव्हाण यांनी  छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक सलोख्याचे उदाहरणं देत, जमाते इस्लामी हिंद ने केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की हा उपक्रम म्हणजे एक सामाजिक सलोख्याचे प्रतीकच आहे. भविष्याचा विचार करून ही घरे बांधण्यात आली आहेत. ट्रस्टने केलेल्या कामाची किंमत कोणालाही पैशामध्ये मोजता येणार नाही. इतके हे काम मोठे असल्याचे चव्हाण म्हणाले. 

जमातचे प्रदेशाध्यक्ष रिजवान-उर-रहमान खान म्हणाले, ज्यावेळी महापूर आला होता त्यावेळी लोकांच्या समस्या सर्वजन विसरले असतील पण जमाअतने त्या स्मरणात ठेवून आपली जबाबदारी ओळखत त्यांना उभे करण्याचे कार्य हाती घेतले आणि आज ते पूर्णत्वास नेले. सर्व माणसे एका पालकांची संतती आहेत. आपल्याला एकमेकांच्या सुख-दुःखाच्या वेळी कामी यावे लागेल. यामुळेच आपल्यात पसरलेला द्वेष दूर होईल. याच उद्देशाने आम्ही आपल्या बांधवांसाठी घरे बांधली आहेत. 34 कुटुंबांना मुलभूत आणि घरगुती साहित्यासहीत सोपविण्यात आली. त्यांमध्ये पलंग, कपाट, जेवणाचे टेबल व खुर्च्या, स्वयंपाकघरातील भांडी, मिक्सर ग्राइंडर इत्यादी मुलभूत व घरगुती वस्तू पुरविल्या गेल्या. तसेच सदर गावात उर्दु आणि मराठी शाळांची दुरुस्ती करून ती वापरण्यायोग्य बनविण्यासाठी जमात-ए-इस्लामी हिंदचा जनसेवा विभाग आणि आयडियल रिलीफ कमिटी ट्रस्ट यांनी काम केले.

जमात-ए-इस्लामी हिंदने कनवाड या गावाला आदर्श गाव बनवण्याचा निश्चय केला. 26 जानेवारी 2020 रोजी या घरांची पायाभरणी करण्यात आली होती. या प्रकल्पासाठी 20 जानेवारी 2020 रोजी आयडियल रिलीफ कमिटी ट्रस्ट आणि जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्यात सामंजस्य करारही करण्यात आला होता. जमात-ए-इस्लामी हिंद च्या जनसेवा विभागाचे सचिव मो. मजहर फारूक म्हणाले, आम्हाला हे गाव एक आदर्श गाव बनवायचे आहे. आदर्श गावे केवळ स्वच्छता, चांगले रस्ते, प्रशस्त घरे आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्यावरच बनत नाहीत तर इथं राहणाऱ्या प्रत्येक वर्गातील आणि समाजातील लोकांनी आपले मने मोकळी व खुली ठेवावीत. प्रत्येकाने एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे यावे, दुसऱ्याच्या दुःखाला स्वत:चे दु:ख समजावे. असे एकात्मतेचे उदाहरण उभे केल्यास आपल्याला या गावामध्ये एक समृद्ध भारत पाहायला मिळेल. यावेळी गावातील नागरिक, प्रशासनातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने जमाअतच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मोहम्मद मजहर फारूख यांनी केले. आभार नदीम सिद्दीकी यांनी मानले. कार्यक्रम कोविड-19 चे नियम पाळून करण्यात आला. 

statcounter

MKRdezign

Contact form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget