Halloween Costume ideas 2015

शाहू महाराज - सामाजिक न्यायाशी बांधिलकी असलेला राजा


कोल्हापूरचे शाहू महाराज (२६ जुलै १८७४ - ६ मे १९२२) यांना छत्रपती व राजर्षी या नावानेही ओळखले जाते. सामाजिक न्यायाशी बांधिलकी असणारा खरोखरच एक राजा होता, जो त्या काळातील (किंवा आजही) 'पुरोगामी' लोकांपेक्षा कितीतरी पटीने मोठा होता, हे सिद्ध होते. शाहू महाराजांच्या राज्यात आरक्षणाचा पाया हा धर्माच्या पलीकडे जाऊन सहभाग/प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने म. ज्योतिबा फुले यांनी प्रेरित केला होता. अशा परिस्थितीत मुस्लिम जातीही लाभार्थी होत्या. शाहू महाराजांच्या आयुष्यात धर्मापेक्षा राष्ट्राला मोठे स्थान होते. हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या परंपरा शाहू महाराजांनी निर्माण केल्या आणि करवीरनगरीच्या लोकांनी निष्ठेने व अभिमानाने त्या परंपरा जतन केल्या आहेत. या परंपरांमुळेच महाराजांनंतरच्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडातच नव्हे, तर स्वातंत्र्योत्तर कालखंडातही देशात हिंदू-मुस्लिम समाजांत दंगलीचे डॉव उसळले तरी कोल्हापूरला त्याची झळ पोहोचली नाही. कोल्हापूरने हिंदू-मुस्लिम सद्भावनेचा आदर्श टिकवून धरला. आजही देशात अथवा महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिम समाजांत दंगलग्रस्त तणाव निर्माण होतो, तेव्हा कोल्हापूरच्या जनतेकडून शाहू महाराजांनी निर्माण केलेल्या परंपरांचा आदर राखला जातो. कोल्हापुरातील हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा ही कोल्हापूरलाच नव्हे तर अखिल महाराष्ट्राला भूषणास्पद आहे. डॉ. जयसिंगराव पवार यांनी आपल्या ‘समाजक्रांतिकारक राजश्री शाहू महाराज’ या पुस्तकात शाहू महाराजांना मुस्लिम समाजातील शिक्षणाविषयी असलेल्या तळमळीचे अनेक दाखले दिले आहेत. त्या काळात ब्राह्मण व प्रभू वगळता सर्व मराठा, लिंगायत, जैन, मुस्लिम समाज मागासलेला होता, याचे मुख्य कारण शिक्षणाचा अभाव हेच होते. शाहू महाराजांनी १९०१ साली मराठा व जैन बोर्डिंगची स्थापना केली. १९०६ साली शाहू महाराजांनी प्रतिष्ठित मुस्लिम लोकांची बैठक घेऊन मोहेमेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून त्याअंतर्गत मुस्लिम बोर्डिंग सुरू केले. विशेष म्हणजे शाहू महाराज स्वतः या बोर्डिंगचे अध्यक्ष झाले. मुस्लिम बोर्डिंगसाठी शाहू महाराजांनी २५० चौ. त्यावर इमारत बांधण्यासाठी सागवान लाकूड व ५५०० रुपये दान दिले आणि त्या ठिकाणी दुमजली इमारत उभी राहिल्याचे पाहिले. तसेच वार्षिक २५० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी शाहू महाराजांनी दिलेले योगदान मुस्लिम समाज कधीही विसरू शकत नाही. मुस्लिमांचे शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केले. आजही मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष शाहू महाराजच आहेत. शिवछत्रपतीप्रमाणेच शाहू महाराजांनी परधर्मीय म्हणून मुस्लिम लोकांचा कधीच तिरस्कार केला नाही. उलट त्यांच्या धर्माविषयी नेहमीच आदर बाळगला, याची अनेक उदाहरणे शाहूचरित्रात विखुरलेली आहेत. कुरआन हा धर्मग्रंथ अरबी भाषेत व अरबी लिपीत असल्याने त्याचा अर्थ सामान्य मुस्लिमांना समजत नव्हता. कुरआनातील धर्मतत्त्वांचा अर्थबोध सामान्यासही झाला पाहिजे, अशी इच्छा बाळगून महाराजांनी त्याचे मुस्लिमांना समजणाऱ्या देवनागरी (मराठी) लिपीत करून ते प्रसिद्धही केले होते. त्यासाठी कोल्हापूर दरबारची २५ हजार रुपयांची मोठी रक्कमही खर्ची घातली होती. शाहू महाराजांनी आपल्या कारकिर्दीत मुस्लिम समाजाच्या मशिदीसाठीही अर्थसाह्य आणि रिकाम्या जागांच्या देणग्या दिल्याचे अनेक दाखले आढळतात. कोल्हापुरात नव्यानेच वसविलेल्या शाहूपुरी या पेठेत मशीदच नव्हती, तेव्हा तेथील मुस्लिमांची कुचंबणा होऊ नये म्हणून महाराजांनी शाहूपुरी पेठेत जागा तर दिलीच शिवाय मशीद बांधकामासाठी एक हजारांहून अधिक रक्कम मंजूर करून दिली. शाहू महाराज सुशिक्षित होते. केंब्रिज विद्यापीठाने त्यांना एलएलडीची मानद पदवी दिली होती. पण त्यांचे वाचन-लेखन हे जगभरातील क्रांतिकारी सिद्धांतांची समीक्षा करू शकणाऱ्या आपल्या अनेक ज्ञानी माणसांसारखे नव्हते, तर त्यांच्या जीवनात अंमलबजावणीच्या नावाखाली समाज त्यासाठी तयार नाही, असे ते म्हणू लागतात. शाळांमध्ये मोफत शिक्षण, शाळांचा प्रसार, मोफत वसतिगृहे, अस्पृश्यतेच्या विरोधात मोहीम, ब्राह्मण पुरोहित पद्धती मोडीत काढणे, आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे, देवदासी पद्धतीवर बंदी, मुलींसाठी शिक्षण व्यवस्था, महिलांचा मालमत्तेवरील हक्क, देवस्थानांच्या मालमत्तेवर राज्याचा हक्क,  दलित कुटुंबांना थोडीफार जमीन देऊन बंदिस्त करण्याची परंपरा संपवा, दलितांवर पहिल्यांदाच रुग्णालयात उपचार व्हावेत, अशी  व्यवस्था करा. ६ मे १९२२  रोजी वयाच्या अवघ्या  ४८ व्या वर्षी मृत्यू होण्यापूर्वी शाहू महाराजांनी २८ वर्षांच्या राजवटीत हे सर्व केले होते! भारतात सामाजिक समता व न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांचे पुरस्कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी त्यांचे गाढे संबंध होते. आज आपण देशाच्या राज्यघटनेतील आरक्षण रद्द करणे हे वंचितांसाठी लागू झालेले आपण पाहत आहोत. शाहू महाराजांचे योगदान इतके मोठे आहे की, नजीकच्या इतिहासात एका व्यक्तीने एवढे काम दाखविले आहे, हे ऐकावे असे मिथक वाटते. शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये शिक्षणावर एकूण मिळकतीचा सहावा भाग खर्च करीत असत. ते म्हणत, जर माझी जनता शिक्ष‍ित झाली तर माझे राज्य मी सर्वसामान्यांच्या हातात देईल. संविधानामध्ये अंतर्भूत असलेली धर्मनिरपेक्षतेमुळे राष्ट्रीय एकात्मता टिकून आहे. आज काही प्रमाणात देशाची स्थिती वेगळी आहे.

- शाहजहान मगदुम

कार्यकारी संपादक, 

मो.:८९७६५३३४०४


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget