Halloween Costume ideas 2015

विधवा आणि इस्लाम : पैगंबरवाणी (हदीस)


स्त्रियांचा आदर-सन्मान ही आमची संस्कृती राहिलेली आहे. स्त्रीशिवाय हा जग अपूर्ण आहे. प्रत्येकाचे जीवनात स्त्री कोणत्या न कोणत्या रूपाने असतेच. पण आम्ही पाहात आहे की समाजामध्ये अजून तरी स्त्रियांना न्याय मिळालेला नाही .याकरिता महिला "स-शक्तिकरण" एक महत्त्वाची संकल्पना आहे पण ही फक्त "कल्पनाच" म्हणून राहिली "संकल्पना" झालेली दिसते .समाजात राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर स्त्रियांना सन्मान व दर्जा प्राप्त झालेला दिसत नाही ज्याचा गोंगाटा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर केला जातो. विशेष करून स्त्रियांसोबत समाजाने कानाडोळा केलेला दिसते.

जुन्या काळापासूनच स्त्रियांवर व विशेष करून विधवेवर अत्याचार व अनाचाराचे इतिहास आहे. पूर्वीच्या काळात विधवेशी पक्षपात केले जात होते .समाजात विधवेला उच्च स्थान नव्हता. मूलभूत गरजांपासून देखील तिला अलिप्त ठेवले गेले होते. विधवेला संपत्तीत वारसाहक्क नव्हता. शिक्षणापासून वंचित केले गेले होते व मजबुरीचे जीवन जगणे विधवेचे भाग्य बनले होते. विधवेला स्वातंत्र्य नव्हते. सतीप्रथा सारखी अनिष्टप्रथेने लाखो विधवेंचे वध केले होते .विधवेला एक किंवा दोन वर्षासाठी काळकोठडीत डांबले जात होते. विधवा आईशी सावत्र मुलाला विवाह करण्याची खुली सूट होती. विधवेला पुनर्विवाह करणे निषिद्ध होते. साज-शृंगार करण्यास विधवेला मनाई होती. असे अनेक अनाचार पूर्वीच्या काळात विधवे सोबत होत असे.

लुंबा फाउंडेशन च्या 2015 च्या अभ्यासानुसार आंतरराष्ट्रीय पातळीवर विधवेंची संख्या 258 दशलक्ष आहे. 38 दशलक्ष विधवा अत्यंत दारिद्र्याने जीवन जगत आहे. भारत विधवेंच्या संख्येत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये एकूण 464 57516 विधवा राहतात. वृंदावन  या विधवेच्या शहरात सहा हजाराच्या आसपास विधवा आहेत.

पूर्वीच्या काळाप्रमाणे आज देखिल स्त्रिया विशेष करून विधवा स्त्रिया असुरक्षित आहे. त्यांचा पक्षपात केला जात आहे. त्यांच्यावर अत्याचार, अनाचार सुरूच आहे. त्यांचे पुनर्विवाहचे प्रमाण वाढलेले दिसत नाही. अनेक रूढी परंपरांचे पालन आज देखील विधवेला करावे लागत आहे. हिंदू समाजात पतीच्या निधनानंतर विधवेचे कुंकू पुसणे, हातातल्या बांगड्या फोडणे, गळ्यातील मंगळसूत्र काढून टाकणे इत्यादीचे पालन करावे लागत आहे. समाजात तिला सामर्थ्य प्राप्त नाही. तिच्यासोबत पक्षपात केला जात आहे. कौटुंबिक, सामाजिक, भावनिक, आर्थिक व शैक्षणिक पातळीवर विधवेचे छळ सुरूच आहे. समाजाने अजून तरी विधवेला अंगीकारले आहे असे दिसून येत नाही. गरिबी लाचारीमुळे विधवा आज देखील आपल्या जिवाचे रान करीत आहे. अक्षरशःकिती लाचार आहे ही विधवा!

विधवासंबंधी इस्लाममध्ये मार्गदर्शन केले गेले आहे ते आम्ही समजून घेण्याचे प्रयत्न करू या.

अल्लाह पवित्र कुराणात आदेश देतो की,

"तुमच्यापैकी जे लोक मरण पावतील, जर त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी जिवंत असतील तर त्यांनी चार महिने 10 दिवस स्वतःला रोखून ठेवावे ,नंतर जेव्हा त्यांची ईद्दत पूर्ण होईल तेव्हा त्यांना अधिकार आहे की त्यांनी स्वतः संबंधी भल्या पद्धतीनुसार इच्छा असेल तसे करावे." (अल बकरा 235)

सय्यद अबुल आला मौदूदी (र.अ.) या आयतीबाबत स्पष्टीकरण देतात की पतीच्या मृत्यूनंतरची ही इद्दत अशा स्त्रियांसाठीही आहे लागू आहे ज्याच्याशी त्यांचा "पूर्णपणे एकांतवास" झाला नसावा. गर्भवती याला अपवाद आहे. अशा स्त्रीच्या पती वारल्याची इद्दत गर्भमुक्त होईपर्यंत आहे मग ही गर्भमुक्तता पतीच्या मृत्यूनंतर लगेच का होत नाही किंवा त्यासाठी कित्येक महिने का लागू नयेत.

दिव्य कुरआनात अल्लाह संबोधित करतो की,

"तुमच्या पैकी जे लोक अविवाहित असतील आणि तुमच्या दास-दासी पैकी जे सदाचारी असतील त्यांचे विवाह करून द्या ." (अन्नुर, तीन, 32)

एके ठिकाणी दिव्य कुरआनात असे मार्गदर्शन आहे की,

"हे श्रद्धावंतानो तुमच्याकरिता हे वैध नाही की तुम्ही बळजबरीने स्त्रियांचे वारस बनावे." (अननिसा 19)

अननिसा आयात 4 मध्ये आहे की,

"आणि जेव्हा वाटणीच्या वेळी कुटुंबातील लोक आणि अनाथ व गोरगरीब आले तर त्या संपत्ती मधून त्यांना देखील काही द्या आणि त्यांच्याशी भल्या माणसासारखे बोला ."(दिव्य कुरआन)

अजजुहा आयत 19 मध्ये म्हटले गेले आहे की, "अनाथा वर सक्ती करू नका " (दिव्य कुरआन)

पवित्र कुराणाची भूमिका विधवेसंबंधी स्पष्ट आहे जे आम्ही वरील आयतीत पाहिले आहे. इस्लाममध्ये विधवेला उच्च स्थान दिले आहे. त्यांचे संरक्षण केले आहे. विधवेला पुनर्विवाह ची संधी प्रदान केली गेली आहे. विधवेला कोणत्याही प्रकारचे ताण असणे इस्लाम मान्य करीत नाही. तिला इस्लामने संपत्तीत वारसा हक्क दिला आहे. बळजबरीने स्त्रियांचे  वारस स्वतःला घोषित करणे इस्लाम मध्ये महापाप आहे. विधवेला समानतेचा दर्जा दिला आहे. तसेच समाजात जे गोरगरीब आणि अनाथ आहे त्यांच्याशी सदवर्तणूक करण्याचे आदेश इस्लाम देतो. अनाथ बालकांना देखील संपत्तीत वारसा भेटू शकतो जरी तो त्या कुटुंबाचा नसेल ,संपत्ती वाटणीच्या वेळी जर कुणी गरीब आणि अनाथ आला तर त्यांना देखील काहीतरी देण्याचे आदेश इस्लाम देतो. अक्षरशः इस्लामने विधवेला पुनर्विवाह, वारसाहक्क, समानतेचा दर्जा, आपुलकीने वागणे, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक हक्क इत्यादी प्रदान केले आहे. तसेच अनाथांना आसरा, संरक्षण, संगोपन, वारसाहक्क, सन्मान इत्यादी इस्लाम प्रधान करतो.

आज आम्ही आमचा संसार खुशीने करत आहात. तिथं विधवेचा संसार उध्वस्त झालेला आहे! कुणी तिच्या मदतीला धावतांना दिसत नाही !तिचे अनाथ बालकांचा कोणी सहारा व आधारस्तंभ म्हणून उभा राहत नाही! विधवेची ज्या आर्थिक, सामाजिक, मानसिक, शैक्षणिक समस्या आहे त्यांना कोण सोडविणार? विधवेला आधार, आत्मसन्मान , तिच्या बालकांचे शिक्षण ,संगोपन कोण करणार? सर्व  जुन्या रूढी-परंपरा कोण मोडीत काढणार? विधवेच्या पुनर्विवाहाचे मार्ग कोण शोधणार? तिच्यावर होणारे अनाचार, अत्याचार व पक्षपात या विरोधात कोण लढा देणार? असे अनेक प्रश्न आहेत आणि याचे उत्तरे तुम्हाला आम्हाला शोधायची आहे.

- आ. यू. खान

(धामणगाव बढे)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget