सामाजिक संघटनांचा गौरव : युथविंग, जमाअते इस्लामी हिंदचा उपक्रम
लातूर (आसेफ सय्यद)
शहरातील युथ विंग, जमाअते इस्लामी हिंद तर्फे या यशस्वीतेकडे (आओ भलाई की तरफ) ही राज्यव्यापी मोहीम 19 ते 29 जून दरम्यान राबविण्यात येत आहे. यानिमित्त लातूर येथील युथ विंगच्या साळे गल्ली स्थित कार्यालयात मोहिमेचा शुभारंभ शहराध्यक्ष अशफाक अहमद यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाची सुरूवात कुरआन पठणाने मुफ्ती वसीम यांनी केली.
मंचावर युथविंगचे शहराध्यक्ष शकील शेख, सय्यद आसेफ, निहाल बागवान, रफिक शेख यांची उपस्थिती होती. यावेळी जमाअतचे शहराध्यक्ष अशफाक अहमद म्हणाले, चारित्र्यनिर्माण करण्यासाठी प्रत्येक युवकाने पुढाकार घेतला पाहिजेत.आओ भलाई की तरफ म्हणजे या यशस्वीतेकडे या मोहिमेचा उद्देश युवकात चारित्र्यनिर्माण करणे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणे, त्यांच्यामधील गुणांना वाव देणे. वाईट गोष्टींना आळा घालण्यासाठी नमाज आणि अल्लाहशी जवळीकता निर्माण केल्यानंतर आम्ही या वाईट गोष्टींपासून दूर राहू शकतो असेही ते म्हणाले. प्रास्ताविक आसेफ सय्यद यांनी केले. ते म्हणाले, आज तरुण वर्गामध्ये पसरलेल्या वाईट सवयी जसे व्यसन, मोबाईलचा चुकीचा वापर, लग्नामध्ये होणाऱ्या अनावश्यक प्रथा, यासारख्या वाईट गोष्टींना आळा घालणेही या मोहिमेचा उद्देश आहे. त्यामुळे प्रत्येक युवकाने या मोहिमेत सहभागी होऊन चारित्र्यनिर्माणासाठी पुढाकार घ्यावा. यावेळी शहरातील रेड फ्लड फाउंडेशन, उस्मानपुरा बॉईज, जमात-ए-इस्लामी हिंदी निलंगा या उल्लेखनिय सामाजिक काम करणाऱ्या संघटनाचा स्मृतीचिन्ह देऊन जमाअतचे शहराध्यक्ष अशफाक अहमद यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
Post a Comment