(७३) आणि अल्लाहला सोडून अशांना पूजतात ज्यांच्या हातात आकाशांतूनही त्यांना काही उपजीविका देणे नाही आणि जमिनीतूनदेखील नाही आणि ना हे कामदेखील ते करूच शकतात?
(७४) तर मग अल्लाहकरिता उदाहरणे बनवू नका.२२ अल्लाह जाणतो तुम्ही जाणत नाही.
(७५) अल्लाह एक उदाहरण देतो. एक तर आहे गुलाम जो दुसर्याच्या मालकीचा आहे आणि स्वत: काहीच अधिकार बाळगत नाही. दुसरा मनुष्य आहे ज्याला आम्ही आमच्याकडून उत्कृष्ट उपजीविका दिली आहे आणि तो त्यातून उघड व गुप्तपणे खूप खर्च करतो. सांगा हे दोन्ही समान आहेत काय? स्तुती अल्लाहसाठीच आहे.२३ परंतु बहुतेक लोक (या सरळ गोष्टीस) जाणत नाहीत.
(७६) अल्लाह आणखी एक उदाहरण देतो. दोन माणसे आहेत, एक मुका-बहिरा आहे, कोणतेही काम करू शकत नाही, आपल्या मालकावर भार बनलेला आहे जिकडेही त्याने त्याला पाठवावे कोणतेही भले काम त्याच्याकरवी होत नाही. दुसरा मनुष्य असा आहे की न्यायाचा आदेश देतो व स्वत: सरळमार्गावर कायम आहे सांगा, हे दोन्ही समान आहेत काय?
२२) म्हणजे अल्लाहला भौतिक बादशाह आणि राजे व महाराजेप्रमाणे समजू नका की ज्या प्रमाणे कोणी त्यांचा सवंगडी आणि निकटवर्ती नोकरांच्या माध्यमाविना त्यांच्याप्रत आपले अर्ज व विनंती पोहचवू शकत नाही. त्याचप्रमाणे अल्लाह-संबंधीदेखील तुम्ही अशी कल्पना करू लागावे की तो आपल्या राजमहालात फरिश्ते आणि औलिया व इतर निकटवर्तींच्या गर्दीमध्ये बसला आहे व कोणाचे व कोणतेही काम त्या मध्यस्थाविना त्याच्या येथे होऊ शकत नाही.
२३) या प्रश्नाच्या उत्तरात दोन्ही बरोबर आहेत असे अनेकेश्वरवादी म्हणू शकले नाहीत. म्हणून फरमाविले, स्तुती अल्लाहसाठीच आहे, इतकी गोष्ट तर तुमच्या लक्षात आली.
Post a Comment