जिसे न जलने की ख्वाहिश न खौफ बुझेन का
वही चराग हवा के असर से बाहर है
शुक्रवार, 8 जुलै 2022 रोजी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची गोळी झाडून एका माथेफिरूने हत्या केली. ही घटना भविष्यात जगाला कलाटणी देणारी ठरू शकेल. कारण इतर देशासारखी बंदूक संस्कृती जपानमध्ये नाही. जपान भौतिकदृष्ट्या जगात अग्रेसर देशांपैकी एक देश. तेथे जीवनमान अतिशय उच्चदर्जाचे, वयोमान जगात सर्वांपेक्षा जास्त, हॅपिनेस इंडेक्समध्ये जपान पहिल्या पाचमध्ये येतो, कठीण प्रयत्न करून सुद्धा तिथे बंदुकीचे लायसन्स मिळत नाही. अशा परिस्थितीतही तिथे तेत्सुया यामागीनी नावाच्या 41 वर्षाच्या एका तरूणाने स्वतः एक क्रूड बंदुक तयार केली व आबे यांच्यावर गोळी झाडली जी त्यांच्या मानेत घुसली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यामागीनी याच्या मनामध्ये एका खास संघटनेबद्दल वैर होते, जिचा संबंध शिंजो आबे यांच्याशी होता. त्या संघटनेला यामागीनी याच्या आईने आपली सर्व संपत्ती दान केली होती. यामागीनी याने जपानी नौदल आणि मेरिटाईम्स सेल्फ डिफेन्स फोर्समध्ये काम केले होते.
जपानमध्ये सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले शिंजो आबे यांची हत्या अनेक अर्थांनी जगाला आंतर्मुख करणारी आहे. कारण 2014 मध्ये बंदुकीने हिंसा केल्याच्या फक्त 6 घटना झाल्या होत्या. त्याच वर्षी अमेरिकेमध्ये बंदुकीने 33 हजार 599 लोक मारले गेले होते. (संदर्भ : ऑनलाईन बीबीसी, दि. 9 जुलै 2022) शिंजो आबे 2006 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान बनले. दरम्यान आरोग्याच्या कारणामुळे त्यांनी राजीनामा दिला होता परंतु पुन्हा 2012 साली ते पंतप्रधान झाले. त्यांच्या हत्येसंबंधी चीन आणि कोरिया वगळता अख्या जगाने हळहळ व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी तर या संदर्भात म्हटले आहे की, ‘‘शिंजो आबे के साथ मेरा जुडाव कई साल पुराना है. मैं गुजरात के मुख्यमंत्री के अपने कार्यकाल के दौरान से उन्हें जानता था. मैं प्रधानमंत्री बनने के बाद भी हमारी दोस्ती जारी रही. अर्थव्यवस्था और वैश्विक मामलों में उनकी समझ ने मुझपर गहरी छाप छोडी. है.’’
सगळ्या जगाला हा प्रश्न पडला आहे की शेवटी जपानमध्ये अशी घटना कशी घडू शकते. अनेक लोकांचा असा होरा आहे की, धर्मामुळे हिंसाचार वाढतो. परंतु जपानमध्ये तर कोणत्याही धर्माला सरकारी मान्यता नाही. जरी जपानचे लोक बौद्ध धर्माचे पालन करीत असले तरी धर्माच्या बाबतीत ते फारसे गंभीर नाहीत. जपानमध्ये नास्तीकांची संख्या अधिक आहे. जपान म्हणजे एक शांतीप्रिय देश आहे. उद्योगांमध्ये रमणारे लोक, गुन्हेगारीशी ज्याचा संबंध नाही असा समाज, अशा समाजातही सुरक्षा यंत्रणेच्या उपस्थितीत यामागीनी याने त्यांच्या अगदी जवळ जावून अगदी मानेत गोळी मारली. हे कसे शक्य झाले? यामागीनी बद्दल पोलीस सुत्रांनी असे सांगितले की, ‘‘तो एकटा होता. एकटेपणामुळे त्याच्या मनावर विपरित परिणाम झाला होता.’’ जपानमध्ये एकटे राहून शांतपणे जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. हे लोक कोणाशी ना कोणाशी नाराज असतात. राजधानी टोकिओमध्ये 2019 मध्ये एका व्यक्तीने क्योटो भागातील एका लोकप्रिय अॅनिमेशन स्टुडिओमध्ये एकट्यापणाच्या रागातून आग लावली होती. ज्यात 36 लोकांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा आरोपीने स्टुडिओबद्दलची नाराजीचे कारण सांगितले. प्रगत देशांमध्ये कोण, कशाबद्दल, केव्हा नाराज होईल आणि मोठी घटना घडवून आणेल याबद्दल नेमके काहीएक सांगता येत नाही. अमेरिकेमध्ये जो की जगातील सर्वात प्रगत देश मानला जातो, त्यात दररोज कुठे ना कुठे गोळीबाराच्या घटना घडतात आणि लोक हाकनाक मारले जातात. एकटेपणामुळे आलेल्या वैफल्यातून केली जाणारी गुन्हेगारी असो की प्रगत राष्ट्रात असलेल्या वांझोट्या संपन्नतेतून निर्माण झालेल्या विकृतीमुळे असो सातत्याने हिंसक घटना घडत असतात आणि त्यात निरपराध माणसं मारली जातात. ही एक मानसिक समस्या आहे. संपन्नतेतून मानसिक समस्या उद्भवण्याचे प्रकार आता जगाच्या प्रत्येक पुढारलेल्या देशात नित्याच्या झालेल्या आहेत. अमेरिका आणि युरोपमध्ये सर्वाधिक मेडिकल प्रॅ्निटस ही मनोचिकित्सकांचीच चालते. हे या गोष्टीचे द्योतक आहे की, भौतिक संपन्नतेमुळे माणसाचे जीवन परिपूर्ण होत नाही.
माणसाचे जीवन परिपूर्ण कसे होते?
या प्रश्नाचे उत्तर देताना जमाअते इस्लामी हिंदचे संस्थापक मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी म्हटले आहे की, ’’नैतिक शक्ती की प्रचुरता भौतिक संसाधनों की कमी की भरपाई कर सकती है पर भौतिक संसाधनों की प्रचुरता नैतिक शक्ती के कमी की भरपाई कभी नहीं कर सकती.’’ मनुष्याचा मूळ स्वभाव त्याचे कर्म आणि जीवनाची कार्यप्रणाली ही त्याच्या धर्मावर आधारित असते. माणूस धार्मिक असेल तर धर्मातून प्रेम, त्याग, करूणा, मान, सन्मान, मर्यादा आणि संस्काराच्या चांगल्या भावना उत्पन्न होतात. परंतु जेव्हा माणसं धर्मापासून दूर जातात तेव्हा पतनाकडे अग्रेसर होत जातात. जो जेवढा धर्मापासून दूर तो तेवढा पतीत होत जातो, स्वार्थी होत जातो आणि आपल्या स्वार्थ सिद्धीसाठी भ्रष्ट मार्गाने संपत्ती कमाविण्यामध्ये त्याला कुठलीही अडचण भासत नाही. स्वार्थी व्यक्ती इच्छा आणि आकांक्षाचा दास होऊन जातो. त्यांच्या पूर्ततेसाठी रात्रं-दिवस प्रयत्नरत असतो. आणि इच्छा आणि आकांक्षा यांना कुठलीच मर्यादा नसते. रोज नवनवीन इच्छा माणसाच्या मनामध्ये निर्माण होत असतात. एक ईच्छा पूर्ण झाली नाही की दूसरी निर्माण होते. ती पूर्ण होते न होते तोच तीसरी उत्पन्न होते. एकाच वेळेस अनेक इच्छा-आकांक्षा मनामध्ये आकार घेतात व त्यांच्या पूर्ततेसाठी पैशाची गरज भासत असते. मग असे लोक पैसे मिळविण्यासाठी वाट्टेल त्या मार्गाचा उपयोग करतात आणि अशा स्वार्थी समाजात ज्याच्याकडे पैसा असेल त्यालाच सन्मान मिळतो. मग त्याने पैसा कसा कमावला याकडे कोणी फारसे लक्ष देत नाही. कुठल्याही मार्गाने पैसा कमाविलेल्या प्रत्येक माणसाला जेव्हा समाजमान्यता मिळते तेव्हा वाममार्गाने संपत्ती कमाविण्यासाठी एक आंधळी स्पर्धा सुरू होते जिला कुठलेच निर्बंध राहत नाहीत. अशा समाजामध्ये नीती नियमांचे सर्व मापदंड कोसळून पडतात. अशा समाजातील पुरूष हे, स्त्री आणि संपत्ती यांच्याच पाठलागामध्ये आयुष्य खर्ची घालतात. या दोन गोष्टी प्राप्त करण्यासाठी ते रात्रंदिवस प्रयत्नशील असल्यामुळे इतर कुठलीही घरेलू आणि सामाजिक जबाबदारी स्वीकारण्याची त्यांची तयारी नसते. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्ती एकटी राहण्याचा प्रयत्न करते. शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी अशा समाजामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपची कायदेशीर सोय केली गेली असल्यामुळे स्त्री पुरूष दोघेही एकाचवेळेस अनेक लोकांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास असतात किंवा किंबहुना ठेवतात. या सर्व धावपळीमध्ये त्यांना मुलं जन्माला घालण्याचा विसर पडतो. म्हणून अमेरिका आणि युरोपच्या अनेक देशांचा जन्मदर गेल्या कित्येक वर्षांपासून स्थिरच नव्हे तर मायनसमध्ये गेलेला आहे. नैतिक बंधने अशा समाजामध्ये झुगारून देण्याची प्रवृत्ती वाढते. धर्म जोखड असल्याची भावना निर्माण होते. नीती नियम हे त्यांना आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर अंकुश लावणारी वाटतात. त्यामुळे अशा समाजातील लोकांचे चित्त कायम सैरभैर असते व ते स्वैराचाराकडे आकर्षित होतात आणि अख्खे आयुष्य त्यातच घालवतात. मग अशा समाजात बालगुन्हेगारी वाढते, स्त्री-पुरूषांच्या संबंधामध्ये अविश्वास वाढतो आणि त्यातून लैंगिक गुन्हे वाढतात. अमेरिकेमध्ये होत असलेल्या महिलांच्या हत्त्यांच्या एकूण आकडेवारीपैकी 50 टक्क्यांपेक्षा जास्त महिलांचे खून त्यांच्याच पुरूष मित्रांकडून केले जातात अशी आकडेवारी अनेक सर्वेक्षणातून पुढे आलेली आहे.
शिंजो आबे यांच्या हत्येनंतर जपानची पौरवात्य जीवनशैलीवरही आता प्रश्नचिन्ह लागला आहे. शिवाय, जगात सर्वाधिक आत्महत्या करणाऱ्यांचा देश जपानच आहे. आत्महत्येसाठी ‘हराकिरी’ हा जो शब्द आपल्याकडे प्रचलित आहे तो सुद्धा जपानी शब्द आहे. जपानमध्ये हराकिरी नावाचा एक डोंगर आहे ज्यावर वैफल्यग्रस्त लोक चढून जातात आणि वरून स्वतःचा कडेलोट करून टाकतात. ज्यात मृत्यू निश्चित असतो. थोडक्यात अमेरिकीची चंगळवादी जीवनशैली ही माणसाला मनोरूग्ण करून विनाशाकडे नेणारी असल्याचे दिसून येते तर दूसरीकडे पुर्वेकडील संपन्न जीवनशैली सुद्धा आत्महत्या आणि हत्येकडे नेणारी दिसून येते. या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेतील मुस्लिम देशांमधील जीवनशैली ही एवढी सक्षम जरूर आहे की त्यामुळे त्या देशात गुन्हेगारी नाही, मनोरूग्ण नाहीत, वृद्धाश्रमे नाहीत, सऊदी अरबमध्ये तर गुन्हेगारीचे प्रमाण जवळपास शुन्य असते. तेथील पोलिसांना वाहतूक नियमन आणि इतर सामाजिक उपक्रम करण्याचेच कर्तव्य बजावावे लागते. अशा परिस्थितीत इस्लामी जीवनशैली हीच माणसाला यशस्वी जीवन प्रदान करण्यामध्ये सक्षम ठरू शकते, हे स्पष्ट होते.
इस्लामचा कसा फायदा होतो?
या संदर्भात जमाअते इस्लामी हिंदचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी म्हणतात की, ’’इस्लाम का सबसे बडा फायदा ये है के, जैसे ही इन्सान शऊरी तौर पर इमान लाता है उसके बुनियादी अख्लाक की शुरूवाती मंजील पर ही उसके ऊंचे अख्लाक की एक बुलंद और शानदार मंजील तयार हो जाती है. जिसके जरीये इन्सान अपने मर्तबे की उस बुलंदी पर पहूंच जाता है जो उसके नफ्स (चित्त) को खुदगर्जी की नफ्सियात (मानसिकता), जुल्म (अत्याचार), बेहयाई (निर्लज्जपणा), गंदगी और आवारगी (स्वैराचार) से पाक कर देता है और उसमें खुदातरसी (ईशपारायणता), तक्वा (ईश्वराची भीती), परहेजगारी (चांगले चारित्र्य), हकपरस्ती (सत्यवादीपणा) पैदा करता है. उसके अंदर अख्लाकी ज़िम्मेदारीयों के शऊर और एहसास को उभारता है, उसे नफ्स को नियंत्रण में करने का आदी बनाता है. उसे सभी मख्लूकों (जीवों) के लिए करम करनेवाला (कृपाळू), खुले दिलवाला, रहेम करनेवाला (दयावान) इतनाही नहीं हमदर्द, इमानदार, बेगरज (निस्वार्थीर्), खैरख्वाह (लोकोपयोगी), बिना किसी तरफदारी के इन्साफ करनेवाला, हर हाल में सच्चा और सच्चे रास्ते पर चलनेवाला बना देता है. और उसमें एक ऐसा बुलंद किरदार (चरित्र) पैदा करता है के जिससे हमेशा सिर्फ भलाई की उम्मीद हो और बुराई का कोई अंदेशा न हो. (संदर्भ : रूदाद भाग 3, पान क्र. 162).
थोडक्यात श्रद्धेचा जीवनशैलीवर अनिवार्य असा परिणाम होत असतो आणि श्रद्धेमध्ये इस्लामी श्रद्धा ही जगातील सर्वात आधुनिक श्रद्धा असून, जवळपास 200 कोटी लोक भूतलावर या श्रद्धेचा पुरस्कार करून जीवन जगत आहेत. यातील ते लोक यशस्वी आहेत ज्यांनी इस्लामच्या मूल तत्वांचा अंगीकार जीवनशैली म्हणून केलेला आहे आणि ते मुसलमान तेवढेच अयशस्वी आहेत जे नावाचे मुसलमान आहेत आणि इस्लामी मूलतत्वावर आधारित जीवनशैलीचा ज्यांनी प्रत्यक्षात त्याग केलेला आहे. जगामध्ये पुर्वेकडील जपानी जीवनशैली मानवाला यशस्वी करण्यासाठी उपयोगी आहे ना पाश्चिमात्य जीवनशैली उपयोगी आहे, फक्त इस्लामी जीवनशैली हीच मानवाला उपयोगी जीवनशैली आहे. मग ही गोष्ट कोणाला आवडो की न आवडो. कुरआनने इस्लामचा द्वेष करणाऱ्यांच्या बाबतीत स्पष्ट म्हटलेले आहे की, ‘‘तोच तर आहे ज्याने आपल्या पैगंबर (स.) ला मार्गदर्शन आणि सत्यधर्मासह पाठविले आहे जेणेकरून त्याला समस्त धर्मांवर प्रभुत्व द्यावे मग अनेकेश्वरवाद्यांना ते कितीही अप्रिय का वाटू नये.’’ (सुरे अस्सफ क्र. 61 : आयत नं.9)
जगात महासत्तेचा आरंभ साधारणतः आठव्या शतकापासून झाला. सुरूवातीला मुस्लिम महासत्ता उदयास आली. त्यानंतर युरोपने मुस्लिम महासत्तेला मागे टाकत ब्रिटनच्या नेतृत्वाखाली महासत्तेचा मान पटकावला. त्यांना महासत्ता बनविण्यामध्ये औद्योगिक क्रांतीची मोठी भूमीका होती. मुसलमान यात मागे पडले. आज 21 व्या शतकातही मुस्लिम जगाने औद्योगिक पर्वामध्ये प्रवेश देखील केलेला नाही. युरोपने भौतिक प्रगती साध्य केली ती चर्चेसना उध्वस्त करून केली. औद्योगिक क्रांतीपूर्वी युरोपमध्ये धर्मसत्ता होती. सर्व कारभार चर्चमधून चालायचा. विज्ञान आणि तंत्रज्ञानाला कवडीची किमत नव्हती. म्हणून युरोपियन लोकांनी चर्चचे ऐकणे बंद केले आणि तंत्रज्ञानाची कास धरली. मात्र मुस्लिमांकडे जेव्हा महासत्ता होती त्या काळात विज्ञान, तंत्रज्ञान आणि आरोग्य शास्त्रामध्ये नेत्रदिपक अशी प्रगती झाली होती. यावरून एक गोष्ट सिद्ध होते की, भौतिक प्रगतीमध्ये इस्लामी श्रद्धा अडथळा बनत नाही. उलट इस्लामी श्रद्धेमुळे भौतिक प्रगतीवर नैतिकतेेचे अंकुश लावले जाते, म्हणून ती अधिक लोकोपयोगी होते. आजच्या सारखी अनियंत्रित होत नाही.
दुसऱ्या महायुद्धानंतर खिलाफते उस्मानियाच्या 1924 साली झालेल्या पाडावनंतर मुस्लिम धर्मसत्ता लयाला गेली. आज पृथ्वीच्या नकाशावर जरी 57 मुस्लिम राष्ट्रे दिसत असली तरी त्यातील एकही राष्ट्र खऱ्या अर्थाने इस्लामी नाही फक्त मुस्लिम आहेत. ते सर्वच्या सर्व युरोपप्रणित भांडवलशाही प्रदान लोकशाही किंवा घराणेशाहीवर आधारित राजेशाहीवर चालतात. भांडवलशाही व्यवस्थेचे नेतृत्व अमेरिकेकडे असून, या व्यवस्थेने अवघ्या जगाला आपल्या कवेत घेतले आहे. या व्यवस्थेने प्रचंड भौतिक प्रगती जरी साध्य केली असली तरी तेवढीच प्रचंड विषमता, गुन्हेगारी आणि मानसिक समस्यांचे जाळे विनलेले आहे. ज्यात अवघे जग गुरफटून गेले आहे. यावर उपाय एकच तो म्हणजे व्याजविरहित अर्थव्यवस्थेवर आधारित इस्लामी लोकशाही. मग कोणाला हे पटो अथवा न पटो.
- एम. आय. शेख
(पूर्व पोलीस उपाधीक्षक, स्तंभ लेखक शोधन)
Post a Comment