Halloween Costume ideas 2015

केरळचे अतोनात नुकसान

मदत कार्य जोरावर : आयआरडब्ल्यू, एसआयओ आणि जमाअतचे सहाय्यता केंद्र

येरनाकुल्लम (मजहर फारूकी) -  केरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीने केरळचे अतोनात नुकसान केले आहे. मात्र सध्या केरळ पूर्व पदावर येत आहे. हळूहळू पाणी ओसरत असून, मदत कार्यामधील अडचणी दूर होत आहेत. पुरामुळे सध्या चिखलसोबत साप, मगरी आणि विंचव घरांनी आल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाणी ओसरत असल्याने सामाजिक संस्थांना मदत कार्य करण्यास सोपे जात आहे. शासन आणि विविध सामाजिक संघटनांच्या सांघिक प्रयत्नांमुळे केरळ लवकरच पूर्वपदावर येईल. मात्र केरळचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. जमाअते इस्लामी हिंदसोबतच आयआरडब्ल्यू आणि एसआयओ या संघटनांनी मदत कार्यात वेग घेतला आहे. 
आयआरडब्ल्यू (आयडियल रिलीफ वर्क) चे 11 स्वयंसेवक 24 ऑगस्टला मुंबईहून केरळसाठी रवाना झाले. व अलवा जि. येरनाकुल्लम येथे पोहोचले. त्या ठिकाणी एस.आय.ओ. (स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन) आणि पिपल्स फाऊंडेशन चे एकूण 3 हजार स्वयंसेवक  पुरग्रस्तांची मदत करत आहेत. विशेष बाब म्हणजे आयआरडब्ल्यूच्या स्वयंसेवकांची अशा लोकांशी भेट झाली ज्यांचे स्वत:चे घर पाण्याखाली गेलेले होते. स्वत: पूरग्रस्त असतानांसुद्धा मानवतेच्या सेवेसाठी ते दुसऱ्यांचा जीव वाचविण्यासाठी स्वत:ला झोकून देत होते. असेच एका स्वयंसेवकाबद्दल अशी माहिती मिळाली की गेल्या दहा दिवसानंतर त्यांनी स्वत:च्या घराची सफाई केली जे की चिखलाने भरले होते. काय जबाबदार व्यक्तींची बोलल्यानंतर आयआरडब्ल्यूच्या स्वयंसेवकाच्या लक्षात आले की, मल्लापूरम व वायनाड जिल्ह्यांमध्ये भुस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. आणि एरनाकुल्लम, पतनंदीटा, पलक्कड, अलेप्पी आणि त्रिशूर जिल्हेसुद्धा पुराच्या पाण्याने प्रभावित झालेले आहेत. सर्वात जास्त हाहाकार ऐरनाकुल्लम आणि आलेप्पी जिल्ह्यात माजला आहे. मुंबईहून आलेल्या टीमने याच दोन जिल्यात काम करण्याचा निश्‍चय केला. 
पहिल्या टप्प्यात स्थानिक लोकांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आयआरएफची टीम दोन गटांमध्ये विभागली गेली व अलवा तालुक्यातील मन्नम व तन्नल आणि पुराऊर गावांमध्ये मदत कार्याला सुरूवात केली. या भागामध्ये जमाअते इस्लामीचे तीन सहाय्यता केंद्र अगोदरपासूनच काम करत होते. इथे अनेक गावांमध्ये विद्युत जोडणी करणे शक्य झालेले नाही. लोक आपली घरे-दारे सोडून कॅम्प आणि इतर ऊंच ठिकाणी आश्रयाला गेलेले आहेत. त्यांची घरं आणि आजूबाजूच्या परिसरात पाणी व चिखल झालेला आहे. घरातले फार कमी सामान पुन्हा उपयोगात आणण्यासारखे राहिलेले आहे. विषारी साप आणि विंचू मोठ्या संख्येने घरामध्ये आढळून येत आहेत. मदतकार्य करणाऱ्यांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. अशीच काही परिस्थिती इतर जिल्ह्यांची सुद्धा आहे. ईश्वरकृपेने आता पाणी पूर्णपणे उतरले आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी घरांच्या स्वच्छतेची मोहिम हाती घेण्यात आली आहे. अनेक लोक रिलीफ कॅम्पमधून आपापल्या घरी जात आहेत. मात्र त्यांच्या मुलभूत गरजा पुरविण्यासाठी तारांबळ उडत आहे. पाण्याने घरातल्या सर्व अन्नधान्य, गॅस इत्यादींची हानी झालेले आहे. सगळ्या गोष्टी नव्याने उभ्या कराव्या लागत आहेत. काही घरं पूर्णपणे बुडाल्यामुळे मोडकळीस आलेली आहेत. तिथे राहणाऱ्यांना परत त्याच घरात जाऊन राहण्यासारखी परिस्थिती नाही. म्हणून त्यांना रिलीफ कॅम्पमध्येच आश्रय घ्यावा लागत आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम आलेप्पी जिल्ह्यात सुरू आहे. कुटनाडमध्ये सुद्धा जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रची एक टीम गेली आहे. 
सर्वच जिल्ह्यामध्ये तात्पूर्ती आश्रयस्थाने तयार करण्यात आलेली आहेत. त्यासाठी खाजगी हॉल, सरकारी आणि खाजगी शाळा, महाविद्यालयांच्या इमारतींचा उपयोग केला जात आहे. मदत कार्य, प्रथमोपचार व वैद्यकीय सहाय्य करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. काही लोकांसाठभ तात्पूरती निवासस्थाने सुद्धा उभारण्यात आली आहेत. स्वच्छ पाणी आणि जेवणाचा पुरवठा सुरू आहे. वातावरणातील बदल पाहून गरम कपडे आणि इतर गरजेच्या वस्तू सुद्धा पुरविण्याचे काम सुरू आहे. 
याशिवाय, पडझड झालेल्या घरांची दुरूस्ती करण्यासाठी लांबपल्याची योजना तयार होत आहे. परिस्थिती निवळताच त्या कामाला सुरूवात होईल. केरळमध्ये सरकार आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी तसेच सामाजिक संस्थांनी मिळून जवळजवळ तीन हजार कॅम्प लावलेले आहेत. स्वत: केरळमधून तीन हजार स्वयंसेवक उभे आहेत. शिवाय, आयआरडब्ल्यू महाराष्ट्र आणि एचआरएस कर्नाटकचे स्वयंसेवकही रात्रंदिवस झटत आहेत. त्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांचा समावेश आहे. केंद्र शासनाचे विविध दल काम करत आहेत.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget