Halloween Costume ideas 2015

सर्वांत चांगले कर्म कोणते? : पैगंबरवाणी (हदीस)


हजरत मआज बिन जबल (र.) यांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांना विचारले, कोणते असे कर्म सांगा जे केल्याने मला स्वर्गात प्रवेश मिळेल आणि नकरापासून दूर होईन. प्रेषितांनी उत्तर दिले, तुम्ही फार कठीण प्रश्न विचारलात. पण ज्याला अल्लाह सोपं करेल. त्यासाठी सोपं कर्मदेखील आहे. अल्लाहची उपासना करा, त्याचा कुणी भागीदार ठरवू नका, नमाज अदा करा, जकात देत राहा आणि रमजानचे रोजे ठेवा. आणि प्रेषित (स.) म्हणाले, मी तुम्हाला भलाईची दारं दाखवू नये? रोजा ढाल आहे आणि दानधर्म कुकर्मांना असे विझवतो जसे आगीला पाणी विझवून टाकते आणि रात्रीच्या वेळी नमाज अदा करा. आणि प्रेषित (स.) म्हणाले, मी तुम्हाला सर्वांत महत्त्वाची गोष्ट सांगू नये? आणि जीभ धरून म्हणाले की हिला नियंत्रणात ठेवा.

मअज (र.) यांनी विचारले, हे प्रेषित, आम्ही जे काही बोलत असतो त्यावरदेखील आमची पकड होईल?

प्रेषित (स.) म्हणाले, लोकांना नरकाच्या खाईत लोटणारी वस्तू त्यांच्या बोलण्याव्यतिरिक्त काय असू शकते.

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, आचरण करत राहा. ज्या कुणाला ज्या कार्यासाठी जन्माला घातलेले असेल ते कार्य त्यास सोपे असते. नेक लोकांसाठी नेकीचे आचरण करणे सोपे केले जाते आणि कंजूस लोकांसाठी कंजूसपणा सोपा केला जातो. 

प्रेषितांनी पवित्र कुरआनातील ही आयत ऐकवली,

“ज्याने अल्लाहच्या कारणास्तव संपत्ती दिली आणि अल्लाहची अवज्ञ करण्यापासून स्वतःला वाचवले, आम्ही त्याचा मार्ग सुकर करतो. आणि ज्याने कंजूसपणा केला, विधात्याकडे लक्ष दिले नाही आणि भलाईच्या कर्मांना खोटे ठरवले, आम्ही त्याला कठीण मार्गाकडे चालवितो.” (सूरह अल् लैल-८), (संदर्भ- तिर्मिजी)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले की अल्लाहने काही गोष्टी अनिवार्य केल्या आहेत, त्यांना वाया जाऊ देऊ नका. काही मर्यादा घातलेल्या आहेत त्यांचे उल्लंघन करू नका, काही गोष्टी निषिद्ध केल्या आहेत त्यांच्या विरुद्ध जाऊ नका आणि काही गोष्टींविषयी तुमच्यावर दया दाखवत अल्लाहने मोन बाळगले आहे, त्यांच्या बाबतीत उहापोह करू नका. (दारकुतनी : (ह. अबू साअलबा खशतिनी)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, अल्लाहने आपल्या ग्रंथामध्ये जे काही वैध ठरवले आहे ते वैध आहे, जे निषिद्ध ठरवले आहे ते वर्ज्य आहे आणि ज्या गोष्टींबाबत मौना बाळगले आहे त्यासाठी क्षमा केली आहे. अल्लाहच्या या देणगीचा स्वीकार करा, अल्लाह काहीच विसरत नसतो. पवित्र कुरआनमध्ये अल्लाह म्हणतो,

“हे प्रेषित, त्यांना सांगा, अल्लाहने जे निषिद्ध ठरवले आहे ते हे की उघड किंवा गुप्तपणे निर्लज्जतेचे कार्य व गुन्हा आणि रास्त गोष्टींविषयी अतिरेक नको. आणि अल्लाहबरोबर इतर कुणासही भागीदार करू नका आणि अल्लाहचे नाव घेऊन अशी कोणती गोष्ट सांगू नका ज्याविषयी तुम्हाला माहिती नाही की अल्लाहने तसे म्हटले असेल.” (पवित्र कुरआन, अल आअरफ-२३)

संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget