मूल्ये, आचारविचार, शिकवणी ते वैश्विक पटलावर प्रस्तुत करू इच्छितात हे त्यांनी सांगितले नाही. त्यांना स्वत: त्यांची कल्पना असेल असे वाटत नाही. सेक्युलॅरिझम या विचाराची कल्पना खरे तर धर्माविरूद्ध नाही. धर्माच्या नावाखाली प्रत्येक धर्माने माणसांव र माणसांची गुलामी, पंडित, पुजारी, पुरोहितांद्वारे केली होती. मग ते कोणत्याही धर्माचे का असेनात. त्यांच्याविरूद्ध विकसित झालेला आणि आधुनि क सत्ताप्रणालीचा मुख्य आधारस्तंभ म्हणून झालेली विचारधारा आहे. धर्माच्या नावाखाली माणसांना गुलाम बनवण्याच्या परंपरेला कंटाळून हे विचार विचारवंतांनी मांडले होते. धार्मिक आस्थांना नाकारणं किंवा धार्मिक विधी पूजा-अर्चा त्यांच्या शिकवणींना अंगीकारण्याविरूद्ध या राजकीय विचाराचा उपयोग केला गेला नाही. सेक्युलॅरिझमद्वारे धर्माचे स्वातंत्र्य जसेच्या तसे बहाल केले गेले होते. ते आजही आहे. सेक्युलॅरिझम फक्त राजकीय विचारधारा आहे. धर्माशी त्याचा काही एक संबंध नाही. धर्माच्या नावाखाली धर्मपंडितांनी माणसांवर माणसांची गुलामी त्या गुलामीला विरोध होतो आहे आणि राहणार. जसे धर्माच्या माणसांविरोधी शिकवणींद्वारे धार्मिक मक्तेदारी बाळगणाऱ्यांनी माणसांच्या हक्काधिकारांचे हनन करू नये, तसेच सेक्युलॅरिझमने देखील माणसांच्या धार्मिक आस्था, आकांक्षा, श्रद्धा, शिकवणी या बाबींमध्ये लुडबुड करू नये. हा इतिहास वेगळा. भारताच्या बाबतीत सांगायचे झाल्यास ज्या नेत्यांना सेक्युलॅरिझमचा धोका असल्याचे वाटते त्यांनी कोणत्या धर्मपरंपरा सभ्यतेचे प्रदर्शन जगासमोर मांडायचे
आहे, हा एक प्रश्न. ज्या धर्माच्या नावाखाली मानवी समाजाला खंड खंड करून टाकले आहे त्या विचारांचा? काही लोकसमूहांना मानवाचादेखील अधिकार दिला नाही. त्यांना तुच्छ समजले जाते, त्यांच्याशी अस्पृश्यतेचा व्यवहार केला जातो. पशुपक्ष्यांसारखेदेखील मानवांशी वर्तन केले जात नाही. त्या परंपरांना संस्कृतीला त्यांना जगासमोर मांडायचे आहे काय? खरी गोष्ट ही नाही. त्यांची खरी समस्या ही की त्यांना भारतात इतर धर्मियांचे अस्तित्व देखील मान्य नाही. ज्यांना स्वतःच्या धर्माचे पालन करणाऱ्यांचे अस्तित्व मान्य नाही ते दुसऱ्यांना कसे सहन करतील. सेक्युलॅरिझमचा वापर ते स्वतःसाठी करून घेतात. इतरांनी त्याचा वापर करू नये, असे त्यांना वाटते. सेक्युलॅरिझमचा जितका दुरुपयोग त्यांनी करून घेतला आणि करत आहेत, तितका जगाच्या कोणत्याही राजकीय व्यऱस्थेने केला नसेल. त्यांना मुस्लिम नको आहेत. म्हणून जेव्हा सेक्युलॅरिझमचे नाव घेऊन मुस्लिम आपल्या हक्काधिकारांची मागणी करतात तेव्हा ते म्हणतात, सेक्युलॅरिझम देशासाठी मोठा धोका आहे. त्यांना म्हणायचे असते मुस्लिम देशासाठी धोका आहेत. सेक्युलॅरिझमशी मुस्लिमांना त्यांनी अशा प्रकारे जोडले आहे. सेक्युलॅरिझमचा उदय १०० एक वर्षांआधी झाला असावा. त्या विचारावर आधारित राजकीय व्यवस्थेने जेमतेम ७०-८० वर्षांपूर्वी जन्म घेतला असेल त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी त्या देशांनी ज्यांना या विचारांचा अभिमान आहे, आजपर्यंत केलेली नाही. मात्र त्याच्या नावाखाली जगातील सगळ्या राजकीय व्यवस्था, राष्ट्रे आपल्या देशांमध्ये राष्ट्रांमध्ये इतर अल्पसंख्यक धर्मसमुदायावर सतत अन्याय केलेला आहे. त्यांना कधीच सेक्युलॅरिझमची त्यास वागणूक दिली नाही. मुस्लिमांचे धर्मपालन करतान तो १४५० वर्षे जुना आहे. १७०० वर्षांपूर्वी मुस्लिमांना त्यांच्या धर्माने ही शिकवण दिली आहे की धर्माच्या नावाने कोणावर अन्याय होता कामा नये. ज्याला त्याला ध्रमाचे स्वातंत्र्य असेल. मुस्लिमांनी त्यांच्याशी धर्मसहिष्णुतेचा व्यवहार करावा. कोणच्या देवीदेवता, इत्यादी धार्मिक परंपरंना वाईट बोलू नये. त्यांच्याशी वाईट वा अन्यायाचा व्यवहार करू नये. त्यांना सेक्युलॅरिझम शिकवण्याचा कुणी विचार करू नये. त्या विचारांच्या पलीकडची त्यांची धर्मसहिष्णुता, त्यांच्या मानवतेच्या शिकवणी आहेत. काळे-गोरे, श्रीमंत-गरीब, तुच्छ अशा शब्दावली सुद्धा त्यांच्या धर्मात नाहीत. सारे मानव एकाच जातीचे – ती जात मानवतेची. कारण सर्वांना एकाच ईश्वराने – अल्लाहने जन्म दिला आहे. इतर धर्माच्या अनुयायांचा दुसरा ईश्वर ही इस्लामविरोधी विचारधारा आहे. आणि इस्लामविरोधी विचारधारेशी मुस्लिमांचा काही एक संबंध नाही. हिंदू-मुस्लिम, दलित-उच्चवर्णीय ही जातवारी तर भारतीय परंपरेने केली आहे, सेक्युलॅरिझमने नाही. पण आपल्या सामाजिक विचारांच्या त्रुटीला हे लोक सेक्युलॅरिझमला जबाबदार धरून परधर्मियांची कोंडी करू पाहताहेत. त्यांना उघडपणे बोलण्याचे साहस नाही. म्हणून ते सेक्युलॅरिझमची आड घेतात, एवढेच!
- सय्यद इफ्तिखार अलमद
संपादक
मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment