(६८) आणि पाहा, तुमच्या पालनकर्त्याने मधमाशीवर हे दिव्य प्रकटन केले१९ की पर्वतांमध्ये आणि वृक्षांमध्ये आणि मांडवांवर चढविलेल्या वेलींमध्ये आपले मोहळ बनव
(६९) व प्रत्येक प्रकारच्या फळांचे रस शोषून घे आणि आपल्या पालनकर्त्याच्या सुरळीत केलेल्या मार्गावर चालत राहा. या माशीमधून रंगीबेरंगी एक सरबत निघतो जो लोकांकरिता आरोग्यदायी आहे, निश्चितपणे यातदेखील एक निशाणी आहे त्या लोकांकरिता जे गांभीर्याने विचार करतात.
(७०) आणि पाहा, अल्लाहने तुम्हाला निर्माण केले, मग तो तुम्हाला मृत्यू देतो आणि तुमच्यापैकी एखादा वृद्ध जर्जर वयापर्यंत पोहचविला जातो जेणेकरून सर्व काही जाणल्यानंतरही त्याला काही कळत नाही. वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाहच ज्ञानातही परिपूर्ण आहे आणि सामर्थ्यातदेखील.
१८) यात एक अप्रत्यक्ष संकेत दारूच्या निषिद्धतेकडेदेखील आहे की ती पवित्र उपजीविका नाही.
१९) वह्य (दिव्य प्रकटन) चा शाब्दिक अर्थ असा गुप्त आणि मार्मिक संकेत होतो जो संकेत देणाऱ्या व संकेत मिळविणार्याखेरीज इतर कोणासही कळू नये. याच अनुषंगाने या शब्दाचा वापर टाळणे, उतरविणे (गोष्ट मनात उतरविणे) आणि गूढ बोध (गुप्त शिकवण) या अर्थाने प्रयुक्त होतो.
Post a Comment