रोममध्ये सुरुवातीला ग्रीक लोकांची सत्ता होती. त्यांच्यामध्ये बौद्धिक ज्ञान सर्वत्र पसरलेले होते. ग्रीक लोकांमध्ये महान बुद्धिजीवी आणि विद्वान होते. त्यांच्यात शाईन नामक एक जमात होती. ते लोक एखाद्या सावलीत बसून ज्ञान प्राप्त करत असत. अॅरिस्टॉटल त्या वेळी एक प्रकारे जगतगुरूसारखी विद्वान व्यक्ती होती. अॅरिस्टॉटल अलेक्झँडरचा गुरू होता. त्या वेळी अलेक्झँडरने पर्शियाचे राज्य जिंकलेले होते. जगातल्या कानाकोपऱ्यातले लोक अॅरिस्टॉटलला ओळखत होते. जेव्हा ग्रीक लोकांना उतरती कळा लागली तेव्हा सत्तेवर रोमन लोकांचा कब्जा झाला, पण रोमन लोक ख्रिस्ती धर्माचे असल्यामुळे ते कट्टर धर्मनिष्ठ होते. म्हणून त्यांनी ज्ञानाचे हे भांडार बाजूला टाकून दिले. हस्तलिखित आणि छापलेल्या पुस्तकांचे भले मोठे भांडार खोल्यांमध्ये टाकून त्याच्यावर कुलूप लावून टाकले. जेव्हा रोमन लोकांनी सीरिया जिंकले तेव्हा ही पुस्तके त्या देशात पडून होती. जगात जेव्हा इस्लामचा उदय झाला आणि मुस्लिमांचा साऱ्या जगामध्ये अनन्यसाधारण दरारा पसरला तेव्हा एकामागून एक राजवट जिंकून मुस्लिम जगत विस्तारत गेले. जगाच्या इतर राष्ट्रांबरोबरच मुस्लिमानी रोमन राष्ट्रांनाही जिंकून घेतले. जेव्हा त्यांनी विकास व प्रगतीचा उच्चांक गाठला तेव्हा त्यांना बौद्धिक ज्ञान आणि इतर ज्ञान संपदण्याची मोहीम हाती घेतली. अबू जाफर मन्सुर यांनी रोमच्या राजाला संदेश पाठवून सांगितले की त्यांच्याकडे जे काही ज्ञानाचे भांडार आहे त्या पुस्तकांचा अनुवाद करून पाठवून द्यावे. रोमच्या राजाने अनेक ग्रंथांचा अनुवाद करून पाठवून दिला. त्या ग्रंथांमध्ये पदार्थविज्ञान आणि इतर वैज्ञानिक विषयांवर ग्रंथ होते. जेव्हा खलीफा मामुनचा काळ आला तेव्हा त्याने रोमन्सना सांगितले की त्यांनी जे काही ग्रंथ असतील ते सारेच्या सारे अरवबी लिपीत रुपांतर करून पाठवून द्यावे. मामुनने त्या ग्रंथांच्या अरबी भाषेत भाषांतराची मोहीम हाती घेतली. मुस्लिमांनी त्या ग्रंथांचा सखोल अभ्यास केला आणि अशा प्रकारे मुस्लिमांची ज्ञानविज्ञानाच्या जगतातही मक्तेदारी झाली. मुस्लिम अभ्यासकांनी ग्रीक लोकांच्या काही विद्वानांवर टीकादेखील केली. मुस्लिमांमधील उच्च कोटीचे विचारवंतांमध्ये अबु नसर फारावी, अबु अली इब्ने सीना, काझी अबुल वलीद, इब्ने रश्द, अबुबकर काझी, इत्यादी सुरुवातीचे अभ्यासक होते.
(संदर्भ – मुकद्दमा : इब्ने खहदून, खंड-२)
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment