(युगांडाचे राष्ट्राध्यक्ष कागुता मुसेवेनी यांनी आपल्या राष्ट्राला संबोधून कोरोनामुळे लागणाऱ्या लॉकडाऊन समजावून सांगण्यासाठी जे भाषण दिले त्याचा अनुवाद आम्ही आजच्या या अंकात विशेष संपादकीय म्हणून प्रकाशित करत आहोत.)
युद्धाला सामोरे जात असताना कुणीही कुणालाही आपापल्या घरीच राहा म्हणून सांगत नसते, तुम्ही स्वेच्छेने घरीच राहाता. जर तुमच्या घरी तळघर असले तर तुम्ही त्याच्यात जाऊन युद्ध संपेपर्यक्षत तिथंच राहाता. युद्धाच्या वेळी आपण स्वातंत्र्याच्या अधिकाराचा आग्रह धरत नाही. स्वतः जगण्यासाठी तुम्ही आपल्या स्वातंत्र्याचा त्याग करता. युद्धाच्या प्रसंगी तुम्ही जेवणाचा आग्रह करत नसता. तुम्ही भूक सहन करता आणि अशी इच्छा बाळगता की जर आपण जगलो तर पुन्हा अन्न घेऊ. युद्ध होत असताना तुम्ही आपली दुकाने व्यापार उघडण्याची जिद्द करत नसता. तुम्ही आपला व्यवसाय बंद करता (आणि वेळ मिळाला तर) आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढता. तुम्ही जीवंत राहाण्याची इच्छा करता म्हणजे तुम्हाला आपल्या व्यवसायाकडे परत जाण्याची संधी मिळेल (जर तुमचा व्यवसाय-धंदा, दुकाने लुटली गेली नसतील तर). युद्धप्रसंगी नवीन दिवस पाहाण्यास मिळावा म्हणून ईश्वराजवळ आभार व्यक्त करता. युद्धाशी झुंज देत असताना तुमची मुलं शाळेत जात नाहीत याची तुम्हाला चिंता नसते. सरकारने तुमच्या मुलांना सक्तीने सेनेत भरती करून घेऊ नये आणि त्यांना शाळेच्या सैन्य छावन्या बनवून तिथं प्रशिक्षणासाठी बोलावू नये यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करता. हे जग सध्या युद्धाला तोंड देत आहे. असे युद्ध ज्यात बंदुका आणि बंदुकीच्या गोळ्या नाहीत. असे युद्ध ज्यात मानवी सैन्य गुंतलेले नाही. असे युद्ध ज्याच्या सीमा नाहीत, ज्यात युद्धबंदीला वाव नाही. विना वॉररूमचे युद्ध आणि ज्याच्यासाठी आदराचे क्षेत्र नाही. या युद्धातील सैन्यांना दया माहीत नाही ज्यांनी मानवी कृपेचे दूध प्यायलेले नाही. हे अंधाधुंद आहे, मुलांसाठी, महिलांसाठी, धर्मस्थाळांसाठी त्याच्याकडे आदरभाव नाही. या सैन्याला युद्धातल्या लुटीत काही रस नाही. त्यास कुठल्या देशाचे सरकार पाडायचे नाही. जमिनीखालच्या खनिजाची त्याला आवड नाही की आदर नाही. याला धार्मिक, वांशिक किंवा कोणत्या विचारधारेशी कसलेच वैर नाही. काही प्रतिष्ठेशी त्याचे काही देणेघेणे नाही. हे सैन्य अदृश्य आणि निर्दयी आहे. याचा एकमेव अजेंडा म्हणजे मृत्यूचे तांडव रचणे हा होय. याची एकच इच्छा म्हणजे या जगात मृत्यूची शेती व्हावी. आपले ध्येय साधण्याची याची क्षमता शंका घेण्यापलीकडची आहे. त्याला मैदानाची गरज नाही. रणगाडे आणि हवाईदलाची त्यास आवश्यकता नाही. जगातील प्रत्येक देशात याच्या छावन्या आहेत. याच्या परिवहनाला कोणत्या वाहनाची गरज नाही. थोडक्यात सांगायचे झाल्यास ‘हम करे सो कायदा’ मानणारा आहे तो. हा कोरोनाचा विषाणू आहे यास कोविड-१९ या नावानं ओळखले जाते. (कारण त्याने आपल्या विध्वंसक क्षमतेचा परिचय त्याने २०१९ मध्ये करून दिला आहे.) धन्य हो! या सैन्याची एक कमजोरी आहे आणि याला पराभूत केले जाऊ शकते. यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे कार्य केले पाहिजे. सहनशीलता आणि अनुशासन. कोविड-१९, सामाजिक आणि शारीरिक अंतर असल्यास जगू शकत नाही. तुम्ही याला छेडल्यावर तो तग धरू शकतो. त्याच्याशी जवळीक त्याला अतिशय पसंत आहे. फक्त सार्वजनिक, सामाजिक आणि शारीरिक अंतर असले तरच हा शरण येतो. स्वच्छ राहणीमानात तो नतमस्तक होतो. तुम्ही जेव्हा आपले भाग्य (Sanitizer) आपल्या हातात घेता आणि वारंवार त्याचा वापर करता तेव्हा तो लाचार होतो. लहान मुलांसारखे डाळभातासाठी रडण्याचे हे दिवस नाहीत. तसे धर्मग्रंथ आम्हाला सांगत असतात की माणूस फक्त जेवण करण्यानेच जगत नसतो. आम्हाला आपल्या अधिकाऱ्यांच्या निर्देशांचे पालन केले पाहिजे. आम्हाला कोविडची वक्रता सरळ करावी लागेल. आम्हाला संयम ठेवावा लागेल. आपणास भाऊबंधांसारखे वागावे लागेल. थोड्याच काळात आम्ही आपले स्वातंत्र्य पुन्हा हस्तगत करू, तसेच आपले व्यवसाय आणि समाजजीवनसुद्धा पूर्ववत करू. आणिबाणीच्या काळात आम्हाला सेवा करण्याची आणि एकमेकांशी प्रेमळपणे वागण्याची गरज आहे. ईश्वर तुमचे रक्षण करो. (नशिबवान आहेत युगांडाचे नागरिक ज्यांना मुसेवेनी यांच्यासारखे नेते लाभले आणि एक आपण…)
- सय्यद इफ्तिखार अहमद
संपादक,
मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment