मूल्य ही एक आदर्श चौकट असते. त्यानुसार माणूस वागला की तो घडतो. त्याला चांगल्या वर्तनाचे वळण लागते. शिक्षण म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाणारा, अविकसिततेकडून विकासाकडे घेऊन जाणारा, अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा आणि मानवाचे जीवन प्रकाशित करणारा मार्ग असतो. नीतिमुल्यांच्या शिक्षणाने व्यक्तीमत्व प्रकाशित होते. व्यक्तीच्या क्षमतांचा शोध लागतो.
पूर्वी माणसं जंगलात एकटे-एकटे रहायचे. कालांतराने टोळ्या करून एकत्र राहू लागले. आदीमानवात आणि जनावरांमध्ये फारसा फरक नव्हता. एकत्र वास्तव्य सुरू झाल्यानंतर वस्तूंची आपसात देवाणघेवाण सुरु झाली. पण त्या वस्तूंचे काही मूल्य नव्हते, फक्त मोबदला होता. एकमेकांचा मान सम्मान होता. या वर्तणातून काही मूल्य जन्माला आली आणि विकसीत झाली. जसं फूलांच्या पाकळ्या एकमेकांशी चिटकून राहतात तेव्हाच फूल तयार होेते तसेच ‘‘अनेक प्रकारचे मूल्य एकत्र आली तर सुंदर माणूसपणाचे दर्शन होते’’
मानवी जीवन हे सुखी, समाधानी व्हावे यासाठी व्यक्तिच्या, लोकसमूहांच्या व समाजाच्या काही धारणा असतात. मानवी जीवनासंबंधी आणि मानवाच्या सुखा-समाधानासाठी तयार झालेली समाजाची आचारसंहिता म्हणजेच ’’मूल्य’’ ज्या बाबींना आपण चांगले समजतो त्याचे शिक्षण म्हणजेच मुल्यांचे शिक्षण.
मूल्य शिक्षणापासून माणूूस कसा घडतो?
मूल्य ही एक आदर्श चौकट असते. त्यानुसार माणूस वागला की तो घडतो. त्याला चांगल्या वर्तनाचे वळण लागते. शिक्षण म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाणारा, अविकसिततेकडून विकासाकडे घेऊन जाणारा, अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा आणि मानवाचे जीवन प्रकाशित करणारा मार्ग असतो. नीतिमुल्यांच्या शिक्षणाने व्यक्तीमत्व प्रकाशित होते. व्यक्तीच्या क्षमतांचा शोध लागतो.
आपला भारतीय समाज एकसंघ आहे. धर्म, जात, भाषा, वेशभुषा सगळे-वेगळे असतानाही ’’विविधतेमधून एकता’’ हेे कशामुळे? याला आधार आहे ना मुल्यांचा! म्हणून आपलं वय वाढत असते ती दिवसांची बेरीज असते पण मुल्यांना धरून जगलेले जीवन खरं आयुष्य असतं. मूल्य नसतील तर माणूस सैतानासारखा वागतो. 21 व्या शतकात राहूनही आदी मानवांसारखा वागत असेल तर त्याला नीतिमुल्यांची शिक्षण अति गरजेची आहे.
नीतिमूल्यांचे शिक्षण नसल्याने आज भारतीय समाजामध्ये अनेक दुर्गुण निर्माण झालेले आहेत. त्यात नशा, बलात्कार आणि व्याभिचार या गोष्टी अशा आहेत की ज्यांमुळे समाज नासत चाललेला आहे. या गोष्टींसमोर पोलीस, कायदा, न्यायालये, सरकार यांनीच नव्हे तर समाजानेही गुडघे टेकलले आहेत. ’’आता हे तर चालणारच’’ असा गैरसमज, समाजाने करून घेतलेला आहे. जेव्हा समाजात एखादी वाईट गोष्ट रुजायला सुरुवात होते त्याच वेळेस तिचे समूळ उच्चाटन केले गेले पाहिजे, तसे न केल्यास भविष्यात ती वाईट गोष्ट समाजाला नाईलाजाने स्वीकारावी लागते. लिव्ह इन रिलेशनशिप भारतीय संस्कृतीचा भाग आहे का? का समलैंगिकता ही आपली संस्कृती आहे? तरी पण यांना समाजानेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मान्यता दिली आहे ना? या वाईट गोष्टींविरूद वेळीच संघर्ष न केल्याचा हा परिपाक आहे. पूर्वीच्या काळात रात्री चोऱ्या व्हायच्या. आज दिवसा होताना दिसत आहे. जास्त मागे जात नाही 50 वर्षा अगोदर भारतीय समाजामध्ये बलात्काराचे नाव ही नव्हते. 1972 साली भारतात पहिला बलात्कार घडला, कारण त्या अगोदर मुल्यवादी समाज होता. मुल्यांना सोडल्यामुळे आता दरदिवस 88 बलात्कारांची नोंदणी होते. अमानवीय खून, हिंसाचार, जाळपोळ यासारख्या सामाजिक भूकंपाने सामाजामध्ये अस्थिरता पाहायला मिळते. नातेसंबंध नावाला राहिले आहेत. नात्यांत कृत्रिमता निर्माण झाली आहे. ती घालविण्यासाठी मुल्यशिक्षण अनिवार्य आहे. नुसतं खा-पी आणि मजा करा याला चंगळवाद असे म्हणतात. चंगळवादी संस्कृतीतून शाळा, महाविद्यालये भरमसाठी निर्माण झाली. जवळपास तीन राज्यात केरळ, लक्षद्वीप व मिजोराममध्ये 100 टक्के साक्षरतेची नोंद झाली, लोकसंख्येत वाढ झाली पण माणुसकीमध्ये वाढ झाली नाही. गुन्हेगारीमध्ये घट झालेली दिसत नाही. असे शिक्षण काय कामाचे? नुसतं सुशिक्षित विद्यार्थी नाही तर सुसंस्कारित, चारित्र्यसंपन्न विद्यार्थीच देशाला प्रगतीकडे (भौतिक सुधारणा) नाही तर उन्नती (भावनिक साक्षरते)कडे घेऊन जाऊ शकतात.
आज फक्त रोजगारासाठी शिक्षण घेतले जात आहे. व्यक्तिसाठी, समाजासाठी, देशहितासाठी, संस्काराचे बीज रुजविण्यासाठी, माणुसकीचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी शिक्षण का नाही? यावर विचार झाला पाहिजे ना? अगदी लहानपणापासून मुलांच्या मनावर संस्काराचे धडे कोरले पाहिजेत. कारण नीतिमुल्यांमुळे नम्रता, आपुलकी , प्रेम, आज्ञाधारकपणा, दुसऱ्यासाठी काही तरी चांगले करण्याचा भाव स्वभावामध्ये निर्माण होतो. व्यक्तिला स्वत:वर नियंत्रण प्राप्त करता येते. संयम येतो, ज्ञानइंद्रिये व कामेंद्रियांना चांगली सवय लागते. माणसाचे साधे जीवनही नीतिमूल्य सांभाळून जगल्यास ते सोन्यासारखे होते.
नीतिमूल्यांना कसे जोपासावे?
नीतिमुल्यांना जोपासण्याचा एकमात्र उपाय हा स्वत:शी संघर्ष होय. आपल्या अधिकारांसाठी संघर्ष करणे हा मानवी स्वभाव आहे. लहानपणी चाकलेटसाठी संघर्ष, तारुण्यात चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी संघर्ष, मजूरी वाढवून मिळावी म्हणून मजूराचा संघर्ष तर नागरिकांना मुलभूत सुविधा मिळविण्यासाठी महापालिकेविरूद संघर्ष. हे सर्व योग्य संघर्ष आहेत यालाच इस्लाममध्ये ‘जिहाद’ असे म्हणतात. चांगल्या उद्देशाला प्राप्त करण्यासाठी सर्व शक्तिनिशी जो लढा दिला जातो तो जिहाद आहे. वरील सर्व संघर्ष हे जिहादच होय.
इंग्रजांच्या विरुद्ध गांधीजींनी जो संघर्ष केला होता तो हा एक जिहादच होता आणि सुभाषचंद्र बोस, अशफाकुल्लाह खान, रामप्रसाद बिस्मिल, भगत सिंग व इतर स्वातंत्र्यसैनिकांनी जो सशस्त्र संघर्ष केला होता तो सुद्धा जिहादच होता. मुस्लिम समाज हा रात्रंदिवस आपल्या नफ्स (चित्त, मन / अंतकरणात निर्माण होणाऱ्या वाईट इच्छा) विरूद्ध जिहाद करत असतो. याला जिहादे अकबर असे म्हणतात. मनात येतं की इतके लोक वाईन पीतात आपणही प्यावी. मात्र इस्लाम म्हणजो नाही ती हराम (अवैध) आहे. मग एका मुस्लिम व्यक्तीच्या अंतःकरणात एक संघर्ष सुरू होतो, प्यायची की नाही प्यायची? ईश्वराचे ऐकायचे की मनाचे ऐकायचे? कधी वाटते बेहिजाब फॅशन करून फिरावे, पण हा सैतानी विचार येताच एक मुस्लिम महिलेच्या मनात संघर्ष सुरू होतो, असे करायचे की नाही? हे तर हराम आहे, असे करू नकोस, मुलांना वाटते अश्लील व्हिडीओ पहावे पण इस्लाम म्हणतो नाही ते हराम आहे पाहू नकोस. थोडक्यात प्रत्येक वाईट गोष्ट जी करण्याची इच्छा होते तिच्याविरूद्ध अंतःकरणात जो संघर्ष चालतो तो जिहाद. या लढाईत ज्याने मनाचे ऐकले तो हरला आणि ज्याने ईश्वराचे ऐकले तो जिंकला. त्यातही जो जेवढा श्रद्धावान तो तेवढा या गोष्टींपासून दूर राहण्यात यशस्वी. नावाचे मुसलमान या लढाईत पराजित होतात.
नैतिक मुल्यांना नवजीवन देण्यासाठी स्वतःशीच जिहाद करावा लागणार आहे. चांगल्या गोष्टींच्या विरूद्ध जिहाद करता येत नाही. निरपराध लोकांविरूद जिहाद करता येत नाही. त्यांच्या विरूद्ध जिहादच्या नावाखाली ज्या हिंसा होतात त्या ‘‘फसाद’’ (दंगली) असतात. आपण राहत असलेली लोकतांत्रिक व्यवस्था ही पश्चिमेकडून घेतलेली आहे. यात स्त्री- पुरुष स्वतंत्रतेचा एवढा अतिरेक आहे की अश्लीलता आणि व्याभिचार यासाठी अनुकूल वातावरण तयार होते आणि परिणाम बलात्कार व व्याभिचार आणि नशेडी पीढि याशिवाय दुसरा कुठलाही असत नाही. यामध्ये मीडियाचाही सिंहाचा वाटा आहे. यामुळे सर्व वाईट गोष्टींच्या विरूद्ध उभे राहण्याची जबाबदारी आपण सर्व हिंदू-मुस्लिम आणि इतर समाजातील प्रत्येक व्यक्तीची आहे, जी या वाईट गोष्टींना वाईट समाजतात त्यांची आहे. भले पाश्चिमात्य देश आपल्याला आर्थोडॉक्स (पुराणमतवादी) म्हंटले तरी चालेल. किती चांगला होता तो आपला आर्थोडॉक्स देश ज्यात बलात्कार होत नव्हते, अश्लिलता, व्याभिचार नव्हता, न होती नशा. ओल्ड एज होम्स नव्हती. स्त्रियांवर कमाईचे ओझे नव्हते, न होते लेकरांचे हाल. तुर्कस्थान व स्पेश न या देशात मुसलमानांनी नैतिक मुल्यांच्या बळावर अनेक शतके शासन केले. सर्वोत्कृष्ट भौतिक प्रगती साध्य केली. स्पेनमधील मस्जिद ए कर्तबा ही एक इमारत पाहिली तर मती गुंग होते. हे त्यांचे सिविल इंजिनिअरिंगचे चमत्कार आजही माणसाला आश्चर्यचकित करतात. परंतू नैतिक मुल्यांच्या पतनामुळे स्पेन आणि उस्मानी सल्तनत लयास गेली.
सारांश हे की सुज्ञान आदर्श नागरिक आणि माणूस बनविण्यासाठी मुलांना नैतिक शिक्षण देणे व चांगले संस्कार करणे गरजेचे आहे. आणि नैतिक शिक्षणाचे सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मॉडेल इस्लाम आहे. अल्लाह सगळ्यांना नैतिक आचरणाची सद्बुद्धी देवो, आमीन.
- डॉ. सिमीन शहापुरे
8788327935
Post a Comment