Halloween Costume ideas 2015

आज्ञाधारकतेसाठी ज्ञानाची व विश्वासाची गरज

dua

इस्लाम म्हणजे परमेश्वराची आज्ञा मानणे होय. परंतु जोपर्यंत मनुष्याला काही गोष्टींचे ज्ञान प्राप्त होत नाही व त्यावर त्याचा विश्वास असत नाही तोपर्यंत तो परमेश्वराचा आज्ञाधारक होऊच शकत नाही.

सर्वप्रथम मनुष्याला परमेश्वर आहे हा विश्वास असला पाहिजे. त्याला हे ही माहित असले पाहिजे की परमेश्वर फक्त एकच आहे जेणेकरून तो दुसऱ्यासमोर हात जोडणार नाही. परमेश्वर सर्व काही बघत आहे व ऐकत आहे हा विश्वास ज्याला असेल तो त्या परमेश्वराची आज्ञाभंग करणार नाही. इस्लामवर चालण्यासाठी ज्या विचारांची व कर्मांची आवश्यकता आहे ते परमेश्वराला ओळखल्याशिवाय व्यक्तीत येणार नाहीत व तो वाईट विचारांनी व परमेश्वराच्या मर्जीविरूद्ध काम करण्यापासून तो स्वतःला वाचवेल.

यानंतर मनुष्याला परमेश्वराच्या इच्छेनुसार जीवन जगण्याचा मार्गही माहित असायला हवा. कुठल्या गोष्टी करायला हव्यात व कुठल्या गोष्टींपासून दूर रहायला हवे हे माहित पाहिजे.

यासाठी त्याला परमेश्वराने मानवांसाठी जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांचे ज्ञान असले पाहिजे. त्याला जर नियमच माहित नसतील तर तो पालन कशाचे करणार? मनुष्याला परमेश्वराची आज्ञा पाळण्याचे फळ काय मिळणार आहे व आज्ञाभंगाची काय शिक्षा मिळणार आहे हे पण माहित असायला हवे. त्यासाठी त्याचा पारलौकीक जीवनावर परमेश्वराच्या न्यायालयात सादर होण्यावर, आज्ञाधारकतेच्या बक्षीसावर व आज्ञाभंगाच्या शिक्षेवर विश्वास असला पाहिजे. ज्याला आखिरतच्या जीवनावर विश्वास नाही तो आज्ञाधारक राहणार नाही. त्याच्यासाठी आज्ञाधारक व्यक्ती व आज्ञाभंग करणारा व्यक्ती दोन्ही समान आहेत. दोन्ही मातीत मिळणार आहेत. काही व्यक्तींना आखिरत (पारलौकिक) चे ज्ञान असते पण ते त्यावर विश्वास ठेवत नाहीत ते भटकलेले आहेत. 

ईमान म्हणजे काय?

वरील भागात आपण ज्ञान व विश्वास पाहिला ते म्हणजेच ईमान. ईमान म्हणजे एखादी गोष्ट जाणून घेणे व त्यावर विश्वास ठेवणे. जो व्यक्ती परमेश्वराच्या एक असण्यावर आणि त्याच्या नियमांना जाणतो व त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतो, तो मोमिन (ईमान असणारा) असतो आणि ईमान असणारा व्यक्ती ’मुस्लिम’ म्हणजेच परमेश्वराच्या आज्ञाधारक बनतो.

ईमान असल्याशिवाय कुठलाही व्यक्ती मुसलमान बनू शकत नाही. ईमान हे मुसलमानरूपी झाडाचे बीज आहे. ईमान व इस्लामच्या दृष्टीने मनुष्याचे चार प्रकार पडतात. 

1. जे ईमान राखतात आणि परमेश्वराच्या आज्ञेचे काटेकोरपणे पालन करतात हे सच्चे मुस्लिम आहेत.

2. जे ईमान तर राखतात पण पूर्णपणे परमेश्वराचे आज्ञाधारक नसतात हे मुसलमान तर आहेत पण गुन्हेगारसुद्धा आहेत. 

3. ज्यांच्याकडे ईमान असत नाही पण त्यांचे कर्म परमेश्वराच्या नियमाप्रमाणेच असतात हे लोक बंडखोर आहेत.

4. जे ईमान राखत नाहीत व वाईट कृत्ये करतात हे लोक सर्वात खालच्या दर्जाचे आहेत. हे बंडखोर तर आहेतच तसेच समाजात अशांतता पसरविणारे सुद्धा आहेत. 

ज्ञान मिळवण्याचे मार्ग

परमेश्वराने निसर्गातच आपल्या असण्याचे संकेत दिलेले आहेत. पण मनुष्याची बुद्धी व त्याचे कौशल्य बहुदा त्या संकेतांना समजण्यात चुका करतो. कोण म्हणतो ’आनंद’ देव आहेत, कोण म्हणतो ’अग्नीचा’ देव वेगळा, ’हवेचा’ देव वेगळा म्हणजे वेगवेगळ्या शक्तींचे वेगवेगळे देव व त्या देवांचा एक वेगळा देव. हे लोक अज्ञानी आहेत. 

आखिरतच्या जीवनासंबंधीही बरेचसे गैरसमज आहेत. काही म्हणतात मृत्यूनंतर पुन्हा जीवन नाही. काही म्हणतात मनुष्य पुन्हा पुन्हा या धरतीवर जन्म घेईल व त्याला त्याच्या कृत्याचे फळ मिळेल.

परमेश्वराने आपल्याला ज्ञानापासून वंचित ठेउन आपली कठोर परीक्षा घेतली नाही. परमेश्वराने मनुष्यांमध्येच असे मनुष्य जन्माला आणले ज्यांनी परमेश्वराचे खरे ज्ञान मनुष्याला दिले. मनुष्य म्हणजेच अल्लाहचे पैगंबर किंवा अल्लाहचे नबी. अल्लाहने त्यांना जे ज्ञान दिले त्याला ’वह्य’ असे म्हणतात आणि ज्या पुस्तकात अल्लाहने हे ज्ञान दिले ते पुस्तक (कुरआन ग्रंथ) अल्लाहचा संवाद आहे. आता मनुष्याची खरी परीक्षा आहे की तो पैगंबरांच्या पवित्र जीवनाला व त्यांच्या उच्च ज्ञानाला बघून त्यांच्यावर ईमान आणतो की नाही. जो मनुष्य सतप्रवृत्तीचा आहे तो पैगंबरावर ईमान आणेल पण ज्याने सद्सद्विवेकबुद्धीचा त्याग केला आहे तो यापासून वंचित राहील. 

परोक्षावर ईमान

जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचे ज्ञान नसते तेव्हा आपण ज्ञान असणाऱ्याचा शोध घेतो व त्याने सांगितलेल्या गोष्टी पाळतो. आपण आजारी असतो तेव्हा डॉ्नटरांकडे जातो. त्याने दिलेले औषध घेतो. आपल्याला त्या औषधांबद्दल काही माहित नसते तरी आपण डॉ्नटरावर विश्वास ठेवून ते औषध घेतो. याचाच अर्थ असा की आपल्याला पृथ्वीच्या प्रत्येक गोष्टीचे ज्ञान मिळवण्यासाठी कोण्या जाणकारावर ईमान ठेवावा लागतो व त्याने सांगितलेल्या गोष्टींचे पालन करावे लागते यालाच परोक्षावर ईमान असणे किंवा गैबवर ईमान असणे म्हणतात. परोक्षावर ईमान असणे म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट माहित नाही व आपण ती गोष्ट जाणणाऱ्यांवर विश्वास ठेवतो. आपल्याला परमेश्वराबद्दल काही माहित नाही, आपल्याला परमेश्वर खुश होईल असे जीवन जगण्याचा मार्ग माहित नाही. आखिरतच्या जीवनाबद्दल माहित नाही. या गोष्टींचे ज्ञान आपल्याला तेव्हा होते जेव्हा आपल्याला एक असा व्यक्ती मिळते जी सतप्रवृत्ती असणारी, परमेश्वराला मानणारी व पवित्र असतेे. तिला परमोच्च ज्ञान असते. त्या व्यक्तीला बघून आपल्याला हा विश्वास बसतो की, ही व्यक्ती जे बोलेल ते सत्य बोलेल. हे विश्वास करणे म्हणजेच परोक्षावर ईमान असणे विश्वास असणे. अल्लाहच्या आज्ञा पाळण्यासाठी व त्याच्या ईच्छेनुसार जीवन जगण्यासाठी परोक्षावर ईमान आवश्यक आहे. पैगंबराशिवाय आपल्याला हे ज्ञान मिळू शकणार नाही व आपण इस्लामच्या मार्गावर चालू शकणार नाही. (संदर्भ : दीनियात)

- अबु सकलैन रफिक अहमद पटेल

लातूर 

9860551773


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget