Halloween Costume ideas 2015

स्वर्गद्वार

एक सुंदर सुविचार आहे की "संध्याकाळच्या जेवणाची चिंता करते ती "आई" आणि आयुष्यभराच्या जेवणाची चिंता करतात ते "बाबा". फादर्स डे दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा करण्यात येतो जेणेकरून आम्ही वडिलाला वर्षभरात एकदा तरी शुभेच्छा व भेट देऊ.

वडील एक अशी व्यक्ती आहे जी मुलांसाठी सतत कष्ट करीत असते. मुलाच्या जन्मावर अति आनंदित होऊन गल्ली मोहल्ल्यात पेढे -मिठाई वाटणारी व्यक्ती म्हणजे वडील .आमच्या साठी संपूर्ण जीवन सतत झटणारी व्यक्ती म्हणजे वडील. आमचे बोट धरून चालणे शिकवणारी व्यक्ती म्हणजे वडील .शाळेत नाव दाखल करून देणारी व वर्गाबाहेर आमच्यासाठी बसणारी व्यक्ती म्हणजे वडील. आम्हाला शालेय वस्तू व गणवेश खरेदी करून देणारी व्यक्ती म्हणजे वडील .जत्रेला आपल्या खांद्यावर बसवून आम्हाला खेळ -तमाशा दाखवणारी व्यक्ती म्हणजे वडील. आम्ही आजारी पडलो तर रात्रभर जागरण करणारी व्यक्ती म्हणजे वडील .आमच्यासाठी दवाखान्याची चक्कर काढणारी व्यक्ती म्हणजे वडील .चांगल्या विद्यालयात महाविद्यालयात ॲडमिशन करून घेण्यासाठी काहीतरी करून "डोनेशन" भरणारी व्यक्ती म्हणजे वडील. खिसा रिकामा असला तरीही कधी "नाही" न म्हणणारी व्यक्ती म्हणजे वडील .आमच्या लग्नासाठी कर्जबाजारी होऊन धूमधडाक्याने लग्न करून देणारी व्यक्ती म्हणजे वडील. आमच्या कल्याणासाठी रात्रदिवस एक करणारी व्यक्ती म्हणजे वडील.स्वतःपेक्षा आपल्या मुलांना यशस्वी बनवू इच्छिणारी व्यक्ती म्हणजे वडील. आपले दुःख मनात ठेऊन आम्हाला आनंद देणारी व्यक्ती म्हणजे वडील. वडीलाचे अनेक उपकार आमच्यावर असते ज्याची परतफेड या जीवनात तरी आम्ही अदा करू शकत नाही म्हणून एका उर्दू शायरने म्हटले आहे की,

"मुझको छांव मेें रखा और खुद जलता रहा धूप में

मैने देखा है एक फरिश्ता बाप के रूप में।"

वडिलांचे आपल्या जीवनात उच्चस्थान असते. इस्लाम मध्ये देखील वडीलाचे महत्त्वाचे स्थान आहे दिव्य कुरआनात अल्लाह आदेशित करतो की,

"आईवडिलांशी सद्वर्तन करा "(दिव्य कुरआन, अलअनाम)

"आईवडिलांशी सद्वर्तन करा जर तुमच्यापाशी त्यांच्यापैकी कोणी एक अथवा दोघे वृद्ध होऊन राहिले तर त्यांच्यासाठी "ब्र"शब्द देखील काढू नका व त्यांना झिडकारून  प्रत्युत्तर देखील देऊ नका". (दिव्य कुरआन, बनीइस्राईल)

अल्लाहचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद (स.) म्हणतात की, ज्याचे आई-वडील पैकी एक किंवा दोघी वृद्ध होऊन राहिले तरी तो त्यांची सेवा करून स्वर्ग प्राप्त करू शकला नाही तर त्याच्या पेक्षा दूरभाग्यवान कोणीच नाही. (हदीस)

एका युद्धाच्यावेळी प्रेषित मुहम्मद (स.) यांचे एक सहकारी मित्र आले आणि त्यांनी युद्धात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली त्याप्रसंगी प्रेषितांनी आपल्या सहकारी मित्राला विचारले की तुझ्या आई वडिलापैकी कोणी जिवंत आहे का! त्यांचे सहकारी मित्र म्हणाले होय दोघेही जिवंत आहे. प्रेषितांनी सहकारी मित्राला सांगितले की तुम्ही तुमच्या आई वडिलाजवळ परत जा आणि त्यांची चांगल्या प्रकारे सेवा करा. (बुखारी)

प्रेषितांनी चार गोष्टींना महापाप घोषित केले आहे. एक अल्लाह खेरीज इतर वस्तूंची पूजा उपासना करणे. दुसरे आईवडिलांशी गैरवर्तणूक करणे . तिसरे आत्महत्या किंवा खून करणे . चौथे जाणून-बुजून खोटी शपथ घेणे.

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की ‘‘सर्वात मोठी नेकी ही आहे की कुणी व्यक्ती आपल्या वडिलांच्या मित्राशी सद्वर्तनाने वागतो.’’ (हदीस)

यावरून आपल्या लक्षात आले असेल की  आई-वडिलांचा उच्च दर्जा इस्लाममध्ये आहे. आई-वडिलांशी सद्ववर्तन करणे, त्यांची सेवा करणे, त्यांच्याशी नम्रतेने बोलणे ,त्यांच्या मित्रांशी चांगले प्रकारे वागणे, त्यांचा आदर-सन्मान करणे इत्यादी मार्गदर्शन आम्हाला दिव्य कुरआनात व प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या पवित्र जीवनात आढळतात.

सद्यस्थितीत आपल्या समाजात असे दिसून येते की आई-वडिलांशी सद्वर्तन होत नाही .काही नालायक अवलाद त्यांच्याशी अपशब्द वापरतात त्यांची सेवा करीत नाही. नोकरी लागली की त्यांना एकटे सोडून शहरात पलायन करतात  त्यांचे आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेत नाही. काही युवक तर आई-वडिलांशी भांडणे देखील करतात. मारहाण देखील करतात. लाजिरवाणी गोष्ट म्हणजे वृद्ध आई-वडिलांना ओल्ड एज होम सेंटर वृद्ध आश्रमात बंदिस्त करून टाकतात.

जर खऱ्या अर्थाने आम्हाला फादर्स डे साजरा करायचे असेल तर वडिलांशी सद्वर्तन करा, त्यांची सेवा करा, आरोग्याची काळजी घ्या, त्यांच्यासोबत बसा, त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांना एकटे सोडू नका, वृद्ध आश्रमात त्यांना कैदी प्रमाणे कोंडू नका, त्यांना स्वतंत्र द्या, त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्याकरिता पैसे द्या, कारण आई किंवा वडील जीवनात एकदाच भेटत असते. ज्यांचे आई-वडील हयात नाही त्यांना आई-वडिलांचे महत्त्व विचारा. आज आपल्याजवळ जे काही साधन संपत्ती आहे ती सर्व आईवडिलांचे कष्टाचे फळ आहे. त्यांच्यावर भरपूर खर्च करा, त्यांना आनंदी ठेवण्याचे नेहमी व सतत प्रयत्न करा कारण या जीवनानंतर एक दुसरे जीवन देखील आहे. ते म्हणजे मरणोत्तर जीवन. आपल्याला ईश्वरासमोर अल्लाह समोर जाब द्यायचा आहे .मरण्या अगोदर मरणोत्तर  जीवनाची तयारीला लागा आणि याची सुरुवात आई वडीलाची सेवेपासून करा. शेवटी प्रेषित मुहम्मद (स.) यांचा एक आदेश मी सांगू इच्छितो की प्रेषित मुहम्मद म्हणतात की,

"आईच्या पायाखाली स्वर्ग आहे आणि वडील स्वर्ग द्वार आहे."

म्हणजे जर आपल्याला मरणोत्तर जीवनात स्वर्गामध्ये उच्च स्थान प्राप्त करायचे असेल तर एक ईश्वराची भक्ती करा ,आई आणि बाबांची सेवा करा कारण की स्वर्ग त्यांच्या सेवेतच आहे.


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget