राज्यात कोरोनाचा उद्रेक होत असताना लॉकडाउन करायचे की नाही, कडक निर्बंध का सैल, की सगळी सूट द्यावी, लॉकडाउनचे नाव घ्यायचे की बिन नावाचे लॉकडाउन लावायचे असे या न त्या प्रश्नात गेले महिनाभर राज्य सरकार गुंतलेले होते. शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली स्थापलेल्या सरकार, नेत्यांना, मंत्र्यांना असे सूचत नसेल की या सगळ्या प्रश्नांमध्ये त्यांना अडकून ठेवणारे तेच लोक आहेत ज्यांनी कोट्यावधींना मानसिक गुलाम बनवून ठेवले होते. वाटल्यास त्यांना विरोधी पक्ष म्हणू शकता.
इतकी साधी सरळ गोष्ट म्हणा की षडयंत्र सत्ताधारी नेत्यांना मंत्र्यांना समजली नसेल तर त्यांना काय बोलावं. जे काही निर्बंध 5 एप्रिल पासून लावण्यात आले तसेच निर्बंध एक महिना अगोदर लावले असते तर आज कदाचित कोरोनाला नियंत्रणात आणण्यात मदत झाली असती. विरोधी पक्षाने लपाछुपी केली नाही. त्यांनी उघड भूमिका घेतली लॉकडाउन नको. कारण त्यामुळे महामारीवर खरे नियंत्रण आणले गेले असते तर ते सरकारच्या बाजूने गेले असते. विरोधकांना कोरोना रोखायचा नाही त्यास वाढवू द्यायचा आहे; मरणारे मरतील. भिडेंनी सांगितलेच आहे की, ’’जे जे जगण्याच्या लायकीचे नाहीत ते मरतील’’ आता कोण लायकीचे नाही हे विरोधी पक्ष ठरवणार. कोरोना महामारी सध्या नियंत्रणाबाहेर गेलेली आहे. ती आणखीन बाहेर गेली तर हे सरकार पाडायला त्यांना सोनेरी संधी मिळणार आहे. कोरोनाशी काही देण घेणं या विरोधी पक्षाचे नाही. त्यांना हे सरकार पाडायचे आहे. त्यासाठी हे निरंतर झटत आहेत. फडणवीसांच्या हाताखाली सगळे मराठे, बहुजन एकवटले आहेत. कसेही करून फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसवायची संधी त्यांना मिळावी म्हणजे गंगेत न्हाल्यासारखे होईल.
एक महिन्याचा कालावधी काही थोडा नसतो. हाच निर्णय (कडक-सैल-लॉकडाऊनचा) महिनाभर आधी घेतला गेला असता तर किती लोकांचे प्राण वाचले असते. पण नाही, चर्चा बैठका, विरोधकांना उत्तरे देणं. त्यांनी रोज एक समस्या समोर ठेवणं आणि हे सरकार त्या समस्येत गुंतून जाणं.
सचिन वाझेला कोठडीत घेऊन आणखी काय-काय त्याच्याकडून बाहेर काढतील आणि कुणा-कुणाचे मंत्रीपद पणाला लागतील हे या सरकारला माहित नाही. याचे नियोजन केंद्राकडे केले जाते. जोवर वाझे जेलमध्ये आहे तोवर ह्या सरकारचा जीव धोक्यात असणार आहे. त्यात या सरकारचे नेतेमंडळी स्वतःची कातडी वाचवायच्या प्रयत्नात दिसते. त्यांना आपलं सरकार वाचवण्याची चिंता दिसत नाही आणि ह्याच वृत्तीमुळे हे सरकार आज ना उद्या, दोन महिने वर्षांनी कोसळले तर यात नवल नसणार.
ज्या सरकारला लॉकडाऊन सदृश्य निर्बंध लावण्याचा निर्णय घ्यायला महिना दीड महिना लागतो. त्याच्याकडून कोरोनावर नियंत्रण आणण्याची कशी आशा केली जावू शकते. ह्या सरकारनं लक्षात ठेवावे विरोधी पक्षाला कोरोना वाढवायचा आहे. त्या द्वारेच सरकार पाडायचे आहे. दोन समस्या संपतील सरकार आणि जे जगण्याच्या लायकीचे नाहीत.
कडक निर्बंध लावायला विरोधी पक्षाला आणखीन समाधान आणि आनंद वाटावा यासाठी रमजानचा शुभ अवसर गाठला गेला. त्या आधी गुढी पाडवा, कुंभमेळा, निवडणुका, आंबेडकर जयंती सर्व काही साजरे झाले. आता रमजानचे काय ते पुढच्या वर्षी येईलच. पण रमजानला लॉकडाऊनची भेट विरोधकांना देण्यास आपण सत्तेत असू की नाही हे कोणाला माहित म्हणून ही रमजानचा शुभप्रसंग.
Post a Comment