Halloween Costume ideas 2015

राष्ट्रविरोधी षङ्यंत्रापासून सावधान!

भारताला हिंदू राष्ट्र बनविण्याचे ध्येय बाळगलेल्या हिंदुत्ववादी सनातन संस्थेचा दहशतवाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. या  संस्थेशी संलग्न वैभव राऊत या तथाकथित दहशतवाद्याच्या मुंबईतील नालासोपारामधील घरात आणि दुकानातून आठ बॉम्ब आणि  डिटोनेटर्स व बॉम्ब तयार करण्याचे साहित्य एटीएसने जप्त केले. या संस्थेच्या कार्यकर्त्यांचा संबंध पानसरे, दाभोळकर, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येशी असल्याचा पुरावा या प्रकरणात पोलिसांच्या हाती लागलेला आहे. या संस्थेशी संलग्न असलेल्या तथाकथित  दहशतवाद्यांना २००७ मध्ये वाशी, ठाणे, पनवेल आणि २००९ मध्ये गोवा येथील बॉम्बस्फोटानंतर अटक करण्यात आली होती. 
यापूर्वी हिंदू दहशतवादाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात देशभर चर्चा सुरू होती. मक्का मस्जिद, मालेगाव, अजमेर आणि समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोट खटल्यांत हिंदुत्ववादी संघटना आणि लोकांची नावे पुढे आली होती. त्यापैकी काही दहशतवाद्यांना अटकही करण्यात आली होती. त्यापैकी काहीजण मुक्त झाले आहेत तर काहींवरील खटले अजून सुरू आहेत. सन  २००७ मध्र्ये Zeitgeist नामक एक चित्रपट मालिका प्रसारित करून पीटर जोसेफ या व्यक्तीने अमेरिकेत गोंधळ उडवून दिला होता. या चित्रपटात अमेरिकेचा इतिहास दाखविण्यात आला  आहे. अमेरिका कशा प्रकारे जगभर षङ्यंत्र रचून कशी अस्थिरता निर्माण करतो आणि कशा प्रकारे त्याचा फायदा उठवितो याचे चित्रण तीन चित्रपटांच्या या मालिकेत दाखविण्यात आले  आहे. जगात दहशतवाद विशेषता इस्लामिक दहशतवाद हा अमेरिकेच्या रणनीतीचा एक भाग आहे आणि अमेरिका दहशतवाद माजवून आपल्या देशाच्या व्यापारात वृद्धी करीत आहे.  अमेरिका कशा प्रकारे मंदीतून बाहेर पडण्यासाठी आपलेच वर्ल्ड ट्रेड सेंटर पाडून त्यास दहशतवादी हल्ला ठरविण्यात आले आणि त्यापासून व्यावसायिक लाभ उठविण्यात आला. हा मुद्दा  चित्रपटात तर्क्वितर्क आणि वैज्ञानिक विश्लेषणांद्वारे सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाचा संदर्भ देण्याचा उद्देश एवढाच की मागील काही दशकांपासून भारतात जे  काही घडत आहे त्याचे या चित्रपटात देण्यात आलेल्या तर्कांशी काही प्रमाणात साम्य आढळून येते. अमेरिका वेगवेगळ्या ठिकाणी मुस्लिमांमध्ये असंतोषजनक वातावरण निर्माण करून  काही नेत्यांची निर्मिती करून त्या समाजात दहशतवादी कारवाया वाढीस लावतो हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. अफगानिस्तानमध्ये तालिबान आणि सीरियामध्ये आयसीसचा  उदय याचाच एक भाग होता. नंतर अमेरिका या लढाईत स्वत: उतरला आणि त्यापासून आर्थिक लाभ घेऊ लागला. भारतातदेखील हळूहळू सांप्रदायिक ध्रूवीकरणाचा प्रयत्न सुरू आहे,  त्यामुळे हा आपल्या देशासाठी चिंतेचा विषय बनला आहे. एकापाठोपाठ एक अशा अनेक घटनांमध्ये अल्पसंख्यकांना लक्ष्य बनविण्यात येत आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये अमेरिका  आपले कठपुतली सरकार स्थापन करूनदेखील शांत बसत नाहीत तर त्या त्या देशांवर तथाकथित दहशतवादाच्या नावाखाली हल्ले सुरूच ठेवत आहे. तेथील सरकारांच्या माध्यमातून  आपल्या हित साधण्यासाठी आर्थिक नीती-धोरणे लागू करतो. सीरियामध्ये अमेरिकेचे हे चक्र नष्ट करण्यासाठी रशियाने उडी घेतली आणि अमेरिकेने निर्माण केलेल्या दहशतवादी जाळे  उद्ध्वस्त करून टाकले. सध्या आपल्या देशात अल्पसंख्यकांवर एकसारखे घृणास्पद हल्ले होत आहेत. त्यांच्या धार्मिक मान्यतांवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. सोशल मीडियावर  त्यांच्याप्रती शाब्दिक हिंसा घडत आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी काय खावे आणि काय प्यावे याबाबतही आक्षेप घेतला जात आहे. काही राजकीय पक्ष तर त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना  पाठीशी घालताना दिसत आहेत. अमेरिकन सरकारने स्थापन केलेल्या ‘यूएस कमिशन फॉर इंटरनॅशनल रिलिजन्स फ्रिडम’ (यूएससीआयआरएफ) नामक संस्थेने जाहीर केलेल्या  अहवालात म्हटले आहे की भारतात मागील वर्षी धार्मिक स्वातंत्र्याच्या स्थिती एकसारखी चिघळत चालली आहे. हिंदू राष्ट्रवादी समूहांनी अल्पसंख्यक आणि दलितांविरूद्ध हिंसा, धमकी  आणि अत्याचारांद्वारा देशाचे भगवीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. या संस्थेने भारताला अफगाणिस्तान, अजरबैजान, बहरीन, क्यूबा, मिस्र, इंडोनेशिया, इराक, कजाकिस्तान,  लाओस, मलेशिया आणि तुर्की अशा विशेष संवेदनशील दुसऱ्या फळीतील देशांच्या पंक्तीत नेऊन बसविले आहे. भारताला अमेरिकन षङ्यंत्र समजून घेतले पाहिजे. फक्त सत्तेसाठी मतांच्या ध्रूवीकरणाची बाब असती तर चिंता करण्याचे काहीच कारण नव्हते. परंतु देशातील स्थिती मोठ्या धोक्याकडे इशारा करीत आहे. देशाविरूद्ध एक मोठे षङ्यंत्र रचले जात आहे.  म्हणूनच या षङ्यंत्राचे उत्तर सर्व देशबांधवांचे ऐक्य आणि एकमेकांचा सन्मान करण्यातच दडलेले आहे. आमच्या इच्छा- आकांक्षांवर नियंत्रण करण्यासाठीच षङ्यंत्र रचली जात आहेत.  यापासून आम्हा सर्वांनी सावध राहिले पाहिजे! 

-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget