(२२) आणि जेव्हा तो आपल्या भर तारुण्यात पोहचला तेव्हा आम्ही त्याला निर्णयशक्ती आणि ज्ञान प्रदान केले,२० अशाप्रकारे आम्ही सदाचारी लोकांना मोबदला देत असतो.
१६) बायबलमध्ये त्या माणसाचे नाव फोतीफार लिहिले आहे. कुरआन या व्यक्तीला `अजीज' या नावाने ओळखतो. एके ठिकाणी कुरआन हीच उपाधि (अजीज) पैगंबर यूसुफ (अ.) यांच्यासाठीसुध्दा वापरतो. यावरुन माहीत होते की ही व्यक्ती इजिप्त्मध्ये एक मोठा पदाधिकारी होती. `अजीज'चा अर्थ सत्ताधारी ज्याचा विरोध केला जात नाही. बायबल आणि तलमूदच्या वर्णनात त्याला सुरक्षाधिकारी म्हटले आहे. इब्ने जरीर माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (रजि.) यांचे कथन आहे की ती व्यक्ती राजकोषाधिकारी होती.
१७) तलमूदमध्ये त्या स्त्रीचे नाव `जुलेखा' (नशश्रळलहर) लिहिले आहे आणि येथून मुस्लिमांच्या कथनामध्ये ती घटना प्रयुक्त झाली आहे. पैगंबर यूसुफ (अ.) यांचा विवाह नंतर या स्त्रीशी झाला होता, याचा मात्र आधार सापडत नाही. असा उल्लेख कुरआनमध्ये आणि इस्राईली इतिहासातसुद्धा सापडत नाही. खरे तर एका पैगंबरपदाला हे अशोभनिय आहे की त्याने एका दुर्वर्तनी स्त्रीशी विवाह करावा आणि ते दुर्वर्तनसुद्धा स्वत: अनुभवावे! कुरआनने एक मूळ नियम स्पष्ट सांगितला आहे,
``वाईट स्त्रिया वाईट पुरुषांसाठी आणि वाईट पुरुष वाईट स्त्रियांसाठी आहेत आणि पवित्र स्त्रिया पवित्र पुरुषांसाठी आणि पवित्र पुरुष पवित्र स्त्रियांसाठी आहेत.'' (कुरआन, २४ :६)
१८) तलमूदचे वर्णन आहे की त्यावेळी पैगंबर यूसुफ (अ.) यांचे वय १८ वर्षाचे होते आणि फोतीफार त्यांचे शानदार व्यक्तित्व पाहून हा मुलगा गुलाम नाही, हे ओळखून बसला होता. हा मुलगा खानदानी घराण्याचा असून तो काही परिस्थितीमुळे येथे आला आहे. त्या मुलाला खरेदी करताना त्याने त्या लोकांना विचारले की हा मुलगा गुलाम दिसत नाही. मला शंका आहे की तुम्ही याला चोरून येथे आणले आहे. याच आधारावर फोतीफारने मुलाशी गुलामासारखा व्यवहार कधीच केला नाही, तर त्याला आपल्या घरात ठेवून आपल्या संपत्तीचा अधिकारी बनविले. बायबलचे असेच वर्णन आहे. (पाहा उत्पत्ति- ३९ :६)
१९) पैगंबर यूसुफ (अ.) यांचे तोपर्यंतचे जीवन कनआनच्या वाळवंटात भटकत राहून जनावरे चारणाऱ्यात गेले. तेथे त्यांना विशेषता आदिवासी जीवन आणि इब्राहीम घराण्यातील एकेश्वरत्वाची व धार्मिकतेची शिकवण मिळाली होती. अल्लाह मात्र त्यांच्याकडून तात्कालीन प्रगत देश इजिप्त्मध्ये काम घेऊ इच्छित होता. यासाठी लागणारे ज्ञान, माहीती अनुभव आणि बुद्धीविवेक इ. गुणांच्या वाढीसाठी खेडूत जीवनात वाव नव्हता. म्हणून अल्लाहने आपल्या पूर्ण सामथ्र्यानिशी यूसुफ (अ.) यांना इजिप्त्च्या मोठ्या अधिकाऱ्याच्या घरात प्रवेश दिला. त्या अधिकाऱ्याने यूसुफ (अ.) यांचे असाधारण कर्तृत्व पाहून त्यांना आपल्या जहागिरीचा अधिकारी बनवून टाकले. या वातावरणात यूसुफ (अ.) यांची पूर्ण क्षमतेने आणि योग्यतेने वाढ होत गेली. त्यांना मिळालेल्या अधिकाराचा वापर करून ते भविष्यात मिळणाऱ्या राज्याधिकारासाठी योग्यता प्राप्त् करत गेले. याच विषयाकडे या आयतीमध्ये संकेत आहे.
२०) कुरआनच्या भाषेत याचा अर्थ साधारणत: पैगंबरत्व प्रदान करणे आहे. मुळात `हुक्म' हा शब्द आला आहे. याचा अर्थ निर्णयशक्तीसुद्धा आहे आणि `सत्ता'सुद्धा आहे. अल्लाहकडून दासाला `हुक्म' देणे म्हणजे अल्लाहने त्याला मानवी जीवनाच्या व्यवहारात, निर्णयक्षमता बहाल केली आहे आणि अधिकारसुद्धा दिले आहेत. `ज्ञान'पासून तात्पर्य सत्याचे विशेष ज्ञान आहे. हे सत्यज्ञान पैगंबरांना प्रत्यक्ष दिव्य प्रकटनाद्वारे दिले जाते.
Post a Comment