Halloween Costume ideas 2015

ईद मुबारक !

रिमझिमत्या पावसात पंधरा ऑगस्टच्या प्रभात फेरीतून भिजत फिरलो़  शाळेतल्या आठवणींचे ढग ही बरसत होते़ घोषणांचा मोठा आवाज पावसाच्या आवाजातही मोठा उठून दिसत होता़  पण हल्ली तो आवाज हरवला़  राष्ट्रीय सण तेवढ्याच मनाने साजरा करताना काही सलणार्‍या घटना त्रास देऊ लागल्या़ पुराच्या पाण्याने वेढलेला गाव़ जिलेबीचा गोडवा आणि पावसातही टोचणारी आपल्याच माणसांची नजर!
या अशा संबंधी नजरांची हल्ली शरीर व मनाला सवय झाली आहे़  झेंडा वंदनला सर्वात पहिले हजर राहून प्रभात फेरीत आनंदाने घुमणारा आवाज आज दाबल्यासारखाच़  भारतीय मुस्लिम म्हणून आता लगबग. देशभक्ती सिद्ध करण्याची स्पर्धाच लागलीय जणू! उदाहरणार्थ माजी पंतप्रधान अटलजी गेले़ रतीबाच्या ‘श्रद्धांजली’ पोस्टने मीडियावर पूर आला सोशल मीडिया, गल्ली चौकातले बोर्ड, फलक, कट्ट्यावरच्या पाट्यांवर सहवेदना झळकल्या़ मुस्लिम मागे राहीलेच नाहीत़ भरभरून वेदना, दु:ख प्रकट झाली़ व्हायलाच हवी!
मी ही शोक व्यक्त केला़ कुणाच्याही जाण्यानंतर, निधनानंतर वाईट बोलूच नये़ ‘अल्लाह सब भेद जानता है!’ बस्स !
पण याला विरोध करणारा एखाद्या मुस्लिम नाव असलेल्याला सरळ-सरळ लोकशाही दरबारात दादागिरीने लाथाबुक्क्यांनी मारण्यात येते़ तेव्हा त्याच्या आवाजाचे काय?
सनदशीर मार्गाने व्यक्त केलेल्या सार्वजनिक मताचा निषेध होऊ शकतो़ पण इथे तो केवळ ‘मुस्लिम’ आहे म्हणून मारहाण आणि अहमदनगरच्या ‘छिंद्म’ला नाटकीपणाची लोकशाहीमुक्त वागणू़क़? राग धरावा की चीड़ आवाज दबलेलाच!
नालसोपार्‍यातल्या साधकी साधू वर्तनाच्या मालीकापासून औरंगाबादेतल्या कापडी दुकानात काम करणार्‍या अंदूरेपर्यंत फक्त चर्चा़  अटक नाट्य आणि द्वेषपूर्ण मांडणीचा लेखाजोखा़, सॉफ्टीझम
यात कुणी नावाचा जरी ‘मुस्लिम’ असता तर\ असो़ यावरही बोलायचे, लिहायचे नाही़ नाहीतर संशयाच्या मारक पावसाच्या सरीने आपली देशसेवा भिजेल! शासन यंत्रणाचे कौतूक करण्यापेक्षा अशा सगळ्या प्रकरणात कुणी मुस्लिम नाही याचाच दिलासा. भितीचा मोठा दगड काळजावर दूर झाल्यासारखे वाटते़ पण सगळं ‘आलबेल’ आहे का?
जातीवाद, सामाजिक विषमता, सांप्रदायिक तणाव, धर्मांधता, जात अस्मितांच्या चळवळी, हिंसक होणारी आंदोलने, सार्वजनिक आर्थिक दुरावस्था, सामाजिक असुरक्षिततेच वाढत प्रमाणं या सगळ्यात मुसलमानांनी मक्तेदारी घेतल्यासारखी़ आपण कसे गुडगुड आहोत हे दाखवल्याचा असमान प्रयोग़. हे केवळ भिती आणि संशयी डोक्यांचे दडपण आहे़ हे धुडकावून लावून केवळ अभिनिवेशाचा भाव लाथाडला पाहिजे़  समाजाच्या सगळ्या घटकांना प्रूफ द्यायची धडपड आता थांबली पाहिजे़ ते प्रश्‍न करतात, आपण उत्तरांच्या वाटा धुंडाळत गुरफटत राहतो़  आता प्रश्‍नांना फाट्यावर मारून सरळ आपले वंचिताचे प्रश्‍न मांडले पाहिजेत़ 
केवळ आरक्षणाचा नव्हे तर रक्षण- संरक्षण - शिक्षणाच्या महत्वाच्या प्रश्‍नांवर घणाघाती मुद्यांवर निडरपणे बोलले पाहिजे़ गेलेल्या माणसांचे दोष, चिकित्सा, द्वेष किंवा प्रेमाची भरती बाजूला करून, सकारात्मक मुल्यांची उभारणी करण्याची प्रामाणिक मेहनत इमानेइतबारे केली पाहिजे़ भारतीय मुस्लिम असण्याचं सर्टिफिकेट, दाखले, लायसन्स, वाटणार्‍या पोटभरू सनातन्यांना फाट्यावर मारून आपल्या पाऊलांची गती आपणच वाढविली पाहिजे़ सैतानी वाईट दुष्टांची संख्या बळावतेय. सातत्याने दुय्यम मानसिकता निर्माण करणार्‍या गोष्टींना ऊत येतोय. यात संयमित अमनचा, शांतीचा संदेश रूजवत पुढे गेले पाहिजे़   लाख करे दुश्मनी कोई, खत्म न किजे रिश्ता, दिल मिले या न मिले हाथ मिलाते रहीए 
केवळ हातच नव्हे तर प्रेमाचा संदेश देत ‘गले लगाव’ ची प्रेमळ पद्धत रूजवत जाऊ. यंदा पावसाळ्यात प्रेमाचंच गाणं गात राहू़ प्रेमाच्या गाण्याचे सूर केरळमधल्या दु:खी पिडीतांपर्यंत पोहचले पाहिजेत़ पाऊस पुराच्या महाथैमानाने शेकडो बळी जात असताना, संसारे मोडकळीस येत असताना, आयुष्यभराची स्वप्ने ढासळत असताना, माणुसकीच्या शिलेदारांनी मानवतेची बुज राखत अखंड मदतीचा वैयक्तिक / सामुहिक मदतीचा ओघ अबाधित ठेवला आहे, ही भारतीय म्हणून आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.
 “ या हाताने दिलेले त्या हाताला कळू नये” म्हणत फाटल्या आभाळाला सुखाचे ठिगळे जोडत, मदत सुरूच आहे़
केरळच्या  त्रीशूर जिल्ह्यातील बीएस्सीत शिकणार्‍या, गरिबीतूनही शिक्षणाचा प्रवास करणार्‍या, आई-वडिलांना सांभाळत, मच्छी मार्केटमध्ये स्वयंरोजगार करून स्वाभिमानाने जगणार्‍या, समजूतदार हन्नान हमीद या पोरीला सलाम करायलाच हवा़ स्वकमाई आणि तीला आलेल्या शैक्षणिक मदतीतून जमून आलेल्या रकमेला तीने गरजू लोकांपर्यंत पोहचवले़ ‘माझ्यापेक्षा’, आता सगळ्यांना याची गरज जास्त आहे म्हणत” ती धडपडतेय. सगळ्या केरळच्या नागरिकांसाठी, मानवतेसाठी!  हा विचारच सुंदर, अशा सुंदर सकारात्मक विचारांचे मूल्य प्रेरक ठरवूयात
नाला सोपाराचा वैभव वहिद असता तर? आणि साधक मदरशातून आलेला असता तर? किंवा अमूक तमूक तमूक अमूकच्या भयप्रद जरतरींना ठेचून सलग मानवता, बेगडी माणसांपासून मुक्त करत उजेडाची झाडे पेरण्याचे धाडस आपल्यात येत राहो़ त्याग प्रेमाची ताकत वाढत राहो़ ‘कुर्बानी’चे बळ मिळो़  ‘ईद मुबारक’ म्हणत आता थांबतो़ इकडे पावसाचा जोर वाढलाय़़
ईदची खरी़  तयारी करायची आहे़
घरातल्या स्वयंपाकाचा गंध जिथपर्यंत पसरतो, तिथपर्यंतच्या किमान शेजार्‍यांना आमंत्रण द्यायचय़़  तुम्ही या शांती आनंद घेऊन
“मुझे तो हर शख्स के भीतर इंसान दिखाई देता है.’’

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget