सध्याच्या परिस्थितीत रस्त्यांचे खड्डे जीव घेणे झाले आहेत. पावसाळ्याची गंभीर परिस्थिती पहाता सर्वांनी स्वतःला सांभाळने गरजेचे आहे. यावर्षी पावसाने उग्र रूप धारण केल्याने राज्यात सर्वत्र पुरपरिस्थिती निर्माण होऊन संपूर्ण महाराष्ट्र जलमग्न झाल्याचे दिसून येते. सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पावसाच्या पाण्याने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. महाराष्ट्रात अनेक नद्यांना महापूर आलेला असून संपूर्ण नद्या तुडुंब भरून धोकादायक स्थितीमध्ये आहेत.यामुळे अनेक धरण भरल्याने प्रत्येक धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पुराने थैमान निर्माण केले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पुरांमुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्याचे दिसून येते.
त्याचप्रमाणे अती पावसामुळे ग्रामीण व शहरी भागातील रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने दुर्घटनांचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढले आहे जनुकाय रोडचे खड्डे "मौत का कुवॉ" बनल्याचे दिसून येते. त्यामुळे जीवीत हानी सुध्दा होत आहे. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत अवकाळी पाऊस व पावसाळ्यातील पाऊस यामुळे वीज कोसळून आतापर्यंत तब्बल 157 लोकांचा बळी गेला ही सुद्धा गंभीर व चिंतेची बाब आहे. या संपूर्ण भयावह घटना निसर्गाचे संतुलन डगमगल्याने निर्माण झाल्याचे दिसून येते. गेल्या तीन-चार दिवसांपासून विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात सतत मुसळधार पाऊस सुरू असल्याने ग्रामीण भागातील लहान मोठ्या नदी-नाल्यांना महापूर आलेला आहे.
विदर्भातील जुनापाणी गावाच्या शेजारी असलेल्या तलावाचा बांध फुटल्याने सर्वत्र हाहाकार उडाला.अशा अनेक घटना विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येत आहे. सध्याच्या परिस्थितीत अख्खा महाराष्ट्र पाण्याखाली आल्याचे दिसून येते. पावसामुळे दरवर्षी रोडला खड्डे पडतात यामुळे अनेक दुर्घटना होत असतात आणि यात अनेकांना आपला जीव सुध्दा गमवावा लागतो ही बाब महाराष्ट्रासह संपूर्ण देश चांगल्या प्रकारे जाणतो.
राज्यात तीन दिवस पुन्हा मुसळधार पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातील लोकांनी सावधान राहणे गरजेचे आहे. पावसाचे विक्राळ रूप पाहता व यामुळे निर्माण होणारी पूरपरिस्थिती, रस्त्यांना पडलेले खड्डे यामुळे होणाऱ्या दुर्घटना यापासून सतर्क राहणे गरजेचे आहे. त्यामुळे जनतेने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नदी-नाल्याचा पूर, रोडचे खड्डे यापासून सावध राहावे जेणेकरून आपल्याला जिवीत हानी टाळता येईल. कारण "जान है तो जहान है"हा मूलमंत्र सर्वांनीच अंगीकारला पाहिजे.
आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे की आगीशी व पाण्याशी खेळू नये. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत पावसाच्या पाण्यापासून सावधान रहाने अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे नदी-नाल्याच्या पुरातून जाऊ नये किंवा प्रवास करू नये व स्वतःचा जीव धोक्यात टाकू नये.आपल्या कामांना वेळ झाला तरी चालेल परंतु नदी-नाल्यांच्या पुरांशी मुजोरी करू नका व आपला जिव धोक्यात टाकू नका.
आज अनेक क्षेत्रातील घरे पाण्याखाली आलेली आहेत.सिमेंट रोडच्या सुविधा झाल्यात, परंतु प्रशासनाचे ड्रेनेजकडे दुर्लक्ष झाल्याने शहर सुध्दा जलमग्न झाल्याचे दिसून येते. याचा त्रास सर्वसामान्यांना आज भोगावा लागतो आहे. अतिवृष्टीमुळे राज्यात आतापर्यंत 104 लोकांचा बळी गेला तर 189 प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला. या व्यतिरिक्त जंगली प्राण्यांची सुध्दा पुरामुळे भयावह स्थिती निर्माण झाली आहे. अतिपावसामुळे राज्यातील 275 गावांना जबर फटका बसलेला आहे व काही गावांचा संपर्क सुध्दा तुटल्याचे दिसून येते.शहरात जिकडे-तिकडे सिमेंटीकरण झाले आहे. परंतु ड्रेनेजची सुविधा बरोबर नसल्याने शहरात सुध्दा जिकडे पहाल तीकडे आपल्याला पाणीच पाणी दिसून येत आहे.सध्याच्या परिस्थितीत पावसाच्या पाण्याने विक्राळ रूप धारण केल्याने पशुपक्षी व मानवजातीसाठी काळ बनल्याचे दिसून येते. नर्मदा नदीत एसटी डुबल्याने 13 लोकांचा मृत्यू झाला व 40 आताही बेपत्ता आहे. अशा भयावह घटना ऐकून अंगावर शहारे येतात. त्यामुळे सर्वांनीच नदी-नाल्याच्या पुरांपासून व मुख्यत्वेकरून रस्त्याच्या जीवघेण्या खड्ड्यांपासून सावधान राहून आपले कार्य करावे व "जान है तो जहान है" हा मुलमंत्र सर्वांनीच अंगीकारावा.
- रमेश कृष्णराव लांजेवार
नागपूर, मो.नं.9921690779
Post a Comment