Halloween Costume ideas 2015

शासकीय योजनांवर ‘रिफा’ची मुंबईत कार्यशाळा

- मुंबई (नाजीम खान) 
 स्वातंत्र्या दिनाचे औचित्य साधून रिफाह चेंबर्स ऑफ कॉमर्सने शासकीय योजनांवर आधारित सेमिनारचे आयोजन केले होते. हा सेमिनार सेसा पहिला मजला, स्वस्तीक चेंबर, कुर्ला येथे संपन्न झाला. सेमिनारमध्ये एस.सी./ एस.टी. आणि अल्पसंख्यांकांकरिता असलेल्या शासकीय योजनांवर आधारित होता. यामध्ये सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांबाबत असलेल्या योजनांची रितसर माहिती देण्यात आली. सेमिनारमध्ये विविध शासकीय विभागातील अधिकार्‍यांनी योजनांची माहिती दिली. यावेळी एमएसएमई चे डायरेक्टर ए.के. गोरवे, नरेंद्र इसतुलकर (डेप्युटी डायरेक्टर एमएसएम), मिलिंद मोहोड (इंडस्ट्रीज ऑफिसर ज्वॉईंट डायरेक्टर इंडस्ट्रीज एमएमआर), चिरो सुमित (डेप्युटी ब्रांच मॅनेजर, एनसीआयसी) और कुलदीप मिश्रा (डेप्युटी ब्रांच मॅनेजर, एनएसआयसी) यांनी मार्गदर्शन केले. 
सेमीनारची सुरूवात फारूक बेग यांनी कुरआन पठणाने केली. प्रास्ताविक सलाउद्दीन अहमद यांनी केले. त्यांनी रिफाह चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे केल्या जात असलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. कोसीनचे उपाध्यक्ष ए.एस. आगवत यांनी उद्योगाच्या भरभराटी कशी करावी, कारखाना कसा चालवावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. एमएसएमई से संचालक ए.के. गोरवे यांनी शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. नरेंद्र इसतुलकर यांनी योजनांचे फायदा आणि  त्यांच्या विस्तारीकरणासंदर्भात माहिती दिली. चिरो सुमित आणि कुलदीप मिश्रा यांनी एनएसआयसी च्या आठ योजनांबद्दल विवरण सादर केले. मिलिंद मोहोड यांनी सुशिक्षित बरोजगारांसाठी असलेल्या योजना आणि त्यासंदर्भात माहिती दिली. 
यावेळी प्रश्‍न, उत्तराचा तासही झाला. उपस्थित व्यावसायिकांच्या प्रश्‍नांना मार्गदर्शकांनी समर्पक उत्तरे देत व्यावसायिकांना प्रोत्साहित केले. शेवटी रिफाचे डायरेक्टर अब्दुल सलाम मलिक यांनी आभार व्यक्त केले.

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget